Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 18, 2007

Hitguj » Religion » साहित्य » &anaoXvarI » Archive through February 18, 2007 « Previous Next »

limboni
Wednesday, March 08, 2000 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi ghe dili-
om namo ji aadhyaa
ved pratipadhya
jayajaya swasanvedhya aatmaroopa
devaa tuchi gaNeshu
sakal matiprakashu
mhaNe nivrottidasu awadharijoji

akar charaN yugula
ukar udar vishal
makar maha mandal mastakasarikha
he tinhi ekawatale
teth brahmakamaLale(?)
te miya shrigurukrupe namile aadibeej

aata abhinav wangwilasini
he chaturyarth kalakamini
he shri sharade, vishwamohini namili miya

om namo ji aadhyaa..

kadachit shabdancha apabhransh zala asel kuthe kuthe. to koNi durust kela tar tikade marathi gaNyat halawuyat aapaN. tula cassetewar havi asalyas kaLaw. mazyakade latachya awajatali aahe.


Ajjuka
Wednesday, March 08, 2000 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dnyaneshwari chi survat aahe.


>> Aga ajjuka tula kasa sahan hot aahe sagal.Ekada chumantar kar bar ani doghanahi
zadawar latkaw, <<

jau de ga varshap, bal buddhi!!! sodun dyayache.

Sandeepb
Wednesday, March 08, 2000 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

makar maha mandal mastakasarikha
he tinhi ekawatale
teth brahmakamaLale(?)

Makar maha mandal mastakakare
he tinhi ekawatale
teth shabda brahmaprgatale

ase ahe bahuda, ch.bhu.dya.ghya.....

Ajjuka
Wednesday, March 08, 2000 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

brahmakamaLale
he barobar aahe.
tech shabd brahmakamaLale

limboni
Wednesday, March 08, 2000 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks sandeep & ajjuka. ya gaNyamuLe mala gaNapati aathawatat. sarwajanik gaNapatichya veli hamakhas wajawale jaNare he gaaNe nave. tarihi! 96 madhe ekada amhi ekada houshi lokancha chhotasa gaNyacha karyakram kela hota. tyat ekine he mhatale hote. mhaNun paN asel. paN.... aso.

sam tyatale proper shabd aathawata aathawata mala pure hotey tyamuLe tula arth kashi sangaNar mi? paN tarihi -
hi dyaneshwarichi suruwat aahe he ajjuka mhaNali te barobar. hi gaNesh & sharadechi prarthana aahe. aadhya, ved pratipadhta, swasanvedhya, aatmaroopa, sakal-mati-prakashu hi sarv gaNeshachich varNane aahet. mhaNe nivruttidasu mhaNajech dyaaneshwar.
omkar tin aksharani banato gaNapati ha omkarswarup aahe. akar charaNyugal, gaNapatiche pot ukar roop & mastak makarasarakhe aahe.
pudhache kadawe sharadesambandhiche aahe.
asa mi yacha arth lawate. chu. bhu. dya. ghya.


sam
Thursday, March 09, 2000 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

limboni,
dhnayawad. kuthlya cassette madhe aahe he gaana ?

Svsameer
Friday, March 10, 2000 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" Kanada vo Vithalu" ya cassettemadhye pratyek ganyachya/abhangachya adhi pra. Ram Shevalkar yancha nirupan aahe. tyani yacha asa vivechan kela aahe.

Dnyaneshwaricha arambh Dnyaneshwarani Atmatatwala abhivadan karun kelela aahe. Vastuta: konatyahi shubhkaryachi suruvat mangalmurtichya vandanane karanyacha paripath aahe. Dnyaneshwar nathapanthiy hote. Tyamule Adinathala tyani vandan kele asate tar te apekshit hota. Pan kuldevata, kinva aradhyadevata ani Ganesh yanchya aivaji Dnyaneshwar vishwachya anurenumadhye otprot bharun rahilelya Atmatatwala ahivadan karun aplya aitahasik vak-yadnyala arambh kartat.
Om namoji adya
Ved pratipadya
Jay jay swasanveddya
Atmaroopa
He je Atmaroop aahe te adyatatwa aahe, vishwatala. Te swasanvedya aahe, yachi anubhuti itarana karun deta yet nahi. Vedani yache pratipadan kelele aahe. He Omkarroop aahe.
Ya atmatatwache pratik omkarachya akaramadhye sathalele aahe. Ya omkarachya akrutimadhye Dnyaneshwarani tyana abhipret asalela Ganesh pahila. Yacha akar mhanaje Ganeshach charan yugul aahet. Yacha Ukar mhanaje Ganeshache vishal udar aahe ani yacha makar mhanaje Ganeshacha mastak. A, U , M ani varati ardha chandrakruti ya sadetin matranchya dware omkarachi akruti sidhdh zaleli aahe. Tya akrutimadhyech Dnyaneshwarani ganeshmurtichi prachiti ghetali ani tila apalya guruchya krupene abhivadan kele.


BTW to shabd "Bramha kavaLale" asa aahe.

Limboni
Friday, March 10, 2000 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

svs dhanyawaad! maazahi gairsamaj dur zala. dyaneshwar naathpathiy te mahiti hote. paN naathpanth mhaNaje nakki kaay te mahiti naahi tyamuLe tya prarthanechya muL kalpanebaddalach mi gairsamaj karun ghetala hota. tu lihil nasatas tar mala kaLalach nasat he kadhi. aso. nusati suranchi sangat jyana jadaleli asate tyatalich mi ek asa mala watata.

Asami
Friday, March 10, 2000 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Limboni..NaathPanthiya mahit nahi tula ?
Naathpanthiya mhanje NavNaathana follow karnaare..
Machhindranaath he pahile Naath..Nantar Gahininaath etc etc ase 9 Naath zale. Shevatche I guess GahiniNaath. Duttacharitrat tyanchya ullekh aadhalato. Tyani hindu dharma parat prasthapit kela ase kahitaree ahey.
Tyapaiki Gahininathani Nivruttinathana diksha dili Ani tyani Dhyaneshwarana.

Naathpanthiya aghori vidyet pan parangat hote ase manle jaate. Mhanje rather aghori shaktinshi te mukabla kartat ase kahitaree ahey. Neet aathavat nahi atta. Pan sadharantah Narayan dharap etc chya pustakanmadhe tyanche reference asatat.

Sagar29in (Sagar29in)
Wednesday, January 24, 2001 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tumhala dnyaneshwaranbaddal ankhi mahiti havi asel tar go.ni.dandekaranchi "mogara phulala" hi kadambari nakki vacha.
it is one of the best creations of gonida.


sagar

Limboni (Limboni)
Tuesday, February 13, 2001 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

om namo ji aadyacha arth go. ni. dandekaranchya 'mogara fulala' madhun-

-he omkara
-he sarvanchya aaditatva
-he vedanchya pratipadanachya vishaybhuta
-he sata:la svata:ch janu shakanarya
-tula namaskar
-tuza jayjaykar
-he sarvanchya budhdhichya prakasharoopa
-tucha aadim ganesha aahes
-shriguru nivruttinathancha dasanudas mhanat aahe
-ji ji maharaj aikave
-akar he donhi charan, ukar he vishal udar. makar he mastak. evamvidh mahaganapatila mi shrigurukrupene vandan kele aahe
-aata abhinavvagvilasini, chaturyarthkalalkamini vishvamohini ji sharada tila namaskar

Manya2804 (Manya2804)
Thursday, September 13, 2001 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ima~ hܲ
maI &anaoXvarI saar s~Ü~ XlaÜk [qao laIiht jaašna. jyaanaa ]%saUkta Asaola %yaanaI ja$r vaacaavaot. ho s~Ü~ svaamaI sva$panand yaanaI sampadIt kolao Aaho


Manya2804 (Manya2804)
Thursday, September 13, 2001 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


! namaÜ jaI Aaqyaa
vaodp`itpaQyaa
jaya jaya svasaMvaoQyaa
Aa%ma$pa

dovaa tU caI gaNaoXa
saklamaitp`kXa
mhNao inavaRi<adasa
AvaQairjaÜ

Aata AiBanavavaaigvalaaisaina
jao caatuyaa-qa-klaakaimanaI
to EaIXaarda ivaXvamaÜihnaI
naimalaI imaMyaa

maja )dyaI sad\gauÉ
jaoNao tairlaÜ ha saMsaarpUÉ
mhNaÝina ivaXaoYao A%yaadÉ
ivavaokavarI

yaa ]paiQamaajaI gauPt
caOtnya Asao sava-gat
to t%va& saMt
svaIkirtI

]pjao to naaXao
naaXalao punarip idsao
ho GaiTkayaM~ tOsao
pirba`mao gaa

jaOsao maagao- ica caalata
ApavaÜ na pvao sava-qaa
ka dIpaQaaro vat-ta
naaDiLjao

tyaaprI paqaa-
svaQamao- rahaTta
sakLkampUNa-ta
sahjao hÜya

sauKI saMtÜYaa na yaavao
duÁKI ivaYaada na Bajaavao
AaiNa laaBaalaaBa na Qaravao
manaamaajaI

AapNayaa ]icata
svaQamao- rahaTta
jao pavao to inavaaMta
saahÜina jaavao


Prashantupasani
Thursday, September 12, 2002 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jyana kharokhar ustukata aahe Dnyaneshwari baddal tyanchyasathi..
www.dnyaneshware.com

Asami
Wednesday, July 02, 2003 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Above site has been hacked. Go at your risk.

Mansmi18
Friday, February 02, 2007 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रुपया या ओळीन्चा अर्थ कोणि सान्गेल का

अधिक देखणे तरि निरन्जन पाहणे
योगिराज विनवणे मना आले वो माये

धन्यवाद


Prashantnk
Wednesday, February 14, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अधिक देखणें तरी निरंजन पाहाणे ।
योगिराज विनवणें मना आलें वो माये ॥ १ ॥
देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं ।
तेणें समाधान मज जोडलें वो माये ॥ २ ॥
अनंगपण फ़िटलें मायाछंदा सांठवले ।
सकळ देखिलें आत्मस्वरुप वो माये ॥ ३ ॥
चंदन जेवीं भरला अश्वत्थ फ़ुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥ ४ ॥
पुरे पुरे आतां प्रपंचा पाहाणें ।
निजानंदीं राहणें स्वरुपीं वो माये ॥ ५ ॥
ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु ।
विठ्ठलीं निर्धारु म्यां देखिला वो माये ॥ ४९५.६ ॥


श्रीसद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांचा, आत्मसाक्षात्काराची अनुभूती नेमकेपणाने प्रकट करणारा हा अभंग, सर्वांगमनोहर आहे. आपली ही, साधना-मार्गावरची, निगूढ, परमोच्च अनुभूती श्रीमाउलींनी सहजपणे शब्दात गुंफ़ली आहे.

अध्यात्ममार्गावरील साधकाच्या अनुभूतीचे आरशासारखे स्वच्छ प्रतिबिंब दाखविणारे माध्यम म्हणजेच ‘अभंग’.

श्री ज्ञानाई, आपल्या भगिनी, श्रीसंत मुक्ताबाईंना म्हणतात की,

"अगं माझी माये, ज्याने निरंजनतत्वाची, म्हणजेच परम्यात्म्याच्या निर्गुण- निराकार स्वरूपाची अनुभूती, ‘ह्याची देही, ह्याची डोळा’, घेतली आहे, त्यालाच परमार्थाच्या प्रांतातला ‘अधिक डोळस’(अधिक देखणें) म्हंटला पाहिजे.माझे श्री सद्गुरु ‘योगिराज’ श्रीनिवृतीनाथ महाराज, यांच्या मनी, माझी प्रार्थना ऐकून, कळवळा आल्यामूळेच मी हे ‘निरंजन’ पाहू शकलो.

त्यांच्याच कृपेने जे ‘साधन’ प्राप्त झाले, ते प्रेमाने आणि नेमाने, करताकरता देहभावाचा बळी देणे सहज साधले गेले, त्यामुळेच सुखरुप अशा परमात्म्याची जवळीक घडून, अखंड समाधानाची प्राप्ती मला झाली.

अग माये, माझा वासनामय देह-पिंड त्या साधनेने फ़िटला, भंगला. मायेच्या छंदाने आलेले जीवत्व त्यांच्या ह्या ‘कृपाशक्तीने’, मावळून शिवत्वात विलीन झाले.त्यामूळे जिकडे-तिकडे आत्मस्वरुपच दिसू लागले.
ज्याप्रमाणे चंदन आतून भरला, पुष्ट झाला की, त्याचा सुगंध बाहेरही दरवळतो, किंवा अश्वत्थ बहराला आला की अंगभर फ़ूलून आलेला बाहेरही दिसतो, त्याचप्रमाणे मी हे ‘निराकार’ स्वरूप श्रीसद्गुरु कृपेने आत-बाहेर व्यापून राहिलेले पाहिले.

माये गं! आता सगळा दृश्यपसारा ‘प्रपंच’ म्हणूनच पाहाणे पुरले-संपले आहे.त्यामुळेच आता सगळ्या वृत्ती सहज निवृत्त होऊन, अखंड निजानंद स्थिती अनुभवण्यास भली-गोड वाटते आहे.

माझ्या माये, माझे सद्गुरु अथांग ज्ञानसागरच आहेत, त्यांच्याच कृपाशक्तीने(रखुमादेविवरु) मला ही अनुभूती आल्यामूळेच, मी विठ्ठलस्वरूप निश्चयपूर्वक पाहिले आणि 'तेच मी' असे जाणले आहे!"


Mansmi18
Thursday, February 15, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशान्तजी,

अनेक धन्यवाद.

अतिशय सुन्दर आणि साधे स्पश्टिकरण.


Mansmi18
Friday, February 16, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशान्तदादा,

अणखि एक अभन्गात्ल्या ओलिचा अर्थ सन्गाल का

अरे अरे ज्ञाना झालासी पावन य अभन्गात
"दिपकी दीपक मावळल्या ज्योती
घरभरि वाती शून्य झाल्या"
या ओळिन्चा अर्थ काय आहे?

धन्यवाद.


Prashantnk
Sunday, February 18, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे ज्ञाना झालासी पावन |
तुझे तुज ध्यान, कळो आले || १ ||

तुझा तूंची देव, तुझा तूंची भाव |
फिटला संदेह अन्य तत्वी || २ ||

मुरडुनिया मन उपजलासी चित्ते |
कोठे तुज रिते न दिसे रया || ३ ||

दीपकी दीपक मावळल्या ज्योती |
घरभरी वाती शून्य झाल्या || ४ ||

वृत्तीची निवृत्ती आपणां सकट |
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज || ५ ||

निवृत्ती परम अनुभव नेमा |
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो || ६ ||


श्रीसंत ज्ञानेश्वरांचा हा अभंग, साधक त्याचा साधन-मार्ग क्रमित असताना, त्याला जेव्हा 'आत्मज्ञान ', म्हणजेच 'ज्ञानसुर्याचा ' बोध , श्रीसद्गुरु कृपेने होतो, तेव्हा ह्या 'ज्ञान ' सुर्याचा प्रकाश ज्यावेळी त्याच्यावर पडतो, त्यावेळची साधकाची, नेमकी स्थिती-अनुभूती, नेमकेपणाने आपल्यासमोर ठेवत आहे. ही अनुभूती आपल्यासमोर ठेवणारे श्रीज्ञाननाथ, हे सर्व ज्ञानयोग्यांचे 'ईश्वर' आहेत.त्यामुळेच त्यांचा ह्या साधन-मार्गावरचा अनुभव रुपी अभंग, निश्चीत पणे एखाद्या 'दीपस्तंभा ' प्रमाणे, आपल्यालाही 'मार्गदर्शक ' आहे.

अरे अरे ज्ञाना झालासी पावन |

यामधे 'अरे अरे ज्ञाना ' ही शब्दरचना, साधकाला 'आत्मज्ञानरुपी ' सुर्याचा उदय झालेला दर्शवित आहे. आता हा उदय झाल्या-झाल्या त्याच्या बाह्य, त्याचबरोबर अंतरंगाची स्थिती काय असते, हे सगळ वर्णन पुढील 'अभंग ' करतो.

झालासी पावन |
साधकाच्या अत:करणात, स्वत: 'पावन ' झाल्याचा- जीवन 'कृतकृत्य ' झाल्याचा 'भाव ' ओसंडून वाहू लागतो.

तुझे तुज ध्यान, कळो आले || १ ||
तुझा तूंची देव, तुझा तूंची भाव |
फिटला संदेह अन्य तत्वी || २ ||


ह्या वरिल 'ओळी ' , साधकाला झालेला ' अहं ब्रम्हास्मी ' ह्या 'महावाक्याचा बोध ' स्पष्ट करतात.

मुरडुनिया मन उपजलासी चित्ते |
कोठे तुज रिते न दिसे रया || ३ ||


ज्ञानसुर्याचा उदय झाल्यावर अजून काय काय होत? तर 'मनरुपी ' द्रवाचे, ' चित्तरुपी ' बर्फ़ात रुपांतर होते.म्हणजे काय होते? अध्यात्ममार्गाचे 'प्रवास-वर्णन ' करताना, ज्यानी-ज्यानी हा प्रवास पुर्ण केला आहे, त्या सगळ्या संत-महात्म्यानी सांगितले आहे, की 'मनाची ' धाव कायम 'विषयाकडे ' असते. मनाला एका जागी थांबणे माहीत नसते.ते सतत एका विषयावरून,दुसर्या विषयाकडे धावत असते.

आता ह्या मनाचे हे 'मनपण ' कधी संपते? ह्या द्रवाचा, बर्फ़ कधी होतो? तर जेव्हा 'प्राण ' लय पावतो तेव्हाच. प्राणायाम करताना, आपण जेव्हा पुरक आणि रेचक करतो तेव्हा 'मन ' धावत असते. जेव्हा अंत:कुंभक किंवा बाह्यकुंभक करतो, म्हणजेच 'प्राण ' थांबतो, त्यावेळी मनाचे, विषयांचे चिंतन ही थांबते. ही स्थिती जेव्हा आपोआप, बर्याच वेळ रहाते, त्यालाच 'समाधी ' अवस्था, मनाचे चित्तरुपी बर्फ़ात रुपांतर,काष्ठ-समाधी असे म्हणतात.(पण ही समाधी अवस्था, वासना-वृत्ती-संस्कार अजूनही शिल्लक असल्यामूळे भंगते, हठयोगी या अवस्थेपर्यंतच पोहचू शकतात.)

अशा प्रकारे सुरवातीला 'प्राणाचा लय ' होऊन 'मनाचा लय ' होण्याचा, अध्यात्ममार्गाचा प्रवास करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील कलीयुगात 'अखंड नामस्मरण ' हा एकमेव सहज-सोपा 'राजमार्ग-सोपानमार्ग ' आहे, हे श्री ज्ञानेश्वरादि संतानी एकमुखाने, एकवाक्यतेने, एकविचाराने, वेळोवेळी, करूणेने-कळकळीने सांगितले आहे.तरीपण आपली दृष्टि कायम बहिर्मुखी असल्यामूळे, आपण ह्या गोष्टि कायम हसण्यावारी नेतो, अजून एक टाइम-पासचे साधन किंवा वादविवादाचे साधन म्हणून दूर्लक्षित करतो. जोपर्यत आपण अंतर्मुख होऊन ह्या गोष्टिचा विचार-विवेक करत नाही, तोपर्यत हजारो सद्गुरु-संताचे-भगवंताचे अवतार होऊन गेलेतरी, आपल्यात तसुभरही फ़रक पडणार नाही ही काळ्यादगडावरची रेघ आहे, असे श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात.

हा मार्ग चालायला आपल्यालाच लागतो, अनुभव-श्रीसद्गुरु हे केवळ 'मार्गदर्शक '. जगाच्या उत्पती पासून आजपर्यत अस एकही उदाहरण नाही की केवळ ऐत-बसून किंवा अध्यात्माची पुस्तकेच्या पुस्तके वाचून कुणाला श्रीभगंवतप्राप्ती झाली आहे. फ़ारतर काय वाद घालता येइल, पुस्तकी-उथळ ज्ञानाच प्रदर्शन करता येईल, पण खर 'आत्मज्ञान ' जर पाहीजे असेल तर , आपण 'अज्ञानी ' आहोत ह्याचा 'बोध ' झाला पाहीजे, संतानी हे अज्ञान दूर करण्यासाठी जे सांगितल आहे, त्याच्यावर चालायची बुध्दि, कृतीकरायचा विवेक जागृत झाला पाहीजे, तो 'योग-कर्मसाम्यदशा ' आली पाहीजे.

आता प्राणाचा, मनाचा लय झाला, पण अजून 'चित्त,त्यावर चालणारी बुद्धी आणि अहंकार' अजूनही 'शिल्लक रहातो.मग त्याच काय होत?

दीपकी दीपक मावळल्या ज्योती |
घरभरी वाती शून्य झाल्या || ४ ||


ह्या ओळीमध्ये दीपकी-मावळल्या-शून्य झाल्या, दीपक-ज्योती-घरभरी वाती यांचा अर्थ जाणुन घेण्यासाठी श्रीमाउलींचाच, श्री ज्ञानेश्वर-गाथेमधील खालील अभंगाच,श्रीसद्गुरुंच सहाय्य घेऊयात.

दीप दीपिका शशी तारा | होतु का कोटिवरी रे |
परी न सरे निशि नुगवे दिवसु | दिनकरनाथें जियापरी रे || ज्ञा.गा.९२०.१ ||


दीप हे दिवाळीमध्ये घरोघरी लावले जातात, तसेच कार्तिक महिन्याच्या पोर्णिमेलाही सर्वत्रच मंदिरांतून हजारो दीप-दीपिका लावल्या जातात.त्याचबरोबर पोर्णिमा असल्यामुळे, आकाशात तारागणांसहित पूर्ण चंद्रही प्रकाशित झालेला असतो. इतके सगळे असले, किंबहुना असे दीप, आकाशातील तारे, कोटी जरी लावले किंवा उगवले, तरी पूर्वदिशेला राउळी, भगवानसुर्यनारायण उगवल्यावर, त्यापुढे या सर्वाचे तेज ज्याप्रमाणे फ़िके पडते, त्याचप्रमाणे 'आत्मज्ञान ' सुर्याचा उदय झाल्यावर आपल्या सर्वशरीरात(घरभरी) पसरलेल्या वासनारुपी तेलावर चालणार्या, बहात्तर कोटी नाड्या-वाती असलेल्या, दीपकाच्या ज्योती, फ़िक्यापडतात-लय पावतात, म्हणजेच 'चित्ताचा लय ' होतो,ते वासनारहित होते,शून्य होते.त्याचबरोबर 'बुद्धिचाही लय' होतो कारण बुद्धीला योग्य-अयोग्य निर्णय घ्यायला, चित्तातील वासना-पूर्वसंस्काराचा ठसा लागतो,तोच 'शून्य'होतो.

अंत:करण चतुष्टयातील, 'मन, बुद्धि,चित्त, अहंकार ' ह्यातील अहंकार( 'मी ' ही जाणीव) अजून राहतोच. त्याच काय होत?ते पण 'लय ' पावायला पाहीजे! ते कसे? हे पुढिल ओळीत सांगितल आहे.

वृत्तीची निवृत्ती आपणां सकट |

ज्ञानसुर्याचा उदय झाल्यावर ' अहंकार ' ह्या उरणार्या अंत:करण वृत्तींची निवृत्ती-लय 'आपणां सकट ' म्हणजेच सगळ्यात शेवटी 'अहंकारासहीत ' होतो. आता हा शेवट्पर्यंत साथ देणारा, सगळ्यात शेवटी संपणारा 'अहंकार ' संपला, आता पुढे काय? तर,

अवघेंची वैकुंठ चतुर्भूज|| ५ ||

वैकुंठात, म्हणजेच ' सहस्त्रार-चक्रात ' , चतुर्भूज-सोहळा होतो, म्हणजेच 'दोनाचे चार हात ' होतात. म्हणजे नक्की काय होत? तर सहस्त्रारात असलेल्या, 'शिवत्वाचे-विठ्ठलाचे-परब्रम्हाचे ' आणि मूलाधारातून,सहाचक्राचे भेदन करून, 'जीवा 'सकट आलेल्या, श्रीजगदंबा,आईभवानी,मूळशक्ती,महामाया, कुंडलीनीशी, रुखमाईशी मिलन होते, जीवत्वाचे-शिवत्वात कायमचे रुपांतर होते, मनुष्यरुपी ओहोळ, समूद्ररुपी श्रीभगवंतात कायमचा, परत वेगळा न होण्याकरता मिसळून जातो, तो समूद्रच-परब्रम्हच होतो.यालाच अखंड 'संजिवन-समाधी' अवस्था म्हणतात.

असा हा अंत:प्रवास आपल्या सगळ्यांचाही लवकरात होण्याकरता काय केले पाहीजे? श्रीज्ञानदेवांनी काय केले? त्यामूळे त्यांना वरिल अनुभूती आली, हे पुढील ओळित आहे.

निवृत्ती परम अनुभव नेमा|

तर त्यांनी 'परब्रम्हरुपी ' आपल्या श्रीसद्गुरु-श्रीनिवृत्तीनाथांनी दिलेली 'साधना ' नेमाने केली, त्याचमूळे हे सगळे अनुभव-अनुभूती त्यांनी अवघ्या २१ वर्षाच्या आयुष्यात, ' ह्याची देही,ह्याची डोळा ' घेतली. संचित-प्रारब्ध-क्रियमाण ही कर्मे बरोबर असताना, त्यांना हे सहजशक्य झाल कारण त्यांनी कृती केली.

शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो || ६ ||

शेवटी, ह्या सगळीकडे अखंड असलेल्या 'श्रीसद्गुरुतत्वाची ' मनधरनी श्रीज्ञानाई आपल्याकरता करतात की 'दया,क्षमा,शांती ' या दैवीगुणांचा उदय करणारा हा 'ज्ञानसुर्य ' आपल्यालाही लवकरात लवकर देवो-लाभो,म्हणजेच आपल्यालाही ही 'साधना' करण्याची 'सुबुद्धि' होऒ.

|| श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators