Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 20, 2006

Hitguj » Health » लहान मुलांचे आजार » Archive through June 20, 2006 « Previous Next »

Savani
Thursday, March 30, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा आता २२ महिन्यांचा आहे. त्याला एक आठवड्यापूर्वी ear infection झाले म्हणून dr नी antiobiotics दिले. पण २-३ दिवसापसून तो परत खुपच चिडचिडा झालाय आणि रात्रभर झोपत नाही शिवाय खूप ताप भरतो आणि tylenol दिले की २ तास ताप कमी होतो. अर्थात पुर्न उतरत नाहीच.
तर मुख्य काळजीचे कारण हे आहे की तो अजिबात कहिहि खात नाहिये. फ़क्त ज्युस आणि दुधावर आहे. काही म्हन्जे काही खात नाहिये तर मला कोणी प्लीज सुचवता का मी त्याला काय खायला देऊ? इथे dr ना विचारले की ते म्हणतात नसेल खात तर नको खाऊ देत. पण तो खूपच अशक्त झाला आहे.


Lalu
Thursday, March 30, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंगात ताप असताना काही खाववत नाही. आणि ताप पूर्ण उतरत नाही म्हणतेस तर tylenol चा डोस नीट दिला जातोय का बघ. ( तू देत असशीलच पण घरच्या चमच्याने दिल्याने डोस कमी पडल्याचे उदाहरण मी पाहिले आहे. ) Tylenol(acetaminphen) ऐवजी Motrin, Advil (Ibuprofen) देऊन बघ. ८ तासाच्या आत पुन्हा ताप आला तर मधे tylenol देता येतं. जेव्हा ताप नसेल तेव्हा गरम वरण भात, सूप असं काही घेत असेल तर दे. antibiotics चा कोर्स पूर्ण झाला का?
तुझा मुलगा लहान आहे म्हणून, पण २ वर्षाच्या वरच्या मुलांचा ताप १०२ पर्यन्त गेल्यावरच औषध द्यायला सांगतात. कारण ताप येणे म्हणजे तुमचे शरीर फाईट करत असते, तो कमी आणून आपण ती प्रोसेस स्लो करतो आणि मग बरं व्हायला वेळ लागतो. बरा झाला की Doc ला विचारुन vitamins दे.


Ashwini
Thursday, March 30, 2006 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी,

खाण्याचा आग्रह करू नको. जे काही त्याला खाववेल तेव्हढेच खाऊ दे. शक्यतो ताप असताना द्रव आहारच योग्य. पण रिकाम्या पोटी नुसते juices घेतल्याने acidity होऊ शकते. जर कफ असेल, नाक, छाती भरली असेल तर दुध पण फार देऊन उपयोग नाही.
सगळ्यात उत्तम म्हणजे वरण भाताची पातळ मऊसर, तूप मीठ घातलेली पेज. एका वेळी खूप देऊ नकोस. थोडी थोडी देत जा. मूग डाळ तो घेत असेल तर चांगलेच. नाहीतर तूर डाळ पण चालेल.
प्यायला पाणी शक्यतो कोमट दे.
ताप खूप असेल तर कपाळावर, हाता पायावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेव.

लालू म्हंटली तसे Tylenol च्या ऐवजी किंवा alternatively Motrin, Advil देऊन बघ.

चुरमुरे, लाह्या यांचे पाणी अधूनमधून देत जा. थोडे थोडे पण सतत काहीतरी liquids देणे हे सगळ्यात महत्वाचे म्हणजे dehydrate होणार नाही.

आणखी लक्षणे सांगितलीस तर घरगुती काही उपाय सुचवता येतील.


Boli
Thursday, March 30, 2006 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Regarding ear infections : It might occur due to milk intake (generally by bottle) by the child while in horizontal position (lying down). This can be avoided.

Savani
Thursday, March 30, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू, अश्विनी खूपच छान सांगितलतं ग. मला अगदी धीर आला. कारण तो काही खात नाही म्हणून मला अगदी सुचत नव्हते.
अश्विनी, अगं मला खरतर तेच विचारायचे होते की काही घरगुती उपाय करता येतील का?
जसे मी मगाशी सांगितले की dr नी ear infection असे सांगितले आहे. त्याला बराच कफ़ आहे. शिवाय सर्दी आहेच. रोज रात्री खूप म्हण्जे १०३ पर्यन्त ताप भरतो. आणि मग त्याला अजिबात झोप लागत नाही. २ एक तासानी ताप उतरतो पण अंग कोमटच असते. बाकी शी, शू मधे काही प्रॉब्लेम नाही.
अश्या वेळेस कोणती फ़ळं देऊ? तापात दुध नको का देउ? पण त्याला दुध भारी आवडते. म्हण्जे अगदी मागून घेतो. liquid पण शक्तीवर्धक असे काय काय देता येईल?


Ashwini
Thursday, March 30, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी,
ear infection असेल आणि antibiotics सुरू केले तर लागलीच ताप उतरायला पाहीजे.
हे antibiotics त्याला लागू पडत नसेल कदाचित. तू परत doctors ना विचारलेस का? माझ्या मुलाला एकदा असेच antibiotics बदलून घ्यावे लागले होते कारण पहीले काही effect च करत नव्हते.

कफ मोकळा होण्यासाठी जरा छाती, पाठ, पोट गरम कापडाने शेक. सितोपलादी चूर्ण, गुळवेल सत्व अश्या औषधांचा उपयोग होईल. पण ती नसतील तर लवंग, दालचिनी, खडीसाखर, हळद, सुंठ mix करून अगदी किंचीत मूग डाळीच्या आकाराइतके दिवसातून ३ वेळा दे. मध असेल तर मधातून दे नाहीतर नुसते दिलेस आणि वर पाणी पाजलेस तरी चालेल.
तापात दुध शक्यतो नको. अगदीच मागत असेल तर हळदीचे दे. गार पाण्याच्या पट्ट्या मात्र ठेव जर ताप १०३ पर्यंत असेल तर. पट्टी नीट पिळून घे म्हणजे त्यात पाणी राहाणार नाही.

chicken soup, vegetable soups असे बघ काही घेतो का. chicken soup मात्र clear दे.
भारतात electrolyte ची पावडर मिळायची. तसच इथे काहीतरी मिळतं. मी नाव विसरले. घरी गेल्यावर पाहून सांगिन. ती पावडर पाण्यात mix करून द्यायची. त्याने शक्ती राहाते.


Seema_
Friday, March 31, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी माझ्या मुलीला ear infection झाले होते . मला वाटत dr नी तुला आता antibiotics दीले असतील. बाळाचा ताप जर का १० दिवसात कमी झाला नाही तर क्रुपया dr कडे परत जा . माझ्या मुली वरुन सांगते कि बरेचदा पहिल्यांदा जी antibiotics दिलेली असतात ती कमी strength ची असल्यामुळ बरेचदा ear infection कमी होत पण पुर्णपणान जात नाही . मला वाटत dr नक्कीच परत एकदा कान check करुन दुसर antibiotics देतील . माझ्या dr च्या म्हणण्याप्रमान या केस मध्ये tylenol चा फ़ारसा उपयोग होत नाही .
आणि तसच जर रोज tylenol देत गेल्यास त्याचा effect नंतर नंतर होत नाही .
please तुझ्या dr च humidifier विषयी काय मत आहे ते विचारुन घे . कारण surprisingly माझ्या dr नी humidifier चा वापर पुर्णपने बंद करायला सांगितला होता .
त्यांच्या म्हणण्याप्रमान it could be one of the culprit behind this.
whole wheat bread, crackers अस काहीही अधुन मधुन खायला आणि कुठल्याही परिस्थिती मध्ये भरपुर liquid घ्यायला सांगितल होत . तसच अशा वेळी pedialyte is best. flavoured or unflavoured कसही चालेल . पण ते मी सारख देत होते .
शक्ती भरुन काढण्यासाठी मी pediasure देत होते . पण ताप कमी झाल्यावर द्यायला सुरुवात केली कारण पोट नाजुक झालेल असत म्हणुण.
अर्थात dr ला विचारल्याशिवाय यातल काहीही देवु नये . तसच dr नी मला थोडे दिवस dairy products avoid करायला सांगितल होत .
माझ्या मुलीला हा त्रास बरोबर एक महिना झाला होता . पण आता ती पुर्ण बरी झाली आहे.
तुमच्या बाळाच जर हे पहिलच वर्ष असेल day care च तर ते आजारी पडणारच अस माझ्या dr म्हणण होत .
तु वर्णण केलेल सगळ मी नुकतच अनुभवल आहे म्हणुन हे लिहल आहे . just as experience . सल्ला म्हणुन नाही .


Rachana_barve
Friday, March 31, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान मुलांमध्ये स्टमक फ़्ल्यु चे सिंप्टम्स सांगा ना कोणीतरी. माझा भाचा सध्या आला आहे. आणि त्याला हाय फ़ीवर आहे (arround 102) . सर्दी खोकला काही नाही. फ़क्त डायरीया आहे. वोमीटींग पण नाही.

Seema_
Tuesday, April 04, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी तुमच्या मुलाला बर आहे का आता ?. काही कळल नाही , तुम्ही पुढ काय केलत ते .

Savani
Tuesday, April 04, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, अगं मला अहो नको म्हणूस. आणि खरच ग मला वेळ झाला नाही इथे यायला. माझा मुलगा आता छान बरा आहे. तू म्हणालीस ना त्याप्रमाणेच doc ने औषध बदलून दिले आणि ते अगदी पचनी पडले. २-३ दिवस झाले जरा खायला पण लागला आहे.
पण तुम्ही सगळ्यानी मला फ़ार धीर दिलात. मी त्याला पहिल्यान्दाच असं आजारी पाहिले त्यामुळे सुचत नव्हते.
अश्विनी सीमा, लालु सगळ्याना " बडावाला thanks " :-)


Vadini
Tuesday, May 09, 2006 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majhi adchan thodishi var Savni-ne lihili aahe -tashich ahe.majha 3 varsha-cha mulaga taap-ulatya jhalyamyule ashakta jhala aahe.aata taap vagaire nahi.pan chidchid aani kirkir vadhali ahe.tyala kay khayla dyave?mhanje tyachi shakti bahrun yeil?khare tar he post ithe karave kee 'aaharshastra aani pak-kruti'yaat karave kalat nahiye.pan ithe tashi thodi chracha disli mhanun ithe kele.koni kahi suchavle tar bare hoil.aamhi ithe Germany-t aahot.

Asira
Monday, June 19, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी ६ महिन्याची आहे. तिला राईस सीरीयल वगैरे देणे चालू केले आहे गेल्या १-२ महिन्यांपासुन.
गेले २-३ दिवस तिला पोटदुखीचा त्रास होतो आहे
नवीन काहीही दिले नाहिये
जोर लावते आणि रडते. पोट तर साफ़ होते आहे तसे रोज. मी तिला ग्राईप वॉटर
, mylicon gas drops, prunes puree देउन पाहिले, पण काही उपयोग नाही झाला. बरीच चिडचिडी झाली आहे एकदम. काही उपाय आहेत काय अजून ?

Moodi
Monday, June 19, 2006 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असिरा ही लिंक चेक कर, बाकी आश्विनी सांगेलच आल्यावर.

/hitguj/messages/103387/80274.html?1108142569

आणि हो तू काय खातेस अन बाळाने काय आहार घेतला ते पण सांग आश्विनीला. ते पण महत्वाचे आहेच.


Asira
Monday, June 19, 2006 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi, तत्पर मदतीबद्दल धन्यवाद
मला अगदी सुचेनासे झाले होते. इथे अमेरिकेत या बाबतीत फ़ार एकटे पडल्यासारखे होते.


Moodi
Monday, June 19, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं आता एकटी कुठे आहेस, मायबोलीवर सगळे अनुभव सांगतात अन एकमेकाला मदत करतातच.

वेळ मिळेल तेव्हा हा सगळा बीबी वाचुन काढ, नेमके बर्‍याच जणींनी जे प्रश्न विचारलेत ते पुढे उपयोगी पडतील तुला. खरयं पण घरात मोठे माणुस नसले की जरा एकटे वाटतेच.


Asira
Monday, June 19, 2006 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती फ़ॉर्मुला वर आहे. तिला रोज दुपारी १ ते २ चमचे gerber rice cereal or oatmeal cereal - पाण्यात कालवून आणि त्याबरोबर १ चमचा गाजर , prunes ,मटार, रताळे असे जे काय असेल ते शिजवून त्याची puree असे देते. हेच गेले १ महिना देत आहे, पण आधी कधीच नाही त्रास झाला

Asira
Monday, June 19, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khoop bare waatale tuze post waachun. dhanyawaad
:-)

Moodi
Monday, June 19, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असिरा मग आता थोडी वाट बघ. आज आश्विनी नाही आली तर मग तिला मेल करुन विचार याविषयी. त्या प्युरीत अर्धी चिमुटभर हिंग घालुन ते थोडे कोमट करुन दे तिला. नुसते नको देऊस, आपण वरणात सुद्धा हिंग घालतोच ना ते पचावे म्हणुन.

Bee
Tuesday, June 20, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असिरा, शिल्पा उर्फ़ storvi ला पण विचारून पहा. तिने बराच research केला आहे. शिल्पाचा रंगिबेरंगी विभागात बीबी पण आहे. तिथे पण विचारू शकतेस लवकर उत्तर मिळावे म्हणून.

Moodi
Tuesday, June 20, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असिरा बाकी लोकांचे मते घेण्यास हरकत नाही, पण आश्विनी उत्तम डॉक्टर आहे, प्रत्येक बाळाची तब्येत, प्रकृती वेगळी असते अन त्याचे निदान तज्ञ डॉक्टरच करु शकतो. त्यामुळे तू आश्विनीलाच विचारावेस हे माझे वैयक्तीक मत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators