Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 23, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 23, 2006 « Previous Next »

Meenu
Wednesday, June 21, 2006 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तीथेच आहे अजुन
त्याच वेड्या वळणाशी
मधुर तुझ्या आठवणी
धीर द्यायला माझ्यापाशी


Maharaj
Wednesday, June 21, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवण तुझी मृगेची धार
वाहू दे त्यात जीवणाचा सार

तो आला काय नी गेला काय
कर त्याला बाय.....बाय


Rupali_rahul
Wednesday, June 21, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृगाच्या पावसासारख तुझं
अवचित येउन जाणं
तु जाउनही माझं
बेहोशीतच रहाणं

त्या धुंदितच कैक वेळा
मला जगाचा विसर पडतो
तिथे हजर असुनसुद्धा
माझा मी कधीच नसतो

त्यावेळी माझे प्रतिबिंब
कधीच स्वतःचे नसते
त्यातसुद्धा नेहमीच मला
तुझीचं हसरी छबी दिसते...

रुप...


Swaroop
Thursday, June 22, 2006 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्याशी भांडण झाल्यावर,
त्या दिवशीच्या पानावर मी काहीच नाही लिहित......
उगाच कशाला खाडाखोड,
उद्या मिटणार असते भांडण, मला आधीच असते माहित......


Meenu
Friday, June 23, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ असं आहे तर !
तरीच तुझ्या रोजनिशीतली ,
शेवटची काही पानं कोरी आहेत ...
आपलं अखेरच भांडण मिटण्याच्या
प्रतिक्षेत !!!


Jo_s
Friday, June 23, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूच आपल्या प्रेमाची आठवण
कुठेतरी सांडली होतीस
मी कुठे भांडलो तुझ्याशी
तूच माझ्याशी भांडली होतीस


Rupali_rahul
Friday, June 23, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भांडणातसुद्धा चुकुन
तु गोडं हसतेस
तुझ्या गालावरची खळी तेव्हा
माझ्या मनात उतरते...

रुप...


Jyotip
Friday, June 23, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल भांडण म्हणजे
श्रावण सर आहे..
ऊन वाढायच्या आधीच
सरींची बरसात आहे


Krishnag
Friday, June 23, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपलं भांडण म्हणजे मिष्टान्नातील
डावं उजवं तोंडी लावणं आहे
गोजिरवाण्या बाळाच्या भाळीचं
गालबोटाचं लेणं आहे


Sarivina
Friday, June 23, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अबोला, भांडण खरं तर एक बहाणा असतो
तुझ्याशी न बोलता.......
तुझ्या आठवणीत रमण्याचा माझा इरादा असतो


Swaroop
Friday, June 23, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु..... मस्तच!

राहु देत काही पाने कोरी,
त्याच फारसं काही नाही....
पण मिटल पाहिजे भांडण,
संपण्याआधी वही....


Shyamli
Friday, June 23, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा स्वरूप.....

वहीतल भांडण वहीतच
रहाव
उगाचच आपण खरंखरं का
भांडाव

श्यामली!!!


Shyamli
Friday, June 23, 2006 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भांडु या खोटंखोटं
म्हणुन खेळ सुरु केला
मिटणार कस आता
हा तर भलताच घोळ झाला

श्यामली!!!


Shyamli
Friday, June 23, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणितरी यावं
चार शब्द बोलाव
आपल हे भांडण
वाट्तय आता संपाव

श्यामली!!!


Meenu
Friday, June 23, 2006 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असतं एखादं भांडणं
कधी न मिटणारं ,
संपली वही तरी
शब्दही न उठणारं ,
काळीज मात्र त्याच्यासाठिच
आत तीळ तीळ तुटणारं ...


Meenu
Friday, June 23, 2006 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असलं भांडण तुला सांगते
जीवाला चटका लावुन जातं ...
कधीही न भरणारी
एक जखम ठेवुन जातं ....
वाहुन संपल पाणी तरीही
कोरडा हुंदका ठेवुन जातं ...


Meenu
Friday, June 23, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलेलही येऊन कुणी
चार शब्द तुझ्यासाठी ....
पण खर सांग तेवढ्यावरच
थांबलय का हे कधी ...?

चार शब्दांचे न कळतच
आठ शब्द होऊन जातील ...
कळण्याआधी तुलाही
सीमारेषा पुसट होतील ...

मखमली पायघड्या
विस्कटुन तु जाऊ नको ...
आपल्या पायी स्वत:हुन
काटे पसरुन जाऊ नको ...

मृगजळामागे वेडे फुका अशी धाउ नको


Meenu
Friday, June 23, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही तरी सांगा ना एवढचं एकदा
तेवढाच दिलासा वेड्या मनाला माझ्या

की वाटतं त्यालाही माझ्याबद्दल प्रेम
तोही आहे आतुर भेटीला माझ्या

रात्रभर त्यालाही लागत नाही झोप
येतात डोळे भरुन त्याचे काळजीने माझ्या

शेवटी फक्त एवढचं सांगा की
येणार आहे लवकरच तो भेटीला माझ्या


Meenu
Friday, June 23, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोरडा हुंदका वाटत नाही का
तितकासा प्रभावी .....?
डोळ्यातुन वाहणार्‍या
पाण्याच्या अभावी ...


Meenu
Friday, June 23, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपार दु:खाला
एकच उतारा
आईच्या कुशीचाच
फक्त निवारा





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators