Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Mediterranean food

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » Mediterranean food « Previous Next »

Lalitas
Thursday, December 23, 2004 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़लाफ़ल :
फलाफल काबुली चण्यापासून बनवतात
१ कप काबुली चणे भिजवून उकडून घ्यावे
१ मोठा चमचा भरून हिरव्या मिरच्या, लसूण व आल्याची पेस्ट
१ चहाचा चमचा धने पावदर
कोथिंबीर बारीक चिरून
मोहनासाठी एक टेबलस्पून तेल व मीठ चवीप्रमाणे

चणे मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे. बाकी सर्व साहित्य एकत्र करून छोटे छोटे पॅटीस तयार करावे. नंतर मैद्यांत हे गोळे घोळवून तेलांत कुरकुरीत होईपर्यंत तळावे.

पावांत किंवा पीटा ब्रेडमधे फलाफल, कांदा, टॉमेटोच्या चकत्या आणि कुठलीही आवडीची चटणी, दही घालून वडापाव' बनवावा. कधी कधी निरनिराळे सॉस आणि केचप वापरतात. प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे final touch द्यावा


Maitreyee
Tuesday, February 28, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबागनुश / ज
हे एक खास प्रकारचे (Dipping) आहे.
साहित्य
१ भरिताचे वांगे
१-२ लसूण पाकळ्या
लिंबू रस २ टे स्पून
ताहिनी २ टे स्पून्(म्हणजे तिळाची पांढरी पेस्ट तयार मिळते ती, ही प्रत्येक पदार्थात वापरतात हे लोक्)
मीठ, Olive Oil , लाल मिरची (optional)

कृती अगदी सोप्पी आहे. वांगे भरिताला भाजतो तसे भाजून सोलून घ्यायचे. ते वांगे, लिंबाचा रस,लसूण, मीठ, ताहिनी असे मिक्सर मधे वाटायचे. साधारण yogurt किन्वा ताज्या लोण्यासारखी consistency हवी. दिश मधे serve करताना वरून १ चमचा olive oil टाकावे. आणि मिर्ची पावडर वरून थोडी घालावी.
मी यात बदल म्हणून २ लाल मिरच्या मिक्सर मधे वाटतानाच घातल्या, छान लागले तेही.
गरम पिटा ब्रेड बरोबर खायला छान लागते किन्वा वर ललिता ने जे सुचवलय त्यात चटणी ऐवजी मस्त लागते.


Maitreyee
Tuesday, February 28, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हमस
हमस हे पण असेच एक common Dipping आहे
वर जे बाबागनुज साठी लिहिलय त्यात वांग्याऐवजी भिजवून उकडलेले काबुली चणे / छोले घाला की झाले हमस तयार!


Anjalisavio
Tuesday, February 28, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय ललिताजी, मैत्रयी छान प्रकार आहेत.
बाबागनुज मला वाटते संजीव कपुर नी ह्या शुक्रवारी खाना खजाना मधे दाखवला. नक्की माहित नाही.


Dineshvs
Tuesday, February 28, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, गल्फमधे फ़लाफ़ल फ़ार लोकप्रिय आहे. ते त्यात मेथी घालतात. शिवाय त्याचा एक साचा पण मिळतो तिथे.
बाकि सगळे डिप्स, तिथे टिनमधे मिळतात. आपल्या चवीला ते सपक लागतात, म्हणुन मिरची वैगरेची जोड द्यावी लागते.
ते लोक चणे भिजवुन, सोलुन वाटतात.


Moodi
Tuesday, February 28, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!! इथे आजच बघितले. ललिताताई छान अन सोपी कृती आहे. आमच्या इथल्या पाकी स्टोअर्स मध्ये ह्याचा रेडीमेड पॅक मिळतो. मला आधी वाटले की ते नॉन व्हेज असेल म्हणुन आणलेच नाही. पण तुमची कृती एकदम सोपी करायला. धन्यवाद.

Maitreyee
Tuesday, February 28, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक Non Veg recipe लिहितेय.. काल की परवा रचना चे पोस्ट पाहून फ़ार आठवण यायला लागलिय mediterranean food ची:-)
याला बहुतेक कबाब च म्हणतात. नक्की नाव नाही आठवत आता.

३-४ लसूण पाकळ्या, मिरे पूड अर्धा टी स्पून, दालचिनी पावडर पाव टी स्पून, (किन्वा साधारण १ इन्च दालचिनी ची पावडर बहुधा तेवधी व्हावी) हे साहित्य मिक्सर मधे वाटा. पाव वाटी Olive oil आणि पाव वाटी लिंबू रस एकत्र करून त्यात ते वाटण, मीठ,आणि हवे असल्यास तिखट घाला.(मूळ कृती मधे तिखट नाहिये). साधारण १ Lb चिकन ला पुरेल हे वरचे प्रमाण.
बोनलेस चिकन चे तुकडे करून त्याला हे मॅरिनेट लावून ४-५ तास तरी ठेवायचे. (मी हे फ़्रीझ मधे ठेवते म्हणजे खराब वगैरे होण्याची भिती नाही)

नन्तर मग हे तुकडे, मधे मधे छोटे कान्दे, सिमला मिरचीचे तुकडे असे bbq skewers ला लावून ग्रिल करायचे. ओव्हन मधे किन्वा bbq /grill असेल तर त्यात.
Olive oil मुळे की काय माहित नाही पण हे चिकन इतके छान tender होते! तोंडात विरघळते अगदी :-)
गरम पिटा ब्रेड, वरील पैकी कोणतेही डिप, टोमॅटोच्या चकत्या असे हवे तसे combo करून खावे.. अहाहा :-)Lalu
Tuesday, February 28, 2006 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कबाबच गं MT . असेल ऑलिव्ह ऑइल मुळे, पण त्यांचे कबाब नेहमीच छान tender आणि ज्यूसी असतात. करुन बघेन.
'बाबागानुश' पण मस्त आहे.


Milindaa
Wednesday, March 01, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आधी वाटले की ते नॉन व्हेज असेल म्हणुन आणलेच नाही. <<<
मूडी, पॅक वर लिहीलेले असते, ते व्हेज आहे की नाही ते :-)

Maitreyee
Thursday, March 30, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश ने दिलेली ही रेसिपी इथे कॉपी करत आहे, सापडायला सोपे जावे म्हणून.. दिनेश, I hope तुमची हरकत नसेल:-)

बकलावा.

मध्य पुर्वेतील हि खास पेस्ट्री. मी तिथे असताना असे अनेक प्रकार चाखले. त्यापैकी एक. मध्य पुर्वेत काय किंवा युरपमधे काय. साखरेचे प्रमाण जरा जास्तच असते.

तर बकलावा करण्यासाठी कागदासारखी पातळ लाटलेली phyllo पेस्ट्री आपल्याला लागेल. आपल्या साठ्याच्या कानवल्याप्रमाणे साठा लावुनहि हा प्रकार करता येतो. पण मग हि पोळी अगदी पातळ लाटावी लागेल. तर हि पेस्ट्री तयार मिळत असली तर खुप सोपे होते.

हि पेस्ट्री ११५ ग्रॅम लागेल. ११ बाय ८ ईंचाचा एक ट्रे लागेल. या आकारात या पेस्ट्रीचे तुकडे कापुन घेतले तर त्या दहा शीट्सतरी होतील.

५० ग्रॅम हॅझलनट आणि ७५ ग्रॅम बदाम. दोन्ही ब्लांच करुन त्याचे पातळ काप करावे. हेहि तयार मिळु शकतात. त्यात ७५ ग्रॅम साखर आणि थोडी दालचिनी पुड मिसळुन ठेवावी.
ट्रेला पातळ केलेले बटर लावुन एक तुकडा पसरावा, त्यावर परत बटर लावुन आणखी एक तुकडा पसरावा. असे चार तुकडे पसरावेत. त्यावर सुक्या मेव्याचे अर्धे मिश्रण अलगद पसरावे. त्यावर दोन तुकडे परत तसेच बटर लावुन पसरावेत. त्यावर ऊरलेले मिश्रण पसरावे. मग परत ऊरलेले चार तुकडे असेच बटर लावुन परतावे. साठ्याच्या करंजीप्रमाणे केले तर बटर लावुन मिश्रण फ़्रीजमधे अर्धा तास ठेवावे, व लाटावे.

सगळे तुकडे ठेवुन झाले कि अलगद हाताने सर्व दाबावे. मग १८० सी तपमानावर ते साधारण अर्धा तास भाजावे. त्यापुर्वी चाकुने शंकरपाळ्यांसारखे चौकोनी कापुन ठेवावे.

या दरम्यान पाकासाठी आणखी १५० ग्रॅम साखर घ्यावी.
त्यात एक टेबलस्पुन लिंबाचा रस घालावा. एखादा दालचिनीचा तुकडा घालावा. आणि पाक साखर विरघळल्यानंतर दोन मिनिटे मंद आचेवर ठेवावा. बलकावा ओव्हनमधुन बाहेर काढल्याबरोबर हा गरम पाक त्यावर अलगद ओतावा. मग ते सगळे थंड करत ठेवावे. वरुन गुलाबपाणी शिंपडावे. गल्फ़मधे ऑरेंज ब्लॉसम वॉटर म्हणुन एक अर्क मिळतो. तो मिळाल्यास तोहि शिंपडावा. वरुन क्रीम लावुन खावे.


Dineshvs
Friday, March 31, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरकत कसली मैत्रेयी ? एकंदर हा प्रकार अनेक जणाना आवडला असे दिसतेय.
ईजिप्तमधे एक तीळाचा हलवा करतात. कुरकुरीत पांढरा शुभ्र असतो. त्यात पुर्वी कस्तुरी घालायचे, आता त्याचा ईसेन्स घालतात. तो पण खुप छान लागतो.


Sanash_in_spain
Tuesday, July 18, 2006 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबागनुज, हमस वगैरेसाठी लागणारी ताहिनी पेस्ट म्हणजे तिळाची भाजून, भिजवून, सालं काढून पेस्ट घरी करून बघितली आहे का कोणी? केली असेल तर कशी झाली होती, चांगली झाली असेल तर पध्दत सांगा ना please.

Madhura_d
Tuesday, July 18, 2006 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tahini chi mazi recipe :

have tevdhe til gheun te light bhajayache . mug blender madhe tyachi pood karayachi, tyat thoda mith takayacha aani either tilacha or shengadanyacha tel ek ek chamacha takayacha aani parat 1 2 minta bleand karayacha , parat tel takayacha parat blend karayacha asa ... havi tevdhi consistency yeiparyant karayacha .....

Sanash_in_spain
Thursday, July 20, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधुरा, thanks गं. करून बघितले तुझ्या कृतीने ताहिनी आणि मैत्रेयीची कृती वापरुन बाबागनुज. छान झाले होते. मला उगीचच वाटले होते कि आपण घरी केले तर ते आपलं भरीतच लागेल कि काय..पण नाही. आपण तिळाच्या ऐवजी शेंगदाणे वापरुन बघु शकतो ना? वांगी आणि पुन्हा तीळ उष्ण पडत असतील का?

Dineshvs
Thursday, December 14, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hummus Bi Tahina

हा देखील मध्यपुर्वेतला आणि भुमध्य समुद्राच्या परिसरातला एक लोकप्रिय प्रकार.
एक कप काबुली चणे चार कप पाण्यात रात्री भिजत घालावेत. भिजवल्यावर ते पाणी ओतुन कुकरमधुन मऊ शिजवुन घ्यावेत. खरे तर मध्यपुर्वेत ते बाहेरच शिजवतात, पण त्याला खुप वेळ लागतो.
तिथे हे शिजलेले चणे सोलुन घ्यायची पद्धत आहे. याने तयार होणारा पदार्थ खुपच मुलायम होतो. सवड नसली तर ते सोलले नाहीत तरी चालतील. मग ते मिक्सरमधे ब्लेंड करायला घ्यावेत. त्यात दोन तीन लसुण पाकळ्या, २ चमचे ऑलीव्ह तेल, अर्धा कप ताहिनी पेस्ट. ( हि तयार मिळते, ती नसेल तर पांढर्‍या तिळाचे कुट घालावे. ) मीठ आणि थोडी पिवळी मिरची पुड घालावी. ती नसेल तर थोडी पांढरी मिरपुड घालावी. अजिबात पाणी न घालता, याची मुलायम पेस्ट करावी.
एका बोलमधे हि पेस्ट घेऊन, त्यावर थोडी मिरचीपुड शिवरावी आणि कच्चे ऑलीव्ह तेल घालावे.
हा प्रकारहि डिपप्रमाणे खाता येतो.Dineshvs
Sunday, March 16, 2008 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रीक सलाड

यासाठी फ़ेटा चीज लागेल. फ़ेटा चीज बकरीच्या दुधापासून करतात, पण ते खुपच खारट असते. याचे कमी खारट व्हर्जन बाजारात मिळते. मिळाले तर ते घ्यायचे.
याचे एक सेमी क्युब्ज करुन घ्यायचे. यात लाल भडक टोमॅटो, हिरव्या सिमल्या मिरच्या, बाकिच्या रंगाच्या सिमला मिरच्या, हिरवी काकडी, ऑलिव्ह्ज याचे मोठे मोठे तुकडे घ्यायचे. आवडत असेल तर कांदा आणि आवडत असतील ते सलाड ग्रीन्स घ्यायचे. यात बेसिलची पाने मात्र अवश्य घ्यायची. ड्रेसिंग म्हणुन क्रीम घालायचे, अगदी आयत्यावेळी मिरीपावडर घालायची. पण यात वेगळे मीठ अजिबात घालायचे नाही.
हे सगळे थंडगार करुन घ्यायचे. खुप छान चव लागते याची.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators