Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
चित्रकविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » चित्रकविता « Previous Next »

Krishnag
Monday, June 19, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्येष्ट महीना सरत आला तरी एकही चित्र काव्य नाही!!

वारकरी निघालेत ह्याच्या भेटी ग्यानबा तुकारामासंगे

vithu

Vaibhav_joshi
Monday, June 19, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृष्णा ... पंढरपूर जवळ जन्मलो .. वाढलो ... अलिकडे कितीतरी दिवस जाणे नाही झाले .. आणि हा जो तू फोटो टाकला आहेस ना हा आमच्या घरात कित्येक पिढ्यानपिढ्या आहे .. ह्या फोटोसमोर दर गुरुवारी भजन व्हायचं ... ह्याला मी माझ्या लहान लहान हातांनी अबीर, गुलाल लावला आहे ... थोडंसं सेंटी व्हायला होतं खरं म्हणूनच मी आज पहिल्या शब्दापासून जे लिहायला सुरुवात करणार आहे ते शेवटपर्यंत न थांबता लिहीणार आहे ... जे उतरेल ते सगळ माऊलीचरणी अर्पण

किती किती वर्षे झाली
भेट नाही माऊलीची
जन्म कोरडा चालतो
वाट शुष्क पाऊलीची

तुझ्या अंगणी वाढलो
नाव काढले जगात
तरी अस्तित्व राहिले
तिथे तुझ्या पदरात

किती वेळा भरोनिया
आले होते ह्या आभाळी
नाही बरसले काही
ऊन लिहीलेले भाळी

ऊन सोसता सोसता
वेळ जायची जाहली
मला ठाऊक नाही ही
यात्रा कुठेशी चालली

कसे जायचे परी मी
भेटीविना निघोनिया
रूप साठवून तुझे
घ्यावे डोळे मिटोनिया

असे इच्छिताच माई
जीव वारकरी झाला
ओलांडून देह आता
तुझ्या भेटीला निघाला


Krishnag
Monday, June 19, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव अप्रतीम!!

ह्या पंढरीनाथाकडे पाहिल्यावर मन कसं अंतर्बाह्य उचंबळून येतं.

तुझ्या शब्दांनी अजूनच भर घातली!


Moodi
Monday, June 19, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा
नाम तुझे घेता देवा म्हणुनी आठवावे
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो...( माऊली बघुन हाच अभंग पण आठवला)

वैभव फार सुंदर लिहीलेस माऊलीविषयी( खरोखरची विठोबा माऊली). तुझी ही अभंगरूपी प्रत्येक हाक जशी अंतरातुनच प्रकटलीय.


Meenu
Monday, June 19, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रे वैभव अगदी खरच मनापासुन लिहीलस बघ आणी भक्तीरसात न्हाऊ घातलस ...
krishna धन्यवाद हा फोटो ईथे टाकुन चांगल लिहायची संधी दिलीस


Meenu
Monday, June 19, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विठु माऊली

सावळी तुझी मुर्ती
माया पाझरते दिठी
म्हणुनी तुज भक्त
सारे माऊली म्हणती

असा तुची एक देव
ज्याला माऊलीचा मान
जरी नाही जन्मदाता
सोसे प्रसववेदना

तुझ्या नामाचा गजर
व्यापे आसमंत सारा
भारावुनी भक्त चाले
पुर्ण पालखी सोहळा

जन्मी एकदा तरी या
पालखीचा योग यावा
जन्म मज पामराचा
देवा सार्थकी लागावा


Jo_s
Tuesday, June 20, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मिनू
सुंदरच
माझाही एक प्रयत्न

पहा वीट पायीची ती
आहे किती भाग्यवानं
जिच्या वर झाले तिथे
विठोबा हो स्थापनं

किती भाग्य थोर तिचे
साधले जवळचे स्थानं
त्याच्या सवे होई नित्य
पंचांमृताचे हो स्नानं

नसे गर्व जरी तिथे
माथा टेकती सरेजणं
मनोमनी जाणते ती
आपुले नेमके स्थानं

जगासाठी इतकी युगे
भार साहे विठ्ठलाचा
कुणी मानेना आभार
नाही शब्द हो प्रेमाचा

किती झाली तरीही
इश्वराशी एकरुप
नाही पुसटही सिमा
भासे जणू विठ्ठल रुप

सुधीर


Aavli
Wednesday, June 21, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्याच प्रेमासाठी
सोडीले वैकुन्ठ
पायी धरीयली आता
पुन्डलिकाची वीट......

युगे अठ्ठावीस उभा
चंद्र्भागे तीरी......
वाट पाहे सदा
भक्ताचा श्रीहरी......

उठूनिया तुम्ही सर्व
आता करारे तयारी
जवळी आली रे
आता पंढरीची वारी.....

निघाली रे दिन्डी
सज्ज सारे वारकरी.........
मुखी गर्जती घोष
जय जय राम कृष्ण हरी...


...............आअपली आवली
पंढरीनाथा............. तुझ्याच चरणी आता..............




Swara
Thursday, June 22, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृष्णा, किती छान आहे माउलीच ध्यान.
वैभव सुंदर.
मिनू, सुधीर, आवली छान.
एक ओंजळ माझी...


डोक्यावर मुकुट तो
सर्प वर कोरलेला||
वाट पाहत भक्ताची
तू रे इथे थांबलेला||१||
तुझ्या भाळावरि टिळा
चंदनाचा दरवळे||
आणि कानात कुंडल
सुंदरसे हाले डुले||२||
कटेवरी हात तुझे
डोळी भाव दाटलेले||
विटेवरी उभा असा
मनी रुप साठलेले||३||
मन माझे देवा तुझ्या
रुपाने हे भरलेले||
आता तुझ्या दर्शनाचे
कारण ना उरलेले||४||
देवा तुझे देवपण
भक्तापाशी गळु जाई||
पांडुरंग माय माझी
लेकराते पान्हा देई||५||



Meenu
Friday, June 23, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वरा सुंदर .. ...

Antya
Saturday, June 24, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chitra kavita

Gajanan1
Sunday, June 25, 2006 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विठ्ठल महिमा
किती हा अपार
सर्व सान थोर
पूजितात.

पूजेमध्ये दन्ग
'सावळ्या ' च्या सन्गे
नाव मात्र सान्गे
'पाण्डु' रन्ग!

देवाचा रन्ग सावळा, पण नाव मात्र पाण्डुरन्ग म्हणजे पाण्ढरा रन्ग असणारा
जोशी साहेब, सावळ्या देवाला पाण्डुरन्ग हे नाव कसे बरे आले असावे?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators