Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
What is SSP ?

Hitguj » Health » What is SSP ? « Previous Next »

Gajanandesai
Wednesday, September 19, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SSP ही आद्याक्षरे असणारा, किशोरवयातील मुलांना होणारा हा आजार कोणता आहे?
यात सुरुवातीला सांधेदुखी सुरू होते, ती असह्य होत जाते. इतकी की ऊठबस करता येत नाही. हळूहळू रुग्णाचे त्याच्या अवयवांवरचे नियंत्रण सुटत जाते. शक्ती क्षीण होत जाते. म्हणजे हातात रिकामा ग्लासही व्यवस्थित धरता येत नाही. शब्दोच्चार नीट करण्याइतपत जीभेवर नियंत्रण राहत नाही. तोंडातून लाळ गळणे वगैरे... काहीसे मतिमंद मुलांसारखे. संवेदना शिथील होत जातात. शेवटी कोमात गेल्यासारखी स्थिती होते. आणि मग खेळ संपेपर्यंत फक्त जीवघेणी आणि सगळ्या दृष्टीने कसोटी बघणारी प्रतिक्षा उरते.

कसला आहे हा आजार? ज्यावर मुंबईतल्या नामवंत रुग्णालयांमधूनही 'अशी केस फार विरळा असते. यावर काही इलाज नाही, फक्त एक प्रयोग म्हणून औषधोपचार चालू ठेऊया' असे सांगण्यात येते. लहानपणी झालेल्या गोवर, फोड्या वगैरे आजारांचा याच्याशी काही संबध आहे का? मेंदूचा काही आजार आहे का हा?

याविषयी मला फक्त वर सांगितल्याप्रमाणे आद्याक्षरेच माहीत झाली. जास्त खोलात माहिती मिळू शकली नाही. पण जे काही पाहिले, ऐकले त्याने मी हादरून गेलो.

माहितीजालात शोधून पाहिले पण काही मिळाले नाही. इथल्या तज्ज्ञांकडून यावर काही माहिती मिळेल आणि तिचा मला व इतरांना उपयोग होईल अशी आशा आहे.

धन्यवाद.


Karadkar
Wednesday, September 19, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SS disease असा सर्च करुन मला थोडीफ़ार माहीती मिळाली :-(

पण कुणा डॉक्टरलाच विचारावे लागेल. मुकुंद तुम्ही सांगाल का?

गूगल सर्च इथे पहा
http://www.google.com/search?hl=en&;sa=X&oi=spell&resnum=1&ct=result&cd=1&q=SS+disease&spell=1


Lalu
Wednesday, September 19, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm.. :-(
Parkinson's चा प्रकार आहे का हा? नक्की माहित नाही. Parkinson's पण लहान मुलांना क्वचितच होतो. लक्षणांवरुन तसे वाटले म्हणून लिहिले...


Chchotu
Saturday, September 22, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन नमस्कार.
SSP किंवा ऍ म्हणजे सब अक्युट स्क्लेरोसिन्ग पन एन्सेफ़ालयटीस.


http://en.wikipedia.org/wiki/Subacute_sclerosing_panencephalitis

Chchotu
Saturday, September 22, 2007 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SSP/SSPऍ या रोगाबद्दल वरील लिंक वर माहिति मिळेल तसेच गुगल वर ऍ चा लोन्ग्फ़ाॅर्म घालुन इतर बर्याच साइट वर सुधा माहिती मिळेल.

Gajanandesai
Wednesday, September 26, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार प्रवीण. मी अत्यंत आभारी आहे. तो आजार हाच. तुम्ही दिलेल्या लिन्कवरची सगळी माहिती मी वाचली. तुमचे कसे आभार मानावेत तेच कळत नाही. असा आजार झालेली एक केस मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळून पाहिली आहे, आणि त्या भयानक आजाराविषयी इथे लिहिल्याशिवाय मला राहावले नाही.

मिनोती, लालू आणि सर्वांनाच मी सांगेन की, वर डॉक्टरांनी दिलेली लिन्क वेळ काढून वाचाच वाचा, आणि इतरांनाही वाचायला द्या आणि योग्य ती काळजी घ्या.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators