Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इतर माहिती

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » इतर माहिती « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 23, 200720 05-23-07  4:20 pm

Alpana
Tuesday, July 17, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल चॉकलेट केक केला होता... अन्नपुर्णा मधल्या बेसिक क्रुती प्रमाणे, पण बिघडला...फ़क्त एक फ़रक...मल एकिने सान्गितले होते कि... चॉकलेट केक थोडा जड होतो म्हणुन त्यात बेकिन्ग पावडर बरोबर त्याच्या निम्मा सोडा घाल... मी तो घातला..बहुतेक सोडा जास्त झाला कारण केक मधे बसला होता... पण मुख्य म्हणजे १८० तापमानाला ५० मिनिटे ठेवुनही मधला खाली बसलेला भाग कच्चाच राहिला.... चिकट चिकट....बाहेरचा भाग मस्त फुगलाय...काय बिघडले असेल....आणी त्या उरलेल्या मधल्या चिकट पिठाचा कही उपयोग होतो का...कणके सारखे आहे ते.. का फेकुन देवु....मी बाहेरचा फुगलेला आणी बेक झलेला भाग काढुन घेतलाय...आणखी एक फरक म्हणजे मी नेहमी साध्या electric ओवनमध्ये अल्युमिनियमच्या भान्ड्यात केक करते... यावेळी microwave oven च्या convection mode मध्ये केला..काचेच्या भान्ड्यात...

Alpana
Tuesday, July 17, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते कच्चे पीठ मला फेकवत नाहिये.... कुकीज वैगरे काही करता येइल का?

Dineshvs
Tuesday, July 17, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना, मायक्रोवेव्ह्ज भांड्याच्या कडेपासुन फक्त ५ सेमी आत पोहोचु शकतात. मला वाटते भांड्याचा व्यास जास्त होता. तरीपण कन्वेन्शन मोडमधे असे व्हायला नको होते.
मायक्रोवेव्ह ओव्हनच्या सोबत जे कूकबूक मिळते, त्या प्रमाणातल्या व अगदी तश्याच केल्या तरच त्या पाककृति यशस्वी होतात.
मधल्या पिठाचे तसे काहि करता येणे जरा अवघडच वाटतेय. पण फ़ेकुन देण्यापुर्वी छोट्या कुकीज करुन बघाता येतील.
बेक झालेल्या केकच्या मधे घट्ट कष्टर्ड घालुन, एक वेगळा प्रकार करता येईल.


Alpana
Tuesday, July 17, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks.... मला पण तसेच वाटले...पण जर काचे ऍवजी मेटलचे भान्डे वापरले तर......त्या बेक झालेल्या केकचा चान्गला भाग वेगळा काढला होता....आणी तो आत्तापर्यन्त सम्पला पण...मी तेच करुन बघणार होते.. अलुमिनियम फ़ॉइल मधे थेवुन कुकीज बनवुन बघणार होते..पण विचार केल एकदा तुम्हाला विचारुन मगच दुसरा प्रयोग करावा... या वीकएन्डला परत प्रयत्न करेन...जमेपर्यन्त

Alpana
Tuesday, July 24, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स दिनेश.. त्या बिघडलेल्या केकच्या कुकीज केल्या..आधी थोडा वेळ कन्वेंशन मोड मध्ये बेक केल्या आणी नंतर ग्रील केल्या... चांगल्या खुसखुशित झाल्या होत्या

Wel123
Sunday, March 23, 2008 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

eggs cha yewaji soda kiwa baking powder waparu shakato ka......1 egg sathi kiti baking powder ghawya lagel please help

Dineshvs
Monday, March 24, 2008 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंडे वापरलेल्या सगळ्याच केकमधे अंड्याच्या जागी सोडा वा बेकिंग पावडर वापरता येत नाही. काहि कृतिमधे अंड्याला पर्याय नसतो तसेच एका अंड्याला अमुक इतकी बेकिंग पावडर असेही सांगता येत नाही.

बिन अंड्याचा केक करताना, दहि, ताक, प्यायचा सोडा असे काहि प्रकार वापरावे लागतात, आणि तश्या काहि कृति आहेत इथे.


Dineshvs
Monday, March 24, 2008 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्विस रोल, किंवा कोल्हापुरी पद्धतीचे फ़्रुट कॉकटेल करण्यासाठी, स्पॉंज केक लागतो. अंडे न वापरता तो कसा करता येईल ते बघु.

२८० ग्रॅम म्हणजे साधारण पावणे तीन कप साधा मैदा, १ टिस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टिस्पून खायचा सोडा, दोन टिस्पुन आयसिंग शुगर हे सगळे एकत्र करुन दोन तीन वेळा मैद्याच्या चाळणीने चाळुन घ्यावे. चाळताना चाळन जरा उंचावर धरावी. असे केल्यामुळे हे सगळे नीट मिसळले जाते.

अर्धा टिन म्हणजे २०० ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क एका मोठ्या बोलमधे ओतुन घ्यावे. त्यात अर्धा कप म्हणजे ६० ग्रॅम साधे लोणी किंवा अनसॉल्टेड बटर मिसळुन घ्यावे. हे हॅंड मिक्सरने केले किंवा मिक्सरचा खास व्हीपर वापरुन केले तर चांगले. १०० एमेल दुध तयार ठेवावे.
आता दुध लोण्याच्या मिश्रणात एकेक चमचा मैदा मिसळत जावा. मिसळताना घुसळणे चालूच ठेवावे. अधुन मधुन थोडे थोडे दूध घालावे.
सगळे मिसळुन झाल्यावरही पाचेक मिनिटे एकाच दिशेने मिश्रण घुसळून घ्यावे.

ओव्हन ३०० डिग्रीज सेंटिग्रेड वर तापत ठेवावा. एक ताजी प्लेन सोड्याची बाटली उघडुन त्यातला १०० एमेल सोडा मिश्रणात मिसळावा. हलक्या हाताने ढवळावे. ओव्हनच्या मानाने ट्रेय घेऊन त्यात मिश्रण ओतावे. हे मिश्रण बरेच पातळ असल्याने आपोआप पसरते.
ट्रे ओव्हनमधे ठेवुन लगेच तपमान २०० डि. से. वर ठेवावे आणि सात मिनिटानी ते १५० डि. से. करुन ३५ मिनिटे बेक करावे.
सुई घालुन कोरडी निघाली कि बाहेर काढुन वायर रॅक वर ठेवावा. मग रोल करावा वा सलाड मधे वगैरे वापरावा. रोल साधारण गरम असतानाच करावा लागेल. रोल करण्यासाठी केकची उंची एक सेमीपेक्षा जास्त नसावी. ती जास्त असेल तर मधे कापुन जॅम सॅंडविच करावे.



Wel123
Monday, March 24, 2008 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks mahiti dila baddal

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators