|
Prajaktad
| |
| Wednesday, January 17, 2007 - 9:31 pm: |
|
|
१ किलो पिठास(मैदा किंवा कणिक किंवा दोन्ही निम्मे निम्मे घ्या)किमान १००ग्रम तुपाचे मोहन घाल,जास्त तुप घातले जास्त खुसखुशित होतिल पराठे. हवि तेवढी कणिक वरिल प्रमाणे (मैदा / गव्हाचे पिठ) भिजवुन घ्या.प्रथम गोल पोळि लाटुन पातळ तुप लावुन मैदा / कणिक भुरभुरुन घ्या.एन्व्हलप प्रमाने दोन्ही बाजुने एक एक घडी घाला.आता दुमडेवर आणी मोकळ्या पदरावर परत तुप लावुन मैदा / कणिक भुरभुरुन घ्या.मोकळे पदर बंद करत एक्मेकावर ठेवा चोकोनी घडी तयार होइल. हळुहळु आकार कायम ठेवत लाटा.फ़ार पातळ नाहि करायचा!तव्यावर तुप सोडुन भाजा.लाकडी उलथन्याने दाबुन भाजले कि छान लेअर सुटतात.
|
प्राजक्ता, धन्यवाद. माझ्या उद्याच्या मेनूमध्ये हे पराठे आहेत.
|
Dineshvs
| |
| Thursday, January 18, 2007 - 4:58 pm: |
|
|
यात खिमा भरुन करता येतात. चारी घड्या घातल्यावर आतले सगळे सारण कव्हर झाले पाहिजे. यासाठी समोरच्या दोन घड्या घालण्यापेक्षा घड्याळ्याच्या दिशेने चारी घड्या घालायच्या, म्हणजे सगळे छान झाकता येते. थोडे कौशल्य दाखवले तर शेवटचा पदर, पहिल्या घडीच्या आत खोचता येतो. सारण भरुन लाटायला कठीण वाटत असेल, तर हि घडी हा पर्याय आहे.
|
Manuswini
| |
| Thursday, January 18, 2007 - 6:40 pm: |
|
|
मी पराठा काहीसा असा सुद्धा करते,खुप खुप पदर सुटतात. गोळ पोळी लाटल्यावर पातळ केलेले तूप चमच्याने सर्व पोळीवर लावावे,पिठ भुरभुरावे. पोळीच्या central पासुन ते diameter edge पर्यन्त सुरिने slit करावे. मग एक त्रिकोणी पदर घालावा त्यावर तूपचा हात, पिठ भुरभुरावे. असे करत आणखी एकेक त्रिकोणी पदर गुंडाळत जावे till you finish . मग तसाच त्रिकोणी आकार ठेवत लाटावे. पातळ करु नये. easily दहा बारा पदर सुटतात. पिठात कडकडीत तूप, नी दही व किंचीत साखर घातली तर सुरेख लागतात. heavy आहेत calories मध्ये पण once in a while who cares
|
प्राजक्ता, चांगले झाले होते.धन्यवाद, अगदी तंतोतंत टिप्स पाळल्या!आता मनुस्विनी ची पद्धत पहावी करून
|
Prajaktad
| |
| Friday, January 19, 2007 - 4:24 pm: |
|
|
धन्यवाद कशाला ? पराठे चांगले झाले , आवडले यातच सगळ आल..
|
मनुस्विनी, सुरूवातीला लाटताना त्रास झाला, नंतर जमले!फ़क्त आकार गोल आणि त्रिकोण यांच्या मिलाफ़ होता.मला वाटले की जाड होतील आणि कच्चे रहातील,पण तसे झाले नाही.(करायला गेले गणपती या सदरात लिहायची गरज नाही भासली
|
Manuswini
| |
| Monday, January 22, 2007 - 7:16 pm: |
|
|
अग काय नहि सवयिने येतीलच बघ, तु पिठात कडकडीत तूप नी दहि, साखर घातलिस? दहि नी साखर घातलि की छान वेगळा वास येतो
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|