|
Bee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 9:55 am: |
| 
|
उदाहरणादाखल, नविन लेखकांमधे मेघना पेठेंची पुस्तके मला G. A. च्या पुस्तकांपेक्षा अधिक आवडतात. हे एक नाव. ह्या लेखिकेची पुस्तके, त्यातील काही कथा पुन्हा वाचाव्याशा वाटणार्या आहेत. तितकी ओढ मला GA न्च्या पुस्तकांमध्ये जाणवली नाही. वर मी फ़क्त G.A न्च्या कथा - विषयाबद्दलच म्हणत नाही तर त्यांच्या शैलीबद्दलही म्हणतो आहे. किंबहूना विषय मला म्हणायचाच नाही. पुस्तक हाती घेतल्यानंतर ते संपले पाहिजे आणि परत वाचायची ईच्छा व्हायला पाहिजे असे GA न्च्या पुस्तकात मला दिसले नाही. ह्यावर कुणी वाद करून आपले मत मांडावे असे मला मुळीच अपेक्षित नाही. मला अमुक अमुक वाटले.. तसे इतर कुणाला वाटले का इतकेच विचारायचे होते. जर कुणाला GA अजूनही up to date वाटत असतील, वाचनीय वाटत असतील तर खूपच छान. कदाचित त्यांच्या मतांवरून मला नविन काहीतरी कळेल आणि GA मी नव्या ताकदीने वाचायला घेऊन बसेन.
|
Zaad
| |
| Wednesday, May 31, 2006 - 10:43 am: |
| 
|
मी मेघना पेठेंची पुस्तकं अजू वाचली नाहीत. पण जी.एं. च्या कथा मला खूप प्रभावित करतात....कितीही वेळा वाचल्या तरी. काही कथा तर मी १० पेक्षा जास्ती वेळा वाचल्या आहेत (रात्र झाली गोकुळी, बाधा इ.)तरी मला अजून वाचाव्याशा वाटतात. आधी त्यांची शैली, मग प्रतिमा, आणि आता त्यांचे विषय मला भुरळ घालताहेत... मेघना पेठे पण वाचायला हवंय...
|
खरे तर एखादा लेखक भिडणे ही प्रक्रिया आपल्या मनोवस्थेवर बर्याचदा अवलम्बून असते. जी एन च्या कथा संथ चाललेल्या आर्ट फिल्म सारख्या वाटतात. काही समीक्षक तर त्याना साहित्यिक आनि त्यान्च्या साहित्याला साहित्य देखील म्हणायला तयार नाहीत. पेठेही ग्रेट आहेत पण त्यान्चे लिखाण गाजते ते साहित्यबाह्य कारणांमुळे. म्हणजे त्या पुरुषांपेक्षाही बोल्ड लिहितात पण जी ए आणि पेठे यांच्यात एक समान धागा आहे आहे म्हणजे दोघेही नियतीपुढे हतबल झालेल्या माणसांचे चित्रण करतात. हतबल, लाचार, केविलवाणी फरपटलेली माणसे !!!!
|
दुसरे असे की पेठेंच्या कथेतील वातावरण हे conemporary असते. जी एंच्या कथेतील फ़ील जुन्या काळचा वाटतो. जसे नवा चांगला सिनेमा चटपटीत वाटतो तर जुने सिनेमे क्लासिक असूनही जरा संथ वाटतात तसे कदचित असावे. जी एंची रूपके अफलातून असतात.जसे ती पाऊलवाट उलट्या मेलेल्या सापाप्रमाणे डोंगरावर गेली होती. इ.
|
Pujarins
| |
| Wednesday, May 31, 2006 - 5:44 pm: |
| 
|
जी एन्चे साहित्य outdated म्हणावे का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे... समीक्षक दोन्ही बाजूंनी त्यान्च्यावर बोलले आहेत. ग्रेससारखा कवी जी एन्ना गुरुस्थानी मानतो तर 'दु:खाची काळी वर्तुळ गिरवत बसणारा लेखक' असे गाडगिळांसारखा म्हणतो... पण एखादा लेखक वाचकाला किती भुरळ घालतो हे महत्वाचे... जी एन्ची कथा फ़क्त कथानकधिSठीत नाही याचे अन्तीम कारण त्यान्च्या कथेचा प्रतीकात्मक धर्म, कथावास्तूचा कालानुक्रम आणि तिचा निवेदनक्रम यात भिन्नता असते. जी एंना घटनांच्या कालानुक्रमापेक्षा त्या घटनांचा अनुभव घेणारे मन चित्रीत करणे आगत्याचे वाटते म्हणूनच त्यांच्या विदुषक, स्वामी, पुरुष, प्रदक्षिणा, ठिपका, लाल गरूड, यात्रीक, शेलोॅट अश अनेक कथा मनाला मोहवतात. या सार्या कथावास्तूंचा, व्यक्तींचा आणि घटनांचा मोहरा प्रतिकात्मक अर्थाकडे असतो त्यामुळे काळ जुना असला तरी त्या कथा आउटडेटेड नाहीत. ५०० वर्षांपासूनचा शेक्सपीअर, २०० वर्षान्पासूनचा टोॅलस्तोॅय, १५० वर्षांपासूनचा दोॅस्तवस्की, ५० वर्षान्पासूनचा सार्त्र आणि पुल outdated म्हणता येतील का? जी एंच्या प्रतीमा, व्यक्तीचित्रण, त्यांचे तत्वद्यान, रुपकं हे स्वतन्त्र लिहिण्याचे विषय आहेत...याशिवाय जी एंच्या साहित्यात त्यांनी भाषांतरीत केलेले साहित्यही ध्यानात घेतले पाहिजे.. सोन्याचे मडके , shaving of shahpot, the lord of flies, ranaateel prakash इत्यादी जी एंचे भाषांतरीत साहित्य तसेच त्यांनी लिहलेली पत्रे म्हणजे मराठीतील एक मोठे लेणं आहे. झादप्रमाणेच मीदेखिल जी एंच्या कथा अनेक वेळेला वाचल्या आहेत प्रत्येकवेळी त्या तेवढ्याच प्रभावीत करतात. मेघना पेठेंची शैली आणि त्यान्च्या कथा ह्यांची जी एंच्या कथांशी तुलना करणे अप्रस्तुत आहे (तशी तुलना करायचीच झाली तर ती पेठे आणि विजया राज्याध्यक्ष यांच्यात करता येईल). याउपर कोणाला कोणता लेखक आवडतो हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीधर्मावर अवलम्बून आहे. आमच्यासारखे जी. ए. भक्त मात्र पून्हा पून्हा मन सुन्न करणारा अनुभव घेत जी. एंच्या कथा वाचतच राहतील
|
Santu
| |
| Thursday, June 08, 2006 - 8:19 am: |
| 
|
पुजारी तुज खर आहे जी ए ची गोष्ट च वेगळी.त्यांच्या कथा कालातित आहेत.मन अगदि सुन्न होते. कारण त्यां च्या म्हणण्या प्रमाणेच जखम अगदि ताजी दिसली पाहिजे अगदि हाड सुध्दा दिसले पाहिजे असे त्यांची धारणा होती. जी ए ना तुलना नाहि
|
Gs1
| |
| Thursday, June 15, 2006 - 9:07 am: |
| 
|
अरे हे आजच वाचले.. हिमेश रेशमिया काय सॉल्लिड गातो, पंडित भीमसेन जोशींना त्याची सर नाही, ती मजा नाही, जुनाट वाटतात असे मी मध्ये एकाकडुन ऐकले होते ते आठवले. असो, हा काही चर्चेचा विषय नाही, ज्याच्या त्याच्या समज आणि आवडीचा प्रश्न आहे.
|
Giriraj
| |
| Thursday, June 15, 2006 - 10:16 am: |
| 
|
GS.. माझ्याकडूनच ऐकले असशील!माझ्याकडे 'समग्र हिमेश' आहे.बी,तुला हवा असल्यास मी स्वखर्चाने पाठवू शकतो. जी.ए.च्या कथा कालातित असतात हा अनुभव मात्र मलाही आहे.कधी जुन्या काळचा फ़ील येतोही पण मुख्य म्हणजे त्यांची जादू उतरत नाही हेच खरे!
|
Gs1
| |
| Thursday, June 15, 2006 - 11:24 am: |
| 
|
गिरी, तुला नुकताच येरवड्याचा हिमेस हा पुरस्कार मिळाला असला तरी असे विधान करण्याची तुझी हिंमत होणार नाही. ( अशी आशा आहे ) कालातीत : खरे आहे, वर पुजारी यांच्या सुंदर विवेचनात तसे आले आहेच. वि.सू. : ही आशा कोण ? असले 'ड' दर्जाचे विनोद करण्यास इथे सक्त मनाई आहे.
|
आधीच हिमेस, त्यात येरवड्याचा हे हे ड दर्जा, सही रे
|
Pujarins
| |
| Sunday, July 02, 2006 - 6:23 pm: |
| 
|
जी एंची पत्रे http://saamana.com/2006/July/02/Link/Utsav_9.htm
|
Pujarins
| |
| Monday, July 10, 2006 - 6:21 pm: |
| 
|
जी. एंची निवडक पत्रे http://esakal.com/esakal/esakal.nsf/MiddleFrame?OpenForm&MainCategory=Saptarang&category=Saptarang_Prasangik
|
वैर्याची एक रात्र ह्या जी एंच्या भाषांतरीत पुस्तकावर बरीच चर्चा ह्या बीबी वर झाली असल्याचे आठवते. हे पुस्तक हिटलरच्या छळछावणीतील अनुभवांवरील आहे. आज मूळ पुस्तकाचे नाव मिळाले. I Survived Hitler's Ovens by Olga Lengyel
|
होय ती चर्चा मी आणि पुजारी या मायबोलीकराने केली होती. धन्यवाद आठवणीने पोस्ट केल्याबद्दल. मात्र ते मराठी पुस्तक कुठेही उपलब्ध होत नाही हे मोठेच दु:ख आहे....
|
रॉबीन, विकिपिडिया वर जी एं बद्दलच्या माहिती मध्ये त्यांनी Conrad Richter या अमेरीकन लेखकाच्या पाच पुस्तकांचा मराठी अनुवाद केल्याचा उल्लेख आहे. कुणाला याबद्दल माहिती आहे का? विकिपिडिया ची ही लिन्क http://en.wikipedia.org/wiki/G._A._Kulkarni
|
Chandya
| |
| Tuesday, June 12, 2007 - 4:22 pm: |
| 
|
तिथेच Conrad Richter वर शोध घेतल्यास खालील माहिती आहे Some of his novels [The Trees (Raan), The Fields (Shiwaar), The Town (Gaav) and The Light in the Forest (Jangalaateel Prakash)] have been translated into Marathi by G. A. Kulkarni, for a project initiated by USIS in India to bring fine American writing into Indian languages.
|
पिंगळावेळ ह्या कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर खालील उतारा आहे. मला भयंकर अस्वस्थ करणारा हा कवितापरिच्छेद आहे. एक विचित्र भावना दाटुन येते मला हे वाचले की. याच कथासंग्रहामधील स्वामी ह्या कथेची आठवण येते हे वाचले की. Stranger, think long before you enter. For these corridors amuse not passing travelers. But if you enter, keep your voice to yourself. Nor should you tinkle and toil your tongue. These columns rose not, for the such as you. But for those urgent pilgrim feet that wander. On lonely ways, seeking the roots of rootless trees. The earth has many flowery roads; choose one That pleases your whim, and gods be with you. But now leavel-leave me to my dark green solitude. Which like the deep dream world of the sea Has its moving shapes; coral; ancient coins; Carved urns and ruins of ancient ships and gods; And mermaids, with flowing golden hair That charm a patch of silent darkness into singing sunlight
|
Shrini
| |
| Wednesday, June 13, 2007 - 9:11 am: |
| 
|
आपल्या वाचकांना G.A. बहुतेक हेच सांगत आहेत!
|
Bee
| |
| Wednesday, June 13, 2007 - 9:41 am: |
| 
|
बेडेकर, हा एक शिलालेख आहे. बहुतेक जीऐंनीच तो ईंग्रजीमधे अनुवादीत केला असेल. 
|
हा मूळ उतारा मराठीतच आहे, की जीएंच्या कुणा चाहत्याने त्याचे मराठीत भाषांतर केले आहे?
|
|
|