Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 28, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » मुलांचे खाणे » लहान मुलांसाठी खाद्य » Archive through January 28, 2007 « Previous Next »

Nilyakulkarni
Sunday, January 21, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा... तुम्हाला मेल केली आहे
लिहियाचे विसरलो...
त्याला अंड नाही देता येनार.....

वृष माझा मुलगा मानसही..एका जागी बसुन जेवत नाही...
तो तर खिडकीच बसुन जेवायचे म्हनतो... रात्री सुद्धा त्याला गाड्या पाहात जेवायचे असते... त्याला
कधी नुसतेच दही खायचे असते.... इलाज नाही...


Deepant
Tuesday, January 23, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Same abt me. majha mulaga 3 yrs 6 months cha aahe. to eka jagi basun jevat nahi kinva jevtana computer var songs/educational cd khelat ch jevato. Any solution?

Sami
Tuesday, January 23, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या कारणासाठी high chair खूप उपयोगी पडते. माझा मुलगा अगदी आठ नऊ महिन्यापासून त्यात बसतो. मुलाना बर्‍यापैकी एका जागी बसून जेवायची सवय लागते. आणि माझा असा अनुभव आहे की त्याना high chair मधे बसवून आपल्याच 'पंगतीला' जेवायला बसवलं तर व्यवस्थित जेवण होतं त्यांचं. मला तरी हा concept खूप आवडला. शिवाय अजून एक फायदा म्हणजे मुलं स्वताच्या हातानीही लवकर जेवायला शिकतात. त्या chair ला एक tray असतो त्यात मी पोळीचे, पराठ्याचे pieces किंवा कुठलंही finger food ठेवते आणि तो खातो. मला वाटतं साडेतीन वर्षापर्यंत तरी high chair उपयोगी पडते.

Seema_
Tuesday, January 23, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Totally agree with you समी .
माझा same अनुभव आहे .


Storvi
Tuesday, January 23, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही माझी लेक high chair वर अजिबात बसत नाही. पण बदलीत ती एका जागी खुर्चीवर आमच्याबरोबर बसुन जेवते. टेबल उंच पडते, तर ती kneel करुन जेवते, पण high chair चालत नाही तीला. मध्यंतरी तिलाही लागली होती आळम टळम करत जेवायची, पण आम्ही कडक होऊन तिला इतर ठिकाणि जेवायला द्यायचेच नाही असे सुरु केल्यापासुन पुन्हा एका जागी बसुन जेवू लागली आहे. पण मुळात तिला जेवण आवडते त्यामुळे आमची सक्ती चालते, पण खाईन तर तुपाशी style असेल तर हे चालणार नाही.
मध्यंतरी ती काही खाईनाशी झाली होती तेंव्ह सर्व उपाय थक्ल्यावर आम्ही तिला जेवतांना बरोबर बसवून आपण स्वत.ःच जेवायला घ्यायचो. मग तिने मागितला की तेवढाच घास द्यायचा पुढचा मागे पर्यंत.. असे एक अठवडा भर केले, अपोआप गाडी रुळावर आली....
बघा पटतंय का...



Kedarjoshi
Tuesday, January 23, 2007 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग तिने मागितला की तेवढाच घास द्यायचा पुढचा मागे पर्यंत.. असे एक अठवडा भर केले, अपोआप गाडी रुळावर आली.... >>

मग तिला आठ दिवस एनर्जी कशी मिळाली?

आम्ही हा प्रयोग एकच दिवस करु शकलो पण आमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. माझी मुलगी एका जागेवर बसते पण जेवतच नाही. तुम्ही काय करायचे ते करा. हां पण मग गोडी गुलाबी ने भरविले की खाते. त्या जेवनाला एखादा तास लागतोच.दोन दिवस जेवायला दिले नाहीतरी तिला जेवायची आठवन येनार नाही. का जेऊ? हा प्रश्न ति रोज विचारते. पण आजकाल जरा कमी त्रास आहे.


Storvi
Wednesday, January 24, 2007 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे काही मुद्दे इथे नीट आणि सुसंगत पणे मांडले आहेत.. वाचुन खुलासा होतो का पहा.

toddler eating habits 1
picky eaters
toddler eating habits 2



Seema_
Wednesday, January 24, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dr sears
केदार, मुलगी भरपुर खेळते का ? activity level कशी आहे तीची ? व्यायाम होतो का ? मी यासाठी विचारल , कारण मुल भरपुर खेळली कि भुक लागतेच . आणि भुक लागली कि मुल आपोआप खातात असा माझा अनुभव आहे .
माझ्या मुलीला जेवायला चक्क आवडत . जन्मल्यापासुन ना तीने fomula साठी कधी त्रास दीला . ना solid साठी . एकुणच happy child आहे ती . आताही पोळी,भाजी,पास्ता वैगरे सगळ आवडीन खाते . आता आपल्यासारख्याच तीच्याही आवडी निवडी असणारच , त्यामुळ खाण्या पिण्याचे नखरे मुलानी करु नयेत हे खर असल तरी उगाचच तीन brocoli च खाल्ली पाहिजे , दुधच पील पाहिजे अस काही माझा म्हणन नसत . ते नाही खाल्ल तर उगाच मी त्याचा बाऊही नाही करत . सर्वसाधारणपणे आपल महाराष्ट्रियन जेवण पौष्टीक असत . आणि School मध्ये ही बर्‍यापैकी पौष्टिक खायला देतात . ( हे माझ मत आहे . इतरांच मत वेगळ असु शकेल . )

तीला मी एकच वेळी जास्त खायला देण्याऐवजी थोड्या अंतरान थोड थोड खायला देते . Time table वैगरे काही नाही . पण generally खाण्याच्या , झोपण्याच्या वेळा consistent ठेवण्याचा प्रयत्न करते . रुटिन पाहिजेच . आमच्या बरोबरच जेवायला बसवते .

पण अचानक एखाद्या दिवशी तीला मुळीच जेवायच नसत . इतके दिवसाच्या अनुभवानंतर माझ्या लक्षात आल आहे कि खाण्याच्या बाबतीत मी तीच्यावर मुळीच जबरदस्ती करुच शकत नाही . गोडीगुलाबीचाही काही फ़ायदा होत नाही . भुकच नसते तीला . अशावेळी तीच आवडत danimal किंवा fruits वैगरे खाल्ल तर देते . थोड खेळुन झाल कि लागते भुक .
ताबडतोब तीच्या kitchen मध्ये येरझार्‍या चालु होतात .



Manuswini
Wednesday, January 24, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
बहुतेक तुझी मुलगी म्हणजे माझी भाचीची कॉपी.
माझ्या भाचीला जेवण म्हणुन आवडत नाही
दिवसभर खेळेल, तोंड सुखलेले असेल, डोळ्यात प्राण अगदी जाणवेल पण 'तुम्हाला दया आली तर भरवा मला, मी म्हणुन खाणार नाही' असा तीचा भाव असेल.
सर्व उपाय केले, लहान पणापासुन तशीच आहे. एक अंडे खायला तीन तास no jokes , मी baby sitting करताना कधी कधी वैतागयचे. तोंडात भरलेला घास एकाच बाजुला ठेवुन द्यायची. मला कधी कधी patience out होवुन फटका मारावसा वाटे. पण इतका गोड चेहरा ना..
डॉकटर म्हणाले की एक दिवस उपाशी ठेवा हा ही प्रकार केला तर लगेच आजारी पडायची. आम्हालाच चिंता.
touchwood,otherwise she is very playful, sharp and active पण खाण्याशी दुश्मनी.

अग बाई, तुला भुक का लागत नाही. समोर काहीही बनवुन ठेव.
एका डॉकटरने सांगीतले की लहनपणी खुप force करुन भरवले की मुले जेवण्यात interest घेत नाहीत स्वःताहुन. त्यांना कळते की आहेत कोणी ना कोणी चिंता करयला. अगदे खरे वाटते कारण सोनु my niece had ameabiosis तेव्हा आम्ही जेवण भरवायचो. पोटात जेवण पचायचे नाही. मग काळजीने भरयवायचो आपले आम्हाला वाटेल तेव्हा उलट हात पाय पकडुन.
तेव्हाचा त्रास हा अजुन आहे आता ती ६ वर्षाची असुन सुद्धा.
तेव्हा बहुतेक मुलाला जबरीने देवु नये असे conclusion काढु शकता.
सोनु कधी हाताने खाईल ह्याची स्वपने माझी बहिण मात्र बघ्तेय अजुन :-(

मी आणखी एक सांगु शकते माझ्या सवयीवरुन, मला लहनपणी फक्त चकली,चिवडा, फरसाण, शीरा, नान्कटई वगैरे मिळाले म्हणजे जेवण आणी होटेलातच जेवायला आवडायचे. ही सवय कशी लागली ते एक वेगळा विषय होईल. पण मुदा हा की एकाच खाण्याची सवय चांगली नसते. स्वाः नुभव :-) बरेच कष्ट घेवुन आईने सोडली ती सवय. :-)


Sami
Wednesday, January 24, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलासाठी तीन वेळा म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारी आणि रात्री जेवण हा pattern मी ठेवलाय. मला doc नीच हे suggest केलं होतं आणि ते work होतंय. इतर वेळी अगदी light snacks खातो. doc असंही म्हणतात की सारखं दूधही दिलं तरी त्यांची भूक supress होते. माझा मुलगा सकाळी उठल्यावर, संध्याकाळी ४ वाजता आणि रात्री झोपताना दूध पितो. सारखं खायला दिलं तर तो जेवण नीट जेवत नाही हा माझा अनुभव आहे. कधी कधी routine मधे बदल होतो कारण त्याचे terrible 2s चाललेत सध्या...मस्तिही भरपूर.

आणि जे आम्ही खातो तेच सगळं मी त्याला देते, काही exceptions सोडल्यास. आणि त्यालाही तेच आवडतं..मग अगदी पोळी भाजी पासून, पाव भाजी नाहीतर काहीही non-indian taco वगैरे असलं तरी चालतं. ते मलाही खरं तर बरंच पडतं. वेगळं करायलाही लागत नाही आणि त्याला सगळं खायची सवय लागली आहे. पण force करून खात नाही हे मात्र अगदी बरोबर आहे. सीमा म्हणते तसं activity level high असल्याकारणाने खेळून झालं की व्यवस्थित जेवतो...


Storvi
Wednesday, January 24, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा सेम पिंच :-O

Storvi
Wednesday, January 24, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझंही exactly सीमा सारखंच आहे. आमच्याही लक्षात आलंय की जर आरोही जेवत नसेल तर तिला खरंच भुक नसते, किंवा पोट बिघडलेले असते किंवा पोट साफ़ झाले नसते. ती condition गेली की परत जेवते. त्यामुळे तिला खायचे नसेल तर आम्ही जबरदस्ती करत नाही. त्यामुळे meal times are not a struggle for us, and she does not dread meal times

Kedarjoshi
Wednesday, January 24, 2007 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

activity level कशी आहे तीची ? व्यायाम होतो का ?>>>
सिमा, हो ती एकदम अक्टीव्ह आहे.तिला जिमचा क्लास पण आहे. भरपुर व्यायाम पण करत असते. मुख्य म्हणजे तिच्या आई सोबत रोज योगा करत असते.

वरन भात वा पोळी तिला आवडत नाही. पण मकरोनी चिज, पास्ता वैगरे स्वत्:च्या हाताने खाते बेटी. मुडी आहे. कधी कधी दोन चार दिवस काहीही तक्रार करत नाही. हां नाश्ता मात्र रोज करते. रुटीन खाने दिले नाही की खाते पण रोज बदल कुठुन असनार. आणी ती टे टु मध्ये नाही चांगली साडे चार वर्षाची आहे.

थकत मात्र कधीच नाही. (पण हायपर नाही.)


सोनु कधी हाताने खाईल ह्याची स्वपने माझी बहिण मात्र बघ्तेय अजुन >>>> LOL.


Storvi
Wednesday, January 24, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असं ऐकलंय की terrible twos १८ वर्ष चालतात.. :-O

Anupama
Wednesday, January 24, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, असे वाटतय की तुम्ही माझ्याच मुलीबद्दल बोलत आहात. ती पण ४ वर्षाची आहे ( btw स्तोर्वि तिचे नाव पण आरोही आहे). पिझ्झा,पास्ता अगदी आवडीने खाते, पोळी-भाजी समोर आली की ४ तास लावेल जेवायला,पण भरवले तर पटापटा खाणार. दुध प्यायला १ तास..
लहानपणापासुन आम्हीपण तिला घरी जे काही बनवले आहे तेच देत आलो, processed food, sugary juices तर देणे टाळलेच, पण गेल्यावर्षापासुन खायचे आणि दुधाचे नखरे सुरु आहेत. मला वाटते याला terrible fours असे नाव दिले तर बरे पडेल :-)


Kedarjoshi
Wednesday, January 24, 2007 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असं ऐकलंय की terrible twos १८ वर्ष चालतात>>>

ऐ अस घाबरवू नकोस.

Zakki
Thursday, January 25, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असं ऐकलंय की terrible twos १८ वर्ष चालतात..
मी गेले ३२ वर्षे मोजतो आहे, नि अजून चालूच आहेत. आपण फक्त लक्ष देण्याचे सोडून द्यायचे १८ वर्षानंतर.

Storvi
Thursday, January 25, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मी गेले ३२ वर्षे मोजतो आहे, नि अजून चालूच आहेत. >>झक्की या वयातही टे टू? शो. ना. हो.... आता तरी नीट वागा :-O

Dhanu66
Sunday, January 28, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,
maza mulga 3 varshacha aahe. tyala breakfast las kay dyave? to khaila khup nakhare karto.
Kindly help

Dineshvs
Sunday, January 28, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dhanu66 ईथे याच BB वर बरिच चर्चा झालीय. वरचे अर्काईव्हज उघडुन बघा.
Nilyakulkarni मी उत्तर दिले होते, सविस्तर.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators