Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 31, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through July 31, 2007 « Previous Next »

Ravisha
Wednesday, July 25, 2007 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोयाबिनच्या डाळीची आमटी कशी करतात?

Princess
Thursday, July 26, 2007 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मिनोती. पण शेंगदाण्याच्या लाडवाना पाक कुठला लागतो तेच मला महिती नाही... एकतारी की दोनतारी की कसाही चालेल :-(?

Karadkar
Thursday, July 26, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, मला पाकातल्या तारा कळत नाहीत. पण पाक व्यवस्थीत झालाय की नाही ते मी पाकाचा थेंब गार पाण्यात टाकते तो जर चिक्कीसारखा कडक झाला तर गॅस बंद करुन त्यात शेंगदाणे घालायचे.

US मधे गुळाचा कडक पाक नेहेमीच जमतो असे नाही. मी केलेली चिक्कि भारतात कधीही बिघडल्याचे आठवत नाही पण इथे ५०% टक्के वेळा मऊ झाली.



Princess
Thursday, July 26, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मिनोती... तुझी टिप वापरुन करुन बघते या वीकेंडला. मग कळवते.:-)

Meghdhara
Thursday, July 26, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी धन्यवाद. दिनेश तुमच्या क्रुतींची वाट पहाते.

मेघा


Ami79
Thursday, July 26, 2007 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अळुचं फदफदे कसे करतात हे कृपया सांगाल का?

Alpana
Thursday, July 26, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप शोधला..पन बीबी नाही सापडला म्हणुन ईथे विचारते... हिन्दी मध्ये ज्याला अरबी म्हनतात त्याल मराठी नावे काय आहे...मी त्याची भाजी एकदा खाल्ली पण कळाले नाही.. आणी भगरीला आणी शिंगाड्याल कय म्हणतात हिंदीत आज डब्ब्यात उपासाचे थालपीठ आणी भगर नेली होती, आणी सगळे विचारायला लागले कि हे तर धान्य आहे मग तु उपासाला कशी खातेस?

Amruta
Thursday, July 26, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदीतली अरवी म्हणजे मराठी मधली अळकुडी. ह्या अळकुड्या आपल्या अळुची मुळ असतात.

Dineshvs
Thursday, July 26, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविशा, सोयाबीनची डाळ कुठे मिळाली ? सोयाबीनची आमटीच करायची असेल तर ते भिजत घालुन वाटुन त्याचा रस काढावा. त्या रसात चिंचेचा कोळ, हिरव्या मिरच्या, हिंग घालुन भरपुर उकळावे. मग वरुन फ़ोडणी द्यावी. हि आमटी वा सार भरपुर उकळणे जरुरीचे आहे. सोयाबीनचे मिन्स व चन्क्स बाजारात मिळतात. सोयाबीनमधले पचायला आणि शिजायला कठिण असणारे घटक काढुन ते बनवलेले असतात, नुसत्या सोयाबीनपेक्षा ते वापरणे कधीही चांगले.

अमि७९ अळुची भाजी इथे आहे

/hitguj/messages/103383/114540.html?1155550308

Ravisha
Thursday, July 26, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा,सोयाबीनमध्ये तर खूपच प्रथिने असतात ना!!!

Bee
Friday, July 27, 2007 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी पोहे भरून केलेल्या सामोस्याची कृती लिहाल का.. हा सामोसा पार्ल्यात मिळतो असे पार्लेकर म्हणताहेत.

Ami79
Friday, July 27, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, तुम्ही लिहिले आहे की डाळ आणि दाणे भिजत घालावे. किती वेळ भिजत घालावे ते सांगाल का?

यात फोडणीत लसूण सुद्धा घालतात का?



Dineshvs
Friday, July 27, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविशा सोयाबीनमधे प्रथिने असतात, पण सगळी प्रथिने पचायला जड असतात. आपल्या डाळीतही प्रथिने असतात, पण आपण त्याबरोबर तेल, हिंग, हळद, लसुण, मोहरी अशी योजना करुन, ती पचायला सोपी करतो.
अमि७९, डाळ दाणे तीन चार तास भिजवले तरी चालतील. यात लसुण घालत नाहीत, पण घातला तरी चालेल.
बी, मुंबईत काहि ठिकाणी पोहे भरलेले सामोसे, देसी सामोसे म्हणुन विकतात. यात कांदेपोहेच भरलेले असतात.


Ami79
Friday, July 27, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, मी नक्की करुन पाहिन

Meghdhara
Sunday, July 29, 2007 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना भगरीला शामक के चावल आणि शिंगाड्याला कुटू म्हणतात. नवरात्रीच्या दिवसात शामक के चावल आणि कुटूका आटा कुठल्याही जनरल स्टोरमधे मिळतो.

आम्ही इथे नवीन आलो तेव्हा गमतीने शामक के दावर म्हणायचो.. :-)

दिनेश कधी टाकताय क्रुती? वाट पहातेय. माझी एक मैत्रीण बीटर चॉकलेट आणि एक चॉकलेट बार आणून दाणे/ काजू/ बदाम वापरून चॉकलेट करते पण पट्ठी पक्की क्रुतीही सांगत नाही नी साहित्याची पूर्ण यादीही देत नाही.

मेघा


Manjud
Monday, July 30, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, पट्टी सामोसा किंवा साधा सामोसा म्हणतात त्याला. त्यात बटाटे आणि वाटाणे पण असतात पण main ingredient पोहेच असतात. मुंबईत बर्‍याच ठिकाणी मिळातो, दादरला मंजू वडेवाला आहे ना त्याच्याकडे पण छान मिळतो

Prarthana
Monday, July 30, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भगरीला मोरधन व शिन्गाड्याला सिन्घाडे असही म्हणतात

Dineshvs
Monday, July 30, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, काय मजा आहे पहा, माझ्या संग्रहातल्या सगळ्या चॉकलेट्सची कृती कुकिंग चॉकलेट पासुनच सुरवात करतात. आज नायजेला नावाच्या एका सुंदर स्त्रीचा प्रोग्रॅम बघितला तिनेही तसेच केले. म्हणजे कुकिंग चॉकलेट डबल बॉयलरमधे वितळवायचे त्यात हवे ते नट्स घालायचे. बटर घालायचे इसेन्स घालायचा, आणि मोल्ड मधे घालुन थंड करायचे.
हवे तर व्हाईट चॉकलेट आणि नेहमीचे चॉकलेट एकतर करुन मार्बल इफ़ेक्ट द्यायचा.
कोको पावडर अनेक वेळा चाळुन घेऊन त्यात व्हाईट बटर आणि पिठीसाखर घालुन मी चॉकलेट्स केली होती. त्यात मधे घालण्यासाठी ऑरेंज पील्स, आणि हॅझेल नट्स घेतले होते, वरच्या मिश्रणात थोडी रम घातली होती, छान झाली होती. अर्थात हि फक्त एक कृति. यात कल्पनाशक्तीला भरपुर वाव आहे.


Meghdhara
Tuesday, July 31, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक यू दिनेश. आधी बेसीक क्रुती जमली की मग कल्पनाशक्तीला वाव मिळेल. करून सांगतेच. :-)

मेघा


Vidyasawant
Tuesday, July 31, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मार्केट मधे मिळतात तसे मेथीचे थेपले कसे करायचे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators