|
Me_sakhi
| |
| Wednesday, November 29, 2006 - 2:25 pm: |
| 
|
भेंडी मसाला साहित्य: अर्धा किलो भेंडी,जिरे,टॉमटो,तळून लाल करुन वाटलेला कांदा.तिखट,हळद,मिठ,धणेपूड,गरम मसाला,लिम्बु. कृती: प्रथम भेंडी स्वच्छ धुवुन कोरडि करुन घ्यावि व चिरुन घेवुन तेलामध्ये लाल रंग येईपर्यंत तळुन बाजुला काढुन ठेवावित. अर्धा वाटि तेल गरम झाल्यावर त्यामधे एक टी-स्पून जिरे टाकून लगेचच अर्धा वाटी बारिक चिरलेला टॉमटो टाकून परतून घ्यावे.त्यामधे एक वाटी तळून वाटलेला कांदा दीड टी-स्पून तिखट, अर्धा टी-स्पून हळद,अर्धा टी-स्पून मिठ पाव टी स्पून गरम मसाला,दीड टी-स्पून धणेपूड,१ टी स्पून लिंबाचा रस हे सर्व टाकुन चांगले परतवून घ्यावे.दीड वाटी गरम पाणी टाकून शिजवून घेणे व त्या मधे तळलेली भेंडी टाकावी.
|
Alpana
| |
| Tuesday, October 23, 2007 - 7:52 am: |
| 
|
अश्याच प्रकारे मी पण परवा केली होती... तेच पोस्ट करायला आले आणी इथे आधीच रेसेपी होती.... फ़क्त थोडा फरक होता.. मी भेंडी उभी चिरुन तेलातुन फ़क्त थोडी परतुन घेतली... आणी कांदा मिक्सरमधुन बारिक केला... तेलावर परतुन त्यात टॉमॅटो केचप घातले (घरात टॉमॅटो नव्हते)त्यात हळद, तिखट, गरम मसाला, बडीशेपेची पुड, आमचुर पावडर घातली... नंतर परतेली भेंडी घातली...आणी फुलके होईपर्यंत बारिक गॅसवर ठेवली... मस्त झाली होती
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 23, 2007 - 2:05 pm: |
| 
|
याच भाजीत बटाट्याचे चिप्स घालुन पण छान लागते. भाजी पुरवठ्याला येतेच, शिवाय ज्याना भेंडी अजिबातच आवडत नाही, त्यानाही खाता येते.
|
Alpana
| |
| Wednesday, October 24, 2007 - 4:38 am: |
| 
|
करुन बघेन..... तसे हा मसाला नुसता पण मस्त लागतो... माझ्या सासुबाई अश्याच प्रकारचा मसाला भरवा करेले करायला वापरतात.... आता सिमला मिर्ची साठी वाप्रुन बघेन
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|