Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 05, 200620 06-05-06  12:12 am
Archive through June 16, 200620 06-16-06  5:14 am

Lopamudraa
Friday, June 16, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

training दे म्हणावं त्या मदनाला थोडं
कुणालाही, कधीही करतो घायाळ
त्याचं मारलय काय आम्ही घोडं ....? ... chaan aahe kavitaa.. kahichyaa kaahii naahiye..!!!!

Jyotip
Friday, June 16, 2006 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु उत्तम.... देवाची चांगलीच काढलीयेस..

Devdattag
Friday, June 16, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मानवास,
आयला हे तुमचं बरं आहे
आमचं कुणी ऐकत नाही हेच खरं आहे
वाटलं होतं मला
की जग थोडं चेंज करू
अगदी पृथ्वीवरल्यासारखी
खाती रिअरेंज करू
म्हंटल त्याच त्याच आयुष्याला
तुम्ही झाला असाल बोर
म्हंटलं आपणच थोडी मजा आणू
लावू थोडा आणिक जोर
आदित्य आणि वरूणाची
अदलाबदल केलीय जरा
लक्ष्मी आणि विद्येलाही
वागायची वेगळी ठेवलीये तर्‍हा
विश्वकर्म्याच्या जागी आहे मदन
आणि मदनाचे टेंपररी आहे सदन
अजूनही आहे बरीच यादी
ऐकता ओली होइल गादी
आत्ता तुमची रजा घेतो
काय होइल त्याची मजा घेतो

दिवे घ्या सर्वांनी


Jyotip
Friday, June 16, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला देवा सहि रे........

Meenu
Friday, June 16, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बस का देवा म्हणजे सुधारणा करायची नाही ते नाही वर excuses..?

Shyamli
Friday, June 16, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सवाल जबाब चाल्लाय का देवाचा आणि भक्तांचा...
सही रे देवा...


Jo_s
Friday, June 16, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा मिनूस तरी म्हणायच.
दोघांच्या क्विता मस्त


Meenu
Friday, June 16, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती दिवस झाले छळत होता हा प्रश्न
राजकारणी कशी काय बुवा देउ शकतात,
सगळ्याच चुकांची समर्थनं .......?
देवा तुम्हीच त्यांचे गुरु आज उलगडा झाला
सुधारणेचा एकमेव मार्गही खुंटला


Gurudasb
Sunday, June 18, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसुंधरा हुईलगोळ [ पुणे ] यांची हि कविता [ विडंबन ] मला आवडलं .

केव्हातरी बटाटे
उकडून माय गेली
चिरले झकास कांदे
परतून फ़्राय केली
सांगितले तरी मी
मिसळू नकोस पाणी
चुकवून ध्यान माझे
उपडी करी तपेली
कळले मला न कैसी
विटली करी जराशी
कळले मलाच तेव्हा फ़सवून माय गेली
उरले घरात काही
नव्हतेच भोजनाचे
आणून ब्रेड खाल्ला
मिसळून साय जेली
स्मरला असा प्रसंग
माझ्याच जीवनाचा
स्वप्नात माय माझी
भरवून घास गेली

















Antya
Monday, June 19, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही सुचत नाही लिहायला
तरीही लिहायलाच लागेल
ज्ञानपीठ नसल तरी
थालिपीठ ख़ावच लगेल !

Aavli
Wednesday, June 21, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनंता तुझ्या लेखणीचा चेव तु
इथेच उतरव........

लिहितोयस तर लिहि..
नाही मिळालं तरी चालेल ज्ञानपीठ.!!
एक दिवस द्रुष्ट न लागण्या..
आईच लावीलं कौतुकाने तीट..!!!


Devdattag
Wednesday, June 21, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच सकाळी आमची त्या भगवंताशी भेट झालीये
त्यांना म्हंटल सर्विस तुमची आता अंडरवेट झालीये

तशा रोज सकाळी आम्ही ठेवतो येणार्‍यांवर नजरा
दिसण्यात कुठे कमी पडतो हा कळत नाही माजरा
चेहर्‍यासाठी सॅलरी आता ग्रॉसवरून नेट झालिये

करून एकदा धीर आम्ही गेलो होतो थोए जवळ
काका ऐकली हाक अन मग पडलो येउन भोवळ
माहित आहे गाडी थोडी जास्त्च लेट झालिये

आम्ही कुठे म्हणतो आम्हा पाहिजे आहे माधूरी
मागणे आमचे एकच आमची कहाणी नसावी अधूरी
तशी आमची जिंदगी एकदम राईसप्लेट झालिये

आपण बाजी मारण्याचा अगदी मनात बांधलाय चंग
नेट वरनच मैत्री केलिये दिसणार नाही आपला रंग
आता तरी तुम्ही द्या यश नीट फ़िल्डिंग सेट झालिये


Princess
Wednesday, June 21, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह देवा.... सुरेख... देवानेच देवावर कविता केलीय. देव नक्की प्रसन्न होणार तुला
प्रिन्सेस


Meenu
Wednesday, June 21, 2006 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे देवावर पण ही वेळ यावी ... ठिक आहे रे तुला अ. उ. आ. ...

Shyamli
Wednesday, June 21, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तरी तुम्ही द्या यश नीट फ़िल्डिंग सेट झालिये>>>

हो का अरे वा......
अ. उ. आ.






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators