Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Mawa Cake

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » Mawa Cake « Previous Next »

Me_mastani
Monday, November 13, 2006 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावा केक ची रेसिपी कोणी सांगू शकेल का? ईथे जी मावा पावडर मिळते ती यात वापरता येते का? धन्यवाद.

Prajaktad
Friday, November 17, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तानी ! माझ्याकडे एका पुस्तकात आहे रेसिपी हवि असेल तर लिहते ती इथे.. पण,मी ती try केलिली नाही आणी त्यात मावा पावडर ही वापरलेली नाही.

Me_mastani
Friday, November 17, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅक्स प्राजक्ता, लिही ना प्लिज. बाकी मायबोलीकर त्यांचे मार्गदर्शन देतीलच.

Prajaktad
Friday, November 17, 2006 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्क मावा केक
साहित्य:
५०० ग्रम खवा
२५० ग्रम साखर
अर्धा लिटर घट्ट दुध
१ वाटी पनिर चुरा
१ वाटी पिठीसाखर
अर्धा चमचा जायफ़ळ पुड
काजु बदाम मधोमध चिरुन,पिस्ते
खरबुज बिया,वेलदोडा दाणे

क्रुति:
खवा हाताने मोडुन साखर,दुध घालुन एकजिव करा.पनिरच्या चुर्‍यात पिठिसाखर मिसळुन रवेदार मिश्रन करा. हा चुरा,जायफ़ळ पुड खव्यात एकत्रा करा.
हे सगळ गसवर परतत रहा.घट्ट होवुन कडेने सुटले की** " तयार " पातिल्यात ओता.झाकण लावा.गार झाल्यावर पिसेस कापा.गडद , हलके बदामी रंग येण्यासाठी हलवाई पातेले बर्फ़ावर ठेवतात.त्यामुळे जो भाग लवकर गार होतो तो पांढरा दिसतो.मधला भाग गरम राहिल्याने बदामी दिसतो.
**
पातेले " तयार " करणे
पातेल्याला तुपाचा किंवा रिफ़ाइंड तेलाचा हात लावुन त्याच्या तळाशी काजु बदाम मधोमध चिरलेले,पिस्ते
खरबुज बिया,वेलदोडा दाणे घाला.
मिश्रण शिजले कि लगेच पातेल्यात ओतुन घट्ट झाकण लावा.

हि मिठाई बर्फ़ी प्रमाणे थापली तर ' पंजाब ' वैगरे भागात याला ' पलंगतोड " किंवा p.g.t हलवा म्हणतात.
क्रुति व इतर माहिती...उषा पुरोहित यांच्या ' शानदार पाकक्रुति ' पुस्तकामधुन.




Seema_
Friday, November 17, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त वाटती आहे कृती. करुन बघायला पाहिजे .
प्राजक्ता पुस्तक कस आहे ते ? चांगल असेल तर मी मागवणार होते .


Me_mastani
Saturday, November 18, 2006 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद प्राजक्ता. छान वाटतेय रेसिपी. खरं तर मी केक सदरात मोडणारी रेसिपी शोधत होते. पण ही पण नक्की करून पाहिन.

Prajaktad
Sunday, November 19, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा चांगल वाटल मला पुस्तक...

Vidyasawant
Monday, November 20, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उषा पुरोहित अग त्यांच्या पाकक्रुती मला खुप आवडतात शिवाय सोप्प्या पण असतात. माझ्याकडे त्यांच एक पुस्तक आहे चेंज हव असला की सरळ पुस्तक घेउन डोळे मिटुन त्यांनी सांगितल तस करते आणि तो पदार्थ सहीच होतो.

Prady
Thursday, November 23, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तानी ही माझ्याकडच्या पुस्तकातली कृती. बघ असं काही करून बघायचं असेल तर.

साहित्य:
१) एक वाटी मैदा
२) एक वाटी मावा
३) एक वाटी साखर
४) पाव वाटी लोणी
५) अर्धी वाटी दूध
६) अर्धा चमचा बेकिंग पावडर
७) पाव चमचा बेकिंग सोडा
८) पाव चमचा वेलची जायफळ पावडर
९) २ अंडी

कृती:
प्रथम अंडी एग बीटरने फेसून घ्यावीत. मैदा, बेकिंग पावडर व सोडा एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे. लोणी, साखर, मावा एकत्र करून फेसावे. त्यात फेसलेली अंडी घलून ५-६ मिन. फेसावे. याच मिश्रणात दूध व वेलची जायफळ पाव्डर घालून सगळे चांगले एकत्र होई पर्यंत फेसावे.

तुपाचा हात लावलेल्या भंड्यात मिश्रण ओतून ओव्हन मधे ३०-३५ मिन. १०० डिग्री c ला बेक करावे. वरून खरपूस गुलाबी झाला की केक झाला का ते पाहून बंद करावे.


Lajo
Thursday, November 23, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady चांगली वाटतेय गं ही रेसिपी. वीकएंडला करुन बघायला पाहिजे.

Me_mastani
Thursday, November 30, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेसिपी बद्दल थंक्यू प्रडी. यात मावा पावडर वापरली तर चालेल का?

Manuruchi
Wednesday, May 07, 2008 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

churni road station baher Merwan che prasiddha mawa cake miltat . kupach chan lagtat , koni try kele aslyas krupya tyachi kruti deta yeil ka

Dineshvs
Wednesday, May 07, 2008 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्नी रोड नाही, ग्रांट रोड स्टेशन ते.

Prr
Thursday, May 08, 2008 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेरवानचे केक वाव!... खरेच त्याची चव छान आहे. मी पन बर्याच जणांना विचारले की काय वेगळे असते त्यांच्या केक मध्ये पण उत्तर नाही मिळाले.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators