Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 12, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » आहारशास्त्र » आहार अन आरोग्य » Archive through August 12, 2006 « Previous Next »

Meggi
Monday, June 12, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीनहूड, तुमचे अनुभव सविस्तर सांगितल्यास सगळ्यांनाच फ़ायदा होइल. पुन्हा नॉर्मल होण्यासाठी तुम्ही काय काय केलत? कसा आहार घेतलात? नॉर्मल झाल्यावर काय काळजी घ्यावी लागते.

Moodi
Monday, June 12, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गारवा ही लिंक बघ. वाचायला अन माहिती मिळवायला तर हरकत नाही ना!! मात्र तुझ्या डॉ. च्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार घे. Best Luck

http://www.second-opinions.co.uk/foods.html

Garva
Monday, June 12, 2006 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi, shonoo, robeenhood...sagdaynche aabhar..me tumhi saangitelya goshti lakshat tehvil !! aajkaal me n navra...weekend la tennis khedto n almost darroj firayla pan jato..hopefully itki exercise sadhya thik asavi. Shonoo, Me udya eka Dietician cha class attend karnar aahe. Ji kahi information midel...ti ya post ver takun thevte...mhanje ajun konala kami padel !
pan me tari.....ithe prashna vicharit rahil.
thanks again.

Chioo
Wednesday, June 14, 2006 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rojchya jevanat konata tandul vaparalela changala?
aamhala basamati, jasmin aani paraboiled ase 3ch prakarache tandul milatat. yatala roj khanyasathi konata changala?

Garva
Wednesday, June 14, 2006 - 10:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

robeenhood, vinod nahi kaamal aahe....tumhi bharpur..namke kay khalle?? me pan sadhya pala-pachoda jaste khat aahe..mhanje surviving on salads, fruits, veggies...
pan teri saanga tumhi 16 kilo 2 mahinyat kase kami kele? plsss.....

Moodi
Wednesday, August 02, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अती उत्तम लेख. आहारातील विसंगती.

http://www.pudhari.com/Archives/july06/27/Link/P-arogyaK.htm

Moodi
Wednesday, August 02, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मैत्रीणीने कोकणातुन आणलेले हातसडीचे पोहे मी खाल्ले होते, ही चव कधीच विसरु शकत नाही. हेच तांदूळ किंवा पोहे आरोग्यदायी असतात.

Bee
Thursday, August 03, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे बासमती तांदूळ वापरतो. पण मला कुणी असे सांगितले की ब्राऊन रंगाचा भात सर्वात चांगला. मी एकदा हा brown rice घरी आणला पण मला तो थोडा रफ़ वाटला. म्हणजे इतका मौ शिजत नाही आणि लवकर गळत नाही हेही एक कारण आहे. पण तब्येतीला चांगला असेल तर नक्की तोच शिजवत जाईन.

कुणाला हातसडीच्या तांदळाला english मध्ये काय म्हणतात हे माहिती असेल तर सांगा.

मूडी, तो लेख मी वाचला. अगदी कितीही विचार केला तरी मला बटाट्याची साले काढाविशीच वाटतात आणि फ़ळांची देखील जसे की चिक्कु वगैरे. भारतात तर कुठलेही फ़ळ जे बाजारात मिळते त्याची वरतून वाट लागलेली असते. म्हणून वरचा भाग मी तरी काढून बाजूला टाकतो.


Karadkar
Thursday, August 03, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुला उत्तर देउ का नये अशा विचारात होते कारण तु परत ना ना शंका उपस्थीत करणार. पण काय आहे ना हाडाच्या शिक्षकाला गप्प बसवत नाही

दिवे घेशीलच :-)


बर आता brown rice बद्दल - हा साधारण हातसडीच्या तांदळासारखाच असतो. म्हणजे वरचे पूर्ण सालटे काढुन टाकलेले नसते. पांढरा शुभ्र नसतो. हातसडिचा तांदुळ म्हणजे भाताच्या साळीतुन हलकेच तांदूळ काढायचा. पाश्चात्य देशात आजकल सगळे मशिनने केलेल अस्ते. त्यामुळे मग brown rice = हातसडीचा तांदूळ असे मानुन खायचे. नाहीतर देसह्हतुन येताना ठिके बांधुन आणायचे २० किलोचे :-)
तर ह्या हातसडीमुळे त्यातले महत्वाचे घटक पदार्थ minerals वगैरे टिकुन रहातात.

अता हा तांदूळ शिजवताना, जवळपास दुप्पट पाणी घाल आणि किंचीत मीठ घालुन कुकरला ३ शित्या कर चान मौ शिजतो. मी भात शिजवेन तर साधा गॅसवरच असा हट्ट असेल तर भात शिजायला किमान ४० मीटे लागतात आअणी जवळपास ३ पट पाणी लागते.
मी अजुन एक उपाय शोढला आहे तो म्हणजे तांदूळ धुवुन ३ पट पाण्यात १ तास तरी भिजु द्यायचे आणि त्याच पाण्यात शिजवायचे.

करुन बघ, अजुन शंका विचरशीलच :-)



Bee
Friday, August 04, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती, म्हणजे साळी असलेले तांदूळ असेच तुला म्हणायचे आहे ना.. कारण साळींनाच फ़क्त साले असतात बाकी स्वच्छ केलेल्या तांदळाची साले काढून टाकलेली असतात आणि ती साले टोचतात देखील.

इथल्या supermarket मध्ये Austrelia, Japan, Thailand म्हणून जो brown rice येतो तो लालसर विटकरी रंगाचा असतो त्याला मी हातसडीचे तांदूळ समजले होते. तू खूप छान माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद. अशीच हाडाची शिक्षिका रहा माझ्यासाठी. मार दिला तरी चालेल हो मास्तरीन बाई :-)


Karadkar
Friday, August 04, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, साळी खातात काय रे? तु खाउन दाखव बरे एकद :-)
दिवे घे.

देशात तो हातसडीचा तांदूळ मिळतो तो हाताने साळीतुन तांदुळ काढतात आणी इकडे मशीन ने. बाकी गुणधर्म सारखेच.
मी पण तोच विटकरी रंगाचा तांदूळ वापरते.

परवा त्याचा मसाले भात केला शिजायला तब्बल एक तास लागला फ़क्त कुकर लावायचा कंटाळा केला.


Moodi
Friday, August 04, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर अगं तू म्हणतेस तसा तो लालसर रंगाचा तांदुळ मी आणला, म्हणजे तो उकडा तांदूळ होता. त्याच्या मी इडल्या केल्या नेहेमीसारख्या तर छान झाल्या. किंचीत चव बदलली अन रंग पण बदलला. त्याच्या इडल्या करुन बघ होतायत का ते.

Supermom
Friday, August 04, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हा ब्राऊन राईस म्हणजे नेमके आहे तरी काय?माझ्याकडे पण बराच पडलाय.(मी बी ची बहीण शोभतेय की काय प्रश्न विचारायच्या बाबतीत?---बी दिवे घे रे.)

मी हेल्थला चांगला वगैरे म्हणून आणला नि आता नवरा हात लावायला तयार नसतो त्या भाताला
इडलीव्यतिरिक्त दुसरे काही करता येईल का त्याचे? नाहीतर गेले अक्कलखाती


Dineshvs
Friday, August 04, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाल तांदळाच्या बाबतीत माझा अनुभव फार वेगळा आहे. त्याला चक्क रंगवलेले होते. पण जो खराखुरा लाल गावठी तांदुळ असतो, त्याला शिजायला खुप वेळ लागतो. त्याच्या ईडल्या केलेल्या चांगल्या.

बेळगावकडे काळा भात म्हणुन एक तांदुळ मिळतो. तो पण खुप चवदार असतो, असे ऐकुन आहे.

मिनोति, कोल्हापुरला राळे मिळतात, ( राजगिर्‍यासारखे दिसतात. ) त्याची खिचडी पण खुप छान लागते. खाल्ली असेलच.


Karadkar
Friday, August 04, 2006 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Brown rice looks like this -
http://www.wheatmontana.com/store/images/Brown-Rice.jpg

red rice looks like this - http://www.myspicer.com/fullpics/5118110.jpg
I have not seen brown rice in Indian store as I don't go there often. I buy it from Trader Joes or whole foods.


Karadkar
Friday, August 04, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, त्या राळ्याच्या साटोर्या करतात का हो?
लहानपणी ळ म्हणयल शिकवताना काळे राळे गोरे राळे म्हणयला लावायचे.


Dineshvs
Saturday, August 05, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साटोर्‍या नाहि करता यायच्या त्याच्या. अगदी राजगिर्‍यासारखेच दिसतात हे राळे. पण चांगले शिजतात व फुलुन येतात.
मराठीच्या पुस्तकात अर्वाचीन मराठी भाषेतला धडा होता, त्यात राळियाची खिचडि रांधली, असा उल्लेख होता.



Moodi
Thursday, August 10, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यंतरी आमच्या इथल्या एका प्रख्यात आयुर्वेदीक डॉक्टरांनी सगळ्यांकरता नॉर्मल पथ्ये सांगीतली.

१) मध अन दही गरम करुन खाऊ नये( आपण दही दम आलू अन काही ग्रेव्हीत वापरतो ते चालते का हे मात्र विचारायला त्यावेळी सूचलेच नाही, आता विचारेन)

२) मांसाहारानंतर( मटण, चिकन, मासे पण) आईस्क्रीम खाऊ नये.

३) मूळा, लसूण शेवग्याच्या शेंगांची भाजी अथवा आमटी हे खाल्ल्यावर दूध पिऊ नये.

४) दुध + दही भात, दहीभात + मीठ + लोणचे अजीबात घेऊ नये. निदान सातत्य टाळावे.

दह्यात मीठ घालू नये हे आश्विनीने आधी सांगीतलेच आहे.

५) तूप अन मध समप्रमाणात घेऊ नये, विषम म्हणजे 2 : 1 असे प्रमाण असावे.


Asmaani
Saturday, August 12, 2006 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालती कारवारकरांची आहारशास्त्रावरील पुस्तके कुणी वाचली आहेत का? मला त्यांचे फक्त "वंशवेल" नावाचे पुस्तक माहिती आहे.
इतर पुस्तकांची कुणी माहिती देऊ शकेल का?


Asmaani
Sunday, August 13, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा ३ वर्षांचा आहे. गेले ८ महिने त्याचे वजन १२ किलो आहे. तसे रोजचे जेवण( पोळी भाजी भात आमटी वगैरे) तो बर्यापैकी जेवतो. वजन वाढावे म्हणून त्याला आणखी काय देऊ?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators