Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 19, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » वाक्प्रचार » Archive through May 19, 2006 « Previous Next »

Bee
Friday, October 28, 2005 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jasao jaI ‘naakanao kaMdo saÜlaNao’ :-)

Gajanandesai
Thursday, November 24, 2005 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथेही येऊन लिहा.

असे मूग गिळून बसू नका! :-)


Gajanandesai
Monday, March 13, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साखरेची साल काढणेः अति (नको इतका) बारकावा आणि चिकित्सा करणे.

Bee
Monday, March 13, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेकी बोले सूने लागे...


अर्थात कुणाला स्पष्ट बोलले जात नसेल तर तिसर्‍याच व्यक्तीला बोलावे म्हणजे ज्याला बोलायचे आहे त्याला ते बरोबर कळते.


Gajanandesai
Monday, March 13, 2006 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काट्याने काटा काढणेः
एक अडथळा दुसर्‍या अडथळ्याचा उपयोग करून दूर करणे. (बहुतेकदा कुटील कारस्थानाच्या संदर्भात वापरतात.)


Karadkar
Tuesday, March 14, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, हा वक्प्रचार आहे का? अमच्या शाळेत तरी आम्हाला ही म्हण म्हणुन शिकवलेली. --- अर्थात तु वेन्धळेपणा कधीच करत नाहिस.

Bee
Tuesday, March 14, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोति, तुझे बरोबर आहे ही म्हण झाली. ह्याला गोंधळणेपणा म्हणतात :-) पण तू का बरे मी वेंधळा आहे असे सिद्ध करण्याच्या मागे लागलीस :-)

Ajay
Friday, March 24, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कागदावर बसणे
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी हळुहळु आपली शिक्षणपद्धती आणली. तेंव्हा पहिली ते चौथी फक्त पाटी वापरत असत. वह्या-पुस्तके पाचव्या इयत्तेपासून सुरु होत. तेंव्हा मुलगा "कागदावर बसायला" लागला असा वाक्प्रचार वापरात आला.
उदा. औंधचे राजपुत्र विजयसिंहराजे यावर्षीपासून कागदावर बसायला लागले.

स्वातंत्र्योत्तर काळात काही वर्तमानपत्रे वाचनापेक्षा वैयक्तिक स्वच्छतेसाठी उपयोगी पडू लागली आणि कागदावर बसणे याला वेगळाच अर्थ प्राप्त झाला :-) आता कुठले राजे कागदावर बसलेही असतील आणि त्यांचे त्याबद्दल कौतुकही झाले असेल, पण ते सोडा.


Gajanandesai
Friday, March 24, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)

घोडे गंगेत नहाणेः बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होणे.

Bee
Friday, March 24, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते गंगेत घोडे नहाणे असे आहे ना? बर्‍याचदा उपरोधिक वाक्यात आपण हा वाकप्रचार वापरतो. जसे की हे जरी तुला कळले तर मी समजेल माझे गंगेत घोडे नाहले.

Zakki
Thursday, April 06, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बादरायण संबंध. आता हा वाक्प्रचार का काय ते माहित नाही. पण त्याच्यामागची गोष्ट मजेशीर आहे. कुणाला माहित नसल्यास सांगा, लिहितो. (त्याचा अर्थ माहीतच असेल असे गृहित धरतो.)

Moodi
Thursday, April 06, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की ती गोष्ट मला खरच माहीत नाही, लिहा की.

Zakki
Thursday, April 06, 2006 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थ लिहीतो, म्हणजे उत्तर पूर्ण होईल. बादरायण संबंध म्हणजे ओढून ताणून स्वार्थासाठी लावलेला संदर्भ.
तर गोष्ट अशी की, एकदा एका कुटुंबाकडे एक पाहुणा येऊन रहातो. प्रथम बायकोला वाटते नवर्‍याच्या ओळखीचा आहे, नि नवर्‍याला वाटते बायकोच्या ओळखीचा आहे, म्हणून कुणि काही बोलत नाही. इकडे पाहुणा मात्र चारीठाव जेऊन मस्त आराम करत होता. त्याची जायची चिन्हे दिसेनात. तेंव्हा नवराबायको एकमेकंशी बोलले नि त्यांच्या लक्षात आले की हा कुणाच्याच ओळखीचा नाही. म्हणून शेवटी नवर्‍याने पाहूण्याला विचारले, काय हो तुमचा आमचा संबंध काय? तेंव्हा पाहुणा म्हणाला, बादरायण संबंध! न कळून नवर्‍याने विचारले, म्हणजे काय? तेंव्हा पाहुणा म्हणाला
'अस्माकं बदरी वृक्षं, युष्माकं बदरी तरु:
बादरायण संबंधो यूयं यूयं, वयं वयं'|
अर्थ: आमच्या घरी बोरीचे झाड आहे नि तुमच्या घरी पण, म्हणून आपला बादरायण संबंध! नाहीतर तुम्ही ते तुम्ही नि आम्ही ते आम्ही. बदरी म्हणजे बोर. बादरायण म्हणजे बदरी ची तद्धित वृत्ति! म्हणून बदरी चे बादरायण!('तद्धितेष्वचामादे:' इति पाणिनी!)


Bee
Friday, April 07, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह झक्की, धन्य झालो तुमचे पोष्ट वाचून. छान आहे तुमचे संस्कृतप्रचुर मराठी!

'तद्धितेष्वचामादे:' म्हणजे नेमके काय?

Zakki
Friday, April 07, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचा अर्थ जेंव्हा "याचा हा" असे म्हणायचे असते तेंव्हा तद्धित वृत्ति नावाचा प्रकार वापरतात. जसे कवी ने केलेले ते 'काव्य', कुंती चे पुत्र ते 'कौंतेय'. तर ही तद्धित वृत्ति करताना 'अच्' म्हणजे स्वर जर आदि म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला असतील तर त्यांची वृद्धी होते. आता ही वृद्धि कशी होते? त्यासाठी दुसरे ' object ' आहे. ते असे: "वृद्धिरादैच्" म्हणजे थोडक्यात, अ चा आ, उ चा औ, असे. आता ते सगळे आठवत नाही. मागे ते पाणिनी चे पुस्तक आणायला गेलो तर मला ते फार महाग नि जि जिथे दिसले तिथे ते बरोबर वाटले नाही.

Zakki
Thursday, May 18, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्याचे पारणे फिटले
यात 'पारणे' म्हणजे काय?


Robeenhood
Friday, May 19, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पारणे म्हणजे सफलतापूर्वक समाप्ती. जसे व्रताचे उद्यापन असते व्रत समपल्यावर त्याचे पारणे फेडण्याचा कार्यक्रम असतो.म्हनजे कृतकृत्य झालो. तसे डोळे सुखावले,कृतकृत्य झाले की त्याचे पारणे फिटले म्हणतात.

आपल्या डोळ्यांचे कुठे पारणे फिटले बोवाजी?(चष्म्याचे पारणे फिटल्याचा वाक्प्रचार अजून आलेला नाही वाटते ...)


Robeenhood
Friday, May 19, 2006 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोवाजी, तुमच्या त्या संस्कृत गंगेत गटांगळ्या खाऊन, नाकातोंडात संस्कृत जाऊन मी मेलो देखील.......

(पण माहीती उत्तम हे मी नाईलाजाने कबूल करतो)


Robeenhood
Friday, May 19, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की बोवाजीनी सांगितलेली गोष्ट गमतीशीर तर आहेच. मला आता नक्की आठवत नाही पण या वाक्प्रचाराचा संबंध बादरायण ऋषींशीही आहे.
बादरायण हे ब्रम्हसूत्राचे कर्ते....
हिन्दू तत्वज्ञानात वेदान्ताचे तीन मुख्य ग्रंथ आहेत. उपनिषदे,भगवत गीता आनि ब्रम्हसूत्रे.त्याना वेदान्ताची प्रस्थान त्रयी म्हणतात.
यातील ब्रम्हसूत्राचे कर्ते बादरायण मुनी.त्यांची तुलना तत्वज्ञानात थेट व्यासांशी केली जाते...
ही सुमारे ५५५ सूत्रे आहेत.त्यात मोक्षप्राप्तीचा मार्ग वर्णन केला आहे. मोक्ष म्हणजे जन्म म्रूत्यू च्या फेर्‍यातून सुटका. हिन्दू तत्वज्ञानात प्रत्येक आत्मा ८४ लक्ष योनी मधून म्हणजे जन्मातून जात असतो त्या सर्व दु:खातून सुटका होण्यासाठी मोक्ष मिळाला तर हे सायकल बन्द होते.म्हणून हा आटापिटा...
विषय फाफलला आहे.
पण बादरायण कोण हेही माहीत पाहिजे.

बादरायण सम्बंधा च्या वाक्प्रचाराबाबत मुनींबद्दल आणखी एक स्पष्टीकरण आहे ते सापडल्यावर टाकीन....


Chafa
Friday, May 19, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! काय मजा येते हे सगळं वाचायला. पण रॉबिन ते पारणे 'फेडणे' म्हणजे नक्की काय?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators