Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वि. म. कुलकर्णी ...

Hitguj » Language and Literature » पद्य » वि. म. कुलकर्णी « Previous Next »

Robeenhood
Tuesday, July 19, 2005 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

iva.ma. kulakNaI- yaaMcaI ‘caavaDIcyaa pazImaagao Ê jaunaa sarkarI vaaDa....’
hI KoD\yaatIla XaaLocao vaNa-na krNaarI kivata kÜNaakDo Aaho kaÆ Asalyaasa pÜsT kravaI Ê Ìpa k$na....


Robeenhood
Sunday, August 14, 2005 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aro iva ma kulakNyaa-naa maharaYT/ ivasarlaa kI kaya Æ

Neelu_n
Friday, January 20, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आर्शिवाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवीNeelu_n
Saturday, January 21, 2006 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक अश्रू

स्वातंत्र्याचा सण, दारात रांगोळी
श्रुंगारली आळी, झगमगे १
तोरणे, पताका, सांगती डोलुन
स्वांत्र्याचा दिन, उगवला २
स्वातंत्र्यासाठी या, आम्ही काय केले?
पुर्वज श्रमले, तयासाठी ३
वृक्ष लावणारे, निघोनिया जाती
तळी विसावती, सानथोर ४
विचारी गुंतत, हिंडलो बाजारी
पेठेत केवढी, गजबज ५
केवढी धांदल, केवढा उल्हास
केवढी आरास, भोवताली ६
मात्र एका दारी, दिसे कोणी माता
दीप ओवाळीता छायाचित्रा ७
ओल्या नेत्रकडा हळुच टिपुन
खाली निरांजन, ठेवीत ती ८
हुतात्म्याचे घर, सांगे कुणी कानी
चित्त थरारोनी, एकतसे ९
होते लखाखत, पेठेतले दीप
आकाशी अमूप, तारा होत्या १०
चित्तापुढे माझ्या, एक दीप होता
एक अश्रु होता, माउलीचा. ११


Neelu_n
Saturday, January 21, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बालमित्रास

आठवते ना-
ओढ्याकाठी अपुल्या घरची
गाय घेउनी धावत होतो
चरावयाला सोडुनिया तिज
पारंब्यावर लोंबत होतो!

आठवते ना-
डोहामधले स्वैर डुंबणे
अंगावरिचे ओले कपडे
अंगावरती तसेच सुकणे,
सुकता कपडे पुन्हा पोहणे...

आठवते ना-
करवदीचा चीक बिलगता
बोटे अपुली बसली चिकटुन
अन कैर्‍याच्या दिवसांमध्ये
हातकातडी गेली सोलुन!

आठवते ना-
हातामध्ये हात घालुनी
अर्धा डोंगर गेलो चढुनी
वर्गामधल्या गोष्टी बोलत
उन्हात फिरलो शेतांमधुनी

-मला तरी नित आठवते गा
आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळिमध्ये या
उबगुनी जाता देह आणि मन


Gajanandesai
Monday, January 23, 2006 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलू, चांगल्या कविता पोस्ट करत आहेस.

Robeenhood
Wednesday, January 25, 2006 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलू खासच
जरा ते चावडीच्या पाठीमागे जुना सरकारी वाडा ही कविता शोध ना


Neelu_n
Saturday, March 25, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रॉबीनहूड 'चावडीच्या...' ही कविता नाही आहे माझ्याकडे. पण मिळाली तर नक्की टाकेन इथे:-)Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators