Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 10, 2003

Hitguj » Language and Literature » साहित्यिक » नारायण धारप » Archive through January 10, 2003 « Previous Next »

Shrini
Thursday, July 18, 2002 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धारपांचे 'चेटकीण' हे नवीन पुस्तक नुकतेच वाचले. अप्रतिम आहे. कोकणाची background आहे. अतिशय low key मधे लिहीले आहे, त्यामुळे अधिक प्रभावी वाटते...

A must read for Dharap fans, or for anybody who likes ghost stories!

Asami
Friday, July 19, 2002 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shrini manushya, me tul amaza address email karto, mala te pathvun de tvart USPS ne. Me tula postage sakat parat pathveen :o)

Kaal mi anand mahal parat vachale. attaparyant kitida vachaley aathavat nahi pan dar veli angavar yenare shahare tech asataat. especially chhotya mulala disnarya prasanganchya veli. man Dharap Rulez.

shrini mala asa kadhi Stedan King vachatana hot nahi. Tula asa janavate ka ?

Shrini
Friday, July 19, 2002 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Asami, vaat bagh!

on a serious note though, I'm a little concerned now... Dharapanchyaa kaahi kaahi pustakaanchi mool pustake nantar vaachanaat aali... uda. Shapath (It), Luchai ('Salem's Lot), Anandamahal (The Shining)... all by Stephen King... aani Dharapaanni yaa mool pustakanchaa kuthehi ullekha kelelaa naahi...

And I honestly feel that S.K. is far more superior to Dharap in creating really chilling atmosphere... tyaache 'It' tar malaa visarataa yenech shakya naahi...

I really urge you to read The Shining...

Maverik
Friday, July 19, 2002 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala asa kadhi Stedan King vachatana hot nahi. >> Woooo ... kaay he :-)

I really liked It and Shining ... chilling indeed ....

Asami: Anandmahal chi photocopy karun pathvun de :-) .. postage bistage kahi milnar nahi :-)

Asami
Friday, July 19, 2002 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shrini I'll give it a try. pan tya katha atishay bhartiy vatataat he vaishishtya aahe. Luchai var anuvadit asa ullekh aahe I guess. Tuzyakade Luchaihi ahe ka ?

Ani ajun ek hotaa mala tyache naav aathavat nahi babudha 'dast' asave, jyat herola tumor asato ani t kuthalya tari gavat zapatalyasarkha jaato. 'dast'ch bahudhaa. te aahe ka ?

mav, vaat bagh :o) have asel tar ethe ye, raha, kha pi, photo kaadh ani lolat vaach :o)



Maverik
Monday, July 22, 2002 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

have asel tar ethe ye, raha, kha pi, photo kaadh ani lolat vaach >> :-) hee heee ... actually, I might come up to Boston next weekend ... plans haven't been finalized ... but will let you know if I come....

BTW junta, sadhya channel abc var shining dakhvat ahet .... kaal part-1 dakhavla ... (covered the first 75 pages of the book approx) ... baki pudhe aaj ahe 9 pm EST ... the fun starts now ...

Rmd
Saturday, July 27, 2002 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

me aajach 'maati kahe kumharako' navacha pustak vachala. mast ahe ekdum. jamala tar tyatali ekhadi goshta takin me ithe huh. paN no promise! sagalya katha baryach mothya ahet :-(

Paankaj
Thursday, August 08, 2002 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hay mala ghyal ka re ithen chandalano...mi dharapancha bhakta ahe mhanun hi arjave.
tar tumachya paikin koni dharapanchya kansachya vaparasambandhi vichar kelay kan?
kansa cha vapar atyant janivpurvak karanara ha ekmev lekhak...
pankaj

Paankaj
Friday, November 22, 2002 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pustakanchi devghev ! anakhi kahi nahi...
are dharapanchya lekhanat suddan asankhya vaishithe ahet tyancha vichar karal ki nahi?

Rmd
Friday, December 27, 2002 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maverik is right!! Devadnya kharach sahi kadambari aahe ekdum!! mrutyula sparsh karun paratalelyancha kaay hota ya kalpanevar adharit aahe. Dharap fans.... nakki vacha pustak!

Shrini
Wednesday, January 08, 2003 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच रात्री 'देवाज्ञा' वाचून संपवलं, and I beg to differ with Mav and Rmd . गोष्टीची मूळ कल्पना (सामान्यात असामान्य, दैवी शक्ती प्रकटणे) धारपांनी या आधीपण बर्‍याच ठिकाणी वापरली आहे. परिसस्पर्श, दुसरा प्रमाद, दुहेरी धार, शपथ, आणि काही प्रमाणात चेटकीण आणि वेडा विश्वनाथ.

या गोष्टीचे माझ्यामते सरळ सरळ तीन भाग पडतात.

पहील्या भागाच्या सुरुवातीला बर्‍याच गोष्टींची पुनरावृत्ती आहे. रेंगाळत, रडतखडत चालला असतानाच पहील्या भागाच्या शेवटी जरा वेग येतो आणि उत्कंठा निर्माण होते. धारपांनी काही प्रमाणात दिलेले स्पष्टीकरण interesting आहे, पण तेवढ्यात दुसरा भाग सुरु होतो.

पहील्या भागाशी दुसरा भाग बर्‍याच प्रमाणात विसंगत आहे. ते पदोपदी जाणवत राहते. पण त्या विसंगतींची यादी देणे म्हणजे गोष्ट उघड करणे आहे, म्हणून देत नाही. दुसरा भाग धारपांच्या अगदी ठरलेल्या pattern मधून जात असताना एकदम तिसरा भाग सुरु होतो.

हा तिसरा भाग म्हणजेच धारपांनी गोष्टीला दिलेली तथाकथित नाट्यपूर्ण कलाटणी. ही कलाटणी वाचून मी अवाक् झालो खरा, पण कौतुकाने नाही, तर धारप अशी कलाटणी कशी काय देउ शकतात या आश्चर्याने!

एखाद्या चित्रकाराने एक चित्र रंगवायला घ्यावे, मग ते अर्धे झालेले असतानाच, त्यातल्या बर्‍याचशा भागावर काहीतरी दुसरेच रंगवावे, आधी काढलेल्या भागाशी हा भाग जुळवण्याची खटपट करावी, आणि शेवटी कंटाळून...

एकूण मला तरी मी फसवला गेलो आहे असेच वाटते. उगाच काहीतरी लिहीण्यापेक्षा धारपांनी न लिहीलेले उत्तम! (आणि 'स्वाहा' ने देखील माझा असाच अपेक्षाभंग केला आहे!)

माझं posting कदाचित जास्तच तीव्र झालं आहे, पण धारपांच्या उत्तम लिखाणाची मी तोंड फाटेपर्यंत स्तुती केलेली आहे, त्यामुळे त्यांच्या सामान्य लिखाणावरची प्रतिक्रीया तेवढीच तीव्र असणार...

आणि वरील मत वैयक्तिक असून ते इतर कुणावरही बंधनकारक नाही, हे सांगून ठेवलेले बरे!


Vaatsaru
Thursday, January 09, 2003 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्^ऋत्यूला स्पर्श करुन आलेल्या लोकांच काय होत ही कल्पना G A Kulkarni ह्यांनी फार पूर्वीच त्यांच्या 'Orpheus' ह्या कथेत वापरली आहे असे अंधुक स्मरते.

Shrini
Thursday, January 09, 2003 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटसरु, G.A. न्ची तुम्ही म्हणता ती कथा मलाही अंधुक आठवत आहे. पण ती कथा पूर्णतः philosophical आहे. धारपांची कादंबरी मात्र भय - गूढ - विस्मय विभागात येते असे मला वाटते.

धारपांच्याच 'मृत्यूद्वार' आणि 'सैतान' (दोन्ही 'भगत' कथा) या कादंबर्‍यांमधे देखील याच प्रकारची कल्पना वापरली आहे. काही विशिष्ट परिस्थितीत घडलेल्या मानवी मृत्यूमुळे काही अमानवी आणि अमानुष शक्तींना आपले जग खुले होते ही ती कल्पना. 'समर्थांना हाक (वेडा रघू)' आणि त्यांचे अगदी सुरुवातीचे पुस्तक 'चंद्राची सावली (गोसावी आणि मोरे हवालदार)' देखील काहीशी हीच कल्पना वापरते.


Rmd
Friday, January 10, 2003 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shrini : chandrachi savali madhe tar ti melelich asate ki!! mruyucha sparsh hi concept tyat nakkich navhati.

Vaatsaru
Friday, January 10, 2003 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिनी, तुम्हाला एक प्रश्न
धारपांच्या अनेक कथा मी वाचल्या पण बर्‍याच वेळेला शेवटी घटनांचे स्पष्टीकरण देताना ते 'मानवी मनाला न पेलणार्‍या गोष्टी आहेत ह्या', किंवा 'तिथे काय झाले हे कधीच कुणाला कळणार नाही कारण समर्थांची झुंज एका वेगळ्याच अज्ञात पातळीवर चालू होती' वगैरे explanations तुम्हाला 'तिच तिच' किंवा अगदीच स्पष्ट शब्दात बोलायचे तर थातुर मातूर नाही वाटत


Shrini
Friday, January 10, 2003 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rmd, 'देवाज्ञा' मधे त्या हेमांगीचा ताबा जसा ती अमानवी शक्ती घेते, तसाच 'चंद्राची सावली' मधल्या 'ती' चा किंवा 'असला प्रकाश नको' मधल्या मुजुमदारचा ताबा ती शक्ती घेते, आणि त्यांचे शरीर, मन, स्मृती यांचा वापर आपल्या दुष्ट हेतूंकरता करते. मृत्यूला स्पर्श करुन परतलेली हेमांगीच आहे की दुसरे कोणी, हे कसे ठरवणार

Shrini
Friday, January 10, 2003 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटसरु, तुम्ही म्हणता ते काही प्रमाणात खरे आहे, पण निदान समर्थकथांमधे तरी धारपांनी याचा कंटाळा यावा इतका वापर केलेला नाही असे माझे मत आहे. विशेषतः त्यांना सुचलेली स्पष्टीकरणे आणि कल्पना : कागदी बाणाच्या घड्या उलगडल्या की तो हानीकारक उरत नाही, किंवा समांतर विश्वांतून स्वतःच्याच प्रतिकृतींची मदत घेणारे समर्थ (विश्वव्यूहाचा भेद, किंचाळणारी खोली), मानसशक्तीने द्रव्याची निर्मिती (सुताने स्वर्ग), अमानवी पण मानवांबद्दल सहानुभूती बाळगणार्‍या शक्ती (बुजगावणे), याच प्रकारच्या शक्तींची घेतलेली मदत (समर्थांना हाक), संमोहनाने मानवी अस्तित्वाचा भास निर्माण करुन ते नाहीसे करणे (मूर्ख मांत्रिक), resonance ने दगडी मूर्ती हलवणे (शक्तीदेवी), ते 'लुकुंडू' चे चेटूक, मार्तंडने केलेला समीपतावादाcआ उपयोग, त्याचा समर्थांनी केलेला मुकाबला, आणि e = mc^2 ने दिलेले स्पष्टीकरण, शेरभ बरोबरचा त्यांचा सामना आणि त्या महालकरीचा त्यांनी जागवलेला आकार (यो अस्मान् द्वेष्टि), 'न्यायमंदिर' मधल्या त्या तीन देवता, आणि त्यांचा masterpiece 'समर्थांचे पुनरागमन' मधले त्यांचे आणि मार्तंडच्या अंतिम संघर्षाचे वर्णन!

याखेरीज त्यांची 'तस्मार अर्चना', त्यांच्या अगरबत्त्या, त्यांच्या साधनेचे वर्णन!

समर्थांच्या गोष्टींमधे इतके वैविध्य आहे की मन थक्क आणि प्रभावित होउन जाते! स्वतः धारपांनी इतर नायक निर्माण केले, पण त्यातला एकही समर्थांच्या तोडीला उतरलेला नाही.

तुम्ही घेतलेला आक्षेप कृ ष्णचंद्र, जयदेव अथवा भगत यांच्या बाबतीत खरा आहे, पण मला वाटते की निदान समर्थ कथांपुरता तरी तो योग्य नाही.

आणि शेवटी, या घटनांचे स्पष्टीकरण तरी कसे आणि कोणत्या आधारावर देणार म्हणूनच त्या गूढकथा आहेत ना


Asami
Friday, January 10, 2003 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

very true shrini. Pan mala personally ase vatate ki Dharapanchya mulchya katha mhanaje jya sadharantah 10-12 varshanpurvi prasidhha zalya tya jaasti interesting ani logical vatataat. I'm aware of your love for samartha. Pan tyanchya specific nayakanchya katha mala baryachda atarkya vatat aalya aahet.

Shrini
Friday, January 10, 2003 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, धारपांच्या बहुतेक समर्थकथा या fantastic असल्या तरी जवळ जवळ प्रत्येक कथेला तर्काची भक्कम बैठक आहे, म्हणूनच त्या इतर कोणीही लिहीलेल्या या प्रकारच्या कथांपेक्षा वेगळ्या आहेत.

१०, १२ वर्षांपूर्वीच्या म्हणजे तुला नेमक्या कोणत्या कथा म्हणायच्या आहेत नावे किंवा गोषवारा देऊ शकलास तर त्यावर काही बोलता येईल.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators