Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अनुराधा पोतदार ...

Hitguj » Language and Literature » पद्य » अनुराधा पोतदार « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 08, 200620 10-08-06  1:34 pm

Iravati
Sunday, October 08, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पौर्णिमा गेली तर जाऊ दे

पौर्णिमेचा आपला संकेत चुकला म्हणून एवढं वाईट वाटलं?
पौर्णिमा गेली तर जाऊ दे आभाळ तरी आपलंच आहे ना
आणि ते पिठासारखं चांदणं तुला कधीपासून आवडू लागलं?
(पीठच पहायचं असेल तर घराघरातल्या डब्यांतून ते कमी का असतं ?)
पौर्णिमेचं चांदणं किती एकेरी, किती एकाकी
निर्मनुष्य विजनात स्वत:लाच शोधणा-या पहिल्या द्रुष्टिहीन जीवासारखं.
ना नक्षत्रांची संगत.
ना अंधाराची प्रीत.
सावळ्या पाण्यात कालवलेलं चांदणं,
अंधाराला बिलगलेलं चांदणं,
नक्षत्रांच्या डोळ्यांनी लुकलुकणारं चांदणं....
आणि एक विसरले
त्या पिठासारख्या चांदण्यात डोळ्यांखालच्या या काळ्या छाया,
काळाचे हे ओरखाडे कसे लपतील
म्हणून म्हणते,
हे सावळं चांदणंच अधिक आपलं आहे.


Iravati
Sunday, October 08, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कडुनिंबाच्या झरोक्यातून

कडुनिंबाच्या झरोक्यातून आभाळाचं कुसुंबी हसू उमलताना
पाहिलं की नकळता हात जुळतात.
वेदकाळातील ऋषींचे हातही असेच जुळले असतील
आणि त्यांच्या तपस्वी ओठांवर कवितेचा जन्म झाला असेल.
तीच ही चिरयौवना उषा.
हे जितंजागतं जग नव्हतं तेव्हाही हीच होती;
आजही ही आहेच.
उद्या?
उद्या हे रसरसतं जग नसेल
तेव्हाही त्या विस्तीर्ण अभावावर आभाळाचं
हेच अबोली हसू विलसत राहील.Iravati
Sunday, October 08, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगण्याचं पात्र

जगण्याचं पात्र कविता होऊन उतू जातं
तेव्हा ते उतू जाण-या दुधासारखं असतं
काठाकाठानं अनावर ओसंडणारं,
फेसाळत्या धारांनी अलगद ओघळणारं.
क्वचित, फार क्वचित,
ते जिवणीच्या कडेनं निसटण-या स्मितासारखं असतं;
अभिषेकपात्रातून ठिबकणा-या धारेसारखं असतं.
जगण्याचं पात्र कविता होऊन उतू जातं
तेव्हा ते उरी फुटलेल्या आभाळाच्या सहस्त्रधारेसारखं असतं.
आणि नेहमीच
मरणाच्या वेणा पार करीत जन्माचा सोहळा भोगणा-या
आईपणासारखं असतं.

Paragkan
Sunday, October 08, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभावावर आभाळाचं हसू ...... वा!

Bee
Monday, October 09, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इरावती, फ़क्त शब्दच आहेत कवितेत. आशय कुठेच दिसत नाही की लक्षातही येत नाही..

Iravati
Monday, October 09, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, आशय ज्याचा त्याने शोधायचा. सापडला तर उत्तम. नाहीतर सोडून द्यावे.... अजून काय सांगणार रे!Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators