Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 15, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » Vidarbhaachee khaseeyat » Archive through January 15, 2008 « Previous Next »

Mrinmayee
Thursday, October 04, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, का ss ही टेक्निकल शब्द न वापरता वर रेसिपी दिली आहे. करून बघण्याची आवश्यकता नाही. फ्लोरिडास एक ट्रिप करावी. पोटभर खायला मिळतील! :-) (उरलेल्या डब्यात भरून देईन.).
मनु, तळण घरात अगदी सठीसहामाशी कधीतरी एकदा होतं. तेव्हा बेक करून बघीतल्या नाहीत. पण पारी पातळ ठेवली तर तेलाचा हात लावून बेक करता येतीलही. नंतर कुरकुरीत करायला १-२ मिनिटं दोन्ही बाजूंनी ब्रॉइल करुन घ्यायच्या.
ह्यावेळी पारीतल्या पिठाचं प्रमाण्: अर्धा भाग डाळीचं पीठ, एक चतुर्थांश भाग मैदा आणि तेव्हडंच तांदळाचं पीठ. भीजवून २ तास झाकून ठेवलं. मग वड्या करायला वापरलं.


Supermom
Friday, October 05, 2007 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, आज पहिल्यांदाच हा फ़ोटो बघितला नि तोंडाला अगदी पाणी सुटलं ग. (खूप दिवस झाले खाऊन.)

माझ्या सासरी माहेरी पुडाच्या वड्या बरेचदा होतात. विशेषत जावई आला की पुडाच्या वड्या नि श्रीखंडपुरी हवीच.
सारणाची कृती फ़क्त जराशी वेगळी आहे. त्यात बारीक चिरलेली कोथींबीर नि एकदम बारीक चिरलेला कांदा, खोबरे, खसखस, आले लसूण,तू म्हणतेस तशा अगदी बारीक चिरलेल्या मिरच्या, थोडे तीळ नि हो, चारोळी अगदी हवीच.

लाटताना पण थोडी वेगळी पद्धत आहे. एका वाटीत थोडे कच्चे तेल, थोडे पाणी नि गोडा मसाला नीट एकत्र करतात. मग बेसनाचे पीठ घट्ट भिजवून त्याची पोळी लाटतात. मग हे मिश्रण एक चमचाभर नीट पसरायचे त्यावर. त्याच्यावर कोथिंबिरीचे सारण पसरून मग वळकट्या करून, कापून तळतात नेहेमीसारख्याच.

छे, छे, आज एडिसनला जायचे आहेच. कोथिंबीर आणावीच लागेल. करून खाल्ल्याशिवाय चैन नाही पडणार.
अन हो, नागपूरला सीताबर्डीवर महाराष्ट्र बॅंकेच्या समोरच्या गल्लीत भांबुरकरांचे दुकान आहे. तिथे अगदी घरच्यासारख्या अप्रतिम पुडाच्या वड्या मिळतात. फ़क्त सकाळी जावे लागते. फ़ार लवकर संपतात.


Malavika
Tuesday, January 08, 2008 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवाच पुडाच्या वड्या केल्या होत्या, नवर्‍याच्या वाढदिवसाला. आमच्याकडेपण सुमाॅच्या पद्धतीने करतात.

Sunidhee
Tuesday, January 08, 2008 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुण्मयी मी जरा गोंधळले आहे. तु पूडाच्या वड्या करताना, पुर्ण पोळी भरून तळतेस आणि मग कापतेस का, वड्या? कारण तुझ्या फोटोत सारणाचा एक भाग खूला दिसतोय. फोटो मात्र झकास!!

Mrinmayee
Wednesday, January 09, 2008 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्ण पोळी भरून तळतेस आणि मग कापतेस का, वड्या?... सुनिधी, हो, अगदी बरोबर! अख्खी पोळी भरून, मग ती कापून तळायची, त्याचा बाकर तेलात उतरू नाही द्यायचा.. हे सगळं सुगरणींचं काम, आपुनके बस की बात नही! खर्‍या वड्या चांगल्या गच्च भरलेल्या आणि क्रॉस सेक्शन मधे त्रिकोणी दिसतात.
चारोळी न घालण्यामागे एक कारण एका पु. व. एक्स्पर्ट काकुंनी सांगीतलं.. एखादा कुचका दाणा पण वडीची चव बिघडवतो! आणि न घालून चवीत फारसा फरक पडत नाही.
एकदा कांदा घालून सारण केलं तर वड्या मऊ पडल्या. काय करायला हवं?
सु. मॉ. ह्या खेपेला नागपुरात गेल्यावर अभ्यंकर रोडवरच्या हल्दिरामच्या बाजूच्या दुकानातून पुडाच्या वड्या घेतल्या. अप्रतीम!!!तुझं बरोबर आहे. पोळीला आतून तेल आणि गोडामसाला लावावा असं सांगीतलं. (पाणी लावलं तर वडी नंतर मऊ पडते का?)


Manuswini
Wednesday, January 09, 2008 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी,
मला ना ह्या वड्या करायच्याच आहेत next weekend ला. कोणासाठीतरी....

परत जरा exactly ती वळकटी वळून कापायचा भाग समजावून सांगते का?
मला फक्त सारण बाहेर येइल का ही चिंता आहे.
आपण करंजी करताना साठा लावून जशी वळकटी करतो तशीच ना करायची? नी मग कापतो तश्याच ना ह्या वड्या कापायच्या?

तुझ्या चित्रात वेगळा आकार दिसतोय?

थंडीत हे असे चमचमीत खायला बरे वाटते चहाबरोबर ऑफ़ीसमधून घरी आल्यावर.


Prajaktad
Wednesday, January 09, 2008 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा कांदा घालून सारण केलं तर वड्या मऊ पडल्या. काय करायला हवं? >>म्रु ! वाळवलेला कांदा वापरला तर ? बाकी तुम्ही लोक एक्स्पर्ट यात.. सहज सुचल म्हणुन सांगितल .. वरचा फोटो फ़ारच tempting आहे अजुन aunthentic पु.व खायचा योग आला नाही.

Sunidhee
Wednesday, January 09, 2008 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ thanks गं.. मला करून पहायच्या आहेत. मात्र मी सुगरण नाही :-( कशा जमतील की.. पण मी त्या आतापर्यन्त एकदाही खाल्ल्या नाहीत.. त्यामुळे करणारच लगेच.

Mrinmayee
Wednesday, January 09, 2008 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, मनु, गुडलक! फारश्या कठीण नाहीत ह्या वड्या. आत येव्हडा माल-मसाला, त्यातून तळलेला पदार्थ. मस्तच लागतो कसाही झाला तरी!
प्राजक्ता, वाळलेल्या कांद्यानी चवीत खूपच फरक पडेल. पण वाईट कशाला लागतोय? करून बघा. आणि मला सांगा. :-)

मनु, वळकटी प्रकरण येणेप्रमाणे:
पारी करण्याकरता भिजवलेल्या पिठाचे पुरीसाठी करु त्या आकाराचे गोळे करायचे.
पुरी लाटून तीला गोडा मसाला-तेलाचा हात लावायचा. (कडेला नको. नाहीतर तेलामुळी कडा नंतर एकमेकींना चिकटणार नाहीत)
चमचा भर (किंवा मावेल तितका) बाकर पुरीवर घालून बोटांनी जरा दाबून पसरट पाया असलेल्या डोंगरासारखा बसवायचा.
चारी बाजूंनी उरलेली पुरी सारणावर लपेटायची. सगळ्या (चारी बाजूच्या)कडा एकमेकींना चिकटून घट्ट बसल्यात ह्याची खात्री करायची. (बसत नसतील तर आतून किंचीत पाण्याचं बोट फिरवून घ्यायचं.
तळहातांनी ह्या वडीला दोन बाजूंनी आणखी जरा घट्ट दाबून लंबुळका त्रिकोनी ( prism सारखा) आकार द्यायचा.
आणि अख्खी वडी तळायची. तळल्यानंतर मी फोटोसाठी म्हणून ती कापली.


Nkashi
Thursday, January 10, 2008 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prism सारखा आकार? :-(
पंजाबी समोस्यासारखा म्हणायच आहे का? incase परत जेव्हा कराल तेव्हा न कापता फोटो टाकाल का? please


Mrinmayee
Thursday, January 10, 2008 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nkashi .. मला त्रिकोणी प्रिझम म्हणायचंय :-) खाली दिलंय चित्र! (मी केलेल्या वड्या तश्या नाहीत कारण त्या तश्या जमल्या नाहीत :-). मी आपली खरी पध्दत सांगीतली. आपण आपल्या सोईनुसार बदल करु शकतो. (चव काही वाईट लागत नाही :-) )

Manuswini
Friday, January 11, 2008 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, धन्यवाद, pls तो आकार मी 'करंजी' मध्ये टाकलाय बघ एक समोसा type तसाच ना ग?(बघून सांगतेस का तिथे? sorry.. )

Nkashi
Friday, January 11, 2008 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स ग मृ.... या वीक्-एन्ड ला try करुन बघेन मी

Mrinmayee
Friday, January 11, 2008 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, तुझ्या करंज्या आणि रेखीव मुरड बघीतली. पण प्रश्ण नाही कळला. सॉरी!

Manuswini
Friday, January 11, 2008 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मृ,धन्यवाद पण मी माझ्या करंज्या नाही बघ म्हटले, I mean त्याच चित्रात एक त्रिकोणी समोसा केलेला आहे तश्याच का ह्या तुझ्या वड्या बनवायच्या का आकाराने? हा होता माझा प्रश्ण?



Mrinmayee
Monday, January 14, 2008 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, ह्या फोटोंमुळे काही मदत होते का बघ! ह्यावेळी वरच्या आकृतीसारख्या करायचा प्रयत्न केलाय. कृपया त्या कागदाचे बोळ्यांकडे दुर्लक्ष करा:-)

Prajaktad
Tuesday, January 15, 2008 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठला कागदाचा बोळा???? कसल्या खमंग दिसतायत वड्या...करतेच आता विकांताला!

Malavika
Tuesday, January 15, 2008 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारी आहेस मृ, तू मनुला आकार दाखवायला पुन्हा केल्यास का? छानच झाल्यात.

Mrinmayee
Tuesday, January 15, 2008 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थँक्यु थँक्यु! मनुला वड्यांचा आकार दाखवायचं निमित्त केलं खरं! :-)

Shonoo
Tuesday, January 15, 2008 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मृ अन तिच्या वड्या आल्या शिवाय बा रा चं GTG करता कामा नये! काय मस्त दिसताहेत, तोंडाला पाणी सुटलं slurrrrp !


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators