Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मायक्रोवेव्ह ओव्हनमधला केक ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » मायक्रोवेव्ह ओव्हनमधला केक « Previous Next »

Dineshvs
Monday, January 22, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायक्रोवेव्ह मधे करण्यासारखा एक सोपा केक.
एक कप मैदा, १ चहाचा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा हे सगळे एकत्र करुन दोनतीनदा चाळुन घ्यावे.
सहा ईंच व्यासाच्या बोलला लोण्याचा हात लावुन घ्यावा.
दुसर्‍या बोलमधे अर्धा कप आंबट दहि आणि पाऊण कप साधी साखर एकत्र करुन हलक्या हाताने फ़ेसुन घ्यावे. त्यात अर्धा कप पांढरे लोणी किंवा तेवढीच घट्ट मलाई फ़ेटुन घ्यावी. त्यात चाळलेला मैदा हळु हळु घालुन नीट फ़ेटुन घ्यावा. पाव कप दुध लागेल तसे घालावे. लाकडी चमच्याने फ़ेटावे व चमचा जरा उंचावर धरुन मिश्रण खाली ओतावे. त्याची धार वा गोळे न पडता, रिबीनीप्रमाणे पट्टा पडला पाहिजे. त्यात २ मोठे चमचे कोको पावडर घालुन परत फ़ेटावे.
६० % पॉवरवर ८ मिनिटे बेक करावा.
दोन मिनिटे ओव्हनमधेच ठेवुन, वायर रॅकवर थंड करावा.
वरुन चॉकलेट आईसिंग करावे, वा फ़ळांच्या बारिक कापा लावुन ग्लेझ करावे.
यात वेगवेगळे फ़ेल्व्हर्स करता येतील
कोको पावडरच्या जागी
एक जास्त पिकलेले केळे व बनाना ईसेन्स, किंवा अर्धा कप मिक्स्ड ओइल आणि ऑरेंज ईसेन्स, रम मधे भिजवलेल्या अर्धा कप मनुका व रम ईसेन्स, टिनमधल्या अननसाचे अर्धा कप तुकडे व अननसाचा ईसेन्स वैगरे


Leenas
Wednesday, April 25, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या केक मध्ये मैद्याच्या जागी रवा वापरता येईल का?

Dineshvs
Wednesday, April 25, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बारिक रवा वापरुन बघता येईल. पण मी प्रयोग केला नाही.

Meggi
Wednesday, April 25, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे कोको powder नाही. त्याच्या शिवाय होइल का केक?

Dineshvs
Wednesday, April 25, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोकोसाठी पर्याय दिले आहेत, त्यापैकी काहिही वापरता येईल

Alpana
Monday, May 21, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wire rack mhanage kay? mazya microwave madhye nahiye...i have LG microwave with grill and convention mode...mi tyaat ajun tari cake nahi kela...ghari junya gol convention oven madhye karayache...warun kacheche zakan aslelya...pan hya microwave madhe nahi kela kadhi....hya madhye don grill rack matr aahet..kay karu?

Dineshvs
Monday, May 21, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वायर रॅक म्हणजे उलट्या चाळणीसारखा प्रकार असतो. यावर केक थंड केला म्हणजे सर्व बाजुने हवा लागुन तो छान कोरडा होतो. जर तो ताटात वैगरे थंड केला तर खालच्या बाजुने ओलसर होतो.
चाळणी उलटी ठेवुन कामचलाऊ वायर रॅक करता येते.
ओव्हनमधल्या रॅकमधल्या गॅप्स मोठ्या असतात, त्यामुळे केकेवर त्याची नक्षी उठु शकते. त्यावर एक स्वच्छ दुपदरी कापड टाकले तर कामचलाऊ वायर रॅक होवु शकते.


Alpana
Tuesday, May 22, 2007 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ok..thanks.....इतके दिवस मी ताटातच थन्ड करत होते

Smitabade
Tuesday, August 07, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

But, for Microwave, exactly which cake pan should be used ? as they are not made for microwave.

Dineshvs
Tuesday, August 07, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठलाही काचेचा किंवा प्लॅष्टिकचा बोल चालेल. व्यास मात्र जास्त नसावा.
वर लिहिल्याप्रमाणे, मायक्रोवेव्ह ओव्हनमधे केक करायचे तंत्र वेगळे असते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators