Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
खिम्याचे प्रकार ...

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » मटण » खिम्याचे प्रकार « Previous Next »

Dineshvs
Thursday, October 13, 2005 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खिम्याच्या गोळ्यांचे काहि प्रकार

अर्धा किलो खिमा, एक मोठा कांदा किसुन, १० ते १२ लसुण पाकळ्या, १ ईंच आले, २ ते ३ हिरव्या मिरच्या बिया काढुन किंवा लाल तिखट, थोडा ताजा केलेला गरम मसाला, १०० ग्रॅम फ़ुटाण्याच्या दाळ्यांची पुड किंवा शिजवुन घोटलेली चणा डाळ, पाव कप चक्का, २ अंडी, पुदिना व कोथिंबीर.

ब्लेंडरमधे प्रथम खिमा वाटावा. मग एकेक जिन्^नस घालावा. सर्वात शेवटी दाळ्यांची पुड घालावी. मीठ घालावे. खिम अजितका बारिक वाटला जाईल तितके गोळे हलके होतात.

आता सुकवलेल्या आलुबुखारचे तुकडे (प्रुन्स), तळलेले काजु, हॅझेल नट, खिसमिस यापैकी काहिहि एक घेऊन त्याभोवती खिमा लपेटुन सुपारेईवढी गोळी करावी. (हाताला तुप लावावे लागेल). सगळे गोळे एकदम करु नयेत.
मोठ्या भांड्यात पाणी ऊकळत ठेवावे. खळबळ ऊकळले कि त्यात एक गोळा सोडावा. जर तो विरघळला नाही तर बाकिचे गोळे सोडावेत. जर विरघळला तर आणखी एखादे अंडे घालुन परत वाटावे लागेल.

दुसरा प्रकार.


तुप तापवुन त्यात मिरे, लवंगा, मिरे, दालचिनी, वेलची घालुन फ़ोडणी करावी. त्यावर आले, लसुण, कांदा व मिरच्या (सर्व बारिक कापुन) परतावे. मग टोमॅटो घालावा. त्याला रस सुटला कि खिमा व मीठ घालावे. शिजवुन सुके करावे. मग त्यात कोथिंबीर व पुदीना आणि गरम मसाला घालुन बारिक वाटावे.

मैदा आणि फ़ेटलेल्या अंड्याचा घोळ करुन त्यात बुडवुन हे गोळे तळावेत. या प्रकारातहि गोळे विरघळतील असे वाटले तर अरारुट मिसळावे.

हे मसाले परतुन न घेता कच्च्या रुपात घातले व अरारुट मिसळुन गोळे केले तरी चालतील.

खमंगपणासाठी परतलेले बेसन घातले तरी चालेल. खिम्यात मटन टेंडरायझर किंवा वाटलेली कच्ची पपई घातली तर खिमा पटकन शिजतो.

खिम्याच्या गोळ्याना एक सोपा पर्याय म्हणजे सॉसेजेस परतुन घ्यावेत. अंडे फ़ेटुन त्यात केशरी रंग घालुन त्याची पातळ ऑम्लेट्स करावीत. त्यात सॉसेजेस गुंडाळावीत. मग त्याचा एक सेमी रुंदीच्या चकत्या कराव्यात. त्याला एक टुथ्पिक टोचावी, व त्यावर अननसाचा तुकडा, किंवा चेरीचा तुकडा, असे काहितर्‍ई टोचावे. मग या काड्या भाताभोवती रचाव्यात.

शाकाहारी मंडळीनी ऊकडलेला सुरण, मिल्क पावाडर किंवा खवा वापरुन असे गोळे करावेत.



Pama
Thursday, November 17, 2005 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खिमा पराठा

साहित्य :
खिमा, हळद तिखट मीठ, धणे पूड, कांदा एकदम बारीक चिरून किंवा किसून, एक टोमॅटो बारीक विरून, आल लसूण पेस्ट, आवडत असल्यास हिरवी मिरची, कोथिंबीर बारीअक चिरून.

कृति :
एका पातेल्यात तेल गरम करून त्यात तमालपत्र टाकाव, मग बारीक चिरलेला कांदा, आल लसूण पेस्ट, टोमॅटो, मिरच्या घालून चांगल परताव. त्यात खिमा टाकून उअरलेले सगळे मसाले टाकावे. हे कुकर मधे शिटी देऊन शिजवता येते किंवा पातेल्यातच शिववाता येते. खिमा पाणीदार नको, तसच एकदम कोरडाही नहो. ओलसर असावा.
पराठ्यासाठी कणीक भिजवतो तशी भिजवावी फक्त भिजवताना त्यात दही घालाव.
गार झालेल्या खिम्याच सारण भरून हलक्या हातानी पराठा लाटावा. पराठ्याच कव्हर जरा जाडच असत, फार पातळ लाटल्यास खिमा बाहेर येतो आणि जळतो अगर तव्याला चिकटून पराठा फाटतो. तव्यावर दोन्ही बाजून तेल लावून तांबूस रंगावर भाजून घ्यावा.


Moodi
Monday, January 02, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रीन खिमा बॉल्स

अर्धा किलो खिमा, ५ ते ६ लसुण पाकळ्या, १ इंच आले, ४ ते ५ हि. मिर्च्या, दालचिनी, लवंग, ३ मध्यम कांदे पातळ चिरुन, २ मोठ्या टॉमेटोचा रस, मीठ, तेल, हळद.

कृती : खिमा धुवुन घ्या. मिक्सरमध्ये प्रथम आले, लसुण,मीठ, मिरची वाटा त्यावरच खिमा घालुन परत वाटा, या मिश्रणाचे लहान बॉल्स करा.

कांदा उभा पातळ चिरुन घ्या. साधारण ४ टेबल स्पुन तेलावर लवंग दालचिनीची फोडणी द्या, त्यात कांदा तांबुस होईपर्यंत परता, हळद घालुन तयार खिमा बॉल्स त्यात घाला. ढवळु नका. त्यावर झाकण ठेऊन ते वाफेवरच शिजवा, अगदी थोडे पाणी घाला. शिजत आले की टॉमेटो रस घाला. एक उकळी देऊन बंद करा.

सर्व्ह करताना चिरलेली कोथिंबीर अन चीजच्या उभ्या सळ्या घाला अन उकडलेल्या अंड्याची मधोमध चकती ठेवा. नान किंवा तंदुर रोटीबरोबर खा.


Moodi
Tuesday, January 10, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खिमा पाय.

साहित्य : अर्धा किलो खिमा, २ पातळ चिरलेले कांदे, प्रत्येकी एक चमचा गरम मसाला, धणे अन जीरे पुड, एक चमचा आले व अर्धा चमचा लसुण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धी वाटी ओले खोबरे, ३ कांदे, ३ ते ४ अर्धवट उकडुन बटाटे, ३ ते ४ टॉमेटॉ, ४ अंडी, मीठ.

कृती : प्रथम पसरट पातेल्यात वा लंगडीत तेल गरम करा त्यात २ बारीक चिरलेले कांदे परता. बटाट्याला थोडे टोचे मारुन त्याला हळद, तिखट,आले लसुण पेस्ट लावा अन ते कांद्यावर रचा, अन त्यावर वरती टॉमेटोचे पातळ गोल काप रचा, मिनिटभर ठेवुन खाली उतरवा.

थोड्या तेलावर दुसर्‍या पातेल्यात उरलेले दुसरे कांदे चिरुन परतुन त्यावर थोडी उरलेले आले लसुण पेस्ट, तिखट, धणे जीरे पुड घालुन परता, लगेच त्यात मोकळा केलेला खिमा घालुन परता तो सुटा झाला की आधी भाजुन घेतलेले खोबरे घालुन परता व गरम मसाला घालुन परतुन अन खिमा शिजवा, तो घट्ट व्हायला हवा.

मग खाली उतरवुन दुसर्‍या आधीच्या पसरट पातेल्यातील कांदा बटाटा अन टॉमेटोच्या मिश्रणावर खिमा पसरवा, त्यावर ४ अंड्यांच्या आम्लेटचे मिश्रण ओता. भांड्यावर झाकण ठेवुन मंद gas किंवा ओव्हनमध्ये बेक करा. अंडे चांगले फुगले की हा खिमा पाय सुरीने केकसारखा कापुन वाढा. आवडत असल्यास सॉस घ्या.


Dineshvs
Wednesday, October 11, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खिमा मटार
अर्धा किलो खिमा घेऊन तो स्वच्छ धुवावा व त्याला तीन चहाचे चमचे आले लसुण हिरवी मिरची पेस्ट चोळुन ठेवावी. मग त्याला अर्धा चमचा हळद, एक चमचा ताजा गरम मसाला, व मीठ चोळावे. दोन मोठे कांदे बारिक चिरुन वा किसुन घ्यावेत. दोन चमचे खसखस व एक चमचा तीळ किंचीत गरम करुन त्याची पेस्ट करावी. तिळाची नटी टेस्ट आवडत नसेल तर वगळावेत. एक मोठी वाटी मटार दाणे व एक चमचा चण्याची वा तुरीची डाळ भिजवुन घ्यावी. हवे असल्यास एखादे गाजर वा लहान बीट किसुन घ्यावे. ( याने रंग छान येतो. )
तेल तापवुन त्यात हिंगावर कांदा परतावा. त्यावर मटार व भिजवलेली डाळ परतावी. मग त्यात गाजर वा बीट घालावे. आणि मग त्यावर मुरवुन घेतलेला खिमा परतावा. परतुन खिमा शिजायला वेळ लागतो, त्यामुळे तो कुकरमधे शिजवुन मग परतला तर चांगले. असा परतताना त्यात खसखस पेस्ट घालावी. दोन चिमटी जायफळ वा लवंग दालचिनीची पुड शिवरावी. हवा तितका परतुन सुका करावा.
यात परोठ्याचे चौकोनी तुकडे घालुन पण परततात.
हेच मिश्रण वापरुन पाय करता येईल. सी के पी पद्धतीचे पॅटिस पण करता येतील. यावरचे बटाट्याचे आवरण त्वचे ईतके पातळ असावे, असा त्यांचा मापदंड आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators