Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 11, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दखेळ » Archive through June 11, 2007 « Previous Next »

Zelam
Wednesday, October 26, 2005 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

varIla kÜDI vaacaUna scholarship cyaa prIxaolaa basalyaasaarKM vaaTtya


Bee
Thursday, October 27, 2005 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल मी पण माधव ह्यांच्या कोड्यात पडलो.. मलाही वाटते ते दोघे बहिण भाउ.. मी तर ताईसोबत आपण चाललो आहे आणि वाटेत कुणी भेटलं असाही विचार करून पाहिला आणि ताईलाच मिस करायला लागलो नंतर :-)

Madhavm
Friday, October 28, 2005 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ga.do. AgadI barÜbar²

JaolamaÊ huXaar jahaja imaLvaNyaasaazI ‘laÜNaI’ maaga-dXa-k ]pyaÜgaI pDayacao.

Aata AaNaKI ek...
vaIsa pahuNao Aalao.
baavaIsa AaMGaÜLIlaa gaolao.
tovaIsa jaovaayalaa Aalao.

tr na@kI kItI pahuNao AalaoÆ ksaoÆ


Bkashish
Friday, October 28, 2005 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pahuNao vaIsaca AalaoÊ baavaI mhNajao bahutok baarva ikMvaa payaáyaaMcaI ivahIr. baavaIsa AaMGaÜLIlaa gaolao mhNajao baavaIvar AaMGaÜLIlaa gaolao. to vaIsa jao pahuNao mhNaUna AalaoÊ jao AaMGaÜLIlaa gaolao to vaIsajaNa jaovaayalaa Aalao.

Kaushik
Thursday, March 15, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वाना एक वीनन्ती आहे की त्यानी एन्ग्लिश मधे न लीहिता क्रुप्या करुन मरातीत लीहावे

Vinaydesai
Thursday, March 15, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kaushik तुम्हाला विनंती, की अशी विनंती करताना तरी ढोबळ चुका टाळाव्या...

Chhatrapati
Thursday, May 24, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाषेला नसे दिशेचा साचा
उभे वा आडवे कसेही वाचा !


जि रा फ
रा व ण
फ ण स

स क स
क स र
स र स

वगैरे ...


Ankulkarni
Thursday, May 24, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छत्रपती आणखी एक
"चिमा काय का माचि "


Mahesh
Friday, May 25, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक आठवते आहे
रामाला भाला मारा
खरोखर मारायचा नाही, नुसते पालिंद्रोम चे वाक्य आहे.


Vinaydesai
Friday, May 25, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात अजुन एक...

गु रु जी
रु मा ल
जि ल बी

आणि

"तो कवि डालडा विकतो"




Slarti
Friday, June 01, 2007 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते जुने 'काकाने काकूचे...' वगैरे आठवते का ? काही नमुने देतो...

काकूने काकाचे कामाचे काळे कोरे कागद काळ्या कात्रीने कराकरा कापून केराच्या कुंडीत कोंबले. काका काकूवर कातावला. काकाने काकूचे काळेभोर केस काळ्या कात्रीने कराकरा कापून केराच्या कुंडीत कोंबले.

चिंतोपंतांच्या चार चवल्या चोराने चोरल्या. चोर चिंचेवर चढला. चिंतोपंतही चिंचेवर चढले. चिंतोपंतांनी चोराला चार चपराकी चढवल्या. चोर चारी मुंड्या चीत !

ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवरून ढब्बा ढेकूण ढासळला.

पुण्याचा परंतप परांजपे पहाटे पाचला पुण्याच्या पर्वतीच्या पाचव्या पायरीवरुन पंचरंगी पोपट पाहताना पावसाच्या पाण्यात पसरुन पडला.

हा कुठलातरी अलंकार आहे ना ? कृ.जा.प्र.पा.


Zakasrao
Saturday, June 02, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला अनुप्रास अलंकार म्हणतात. ( CDBG)
याच कोल्हापुरात आम्ही खालील प्रमाणे उदाहरण देत होतो
पांडु पाटलाचा पांढरा पाडा पंचगंगेच्या पाचव्या पायरीवरुन पाण्यात पडला.
पाडा= तरुण बैल
पंचगंगा=कोल्हापुरातील एक नदि
किंवा
पेटवले पाषाण पठरावरती शिवबाने
३ प आल्यामुळे हादेखिल अनुप्रास अलंकार. हे आमच्या मराठीच्या बाईंच आवडीच उदाहरण.
हे जमल नाहितर तर ऐन वेळी काका आणि काकु परिक्षेत मदतीचा हात द्यायचेच. हे आता लिहिता लिहिता एक गाण आठवल ते हि याच अलंकारात आहे. (याच रिमिक्स पार्टी स्पेशल आहे बरं)
चंदुकि चाची ने चंदु की चाची को चांदीके चमचेसे चटणी चटायी.


Mrinmayee
Sunday, June 03, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पांडुरंगाचा पाचवा पोर पायखान्याच्या पहिल्या पायरीवरून पा xx पा xx पळाला! अनुप्रास अलंकाराचा म्हणून सांगीतलेला हा नमुना शाळेत एका वर्गमैत्रीणीला शिक्षा करून गेला. बाईंनी बाकावर उभं केलं!

Mahesh
Monday, June 04, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यामधे पर्वतीच्या पन्नासाव्या पायरीवर पहाटे पाचला पेशव्यांनी पंचरंगी पोपट पाहिला / पकडला.

Dineshvs
Monday, June 04, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचपतिव्रतानी प्रत्यही तुझी पूजा करावी, अशी पवित्र तुझी पात्रता.

गडकर्‍यांच्या एकच प्याला, नाटकातले वाक्य.


Nalini
Tuesday, June 05, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काकाने काकूला कवठाच्या काठीने कोपर्‍यात कोचले कारण काकूने काकाच्या कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.

Chhatrapati
Sunday, June 10, 2007 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाच लो, सुलोचना !
वाह ! हाच चहा हवा !!



Chhatrapati
Sunday, June 10, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याच्या पंतांची पिवळी पगडी पर्वतीच्या पंचवीसाव्या पायरीवरून पाचव्या पायरीवर पडली. पंत पाचव्या पायरीपर्यंत पोचण्यापूर्वी पंढरपूरच्या पिंटूने पंतांची पिवळी पगडी पळवली. पिंटूने पगडी पंढरपूरला पाठवली. पंतही पटकन पंढरपूरला पोचले. पंतांनी पांडुरंगाच्या पायाशी पिवळी पगडी पडलेली पाहिली. पगडी पाहून पंत पांडुरंगाच्या पाया पडले, पगडीसह पंत पुण्याला परतले.

Ameyadeshpande
Sunday, June 10, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलीनी ते काका काकू वालं आम्ही असं म्हणायचो.

काळे काकांच्या काळ्या काकूने कार्यालयातील कापाटामधले कामाचे कागद कोर्‍या कात्रीने करा करा कापून कचर्‍याच्या करंडीत कोंबले. काळे काला काळ्या काकूला कावले.

ढब्बेरावांच्या ढब्ब्या ढेरी वरून ढब्बा ढेकुण डासळला.


Zakasrao
Monday, June 11, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढब्बेरावांच्या ढब्ब्या ढेरी वरून ढब्बा ढेकुण डासळला>>>>
हेच वाक्य माझी बायको अस म्हणते.
ढम ढेरीच्या ढेरीवरुन ढेकुण ढासळला.
अरे ते अतिशयोक्तीचे उदाहरण आठवतय का कोणाला?
शिप्पिभर तेल आणल
आणि शेवटी त्या उंट पोहुन गेला अस काहितरी आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators