Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ओल्या हळदीचे लोणचे ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » लोणची » ओल्या हळदीचे लोणचे « Previous Next »

Sharmila_72
Monday, December 05, 2005 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओल्या हळदीचे लोणचे

साहित्य: ओल्या हळदीचे गड्डे, ओल्या मिरच्या, मीठ, लिम्बू, आलं, (पाव वाटी मोहरी कुटुन, १ चमचा मेथी व १ चमचा हिंग तळुन कुटुन, हे तीन जिन्नस एकत्र करुन तयार करुन घेतलेला मसाला

ओल्या हळदीच्या गड्ड्यांचे व आल्याचे गोल गोल तुकडे प्रत्येकी एक वाटी करावे. ते एकत्र करुन त्यांना वरील मसाला चोळावा. नंतर अंदाजाने मीठ व लिंबाचा रस त्या तुकड्यांवर घालावा. तसेच ओल्या मिरच्यांचे तुकडे एक वाटी करुन तेही त्यात घालावे. नंतर तेलाची फोडणी करुन थंड झाल्यावर त्यावर घालावी. हे लोणचे कालवून सारखे करावे आणि बरणीत भरुन ठेवावे. बरेच दिवस टिकते.


Dineshvs
Monday, December 05, 2005 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या लोणच्याने तोंडाला चव येते. हळद आणि आले किसुन घेतले तर लोणचे छान मिळुन येते, पण किसणी पिवळीधमक होवुन जाते.

Sharmila_72
Wednesday, December 07, 2005 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीणा, झालं ग माझ पण आम्बेहळदीचं लोणचं तयार. मी यावेळेस थोडी आम्बेहळद, आल, आणि २ बुटुक साधी ओली हळद असे सर्व किसून घातले दिनेश यांनी सांगितल्याप्रमाणे. ( हातांचा विशेषत: नखान्चा पिवळेपणा आहे अजून ) आणि बाकीची आम्बेहळद गोल गोल तुकडे करुन घातली मला ती चावून खायला आवडते म्हणुन. छान मिळुन आलय त्यामुळे.घरी हळद लावून पहायला काहीच हरकत नाही, म्हणजे हळदीची पाने पण मिळतील मोदक वाफवताना, पातोळ्या करताना

Madhura_d
Thursday, December 22, 2005 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, मला तू सान्गितल्या प्रमाणे लोणचे करुन बघायचे आहे. पण लोणच हा प्रकार मी पहिल्यान्दाच करत असल्याने, फोडणी किती घालायची ते कळत नाहीये. मला प्रमाण सान्गशील का??

हळद १ वाटी
आल १ वाटी
मिर्ची १ वाटी
मसाला पाव वाटी
फ़ोड्णी च तेल
??????????

नेहमीची फ़ोडणीची मोहरी मिक्सर मधुन चालेल की मोहरी ची डाळ विकत आणू?????


Sharmila_72
Thursday, December 22, 2005 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधुरा, आपली नेहमीची मोहरी पाव वाटी घेऊन ती मिक्सरमधून काढ. पण फार वेळ फिरवू नकोस मिक्सर. जस्ट फ़िरव.भरड हव. आणि तेल साधारण पाऊण ते एक वाटी घे. आणि मधुरा, तेल जरी कमी वाटल ना तरी नंतर केव्हाही फोडणी करुन घालता येतं. तेव्हा पाऊण वाटी प्रथम घेतलस तरी चालेल. आणि थंड झाल्यावर मगच ओतायची हं फोडणी, माहीत आहे ना?

Savani
Thursday, September 14, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, मला हे हळदीचे लोणचं करायच आहे. मला सांगा की ह्यात आलं किती घालायचं? म्हण्जे हळदीच्या बरोबरीने का?
दिनेशदा, तुम्ही पण सांगा. आणि हळद लावायची आयडीया छान आहे. लावून पाहते.


Dineshvs
Thursday, September 14, 2006 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळदीच्या बरोबरीने आले घेतले वा कमी घेतले तरी चालेल.
चकत्या करुनच हे लोणचे करतात, पण किसुन केले तर छान मिळुन येते. ओल्या हळदीने किसणीला मात्र पिवळा राप चढतो, हे लक्षात ठेवायचे.
मिरचीपेक्षा मिरीदाणे, वा ओले मिरीदाणे मिळाले तर फार छान. शक्य असेल तर या पिंपळीपण मिसळावी. हा मिरीसारखाच एक प्रकार असतो.
किसुन केलेल्या लोणच्यात नुसता लिंबाचा रस, साखर मीठ व हिंग घातला तरी चालतो फोडणी वा मसाला नाही घातला तरी चालेल.


Savani
Thursday, September 14, 2006 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, धन्यवाद. हे लोणचं मुरायची वाट नाही न बघावी लागत. लगेच खाता येत न.

Dineshvs
Friday, September 15, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो खाता येते. पण कच्च्या हळदीने कधीकधी घश्याला त्रास होतो. म्हणुन आठवडाभर तरी मुरु द्यावे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators