Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 06, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 06, 2006 « Previous Next »

Poojas
Tuesday, June 06, 2006 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला नाही म्हणवत नाही..
म्हणून मी तुझे शब्द झेलते..
खरंतर..
असंख्य नजरांचे तीक्ष्णं बाण
मी आपल्या मैत्रीखातर पेलते..!!


Rupali_rahul
Tuesday, June 06, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिथ्य आभासातही त्या
तुझा प्रेमळ सहवास
या मनाने घेतलाय
तुझ्याच प्रेमाचा ध्यास…

रुप…


Poojas
Tuesday, June 06, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप्स.. लोपा..

तुझ्या प्रेमाचं अत्तर माझ्या
ह्रदयाच्या कुपीत लपलं आहे..
तू नसल्यावर त्याचा दरवळ..
यातच तुझं असणं मी जपलं आहे..


Lopamudraa
Tuesday, June 06, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु समोर आलास की
शब्द गळ्यातच अडकतात..
नजरही मला सोडुन पळते...
आणि मी वेडी कोणाची तरी सोबत
मिळेल का म्हणुन..
बावरी कळी होते...!!!


Poojas
Tuesday, June 06, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू समोर असलास
की मला काहीच स्मरत नाही...
पण तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी
शाईच पुरत नाही..!!


Lopamudraa
Tuesday, June 06, 2006 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु समोर आल्यावर
माझं मला अस्तीत्वच
जाणवत नाही..
एक शिल्प भान विसरलेले
एव्हढीच माझी ओळख उरते...!!!


Lopamudraa
Tuesday, June 06, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु समोर आल्यावर.
ओळखीचे शब्दही आठवत नाहित..
तुला आठवतांना...
कवितेला शब्द उरत नाहीत...!!!


Rupali_rahul
Tuesday, June 06, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पथ तुस्सि ग्रेट हो, लोपा, पुजा......

Rupali_rahul
Tuesday, June 06, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मागे पोस्टलेली..
अबोलच शब्द माझे,
अबोलीच माझी कहाणी,
अव्यक्त राहिल्या भावना,
मुकिच राहिली वाणी...

रुप...


Lopamudraa
Tuesday, June 06, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु समोर तरी
कागदावर तुझेच
नाव गिरवणे

तुझ्या नजरेचे उखाणे..
झाले माझ्या जगण्याचे बहाणे...!!!


Poojas
Tuesday, June 06, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या इतकंच माझं मन
तुझ्यासाठी वेडं आहे..
तरी सुद्धा तुझं मन
माझ्या साठी कोडं आहे..!!


Poojas
Tuesday, June 06, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू अबोला धरलास की
माझ्या रात्री जागतात..
माझे श्वासच माझ्याशी
अनोळखीपणे वागतात..!!


Rupali_rahul
Tuesday, June 06, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या मनाची कोडी,
माझ्या मनातच सुटतातं,
त्या कोड्यांचे भावार्थ,
माझ्या मनात उमटतातं...

रुप...


Devdattag
Tuesday, June 06, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलणे तिचे मुक्याने
अन काळजाचा ठोका चुके
बोलतांना अमुचे अताशा
शब्दही होती मुके


Poojas
Tuesday, June 06, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या असंख्य भावनांनी
तुझ्या अस्तित्वाला वेढलं आहे..
कारण..
तुझ्या आठवणींचं पिंपळपान
माझ्या मनाच्या पुस्तकात दडलं आहे..!!


Devdattag
Tuesday, June 06, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते तुझे शब्दांनी
मला कोडी घालणे अन
मग हळूच डोळ्यांनी
त्यांचे उत्तर सांगणे


Rupali_rahul
Tuesday, June 06, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुके मुके राहुन माझे,
तुला पहात रहाणे,
क्षणभंगुर भेटित त्या,
माझ्या मनात सामावुन घेणे...

रुप...


Poojas
Tuesday, June 06, 2006 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझा मुका संवाद मला
मनापासून जाणायचाय..
तुझा श्वास डोळ्यात साठवून
माझ्या मनात आणायचाय..!!


Devdattag
Tuesday, June 06, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलणे माझे असे का
सांग कुणीही जाणले
मग माझ्याही जाणीवेने
व्रत मुक्याचे बाणले


Poojas
Tuesday, June 06, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरी आपल्या दोघांमध्ये संवादाचा अभाव असेल..
तरी आपल्या श्वासांमध्ये सहवासाचा भाव असेल..
हाच भाव जगण्यासाठी श्वास देत जाईल.. अन..
आपल्या संवादाची नौका पुढे नेत राहील..!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators