Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 17, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through August 17, 2006 « Previous Next »

Robeenhood
Saturday, July 29, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वात्रट शब्द आला आहे वातरट पासून. वात झाल्यानन्तर माणूस काहीही असंबद्ध बरळू लागतो.तसे बडबडणारा तो वात्रट. व्रात्य म्हणजे खोडकर...

दशग्रंथी ब्राम्हन म्हणजे ज्याने दहा धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे तो. वेदी(याला सरदार बेदी असे म्हणतात)द्विवेदी,त्रिवेदी, चतुर्वेदी हा त्यातलाच प्रकार....


Bee
Monday, August 14, 2006 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...

व्रात्यबद्दल रॉबीनचे धन्यवाद!

मला अंतपूर शब्दाचा अगदी ठाम अर्थ हवा आहे. मी कित्येक कवितांमधून हा शब्द वाचला आहे.. माझ्या मतानुसार अंतपूर म्हणजे मृत्युनंतरचे ठिकाण.. CBDG


Moodi
Monday, August 14, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अंतःपूर म्हणजे जर मृत्युनंतरचे ठिकाण तर स्वर्ग, नरक कशाला म्हणतात? मृत्युलोक कशाला म्हणतात?

अंत म्हणजे कसला अंत? कोणाचा अंत? पूर म्हणजे काय? तो कशाचा असू शकतो? की त्याला अंत असे म्हणतात? मग अंतःस्थ म्हणजे काय? अंत याला दुसरा शब्द कोणता? आतले याला काय म्हणतात?

सांगू शकशील?


Bee
Monday, August 14, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, एक ना धड अन भाराभार चिंद्या. केवढे ते प्रश्न आणि smilyes !!!!! त्यापेक्षा उत्तर माहिती असते तर सांगायला काय पैसे पडले असते तुला.. स्वर्ग, नरक, पाताळ ही ठिकाणांची स्पष्टपणे नावे झालीत. प्रत्येकाच्या वाट्याला ह्यातील कुठलेली अंतपूर येऊ शकते. हा शब्द नक्कीच अंत + पूर असा बनलेला नाही. तू पूर काय विचारतेस उगाच :-)

दिवे घे हो ताई माई अक्का..


Moodi
Monday, August 14, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अरे मला ताई माई अक्का कॉंग्रेसचा शिक्का नको म्हणूस जरुर म्हण. अन स्माईली टाकल्या म्हणून रागवु नकोस रे. तू नाही का भारंभार टाकतोस?

बरं पूर म्हणजे प्रासाद, महाल म्हणजे खोली, रुम, दिवाणखाना, भवन( अख्ख्या घरालाही भवन म्हणतात, मराठीच भाषा ती) जसे कैकयी कोपभवनात गेली होती. आता कोप म्हणजे काय नको विचारुस. अंत म्हणजे आतल्या, अंतस्थः.

आणि त्या चिंध्या आहेत हं, चिंद्या नाही. आणि हो मी पैसे घेत किंवा देतही नाही सांगायला. दिवे घे हो.

आणि काही चुकले तर चुकले. बाकीचे जरुर दुरुस्त करतील.


Moodi
Monday, August 14, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी एक विसरले. महाभारत रामायण कालीन जे ग्रंथ असतात, त्यात शेवटच्या पानांवर त्या त्या शब्दांचा अर्थ दिलेला असतो, जमल्यास तो ही बघत जा.

Ajjuka
Tuesday, August 15, 2006 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतपूर नाहीये तो शब्द. अंतःपूर असा आहे. हा विसर्ग र चा लोप होऊन आलेला आहे संधी होताना. अंतर + पूर असा.
मूडी म्हणते ते बरोबर आहे. पूर म्हणजे ठिकाण.
अंतर या शब्दाचा अर्थ आतले किंवा मनातले असा होउ शकतो. या शब्दाच्या संदर्भात तो आतले हाच आहे.
थोडक्यात अंतःपूर म्हणजे घरातील आतले ठिकाण. सगळ्या जुन्या गोष्टींच्यात राजाचे / राणीचे अंतःपूर हा शब्द येतो. त्याला private space हाही sense आहे. पण शब्दार्थ बघितला तर आतली जागा हा योग्य आहे.
मी सहज उत्सुकता म्हणून शेवटचे archive वाचले त्यातले काही..
पांघरून हे क्रियापद नाही. पांघरणे हे आहे. मी शाल पांघरली.. इत्यादी.. असो.

ग्रंथी याचा अर्थ glands असा होतो. ग्रंथी होणे असे क्रियापद मी तरी ऐकले नाही.
दशग्रंथी चा अर्थ बरोबर आहे वरच.
गबाळग्रंथी हे विशेषण माणसाला फारसे लागू पडत नाही. तो गबाळग्रंथी आहे असे शक्यतो म्हणले जात नाही तर त्याचा कारभार गबाळग्रंथी आहे असे म्हणले जाते.
यावरून तरी मला ग्रंथीचा संदर्भ maintaining (books) याच्याशी असावा असे वाटते.
असो..


Bee
Tuesday, August 15, 2006 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, खूप सुंदर माहिती दिलीस. मी आज सकाळी इथे येऊन विसर्ग विसरलो हे लिहिणारच होतो. तेवढ्यात तुच बरोबर केलेस. तुझे, मूडीचे दोघींचे thanks

Shonoo
Wednesday, August 16, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
सर्वसाधारणपणे राण्यांच्या ( स्त्रियांच्या )निवासाची जागा या अर्थाने अन्त:पूर हा शब्द वापरला जातो.


Bee
Thursday, August 17, 2006 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ह्यामध्ये काष्ठी शब्दाचा अर्थ काय होतो आणि ते काष्ठी आहे की काष्टी आहे? काष्टा हा नऊवरीला असतो इतके माहिती आहे. ह्यावरुन वाटते की हा शब्द काष्ठा असा असेल. (नेसलेल्या नऊवारीच्या कुठल्या भागाला काष्टा म्हणतात मला माहिती नाही.) तसेच रांधा-वाढा-उष्टे-काढा हे शब्दही कसे लयबद्ध आणि एकमेकांना चिकटून आलेले वाटतात. मराठी भाषेत असे समूहाने एकत्रीत आलेले शब्द कुणाला माहिती असेल तर इथे लिहा.

Nvgole
Thursday, August 17, 2006 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी म्हणजे पाण्यात, जमिनीवर, लाकडात आणि दगडात.

Milindaa
Thursday, August 17, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काष्टा

तो कासोटा असतो


Manishalimaye
Thursday, August 17, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नऊवारी साडीचा असतो तो काष्टा आणि इथे काष्ठ असा शब्द आहे काष्ठ म्हणजे लाकुड. कष्ठशिल्प हा शब्दप्रयोग ऐकला असेल.

Moodi
Thursday, August 17, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही मिलिंदा बी म्हणतोय ते बरोबर आहे. कासोट्याला काष्टा पण म्हणतात. काष्ट्याची साडी असाही शब्द प्रचलीत आहे.

Asami
Thursday, August 17, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी काही असो, bee ने काष्ठीचा धरलेला अर्थ ठेवून जळी - स्थळी वाचले तर

Maitreyee
Thursday, August 17, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाम्या! अग्गदी तेच डोक्यात आलं होतं माझ्या

Naatyaa
Thursday, August 17, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी तुझा मवाळ स्वभाव काही जाणार नाही!!

Deepanjali
Thursday, August 17, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ह्यामध्ये काष्ठी शब्दाचा अर्थ काय होतो आणि ते काष्ठी आहे की काष्टी आहे
<<<<बी ,
काष्ठी म्हणजे धोतराचा काश्टा .
आणि जळी स्थळी काष्टी पाषाणी महणजे दगडा वर जळून पडलेले धोतर !
लक्षात ठेव आणि पुन्हा विसरु नको !


Zakki
Thursday, August 17, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला मिलिंदा. काहीतरी कारण काढून एकदम कासोट्याला हात घालतोस. बरे नव्हे हो! मार खाशील एक दिवस.


Anilbhai
Thursday, August 17, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय गम्मत आहे. गोव्यात काश्टी म्हणजे लंगोटी. :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators