|
Moodi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 12:57 pm: |
| 
|
मिलिंद बहुतेक सुषुम्ना नाडी असेच म्हणतात, सुसुक्ष्म नाडी नाही.
|
धन्यवाद मूडी. या bb वर मी आधी का नाही आलो?
|
Suniti_in
| |
| Wednesday, February 15, 2006 - 6:47 pm: |
| 
|
Bee खरच फार छान माहिती दिली आहे. मी एक गर्भसंस्कर चे पुस्तक वाचले. त्यात वरीलप्रमाणेच मणक्यातून दिर्घ श्वासाची क्रिया झाल्यानतर ५-१० मि. नंतर हाताचे तळवे दोन्ही गुड्घ्यांवर ठेउन चक्रांचे ध्यान करावे असे दिले आहे. त्यात चक्र मेडिटेशन चा उल्लेख आहे. त्याबद्दल सांगाल का?
|
Bee
| |
| Thursday, February 16, 2006 - 4:22 am: |
| 
|
सुनिती, गर्भसंस्कार हे पुस्तक चांगले आहे हे मला कित्येकांनी सांगितले आहे, माझी ताईदेखील हेच पुस्तक वाचते आहे. पण हे पुस्तक योगासाठी नाही. आपल्या शरीरात सहा चक्र असतात. सहा की आठ मलाही confirm करावे लागेल. हे चक्र जागृत व्ह्यायला तितकी साधना लागते. आधी आपले शरीर योगासाठी तयार करावे लागते. योगसाधना करूनच आपले शरीर medidations, path towards spirituality साठी तयार होते. म्हणून आधी योगा शिकावा, मग आपोआपच आपले मन mediation कडे वळते. योगा केल्यानंतर हे सर्व चांगले परिणाम आपल्याला आपोआपच मिळत राहतात आणि त्याची आपल्याला प्रचीती देखील येते.
|
चक्र एकूण सात. मूलाधार, स्वाधिष्ठान,मणिपूर,अनाहत, विशुद्ध, आज्ञा व सहस्रार चक्रा. प्रत्येक च्क्राची जागा ठरलेली आहे. चक्र ध्यान म्हणजे प्रतेक चक्रावर लक्ष केंद्रीत करातचे. science ने सिद्ध झाले आहे की चक्र म्हणजेच endocrine glands किंवा आंतर स्त्रावी ग्रंथी. endocrine glands आपल्य शरिराचे metabolism control करतात. पुस्तक वाचून अथवा tv वर पाहून योग कधीही करु नका. योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करा.
|
Bee
| |
| Thursday, February 16, 2006 - 7:28 am: |
| 
|
छान माहिती दिलीस विहार. फ़क्त एकदा पडताळून बघावी लागेल. तुला प्राणाकर्षणाचे जे प्रकार माहिती आहेत तेही लिही. तू योगमुद्रा तर म्हणत नाहीस ना?
|
धन्यवाद बी. मी स्वत: ३ वर्ष शिकत आहे तसेच शिकवित ही आहे. सवडीने माहीती टाकतो.
|
Ekanath
| |
| Thursday, February 16, 2006 - 10:17 am: |
| 
|
बी महोदय, धन्यवाद. उपयुक्त माहिती दिलीत.
|
आम्ही त्याला प्राणधारणा असे म्हणतो. आधी श्वसनमार्ग शुद्धी करुन वज्रासनात बसायच. मेरुदंड ताठ, हाताचे पंजे गुडघ्यावर, डोळे बंद. प्रकार १. श्वास्-प्रश्वासाच्या आवागमनाला अगदी निरखून पहायच. म्हणजे चक्क मोजायचे किती वेळा श्वास घेतला व सोडला. प्रकार २. या मधे आपले सर्व लक्ष नाकपुडिच्या कडावरती ठेवायच. श्वास घेताना एक थंड जाणिव होते आणी सोडताना थोडासा कोमट अस जाणवत. त्यावरच आपल लक्ष केन्द्रीत करायच. उरलेले २ प्रकार उद्या.
|
Manuswini
| |
| Thursday, March 02, 2006 - 5:48 am: |
| 
|
माहीती चांगली आहे पण अहो भाषा एत्कि जड का हो वापरता? मेरुदड म्हणजे काय?
|
Anilbhai
| |
| Thursday, March 02, 2006 - 12:48 pm: |
| 
|
उद्या म्हणजे केव्हाच्या उद्या 
|
Mrunmayi
| |
| Saturday, March 04, 2006 - 12:02 pm: |
| 
|
मेरुदड म्हणजे पाठीचा कणा असावा...
|
भाई , टाकतो हो नक्की! म्रुण्मयी बरोबर आहे
|
प्रकार ३). हा थोडासा कठीण प्रकार आहे. पण मन एकाग्र करण्यास अत्यंत उपयुक्त. श्वासाचा वेध घेणं म्हणजे श्वास शरीरात कुठवर जातो आणि सोडल्यावर तो हवेत कुठवर जातो याचा वेध घेण, त्याला follow करण हे या प्रकारामधे येत. प्रकर ४) साक्षीभावना! मन आधी श्वासावर केंद्रीत करायच. (वरीलपैकी कुठल्याही प्रकारे). मग तटस्थपणे आपले विचार पहायचे. नदीच्या काठावर बसून तिच्या प्रवाहाकडे पहावे तस. लक्षात घ्या तुम्ही एक तटस्थ व्यक्ती म्हणूनच तुमच्या विचारांकडे पहायचे आहे. अष्टांग्योगातल्या प्रत्याहाराची ही प्रथम पायरी आहे.
|
Bee
| |
| Monday, May 22, 2006 - 5:47 am: |
| 
|
मनुष्याचे निराश होणे हे अगदी जवळपास रोजच्या जीवनात घडणारी गोष्ट आहे. पण निराशेवर मात करण्यासाठी भस्र उज्जेयी म्हणून एक प्रकार आहे. मला ह्या प्रकारचा खूप फ़लदायक अनुभव आला म्हणून इथे लिहितो आहे. हा प्रकार कपालभाती आणि उज्जेयी चे मिश्रण आहे. त्यामुळे आधी कपालभाती आणि उज्जेयी येत असल्याशिवाय हा प्रकार करता येत नाही. भस्र उज्जेयी - १) पद्मासमामध्ये स्थिर बसा. २) उज्जेयीमध्ये आपण घशाला घर्षण होऊ देतो म्हणून घोरल्यासारखा आवाज येतो. तर हा आवाज काढून म्हणजे उज्जेयी करुन लगेच उज्जेयीनेच श्वास बाहेर सोडायचा. २) श्वास आत घेताना आणि सोडताना कपालभातीमध्ये आपण जसे भरभर दोन्ही नाकपुडिने श्वास घेतो आणि सोडतो तसेच कुठलीही नाकपुडीने बंद करायची नाही. ३) १०८ वेळा श्वास आत बाहेर व्हायला पाहिजे. असे दोनदा करायचे. भस्र उज्जेयीचा आवाज हा गाढव जसा ओरडतो तसा होतो. खूप मजेशिर प्रकार आहे. सगळ्यांमिळून केला तर शेवटी सगळेच जण हसवून थांबवतील इतका विनोदी आवाज निर्माण होतो. मात्र मी वर जसे सांगितले आहे, निराश अवस्थेत मनुष्य शिरत नाही.
|
बी, अजुन थोडे स्पष्ट करुन सांग ना...!!! आणि भ्रमर्विहार... तुम्हि योग शिकता आहात म्हणुन तुम्हाला विचारते...!!! योगात पण काही प्रकार आहेत्का जसे मी लहानपणापासुन योग ही शांतपणे हळु म्हणजे घाईगडबड न कराता कारायचे असते अस ऐक्लय आणि करत आलेय.. पण इकडे परदेशात south indian गुरुंनि शिकवलेला प्रकार मला वेगलाच वाटला.. आसन तर जोर लाउन करत्च होते पण उड्या मारत प्रत्येक आसनाच्या नंतर सुर्यनम्स्कार घालणे विचित्र वाटले...!!!
|
लोपा, पारंपारीक योगासने ही अगदी शांत केली जातात. याच कारण हे की आसनाच्या अंतिम अवस्थे मधे जाताना, अंतिम अवस्था प्राप्त केल्यावर आणि त्यातून बाहेर येताना आपल मन हे आपल्या शरीराशी निगडीत रहावे. कारण योग म्हणजे युज किंवा जोडणे. काय जोडायच? शरीर व मन. पण हल्ली योग व arobics याची सांगड घालून नविन प्रकार केले जातात उ.दा. power yoga . मी कधी हे करून पाहीले नाही. त्यामुळे ते कितपत उपयुक्त आहे हे नाही सांगू शकत. प्रत्येक आसनाच्या नंतर सूर्यनमस्कार का घालतात याच कारणही तेच देऊ शकतील five tibetan पद्धतीत पण असेच वेगात काही प्रकार करतात. माझे गुरु श्री. अम्रुत पाटिल सांगत की एक doctor नेहमी लक्षात ठेवा. dr. nb scrap, ac,ac . म्हणजे differential relaxation, normal breathing, slow,comfortable, rhythmic,attractive, pleasurable, according to capacity & avoid competetion
|
Bee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 6:42 am: |
| 
|
लोपमुद्रा, जे समजले नाही ते तू विचार मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीन.
|
निराश अबस्था टाळण्या करता मोठ्याने प्रणवोच्चार करुन पाहिला आहे का? फायदा होतो हा अनुभव
|
(हा योगाचा विषय नाही किन्वा नसावा, पण तरीही) निराशा, मनातील अनामिक भिती घालविण्यासाठी खं या एकाक्षरी मन्त्राचा "उच्चारुन" केलेला जप उपयोगी पडतो! हा जप मनातल्यामनात करु नये, प्रभावी ठरण्यासाठी उच्चारुनच केला पाहीजे! "खं" या अक्षराचा उच्चार करताना बेम्बीच्या देठापासुन ढवळुन घेवुन हवा वापरली जाते, त्याचा सम्बन्ध कदाचित बी ने सान्गितलेल्या योग प्रकाराशी शॉर्ट कट मधे असु शकतो चु. भु. दे. घे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|