Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कोथिंबिरीचा पराठा ...

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पराठे » कोथिंबिरीचा पराठा « Previous Next »

Moodi
Thursday, January 05, 2006 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथिंबीरिचा पराठा.

साहित्य : २ वाट्या कणिक,१ वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ,३ टेस्पुन तेलाचे मोहन, मीठ, तिखट, हळद,हिंग.

सारण : १ मोठी जुडी कोथिंबीर, अर्धी वाटी सुके खोबरे किस, अर्धी वाटी तीळ, थोडा लिंबु रस,१ चमचा काळा मसाला, मीठ, तिखट.

कृती : सर्व पीठे एकत्र करुन त्यात तिखट, मीठ,हळद, हिंग अन तेलाचे मोहन घालुन घट्ट भिजवावे.
सारणासाठी खोबरे अन तीळ भाजुन घ्यावे. ते थोडे भरडसर वाटुन घ्यावे. नंतर सर्व एकत्र करुन तिखटसर सारण तयार करावे.
पीठाचा बेताच्या आकाराचा गोळा घेऊन त्याची पोळी लाटुन त्यावर तेलाचा हात फिरवावा व पोळीच्या अर्ध्या भागावर सारण पसरावे व दुसरा भाग त्यावर दाबुन करंजी प्रमाणे बंद करावे. थोडा लाटुन घ्यावा. अन तव्यावर तेल सोडुन दोन्ही बाजुने भाजावा.
करंजी प्रमाणे जमत वा आवडत नसेल तर कणकेच्या गोळ्यात सारण भरुन त्याचा उंडा करुन नेहेमीप्रमाणे पराठा करावा.

सुके खोबरे नाही घातले तरी चालेल अन तीळाचे प्रमण पण कमी असले तरी चालेल.


Priya
Thursday, January 05, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, छान वाटतेय कृती. बाकरवडीची आठवण आली. त्याचा असा प्रकार करता येईल हे डोक्यातच नाही आले.

Chinnu
Thursday, January 05, 2006 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कृती फ़ार फ़ार आवडली मूडी. मी नक्कीच करुन पाहिनच!

Paragkan
Friday, January 06, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Interesting indeed ... कुणीतरी करून पाठवा बरं मला. :-O

Supermom
Wednesday, January 11, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी छान आठवण केलीस. नागपूरला जी पुडाची वडी करतात त्याचे हे सारण. फ़क्त त्यात खसखस पण घालतात. जास्त तेलकट करायचे नसले की मी वडी ऐवजी नेहेमीच हे पराठे करते.पार्टीमधे तर एकदम हिट होतात. अर्थात मी खसखसपण घालते त्यात.

Zelam
Friday, January 13, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी मी काल केले होते हे पराठे, छान झाले हं.
BTW तुला किती माहिती आहे ग!


Moodi
Friday, January 13, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम अन सुपरमॉम मी सारण न करता खोबरे सोडुन बाकी सर्व डायरेक्ट कणिक अन बेसनातच मिसळुन पराठे करते. खोबरे घालत नाही, पण आता केले की खोबरे अन खसखस घालुन करेन.

Ankulkarni
Friday, January 13, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि
कोथिम्बिर पराठा क्रुति एकदम आवडलि आता नक्कि करुन बघेन.

अस्मिता


Storvi
Monday, January 16, 2006 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खल्लास झाले होते पराठे... :-)

Lalu
Monday, January 16, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला ' पुडाची पोळी' असं पण नाव आहे. पुडाच्या वडी सारखंच सारण असतं म्हणून असेल.

Meggi
Monday, August 07, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, तू दिलेल्या साहित्यात किती पराठे होतील?

Bee
Tuesday, August 08, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेग्गी तसे सांगता येणार नाही कारण तू एका पराठ्याला किती कणिक घेते हे मला माहिती नाही. तरीही पाच सहा होऊन जातिल असे वाटते.

मूडी, no thanks please!


Moodi
Tuesday, August 08, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही रे बी. मेग्गी साधारण १२ ते १५ पराठे होतात. बी no thanks please

Akhi
Friday, November 23, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथिंबीर पराठा:
बारिक चिरलेली कोथिंबीर
धनेपुड
काळा मसाला
तिखट
हिन्ग
मीठ
तेल
कणीक

नेहमी पराठ्याल भिजवतो तशी कणीक तेल मीठ घालुन भिजवणे. बाकी सर्व पदार्थ थोड्या तेलात एकत्र करावे. मग कणके चा गोळा घेउन पुरि च्या size चा लटावा. त्यावर कोथिंबीर चे मिश्रण लावावे. मग normal पराठा लाटावा. आणि किंचीत तेलावर खरपुस परतुन काढावा. पराठ्या बरोबर दही पण serve करावे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators