Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 20, 2008

Hitguj » Language and Literature » भाषा » पारीभाषिक शब्द प्रयोग » Archive through April 20, 2008 « Previous Next »

Ladtushar
Friday, April 11, 2008 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी भाषेत वापरले जाणारे इंग्रजी व इतर भाषीय शब्द व नव नविन विज्ञानिक संज्ञा यांचे मराठी समान अर्थी व नाविन्य पूर्ण शब्द प्रयोग प्रचलित करण्या साठी हा उपक्रम सुरु करवा अशी कल्पना (झाकी यांच्या सोजन्याने) सुचली. ती प्रत्यक्ष्यात आणण्याचा हा प्रयत्न.

आपल्या मायबोलीवर सर्व क्षेत्रातील वक्ती येतात, तर प्रेतेकाने थोडासा हातभार लावून आपल्या रोजच्या व्यव्हारातिल पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द सुचवून या बा. फ. ची शोभा वाढवावी अन आपली मराठी बोली भाषा वृद्दीगंत करावी ही विनंती विशेष.

Ladtushar
Friday, April 11, 2008 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रोग्रामर - संगणक प्रणाली लेखक
प्रोजेक्ट - प्रकल्प
प्रोजेक्ट मानेजर - प्रकल्प व्यवस्थापक
टीम लीड- समूह नेता / कंपू दिशादर्शक
देव्हल्पर - ?

Ladtushar
Friday, April 11, 2008 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Portable Document Format - ?
Browser - ?
Word Document - ?Bee
Friday, April 11, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाडके तुषार, हा बा. फ. छान आहे पण तुमच्या शुद्धलिखाणातील अबब चुका पाहून जीव धापला :-)

Slarti
Saturday, April 12, 2008 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

self-referencing statement = 'स्वसंदर्भात्मक विधान' कसे वाटते ?

Ladtushar
Sunday, April 13, 2008 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, हो ना मी थोड़ा कच्चा रहिलो शुद्ध लेखनात...जरा जास्तच लाड केले माझे माझ्या मराठी च्या बाईनी
आत्ता थोड़े सुधरायाचा प्रयत्न करतो...

'स्वसंदर्भात्मक विधान'
Slarti हे काही वाईट नाही आहे चांगलेच आहे अश्या मराठी ची सवयच पड़ायला हवे...मग मज्जा येइल!

Bee
Friday, April 18, 2008 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नोबेल प्राईझ ला मराठी शब्द कुठला आहे?

Asami
Friday, April 18, 2008 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू उगाच काहितरी विचारायचे म्हणून विचारतो आहेस का ? prize ला पारितोषिक पण नोबेल हे विषेशनाम आहे. त्याला प्रतिशब्द कसा असेल ?

Lalu
Friday, April 18, 2008 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तू उगाच काहितरी विचारायचे म्हणून विचारतो आहेस का ?

असामी, हा प्रश्न तू उगाच काहीतरी विचारायचं म्हणून विचारला आहेस का? ~D

Mrinmayee
Friday, April 18, 2008 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नोबेल प्राईझ ला मराठी शब्द कुठला आहे?
'नकारघंटा पारितोषिक'!


Sakheepriya
Friday, April 18, 2008 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'नकारघंटा पारितोषिक'! >> >>

Shendenaxatra
Saturday, April 19, 2008 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतका छान आणि कल्पक प्रतिशब्द शोधल्याबद्दल मृण्मयीलाच एक नोबेल पारितोषिक द्यावे अशी मी शिफारस करतो !!

Bee
Saturday, April 19, 2008 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे असामी, प्राईझला 'परितोषिक' इतका शुद्ध मराठी शब्द काही केला आठवत नव्हता.. मी आपले 'बक्षिस' हाच शब्द डोक्यात घेऊन बसलो होतो आणि नोबेल ला तर एकही मराठी शब्द मला माहिती नाही. उगाच नाही रे विचारत मी. असा गैरफ़ायदा कशाला घ्यायचा.

मला माझ्या एका कवितेसाठी हा शब्द हवा आहे म्हणून इथे विचारला. धन्यवाद.


Bee
Saturday, April 19, 2008 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nobel बद्दल मी घोळ केला. मी त्याचे स्पेलींग Noble असे घेतले होते. कारण Noble चा अर्थदेखील well distiguished person बद्दलच आहे. आता विकीवर जाऊन सर्व माहिती वाचून पाहिली. धन्यवाद असामी.

ज्यांना विकीवरची माहिती वाचायची असेल त्यांनी ही लिंक पहावी
http://en.wikipedia.org/wiki/Nobel_Prize पण माझ्या खेरीज इतर कुणी इथे इतका अज्ञानी असेल इथे असे वाटतं नाही :-)

Tonaga
Saturday, April 19, 2008 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुलडोझरला मराठी शब्द माहीत आहे का... अंदाज करा...

Dineshvs
Saturday, April 19, 2008 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कूल, म्हणाला होता, कि नगर भागात त्याला, " उकर्‍या " असा शब्द आहे.

Shonoo
Sunday, April 20, 2008 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अरे सुशिक्षित ना तू? शिवाय इतकी वर्षे परदेशात आहेस, देश विदेश फिरला आहेस. अन तूला नोबेल पारितोषिकाच्या बद्दल माहिती नाही- की ते एका माणसाच्या नावाने दिले जाते? लिन्क दिलीस ती पण विकिपेडिआ ची? नोबेल ची स्वत:ची साइट आहे ती पाहिलीस तरी का?


Tonaga
Sunday, April 20, 2008 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उकर्‍या मला वाटते जेसीबी ला म्हणत असावेत...

बुलडोझरला 'बलिवर्द संयंत्र' म्हणतात. पुण्यात सिमला ऑफिस जवळ कुठलेसे सरकारी ऑफिस आहे तेथे एका पाटीवर हा शब्द दिसला. पुढे कंसात बुलडोझर लिहिले होते म्हणून त्याचा अर्थ कळला. मात्र शब्द सुन्दर आणि भारदस्त वाटला....


Shendenaxatra
Sunday, April 20, 2008 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुलडोझरला खणगाडा किंवा खणकयंत्र म्हणता येईल.

Bee
Sunday, April 20, 2008 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुलडोझरला बरीच नावे दिसतात :-)

शोनू, मान्य आहे.. पण मी कच्चा आहे G.K मधे.. जरी माझे वाचन बरे असले तरी देखील ते कच्चेच राहिले आहे.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators