Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 22, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through February 22, 2008 « Previous Next »

Bee
Wednesday, February 13, 2008 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे rolled oats आहेत. त्याचा मी कसा उपयोग करू शकतो कुणी सांगू शकेल का?

Arch
Wednesday, February 13, 2008 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तू ते खाऊ शकतोस.

Amayach
Wednesday, February 13, 2008 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स सगळ्याना! करुन पाहते आता एक एक प्रकार...

Sushinde
Wednesday, February 13, 2008 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Bee,

He recipe karun paha..masta ahe mepan try keli ani mala khup avdali..easy and healthy

http://onehotstove.blogspot.com/2007/07/crunchy-granola.html

Maanus
Thursday, February 14, 2008 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या accountant ने मला ही रेसीपी सांगीतली होती.

pre heat oven at 350 आणि तो गरम होत असताना एका काचेच्या भांड्यात एक butter stick टाकायची, butter melt झाल्यावर त्यात real mapel syrup किंवा मध, एक कप सनफ्लॉअर ऑईल वैगेरे टाकुन ते थोडे गरम करायचे.

मग ह्या मिश्रनात granola, faux seeds, sunflower seeds, peanuts, oats, coconut तीळ, वैगेरे टाकायचे आणि एक तास भर ओव्हन मधे भाजायचे.

भाजत असताना दर १० मिनटाने सगळे मिश्रन हलवावे नाहीतर ते जळेल.

रोज breakfast हे चांगले आहे असे तीचे म्हणने.


Sayonara
Thursday, February 14, 2008 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३,४ वर्षापूर्वी केया ने इथे 'रवा उत्तप्पा' ची रेसिपी टाकली होती. कुठे मिळेल मला ती? कुणाकडे आहे कां?

Uno
Thursday, February 14, 2008 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank You Bee,

Tya prata barobar ji Curry milate tyachi recipe tumala mahit aahe ka?


Bee
Friday, February 15, 2008 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्च, प्राटा एक दोनदाच खाल्लेला. नविन आलो होतो तेंव्हा. रोल्ड ओट बद्दल म्हणशील तर कलीगने विकत आणला, तिच्याकडून काही संपत नाही. मग काय मला देऊ करते आहे. म्हणून विचार केला आधी हितगुजवर विचारून बघू त्याचे काही होते का.

सुशिंदे धन्यवाद. छान आहे तो ब्लॉग.


Manjud
Friday, February 15, 2008 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, अक अख्खी बटर स्टीक आणि १ कप सनफ्लॉवर ऑईल एका दिवसाच्या ब्रेकफास्टला खायचं? हाय राम, म्हणजे रोज मला अख्खे २ तास जिममध्ये घालवावे लागतील......

Princess
Monday, February 18, 2008 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा चार वर्षांचा आहे. सध्याच्या सगळ्याच मुलांप्रमाणे त्याचेही जेवणाचे खुप नखरे आहेत (भाज्या नकोत, सुप्स नकोत :-( ). त्याच्या शाळेच्या डब्ब्यात काय द्यावे हा अगदी रोजचा प्रश्न असतो. इडली डोसा आनंदाने खातो अगदी रोज तेच हवे असते.
कोणी मला हेल्दी लंच बॉक्स आईडियाज देउ शकेल काय? इथे असा काही बीबी असेल तर त्याची लिंक द्या प्लीज.


Prachee
Monday, February 18, 2008 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईवर गेलेला दिसतोय. असो, अगं वेगवेगळे पराठे ट्राय केलेस का? इडली आवडते तर त्यात भाज्या घालुन बनव. पालक पुरी, मेथी पुरी बटाटा पुरी बनव. सुप्स घेत नाही तर, टोमटो किंवा पालाक भात (प्युरी करुन त्यात भात शिजव) बनव. पावभाजी करुन दे. कटलेटस आवडतात सहसा मुलांना. बघ, राधेयला आवडते का? लवकरच अजुन काहीतरी सुचवेन.

Prachee
Monday, February 18, 2008 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे बघ काही मिळते का
/hitguj/messages/103383/84968.html

Princess
Monday, February 18, 2008 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राची खुप खुप धन्यवाद. तू दिलेली लिंक पण उपयुक्त आहे. धन्यवाद.

Wel123
Thursday, February 21, 2008 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माला पनीर मखनी ची रेसीपी हवी आहे. please sanga

Rujutajoshi
Thursday, February 21, 2008 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे आहेत प्नीर च्या क्रुती


Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » पंजाबी » पनीर भाज्या » pnaIr maaKnavaalaa


Wel123
Thursday, February 21, 2008 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

paneer makhani ani paneer makhanwaala ekach aahe ka?karan paneer makhani madhe fakta tomato asto evdhe mala mahit aahe.

Bee
Friday, February 22, 2008 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी डांगर विकत आणले आहे मालवणी बाजारातून. पण ते कसे खायचे हे माहिती नाही. मदत हवी आहे.

Dineshvs
Friday, February 22, 2008 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते डांगर पोह्याचे आहे कि उडदाचे ?
पोह्याचे असेल तर त्यात दहि वा तेल घालुन नुसते खाऊ शकतोस, उडदाचे असेल तर त्यात कच्चा कांदा, मिरची कोथिंबीर आणि तेल किंवा दहि घालुन खाऊ शकतोस. डांगरात मीठ मात्र खुपदा असतेच. आवडत असेल तर आणखी तिखट घालु शकतोस.
डांगर नेहमी कच्चेच खायचे असतात. शिजवायचे वगैरे नाही.
मालवणी बाजारात तुला आवडतील असे अंबोळी पिठ, कुळथाची पिठी, मेतकुट, आगळ असे प्रकार मिळतील.


Bee
Friday, February 22, 2008 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, हे डांगर गावठी पोह्यांचे आहे. पोहे पण गावठी असतात हे मालवणच्या डांगर विकणार्‍या बाईंकडून कळलं. लालसर विटकरी रंग आहे त्याला. तिखट भरपुर आहे. मी चमचाभर डांगर भाता बरोबर मेतकुटासारखे खाऊन पाहिले. खूप छान लागले मला ते. उडीदाचे पण असते हे नव्हते माहिती. धन्यवाद.

Bee
Friday, February 22, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिंदेबाई, तू दिलेल्या लिंक वरून पाककृती करून पाहिली, मी नाही, कलीगनी. छान झाली असे त्रिवार सांगितले तिनी मला.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators