Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 21, 2003

Hitguj » Language and Literature » भाषा » शुद्धलेखन » Archive through January 21, 2003 « Previous Next »

Sukhada
Friday, January 10, 2003 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. र्‍हस्व - दीर्घ

संस्क्^ऋतमधील काही शब्द मराठीत तसेच्या तसे वापरले जातात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात.
उदा : कवि मति

मराठीतील तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
उदा : कवी, मती,गुरू

इतर शब्द दीर्घान्ती लिहावेत.
उदा : विनंती,पाटी,जादू
अपवाद : आणि,नि

परंतु, यथामति तथापि इत्यादी तत्सम अव्यये र्‍हस्व लिहावीत.

तसेच समासिक शब्दामधे जर दीर्घान्त तत्सम शब्द आला असल्यास तो र्‍हस्व लिहावा.
उदा : बुद्धिवैभव, कविमन

व्यक्तीनामे, ग्रंथनामे शीर्षके आणि सुटे र्‍हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावे.
उदा : हरी, भवभूती, कुलगुरू


Sukhada
Friday, January 10, 2003 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अणू - अणुशक्ती
विधी - विधिनिशेष
वस्तू - वस्तुस्थिती
शक्ती - शक्तिमान
गती - गतिमान

पण वधूवर मधे वधू दीर्घान्तच लिहावा.

विद्यार्थिन्, गुणिन् यासरखे इन अन्ती शब्द मराठीत लिहिताना
त्यांच्या शेवटी असलेला न लोप होतो आणि उपान्त्य र्‍हस्व अक्षर दीर्घ होते.


उदा : विद्यार्थी, प्राणी, पक्षी,स्वामी

हेच शब्द समासात पूर्वपदी आले असता ते र्‍हस्वान्त लिहावेत.

उदा : विद्यार्थिमंडळ, गुणिजन, मन्त्रिमंडळ

दीर्घ ईकारान्त आणि ऊकारान्त शब्दातील उपान्त्य इकार
आणि उकार र्‍हस्व लिहावेत.


उदा : गरिबी,माहिती,हुतुतू

अपवाद : नीती, कीर्ती, भीती, रीती, प्रीती, दीप्ती, विभूती, ऊर्मी


याचप्रमाणे अकारान्त, ओकारान्त आणि एकारान्त शब्दांनाही लागू होतो.
उदा : पाहिले, मिळवितो.

पण हाच नियम तत्सम शब्दांना लागू होत नाही.

उदा : ऊर्जा, ऊष्मा, पूजा, परीक्षा, प्रतीक्षा.

अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार आणि उकार दीर्घ लिहावे.

उदा : गरीब,वकील,सून,वीट, भरीव, कूल,चूल, फकीर, हुरूप

अपवाद : गुण, विष, मधुर, प्रचुर, मनुष्य, विपुल,अंकुर,अद्भुत, विधुर, जटिल,
मलिन, कुटिल, साहित्य, मंदिर,जीवित,शारीरिक,मानसिक


मराठी शब्दातील अनुस्वार विसर्ग आणि जोडाक्षर यांच्या पूर्वीचे
इकार उकार सामान्यत र्‍हस्व असतात.


उदा : भिंग, पिंप, नारिंग, निःपक्षपातीपणे, छिः, थुः, विस्तव, मुक्काम

परंतु तत्सम शब्दात ते मुळाप्रमाणे र्‍हस्व किंवा दीर्घ लिहावेत.

उदा : तीक्ष्ण, वरिष्ठ, पुण्य,पूज्य


To be continued ...

Milindaa
Friday, January 10, 2003 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dIGa- škarant AaiNa ]karant XabdatIla ]pan%ya [kar AaiNa ]kar dIGa- ilahavaot.


Akarant XabdaMcao ]pan%ya [kar AaiNa ]kar áhsva ilahavao.

<<<

sauKdaÊ varIla vaa@yaaMt tulaa ‘áhsva’ cyaa izkaNaI ‘dIGa-’ AaiNa ‘dIGa-’ cyaa izkaNaI ‘áhsva’ ilahayacao Aaho ka Æ karNa tU ilaihlaolaI ]dahrNao naomakM ]laTM dXa-vatat AsaM vaaTtMya

tuJaI caUk kaZNao ha ]_oXa naahI tr inayamaaMmaQyao kahI caUk AsaU nayao ha hotU


Sukhada
Friday, January 10, 2003 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

milidaa : Thanks chook durust kelee aahe ! :-)

Dharmadhikari
Friday, January 10, 2003 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sukhada
You are a major asset to Maayboli
Keep on contributing

Jay
Saturday, January 11, 2003 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुखदा,
मनपूर्वक धन्यवाद. खूपच उपयोगी माहिती आहे. मराठी मातृभाषा असल्याने आपल्याला फ़ार चांगली येते हा (गैर)समज लगेच दूर झाला आणि मला जमिनीवर आणलं. :-)
या अनुषंगाने मला ॠ आणि ॡ यांच्या बद्दल एक प्रश्न होता. ॠ (दीर्घ ऋ) आणि ॡ (दीर्घ ऌ) यांचा कोणत्या शब्दात उपयोग होतो? माझ्या महितीप्रमाणे ऋषी आणि कॢप्ती मध्ये ते र्‍हस्व आहेत.(हे बरोबर का?)
(इथे rlu लिहीता येत नाही आहे. क्षमस्व.)


Chafa
Saturday, January 11, 2003 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय, तुला क्लृप्ती म्हणायचे आहे का? आणि दीर्घ, र्‍हस्व ऋ असंही आहे का? ऋषी, ऋग्वेद, ऋणानुबंध हे सगळे ऋ मला तरी एकच वाटतायत.

Jay
Saturday, January 11, 2003 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chafa
hÜya. AÊ AaÊ [Ê š... maQyao AM AaiNa AÁ yaanantr ? ³áhsva AaiNa dIGa-´ AaiNa rlu ³áhsva AaiNa dIGa-´ ho hI svar maI paihlao. maayabaÜlaIvarcyaa transliteration chart maQyaohI Aahot. BTW krluptee ksao ilaihlaosa :-) Æ


Chafa
Saturday, January 11, 2003 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

klRuptee = @laRPtI AsaM ilahI. :-)

Beti
Monday, January 13, 2003 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sauKda tuJaa ha ]pËma AiBanaMdnaIya Aaho !

Thepunekar
Tuesday, January 14, 2003 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yep,
माझंही तेच मत आहे. असे झकास पैकी नियम वगैरे तयार लिहून मिळाले कधीही गरज पडेल तेव्हा पहायला तर खूपच उपयोगी होईल. मी लिहिताना नेहेमीच जो शब्द जसा बरोबर 'दिसेल' तसा लिहित असे. आता जास्त 'डोळस' पणे अचूक लिहिता येईल.

Sukhada
Tuesday, January 14, 2003 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना धन्यवाद. मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे

जय : दीर्घ ॠ आणि र्‍हस्व ऋ आहेत.. ऋण मधे र्‍हस्व ऋ वापरतात, नैर.ॠत्य, ॠणानुबंध मधे तो दीर्घ लिहितात.

नैर.ॠत्य मधे ॠ वर 'रफार' आहे तो कसा द्यायचा कोणाला सांगता येईल का?
Sukhada
Tuesday, January 14, 2003 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


उपांत्य दीर्घ ई - ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य ईकार - ऊकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी र्‍हस्व लिहावा.

उदा : गरिबास, वकिलांना, सुनेला, नागपुरास

अपवाद : दीर्घोपान्त्य तत्सम. शरीरात, गीतेत, सूत्रास, जीवास

वरील नियमाप्रमाणे

समजूत - समजुतीने
निवडणूक - निवडणुकीत
तपशील - तपशिलात


उपान्त्य 'ई - ऊ' असलेल्या तत्सम शब्दांनाही वरील नियम लागू होत नही.
उदा : परीक्षा - परीक्षेत
वीर - वीराने
दूत - दूतास
विद्यापीठ - विद्यापीठात
सूत्र - सूत्रातील

परंतु शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई - ऊ यांच्या जागी'अ' आल्याचे दिसते.


उदा : तालीम - तालमीचा
बेरीज - बेरजेला
पाटील - पाटलाने
माणूस - माणसाची
लाकूड - लाकडाचा


शब्दाचे उपान्त्य अक्Sःअर 'ई' किंवा 'ऊ' असल्यास सामान्यरूपात 'ई' च्या जागी 'य' येतो. तसेच 'ऊ' च्या जागी 'व' येतो.

उदा : फाईल - फायलीत
देऊळ - देवळात
पाऊस - पावसात.

क्रमश
Dharmadhikari
Tuesday, January 14, 2003 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Write it thisway
naiR^I.rty = naO?R-%ya

Sukhada
Monday, January 20, 2003 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dharmadhikari : thx :-) .. ..

Sukhada
Monday, January 20, 2003 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो.

उदा : पैसा - पैशाचा
घसा - घशाचा
ससा - सशाचा.

पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी असलेला 'जा' सामान्यरूपात तसाच राहतो त्याचा 'ज्या' होत नाही.

उदा : मांजा - मांजाने
सांजा - सांजाची
गांजा - गांजाcए.

शब्दाच्या मधे येणार्‍या 'क' किंवा 'प' चे द्वित्व रूप सामान्यरूपात निघून जाते.
उदा : रक्कम - रकमेचा
तिप्पट - तिपटीने.

शब्दाच्या मधे येणार्‍या 'म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर अनुस्वारविरहित होते..

उदा : किंमत - किमतीचा
गंमत - गमतीने
हिंमत - हिमतीने.

ऊकारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.

उदा : गणू - गणूस
शकू - शकूची.

धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' किंवा 'वून' होईल..

उदा : चाव - चावू - चावून
लाव - लावू - लावून
जेव - जेवू - जेवून
खा - खाऊ - खाऊन
धू - धूऊ - धूऊन

मराठी शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असले तर उपान्त्य इ - कार वा उ - कार र्‍हस्व असतो.

उदा : किड, गुणी, पिसू, मेहुणा, वकिली, पाहिजे, गरिबी, महिना.


Beti
Monday, January 20, 2003 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुखदा जेव - जेवून हे पटले पण धू - धुऊन जरा विचित्र वाटते आहे. कदाचित वर्षानुवर्षे बाळगलेला गैरसमज असल्याने असेल :-)
पण पुढची वाक्ये पहा हां
१. ती जेवायला घरी गेली
२. मी विहिरीवर धुणी धुवायला गेले.
please याचे स्पष्टीकरण देशील का ?


Sukhada
Monday, January 20, 2003 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

beti : बरोबर आहे धू चे धुवायला असेच होते. पण जर 'खा' , 'जा' यची रूपे पाहिली तर खा - खाऊन
जा - जाऊन असे होते.
पण जसे 'धू' चे 'धुवायला' असे रूप होते तसेच खा चे 'खावयाला' असेही रूप होते.
जसे : गणपती बाप्पा मोरया, उंदरावरती बसुनी या, लाडू मोदक खावया'

थोडक्यात वरील नियम फक्त 'ऊन / हून' प्रत्ययासाठी आहे... 'उन' प्रत्यय लावताना खा चे खाऊन आणि धू चे धुऊन असेच रूप होते.
आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे
धू - धुवायला - धुववत नाही
खा - खावयाला / खायला - खाववत नाही
अशा रूपांच्या वेळी 'व' च वापरला जतो.


Bee
Monday, January 20, 2003 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सुखदा, तू किती श्रम घेउन हे सर्व लिहिते आहेस. great आहेस.


Wakdya
Monday, January 20, 2003 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किर्ती हा शब्द वर कीर्ती असा दिला आहे जोडाक्षरामागिल इकार वा उकार र्‍हस्व असतो ना? की काही वेगळा नियम आहे?

Sukhada
Monday, January 20, 2003 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wakadya : kItI- ha Xabd Apvaadat maÜDtÜ. An%ya Axar dIGa- Asatanaa ]pan%ya Axar áhsva Asato pNa kItI- ha Xabd yaa inayamaasa Apvaad Aaho

Wakdya
Monday, January 20, 2003 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mhNajao iktI- Asao ilahUna vaYaa-nauvaYao- maI caUk krt hÜtÜ tr ²

Paragkan
Monday, January 20, 2003 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

great job sukhada .. barich maahiti miLate aahe.

Beti
Monday, January 20, 2003 - 10:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Qanyavaad sauKda. pTvaUna Gaotlao²:-)Chafa
Monday, January 20, 2003 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुखदा, तसे मग खूप अपवाद आहेत कीः
मूर्ती, स्फूर्ती, प्रीती


Wakdya
Tuesday, January 21, 2003 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीतरी गडबड आहे रे चाफ़्या..
मूर्ति मधिल दुसरा इकार र्‍हस्व आहे, त्याच प्रमाणे किर्ती देखिल कीर्ति असे योग्य वाटते आहे.. पण माझे म्हणणे प्रमाणभुत नाही!
~D

Beti
Tuesday, January 21, 2003 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaakD\yaaÊ tÜ jaunaa inayama XauwlaoKnaacaa. pNa maI iXaklao %yaa inayamaanausaar kItI- AaiNa maUtI- doKIla p`maaNaBaUt Aaho. :-)

Wakdya
Tuesday, January 21, 2003 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AroccyaaÊ mhNajao vyaakrNaat doiKla jaunao navao Asaa Baod Aahoca kaÆ ~D

Chatur
Tuesday, January 21, 2003 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी चुकत नसेन तर पूर्वी हि / ही असे वेगवेगळे प्रकार होते. त्यांचा प्रयोग खालील प्रकारे केला जात असे.

तुझे म्हणणे मलाहि मान्य आहे.

मला ही वस्तु नाही आवडली.

१९३७ सालच्या काही मासिकात सावरकरांचे लेख वाच्ताना मला असे आढळले होते. तसेच तेव्हा ही व्याकरणाबद्दल बराच वाद चालला होता. सावरकरांचे म्हणणे होते की मराठी कठीण असली तरी चालेल, पण तिची शुद्धता राखली पाहिजे व व्याकरणाचे सर्व नियम पाळले पाहिजेत. मात्र इतरांचे म्हणणे होते की मराठी भाषा ( व्याकरण ) सोपी केली पाहिजे. Incidentally, त्या काळी " इ " , " ई " , " उ " , " ऊ " हे " अ " खाली " इ " कार किंवा " उ " कार काढून लिहिले जात असत (निदान सावरकरांच्या लेखनात).

कुणाला या बाबत अधिक माहिती आहे का?


Thepunekar
Tuesday, January 21, 2003 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

e baoTIÊ ‘maaMjarI’ kI ‘maaMjair’ gaMÆ


Thepunekar
Tuesday, January 21, 2003 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चतुर, अ च्या खाली उकार वगैरे काढण्याची प्रथा सावरकरांनीच काढली. टंकलेखकावर तसेच मुद्रणालयात मराठी भाषा वापरणे सोपे जावे म्हणून त्यांनी ह्या कल्पनेचा पुरस्कार केला होता. अन मला आठवतंय, किर्लोस्कर मुद्रणालयात मुद्रित केलेली अनेक पुस्तके तीच पद्धत पाळतात. किंवा पाळत असत. माझ्याकडे कमलाबाई ओगले ह्यांच्या 'रुचिरा' ची एक जुनी आवृत्ती आहे. त्यात अश्याच प्रकारचे मुद्रण आढळते. अन गेली दोन तीन वर्षे मी पण तसाच लिहीतो.

Wakdya
Wednesday, January 22, 2003 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

id puNaokra ­­ ­­
maaMjarI kI maaMjair Æ .. ..

Sukhada
Wednesday, January 22, 2003 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्या : मूर्ती, स्फूर्ती हे ही अपवाद आहेत. आणि वर काही अपवाद दिले आहेत. ते पहा.

वाकड्या : कीर्ति, प्रीति हे संस्क्^ऋत र्‍हस्वान्त शब्द आहेत. वरचे नियम नीट वाचलेस तर तुझ्या लक्षात येईल की संस्क्^ऋत र्‍हस्वान्त शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत असा नियम आहे. जसे कवि - कवी.

beti : इतक्यात पटवून घेतलंस ? मला स्वतलाच पटलं नाही. कारण मी सुद्धा बोलताना जरी धुऊन असे म्हणत असले तरी लिहिताना धुवून असेच लिहिते. पण मग पी चे पिऊन असे लिहिले जाते पिवून असे का लिहिले जात नाही ?


Sukhada
Wednesday, January 22, 2003 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन आणि जुने शुद्धलेखनाच्या नियमाविषयी कोण कुठल्या अर्थाने बोलले आहे मला माहीत नाही आणि त्याबद्दल कोणाला माहीत आहे किंवा नाही याचीही मला कल्पना नाही पण मी seriously सांगत आहे की शुद्धलेखनाचे नवीन आणि जुने नियम आहेत. मला जुन्या नियमांविषयी फारशी कल्पना नाही पण त्यात 'जेव्हा, केव्हा' अशा शब्दांवर अनुस्वार देण्याचे नियम होते असे ऐकले आहे.

मी जे नियम लिहित आहे ते महारष्ट्र शासनाचे शुद्धलेखनाचे नियम आणि मो . रा . वाळंबे लिखित सुगम व्याकरण यात दिलेलेच नियम लिहित आहे. यातला एकही नियम माझ्या मनाच नाही.

मी स्वत ते नियम वाचताना बर्‍याच वेळा confuse झाले आहे. मी या विषयात तज्ञ नसल्यामुळे मी दिलेले स्पष्टीकरण बरोबर असेलच असे नाही. beti ने जसं 'धू' बदाल ची स्पष्टीकरण विचारले होते, तसेच जास्तीत जास्त लोकांनी विचरावे आणि तज्ञ लोकांनी शंकांचे निरसन करावे असे मला वाटते. यामुळे माझ्यासह बर्‍याच लोकांचे गैरसमज दूर होतील.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators