Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 21, 2007

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » Archive through March 21, 2007 « Previous Next »

Sherloc
Tuesday, February 13, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माधवी माटे यांचे "रावणबाळ" हे पुस्तक कुठे मिळेल? आद्य खलपुरुष रावणाबद्दल, त्याच्या बाळपणाबद्दल छोट्या गमतीदार चारोळ्या आहेत त्यात.

Shmt
Thursday, February 22, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला english fiction पुस्तके वाचायची आहेत. मला कोणी साध्या, सोप्या भाषेत आणि interesting अशी कोणती पुस्तके आहेत, ते सुचवेल का? मग मी इथल्या library तून ती आणेन.
धन्यवाद.


Shonoo
Thursday, February 22, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shmt

/hitguj/messages/103385/116642.html?1158590943
ही लिन्क चेक करा. याच बी बी चे आर्काइव्हस चाळून पहा आणखीन ही नावं सापडतील. अजून वाचली नसतील तर हॅरी पॉटर ची पुस्तके पण वाचायला सोपी आहेत.

Milindaa
Wednesday, February 28, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103385/123218.html?1172682206

या लिंकवर बघा

Badbadi
Thursday, March 08, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या काहि दिवसात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे "माझी जन्मठेप" आणि गोपाळ गोडसे यांचे "गांधीहत्या आणि मी" हि पुस्तके वाचली. माझी जन्मठेप शाळेत असताना वाचलं होतं. पण तेव्हाचा अनुभव आणि आताचा यात बराच फरक आहे. या पुस्तकात प्रचंड ऊर्जा आहे. सावरकरांनी अंदमान मध्ये खूप हाल सोसले आणि त्याहि परिस्थितीत ढळले नाहीत!!! सहनशक्ती, vision, स्वाभिमान, भाषाप्रभुत्व, देशप्रेम अशा अनेल अमूल्य गुणांचा साठा म्हणजे सावरकर. शिक्षा असह्य होऊन सावरकरांच्या मनात २-३ वेळा आत्महत्येचे विचार आले. त्या प्रत्येक वेळी त्यांनी केलेला विचार भारावून सोडतो. गांधीहत्या प्रकरणीदेखील सावरकर गोवले गेले. त्यावेळी स्वत: अभिवेदन चालवून त्यांनी न्यायालयाला सत्य पटवून दिले.
दोन्ही पुस्तके वाचनीय आणि संग्राह्य आहेत. मी एका पाठोपाठ दोन्ही वाचली, अनेकदा रात्री झोपले तरी झोप यायची नाही. गांधीहत्या आणि मी वाचताना ज्या दिवशी नथुरामांच्या फाशीचे प्रकरण वाचले त्या रात्री तर मध्येच कधी जाग आली तरीदेखील नथुराम फाशी गेले याचंच वाईट वाटत होतं.
३-४ वर्षांपूर्वी महानायक वाचले. तेव्हा जे वाटलं तेच यावेळी परत वाटले - सावरकर, सुभाषचंद्र यांसारखे लोक आपल्याला सक्रिय राजकारणात लाभले नाही हे आपलं दुर्दैव!!!

(मी गांधीविरूद्ध नव्हते आणि आजहि नाही. याबद्द्ल नंतर कधी लिहिन. माझ्या या २ पुस्तक वाचण्यावरून काहि दुसरेच फाटे फुटू नयेत म्हणून हे इथे स्पष्ट करत आहे.)

Bee
Friday, March 09, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडी, अभिवादन चालवून म्हणजे केस चालवून म्हणतेस का? माझ्या मते अभिवादन म्हणजे नमन करणे. जसे की शुभरजनी, सुप्रभात, सुदुपार.

Paarava
Friday, March 09, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kunala waeet watel mhanun apan aapale vichar wyakt karu naye ase nahi kaaran aapan iitihas badalu shakat nahi. tyamule chan watale " badabadi". bhetun anand zala. "saagaraa pran......" aiekatannach shahare yetat. tr mg pustak vachtanaa tr prasangach dolyaasamor ubhe rahatat. me pn wachen donhi pustaka. baap re barech bolalo. me navin aahe ithe. saglyaannna namaskar.... chuk bhul maaf. bhetu parat....

Badbadi
Monday, March 12, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तो शब्द "अभिवेदन" असा हवा आहे. लिहिताना चूक झाली. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!!!
मॉड, तुम्ही हे दुरूस्त करू शकाल का?

पारवा, कोणाला वाईट वाटेल वगैरे विचार मी निदान पुस्तकाबद्दल लिहिताना तरी करत नाही.


Bee
Monday, March 12, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेदन शब्दाचा नक्की अर्थ काय होतो बडी?

Kandapohe
Monday, March 12, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक दोन वर्षापूर्वी डॉक्टर आपटे यांचे 'हृदयस्पर्शी' वाचण्याचा योग आला. प्रस्तावना वाचतानाच कळले की हे तर आपलेच फॅमीली डॉक्टर. त्यांचा व आमचा जवळचा परीचय असल्यामुळे पुस्तक वाचताना सगळ्या घडामोडी डोळ्यासमोर उभ्या रहील्या.

पुस्तकाबद्दल थोडे.

हे पुस्तक, आपटे दांपत्याने आपल्या मुलावर अगदी जन्मापासून कोसळलेल्या संकटांशी दिलेल्या झुंजीची माहीती देणारे. आपटे दांपत्यास तीन मुलं. त्यातील आशीष हा सर्वात लहान. जन्मापासून त्याच्या हृदयात गुंतागुंत झालेली. पण वाट्टेल ते झाले तरी आशीषला मरणाच्या दाढेतून बाहेर काढयचीच असा निर्धार करून आपटे दांपत्याने आणि त्यांच्या परीवारातील अन्य सदस्यांनी परिस्थितीशी जो सामना दिला त्याची माहिती या पुस्तकात आहे.

आशीष आपटे हा त्यांचा मुलगा २७ वर्षे जगला. हृदयावरची अवघड, भारतात ना होणारी अनेक ऑपरेशन झालेली असतानाही सी. ए. आणि आय. सी. डब्ल्यु. ए. झाला. त्याच्या जीवनावरील हे पुस्तक वाचनीय आहे.


Shrini
Monday, March 12, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एं चे 'कुसुमगुंजा' नुकतेच वाचून संपवले. सुरेख पुस्तक आहे. विशेषतः त्यातल्या लग्न, चैत्र, बारसे, फेड, आणि, एक मित्र एक कथा, या गोष्टी अप्रतिम. मराठीतल्या इतर कुठल्याही लेखकाने / किने वाचनाचा हा अनुभव मला दिलेला नाही. जी एंचे लिखाण मराठीत अतुलनीय आहे!

पुस्तकाचा तपशील:

परचुरे प्रकाशन, मुंबई, १० जुलै १९८९. किंमत ५० रूपये.


Badbadi
Monday, March 12, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिवेदन = अपील, अर्जित

अधिक माहितीसाठी
हे पाहा

Bee
Tuesday, March 13, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Badi, link baddal dhanyawad!

Zakasrao
Thursday, March 15, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परचुरे प्रकाशन, मुंबई, १० जुलै १९८९. किंमत ५० रूपये.
श्रीनि नक्की ५० रु. च आहे का?
मी फ़ेड वाचली आहे. छान आहे.


Dineshvs
Monday, March 19, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंगला गोडबोले यांचे, पर्स हरवलेली बाई, ( नवचैतन्य प्रकाशन, पाने १६०, मूल्य १४० रूपये ) हे पुस्तक घेऊन भल्या पहाटे, फ़्लाईटची वाट बघत होतो. त्यावेळी माझ्या चेहर्‍यावरचे भाव बघुन, शेजारचा अमराठी माणुस मला म्हणाला, बहुत मजेदार है क्या, थोडा हमेभी तो बताओ. ( मी त्याच्या विनंति ला मान देऊ शकलो नाही, कारण या पुस्तकातील भाषेचे भाषांतर मला तरी शक्य नाही )

तर हा आहे काही ललित लेखांचा संग्रह. लेख अगदी गुदगुदल्या केल्यासारखे हसवतात. ईतके मिश्किल असुनहि ते अगदी मार्मिक आहेत. लेखिकेने स्वतःवरच बहुतेक सगळे विनोद केले आहेत. पण आपल्याला मात्र आपल्यासमोर आरसा धरल्यासारखे वाटत राहते. यातले बहुतेक प्रसंग आपल्या आजुबाजुला घडलेले असतात. आपल्या बाबतीतहि हे घडलेले असते. पण यावर असे भाष्य करणे मात्र आपल्याला जमलेले नसते.
पण तरीही कुठेहि हा विनोद कुणालाच दुखवत नाही. सगळेच लेख विनोदी आहेत असे नाही, जाहिरातीतील स्त्री दर्शनावर पोटतिडिकेने लिहिलेला लेखहि आहे.
वाचकाना हसवणे ( त्यातुन मराठी ) हे खुपच अवघड काम आहे. पण तरिही लेखिका आपल्याकडे कायम कमीपणा घेते. आपण अगदी सामान्य लेखिका आहोत, हा सूर कायं ठेवलाय. ( अर्थातच तो पटत नाही ) याबाबतीत लेखिकेची वाक्ये अशी, माझ्यापुरतं, मलाहि एक प्रशस्तिपत्र सुखावतं, ते सांगायला हरकत नाही. ' तुझं लेखन वाचताना तू समोर बसून गप्पा मारत्येस असं वाटतं बाई !' असं कुणी कुणी म्हणतात, तेव्हा मी सुटकेचा श्वास सोडते, नाही तरी जीवनाची अंतिम सत्यं सांगता येतील एवढी प्रतिभा आपल्यापाशी नाहीच. मग निदान गप्पागोष्टींमध्ये, हसतबोलत वेळ कधी गेला ते कळलं नाही, असं होणं ही पावती का पटकावू नये ? ( पान ८४ )

अजुनहि पुस्ताकतल्या लेखांचे विषय सांगावेसे वाटत नाहीत. कारण ते प्रत्यक्ष वाचुनच बघायला हवेत. पण एक उदाहरण मात्र देतो.

" सोन्या, जरा कपबश्या काढतोस ?"
" काय काढू ?"
" कपबश्या "
" आहेत आपल्याकडे ?"
" असतील, बघ जरा "
" कुठून काढू ?"
" शेल्फातून "
" कुठलं शेल्फ ?"
" अरे त्या खोलीतलं. "
" कुठली खोली "
हे सगळं ऐकणार्‍या आणि चहा खाणं, गप्पा अगर महत्वाचं काम या सगळ्या आघाड्या संभाळण्याची कसरत करणार्‍या बाईला शहाणा पाहुणा काय म्हणेल ? ' मी चहा सोडलाय ' असं म्हणेल ? की मला ओट्यावर दिसणार्‍या तसराळ्यातून किंवा कढईतुन चहा दिलात तरी चालेल असं म्हणेल ?
एवढं करुन संबंधित व्यक्तिनं बरोबर टाकायला ठेवलेले, तडकलेले कप किंवा टवके उडालेल्या बश्या रुबाबाने समोर आणून ठेवल्या की बाई बापडी सर्वसंगपरित्याग करुन संन्यास घ्यायला मोकळी ! ( पान ४६ )


Bee
Tuesday, March 20, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कोबाल्ट ब्लू' नावाचे एक पुस्तक आले आहे, लेखक आहेत सचिन कुंडलकर. नावावरुन ह्या पुस्तकाविषयी मला उत्सुकता लागलेली आहे. कुणी आहे का ज्यानी हे पुस्तक वाचले आहे? असेल तर प्लीज परिक्षण लिहा ही विनंती!

आशा बगेंच्या 'भुमी' ह्या कादंबरीला कुठला तरी पुरस्कार मिळाला आहे. कुणी वाचले का हे पुस्तक?


Badbadi
Wednesday, March 21, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशने सांगितलेलं पुस्तक PDF स्वरूपात
इथे उपलब्ध आहे.

Kshitij_s
Wednesday, March 21, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडि, पुस्तक डाउनलोड करण्यासाठि सदस्य व्हावे लागते का?

Dineshvs
Wednesday, March 21, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, छान काम केले बडबडी. आता सगळ्याना वाचता येईल हे पुस्तक.


Badbadi
Thursday, March 22, 2007 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षितिज, हो.. डाऊनलोड करण्यासाठी सदस्य व्हावे लागेल.
दिनेश, :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators