Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 14, 2006 « Previous Next »

R_joshi
Tuesday, June 13, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत :-)

शब्द म्हणजे
माझ्या भावनांचे गुढ
शब्द म्हणजे
माझ्या अस्तित्वाचे मुळ

मी बनले शब्दांमुळे
शब्द माझ्यामुळे बनले नाहित
जीवनाच्या वाटेत ते मला
कधिच एकटे टाकून गेले नाहित.

प्रिति


Aavli
Tuesday, June 13, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


शब्दाच्या दुनियेत एवढी कशी रमते,
शब्दाच्या संगतीने शब्दाचीच होते.


Aavli
Tuesday, June 13, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


शब्दाच्या दुनियेत एवढी कशी रमते,
शब्दाच्या संगतीने शब्दाचीच होते.


Meenu
Tuesday, June 13, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भावनांपेक्षा का शब्द मोठे ?
करायला व्यक्त भावना शब्द थोटे
किती तरी वेळा गोंधळ करुन ठेवतात
मला म्हणायच असतं एक शब्द तिसरच सांगतात


Meenu
Wednesday, June 14, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्द नुसते पोकळ
संवादाचे माध्यम केवळ
आवाजाच्या पट्टीनीही हलतात जे
पट्टीबरोबर अर्थही बदलतात ते


Archanamandar
Wednesday, June 14, 2006 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्द कधी सहवास
कधी नुसताच भास
शब्द सुटकेचा निःश्वास
कधी शब्द कारावास.


Archanamandar
Wednesday, June 14, 2006 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दांचेच खेळ सारे
शब्दांचीच सारी माया
शब्द शब्दालाच देती
नवा जीव नवी काया


Shyamli
Wednesday, June 14, 2006 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी शब्द कारावास.>>>
व्वा!!!
फारच छान...
आवडला हा शब्द


Meenu
Wednesday, June 14, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नको गुंतुस फार शब्दांमधे
मौनाला नको समजुस तु साधे
म्हणुनच शब्द चांदी
अन मौन सोने म्हणुन गेले मोठे


Meenu
Wednesday, June 14, 2006 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दांच्या पलिकडचा
शोध तु अर्थ ..
त्याची होईल मदत
करायला जीवन सार्थ


Meenu
Wednesday, June 14, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' ध ' चा ' मा ' झाला
आणी झाला केवढा अनर्थ
फक्त शब्दांवर विसंबल्याचा
हा झाला परीणाम
म्हणुन सांगते शब्द हे नाही
केवळ परिमाण


Kanishka
Wednesday, June 14, 2006 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम राम मी नविन मायबोलि कर

R_joshi
Wednesday, June 14, 2006 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कनिशका मायबोलिवर आपले स्वागत आहे. :-)

शब्द सांगतात जरी दुहेरी अर्थ
तशाच भावना हि करतात व्यक्त

मौन आहे सोने हे मी नाकारत नाही
पण प्रत्येक वेळाच त्याचि जादु चालत नाही

मन मोकळे करायचे असेल तर शब्दच लागतात
मांणसातील नात्यांचा ते एक अस्पष्ट दुवा असतात

प्रिति


Sumati_wankhede
Wednesday, June 14, 2006 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दांना कुठले कुंपण, शब्दांना कसले बंधन
शब्दांचे चहू दिशांनी.... पसरलेले अंगण
शब्दांचा अमोल ठेवा.. जणू श्रीकृष्णाचा पावा
शब्द.. गंगा, भगिरथ अन शब्द राधेचे मन!


Aavli
Wednesday, June 14, 2006 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दावाचुन कसे कळले शब्दाच्या पलिकडले....

मराठी भावगीत.......


Archanamandar
Wednesday, June 14, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थकतात नेत्र जेथे
तेथेच भेटशी तू
सरतात अर्थ जेव्हा
तेव्हाच बोलशी तू.


Vaibhav_joshi
Wednesday, June 14, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह !!!
मस्तच एकदम


Archanamandar
Wednesday, June 14, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'शब्द' पासून थोडी फारकत घेऊन....

क्षण हाच सादावलेला
क्षण हाच नादावलेला
क्षण हाच ओढावलेला
क्षण हाच निर्ढावलेला.

अर्चना.


R_joshi
Wednesday, June 14, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्चना उ त्त म :-)

तुझ्या नेत्रात माझि स्वप्ने
बहरताना मी पाहिली
आणि अश्रुंच्या धारेतुन
वाहुन जाताना हि मीच पाहिली


Archanamandar
Wednesday, June 14, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा जोशी...
अजून काही...

काही क्षण भाळायचे, काही सांभाळायचे
काही क्षण गाळायचे, काही उगाळायचे.

अर्चना.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators