Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 01, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » ललित » साकुरा फुलला, साकुरा फुलला ( Cherry Blossom ) » Archive through April 01, 2006 « Previous Next »

Kandapohe
Friday, March 31, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जपानमधे अत्यंत फोटोजेनीक अशा समजल्या जाणार्‍या गोष्टी आहेत त्या म्हणजे, माउंट फुजी
( Mt. Fuji ), किंकाकुजी ( Golden Temple ), कोयो (Autumn colors) आणि फुलणारा साकुरा ( Cherry Blossom )

या पैकी माउंट फ़ुजी विषयी गतवर्षी मी गुलमोहोर वर लिहीले होते. किंकाकुजी व कोयो विषयी लिहावेसे वाटले नाही पण साकुरा बद्दल लिहणे मात्र राहवले नाही. खरे तर तो बघण्यात जास्ती मजा आहे पण तरी एक प्रयत्न करत आहे.

जपानला भेट द्यायची असेल तर मार्च्-एप्रिल आणि ऑक्टोबर हे महीने सर्वात चांगले समजले जातात. त्याचे मुख्य कारण ऑक्टोबर महीन्यातील लालबुंद कोयो आणि मार्च किंवा एप्रिल महिन्यात फुलणारा साकुरा.

या दोन महीन्यात निसर्गाची मनमोहक रंगसंगती बघायला मिळते. ऑक्टोबरमधे आधी पिवळा व नंतर लालबुंद अशा रंगाची उधळण करत गुलाबी थंडीचे आगमन होते, तर मार्च एप्रिलमधे निळ्या, पिवळ्या आणि लाल रंगाची फुले बघायला मिळतात. थंडीनंतर पानगळ झालेल्या आणि फक्त काटक्या शिल्लक राहीलेल्या झाडावर अचानक झालेला निसर्गाचा रंगीत शिडकावा बघताना मन प्रसन्न, उल्हासीत होउन जाते.

भारतात असताना जसे मला पारीजातक (प्राजक्त), बकुळ, पांढरा चाफा, रातराणीच्या फुलांचे आकर्षण होते तसेच आकर्षण जपानच्या अनऑफीशल राष्ट्रीय फुलाबद्दल अर्थात साकुरा बद्दल आहे.

जपानमधे महायुद्धानंतर हेलीकॉप्टरने अनेक ठिकाणी बिया टाकुन झाडे लावली गेली. या मधे जी झाडे होती त्याचे दुष्परिणाम संपुर्ण जपानमधे होत आहेत. यातील अनेक झाडांमुळे उडणार्‍या परागकणांनी अनेकांना त्रास होतो व सर्दी, खोकला, घसेदुखी, डोळे चुरचुरणे चालु होते. वृक्षलागवडीचे फायदे सगळ्यांना माहीत असतात पण तोटा प्रथमच जपानला आल्यावर कळला. अर्थात फायदे जास्ती आहेत.

थोडेसे विषयांतर झाले पण सांगायचे हे होते की जपानमधे आनेक ठिकाणी मुद्दाम साकुराची झाडे सलग लावलेली आहेत. हे सगळे मार्ग आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, महात्मा गांधी मार्ग जसे अनेक शहरांमधे आहेत तसेच जपानमधे साकुरा मार्ग आहेत. हे सगळे रोड साकुराच्या दिवसात दिव्याने प्रकाशीत केले जातात. दुतर्फा असलेली साकुराची झाडे, मंद पेटलेले दीवे हे फारच छान, नयनरम्य असे दृश्य असते. अगदी शुक्रतारा मंदवारा आळवण्या एवढे अप्रतीम.

साकुराची फुले फुलण्याआधी साधारण तशीच पण थोडे भडक गुलाबी रंगाची फुले उमे ( Plum Tree ) च्या झाडावर फुलतात आणि आता साकुरा बघायला मिळणार हे जाणवायला लागते. याच उमेची वाईन (Plum Wine) बनवली जाते. उमेच्या फुलांमधे अनेक छटा आहेत. फिकट गुलाबी पासुन लाल रंगापर्यंत.

एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते, की इतकी साकुराची लागवड असुनही जपान, अमेरीकेतुन चेरी आयात करते. इथल्या बाजारात जपानी चेरी फार कमी दिसतात व अमेरीकन चेरीने जास्ती मार्केट शेअर घेतलेला दिसतो.

उमेची फुले आणि हवेत वाढलेला उबदारपणा साकुराच्या आगमनाची वर्दी द्यायला लागतात. साकुराचा बहर म्हणजेच जपान मधे वसंत ऋतूचा प्रवेश. फिकट गुलाबी रंगाने भरगच्च बहरलेले झाड पाहुन इथल्या कविंना नक्कीच नविन कल्पना सुचत असतील. आकाशात विमान उडत जात असले की कीतीही प्रगत देशातील लहानग्यापासुन वयोवृद्धाला सुद्धा जसे वर बघायला लावते (हा माझा समज आहे) तसेच बहरलेले, गुलाबी फुलांनी लगडलेले साकुराचे झाड दुर्लक्षीत असुच शकत नाही.

साकुरा बघणे हा वेगळाच कार्यक्रम असतो जपानमधे. या बघण्याच्या कार्यक्रमाला हानामी (हाना = फुले, मी = बघणे) असे म्हणतात. असाच आणखी एक कार्याक्रम जपानी माणुस आपल्या कुटुंबासोबत बघतो. तो म्हणजे हानाबी (Fireworks) (हाना = फुले, बी = आग). एरवी सोमवार ते शुक्रवार सदैव कामात असलेला जपानी माणुस, हा वेळ मात्र आपल्या कुटुंबास देतो. साधारण सगळे कुटुंब किंवा प्रेमी युगुले हे दोन्ही कार्याक्रम बघायला गर्दी करतात. येतानाच आपण कोजागीरी साजरी करताना करतो तशी तयारी करतात व खाद्यपदार्थ, बीअर, पाणी, जपानी चहा, बसायला प्लॅस्टीक आणतात वर दिवसभर गप्पा मारत, खाण्याचा आस्वाद घेत, बीअर पीत, फोटो काढत आनंदात दिवस घालवतात. जाताना आपण केलेला कचरा व्यवस्थीत एका पिशवीत गोळा करुन तो कचरापेटीत टाकतात.

याचे औचित्य साधुन, गेले काही वर्ष जपानमधील भारतीय दुतावासातर्फे, साकुरा बाजार चॅरीटी, हा कार्यक्रम दरवर्षी आयोजीत केला जातो. भारतीय दुतावास ज्या ठिकाणी आहे तो भाग टोक्योमधे साकुराकरता प्रसिद्ध आहे. जपानी लोकांना निरनीराळे खाद्यपदार्थ टेस्ट करायला आवडते. गेल्या काही वर्षात भारतीय पदार्थाची आवड वाढते आहे. त्यामुळे जपानमधील अनेक भारतीय संस्था एकत्र येवून वेगवेगळ्या पदार्थांची विक्री, मेंदी काढणे, भारतीय कपड्याची विक्री केली जाते. अनेक संस्थेचे स्वयंसेवक यात भाग घेतात व त्यातुन मिळणारा नफा भारतीय दुतावासाला दिला जातो. जो नंतर भारतातील सेवाभावी संस्थांना वाटला जातो.

साकुरा जसा येतो तसाच भुर्‍कन निघुन जातो. वर्षातुन एकदाच फुलणार्‍या या फुलाचे आयुष्य फक्त एक आठवडा असते आणि चौथ्या पाचव्या दिवशीच पाकळ्या गळायला सुरुवात होते. जरी साकुराचा मोसम संपला तरी उत्साह, उल्हास कायम रहातो परत एकदा साकुरा बघण्यासाठी. परत एकदा वसंत ऋतुचे आगमन झाले की मोगरा फुललाच्या चालीवर साकुरा फुलला साकुरा फुलला गुणगुणावेसे वातते.

समाप्त.

टीप मुद्दाम अनेक लिंक दिल्या आहेत ज्याला टिचकी मारली तर फोटो बघता येतील.


Shyamli
Friday, March 31, 2006 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सुन्दरच दिसतोय हा साकुरा.....

वाचुन आणि फोटो बघुन
खरच बघावा वाटायला लागला आहे.....



Ruma
Friday, March 31, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान रे केपी.. मस्तच
एकदम साकुरा दोन्ही कडेने असलेला रस्ता समोर आला..


Sanghamitra
Friday, March 31, 2006 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांद्या सही लिहीलंय. अगदी डोळ्यासमोर उभे रहातात ते साकुरा रोड्स. फोटो सुद्धा टाक ना जमलं तर.


Meenu
Friday, March 31, 2006 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदापोहे.. छान लिहीलयस रे अगदी आटोपशीर
आकाशात विमान उडत जात असले की कीतीही प्रगत देशातील लहानग्यापासुन वयोवृद्धाला सुद्धा जसे वर बघायला लावते
हा तुझा समज अगदी खरा आहे... निदान मलाही तसच वाटत...

खूप महिने आहेस वाटत जपान मधे...


Rahulphatak
Friday, March 31, 2006 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा केपी, छान माहिती लिहीली आहेस ! फोटोही सुंदर आहेत !
एकच आठवडा असणारा हा पुष्पोत्सव काही कारणाने चुकला तर चुटपूट लागत असेल त्या सुमारास परदेशी जाणार्‍या जपान्याना, आणि आधी किंवा नंतर जपान भेटीवर येणार्‍या परदेशी लोकाना...


Champak
Friday, March 31, 2006 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good KP .. .. ..!:-)

Psg
Friday, March 31, 2006 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केपी, छान माहिती.. फ़ोटोहि मस्त आहेत. एखाद्या मासिकात लेख छापून येऊ शकतो हा तुझा इतका informative आहे! :-)

Deemdu
Friday, March 31, 2006 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केप्या तुझ्याकडुन इतक्य चांगल्या लेखाची अपेक्षा नव्हती रे :-)

:DDDDDDD
दिलेत ते सगळे दिवे घे रे भाऊ

Chinmay
Friday, March 31, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा कांद्या सही लिहिलय...
साकुरा बाजारात मस्त बटाटेवडे खा रे भो...:-)


Rajkumar
Friday, March 31, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहीलयस रे.
म्हणजे जपानी लोकही विरंगुळा शोधतात तर..


Zelam
Friday, March 31, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच लिहिलय रे.
फोटो पण मस्त. खूप ऐकलय या साकुराबद्दल. जायला पाहिजे एकदा जपानला.


Lalu
Friday, March 31, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केपी, छानच लिहिलं आहेस. तिकडच्या चेरी ब्लॉसम फेस्टिवलची माहिती मिळाली.
वॉशिंग्टनच्या लोकांनाही याची ओळख आहे. इथे लावलेली झाडे जपानी लोकानी भेट म्हणून दिलेली आहेत. या वीकएन्डलाच इथला पीक आणि फेस्टिवल पण आहे. खच्चून गर्दी असते. वॉशिंग्टनच्या पर्यटन सीझनची ही सुरवात. मागे मी फोटो टाकले होते.
तू काढलेले तिथले फोटो असतील तर टाक रे.


Rachana_barve
Friday, March 31, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच लिहिल आहेस केपी. .... ..... ...


Ninavi
Friday, March 31, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदेपोहे, सुंदर वर्णन केलंयस. लिंक्स पण मस्त आहेत.
आम्हाला इथे बसल्या जागी हाना मी ( !!!!) झाला(ली?)


Seema_
Friday, March 31, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच , आवडल एकदम . फ़ोटो बघुन तर फ़ारच मस्त वाटल .

Maanus
Friday, March 31, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! लहानपनी बालचित्रपट मोहत्सवात एक जापनीज सिनेमा पाहीला होता. त्याची आठवन झाली. त्यात बहुतेक हेच झाड दाखवले होते.

अमेरीका काहीतरी export करते हे पन नव्यानेच कळाले :-)


Arch
Friday, March 31, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनायक, छन लिहिल आहेस. तिथला Autumn फ़ारच सुंदर दिसतोय. आपल्याकडे जसे माणसांना फ़ुलांची नाव देतात तसे तेथे कोणाच नाव साकुरा असत का?

Chinnu
Friday, March 31, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे केप्या! अजुन येवु द्या..

Kalandar77
Friday, March 31, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलंयस रे KP!

Tulip
Friday, March 31, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!! अगदी छान. सुंदर फुलांच सुंदर वर्णन.

Ek_mulagi
Friday, March 31, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो Arch ,असत, म्हणजे आहे नाव " साकुरा " ,
माझ्या मित्राची मुलगी,
पुढच्या वीक मध्ये "साकुरा" एक वरषाची होईल.
त्याची बायको जपानी आहे.


Karadkar
Friday, March 31, 2006 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

KP छान लिहिले आहेस. जरा तू स्वतः काढलेला एक फोटो टाक.

Kmayuresh2002
Saturday, April 01, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांद्या,सही रे भो... भारतात येताना माझ्यासाठी घेऊन ये रे साकुरा:-)

Krishnag
Saturday, April 01, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केपी झक्कास, फोटोमुळे लिखानाची लज्जत वाढविली!!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators