Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

पनीर टिक्का

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » पंजाबी » पनीर टिक्का « Previous Next »

Dineshvs
Wednesday, November 22, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाव किलो पनीरचे एक ईंच लांबी रुंदीचे तुकडे. पनीर घट्ट असावे. सहज कापता आले पाहिजे. घरगुति वापरायचे असेल तर एक कप छान्याला एक चमचा मैदा घालुन ब्लेंड करावे आणि वजन ठेवुन पाणी काढुन टाकावे.
एक कप घट्ट दही वा चक्का फ़ेटुन घ्यावा. त्यात एक चमचा लाल काश्मिरी तिखट, चिमुटभर ओवा. एक चमचा तंदुरी मसाला, मीठ, चिमुटभर साखर, थोडा हिंग घालुन फ़ेटुन घ्यावे.
पनीरच्या तुकड्याना एक ईंच आले, तीन चार लसुण पाकळ्या व एखादी हिरवी मिरची यांचे वाटण चोळुन घ्यावे. चोळताना अर्ध्या लिंबाचा रस घालावा. मीठहि लावावे. दहा मिनिटाने पनीरचे तुकडे फ़ेटलेल्या दह्यात घालावे. हलक्या हाताने मिसळुन, झाकुन फ़्रीजमधे तासभर तरी ठेवावे.
दोन सिमला मिरच्या, दोन मोठे कांदे, आणि दोन घट्ट टोमॅटो यांचे पनीरच्या आकाराचे तुकडे करावे. या सर्व तुकड्याना थोडे तेल व मीठ एकत्र करुन चोळावे. थोडे तेल मुरवलेल्या पनीरमधे घालावे.
मग बार्बेक्यु स्टिक्स घेऊन, त्यात क्रमाक्रमाने हे सगळे ओवावे. प्रखर विस्तवावर, अधांतरी धरुन गोल गोल फ़िरवत ग्रिल करावे. मसाला सुकला आणि पनीरचे कोपरे काळे झाले कि प्लेटमधे काढावे. त्यावर चाट मसाला शिवरुन खावे.
सोबत पुदीन्याची चटणी. बारिक उभा कापलेला कांदा व बीट घ्यावे.


Bage
Monday, January 01, 2007 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Dinesh
मला वाटत bhagya नी फ़िश टिक्का ची रेसीपी दिली होती.
anyways, माझ्याकडे grill नाही आहे मी conventional oven मधे कस grill करु?


Dineshvs
Tuesday, January 02, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शक्य असेल तर बार्बेक्यु स्टिक्स मधे ओवुन, त्या कश्याच्या तरी आधाराने अधांतरी ठेवता आल्या तर छान. साधारण १० ते १५ मिनिटात होतील.
त्यानंतर म्हणजे मसाल्याचा ओलसरपणा गेल्यावर नॉन स्टिक तव्यावर दोन तीन मिनिटे ब्राऊन होण्यासाठी ठेवावे. शक्य तर यावेळी तेल वापरु नये.


Prajaktad
Tuesday, January 02, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंवा पनिर ओव्हन मधे कोरडे झाले की ओव्हन बंद करुन लो broil सेट वर सगळ्यात वरच्या जाळीवर ठेवावे. छान ब्राऊन होते.

Bage
Wednesday, January 03, 2007 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Dinesh ,Prajakta .
मी try करुन बघते



Bage
Wednesday, January 03, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे sour cream उरल आहे
ते ह्या दह्यात mix केल तर चव बिघडणार नाही न


Dineshvs
Wednesday, January 03, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही बिघडायची. पण जर ते जास्तच उरले असेल तर पनीर टिक्का मसाला करता येईल.
सगळी प्रोसेस अशीच फ़क्त वेगळी ग्रेव्ही करावी लागेल.


Sonchafa
Thursday, January 04, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पनीर टिक्का घरी बनविण्याचा प्रयोग केला. आणि काय करणे टाळावे हे लक्षात आलं म्हणून इथे लिहीत आहे. मी दोन दिवसापूर्वी पनीर आणून त्यातले अर्धे वापरले होते आणि शिल्लक पनीर पाण्यात घालून ते chilling tray मध्ये ठेवले होते. माझा अंदाज असा आहे की पाण्यात राहिल्यामुळे ते पनीर फ़ारच नरम पडले असणार कारण आगीवर धरल्यावर भरपूर पाणि तर बर्नर वर पडलच ( आई ओरडली हे ओघाने आलच!) पण बार्बेक्यु स्टिक मध्ये अडकवतानच ते मरणोन्मुख झाले होते. टिक्का तयार झाला तेव्हा त्यात प्रमुख्याने सिमला मिर्ची, टोमॅटो आणि कांदा एवढच दिसत होते. :-(

दिनेश म्हणतात त्याप्रमाने पनीर बनवतानच त्यात मैदा घातल्यास ते नक्की सोयीचे होईल. किंवा शिल्लक पनीर मधून टिक्का बनवायला जाणे तरी टाळावे.

ओवा न सापडल्यामुळे मी त्या ऐवजी शहाजिरे घातले होते आणि त्याचाही स्वाद चांगला लागला.


Dineshvs
Thursday, January 04, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफा, अगदी बरोबर, शक्यतो पनीर उरवुच नये. लगोलग वापरुन टाकावं.
आपल्या आया मंडळीना सगळं वाटीवाटीभर उरवायची सवय असते. मी आईला म्हणतो, आपल्याकडे कधीहि गौर बसवता येईल. सोळा भाज्या फ़्रीजमधे असतातच.


Safaai
Friday, January 05, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण ते पनीर पाण्यात का घालून ठेवले? नुसते का नाही ठेवले?

Sonchafa
Friday, January 05, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटले की पनीर कोरडे पडेल फ़्रिजमध्ये राहून म्हणून पाण्यात ठेवले. आणि ते जर फ़्रीझर मध्ये ठेवले तर फ़ारच कडक होते अमुलच्या पनीरसारखे म्हणून तेही टाळले.. दोन दिवस वापरले जाणार नव्हते म्हणून चिलिंग ट्रे मध्ये ठेवले..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions