Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
स्विस रोल

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » स्विस रोल « Previous Next »

Dineshvs
Tuesday, January 03, 2006 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक वेगळा स्विस रोल.

११५ ग्रॅम कॅस्टर शुगर घेऊन त्यात २ टेबलस्पुन पाणी घाला. साखर विरघळेपर्यंत हे मंद आचेवर ठेवा, आणि मग प्रखर आचेवर एकतारी पाक करुन घ्या. याला २ ते ३ मिनिटे लागतील. मग २ अंड्यातले फ़क्त पिवळे थोडे फ़ेटुन घ्या आणि त्यात वरील पाकाची बारिक धार सोडत सतत घुसळत रहा. हे फ़िकट पिवळ्या रंगाचे व घट्टसर होईल. याला ५ ते १० मिनिटे लागतील. मग त्यात १५० ग्रॅम अनसॉल्टेड बटरचे छोटे छोटे तुकडे घालत सतत व्हिस्क करा. हे मुलायम होईपर्यंत घुसळत रहा. मग त्यात १ टेबलस्पुन, sweet sherry किंवा Marsala घाला. नाही घातली तरी चालेल. त्या ऐवजी आवडेल तो ईसेन्स घातला तरी चालेल. हे क्रीम फ़्रीजबाहेरच थंड जागी ठेवुन द्या.

१२ बाय ८ ईंचाच्या स्विस रोल टिनला किंवा सपाट ट्रेला ग्रीजप्रुन पेपरने लाईनिंग करुन घ्या. दोन अंडी आणि ५० ग्रॅम कॅस्टर शुगर, एकत्र फ़ेटुन घ्या. एलेक्ट्रिक बीटर लागेल. साध्या बीटरने केले तर गरम पाण्यात दुसरा बोल ठेवुन त्यात करा. हे मिश्रण फ़ेसासारखे होईल. त्यात ५० ग्रॅम मैदा व चिमुटभर बेकिंग पावडर एकत्र चाळुन थोडी थोडी मिसळा. त्यात अर्धा चमचा ईंस्टंट कॉफ़ी घाला व परत घुसळा.

तयार केलेल्या ट्रेमधे हे ओता. किंचीत ठोकुन सपाट करुन घ्या. २०० से, किंवा गॅस मार्क ६ वर १२ ते १५ मिनिटे बेक करा. मधे बोटाने किंचीत दाबले तर परत वर आले पाहिजे. एका किचन टॉवेलवर थोडीशी साखर पखरुन घ्या. या रुमालावर तो केक ऊपडा घाला. पेपर चिकटला असेल तर हलक्या हाताने सोडवुन घ्या. २ ते ३ मिनिटे थंड होवु द्या. कडा सरळ रेषेत कापुन घ्या. मग रुमालासकट रोल करा. ३० मिनिटे वायर रॅकवर थंड करा.

३ ते ४ मोठे चमचे कुठलाहि आवडता जॅम गाळण्यावर रगडुन घ्या. रोल ऊलगडुन त्यावर आधी जॅम लावा त्यावर तयार केलेले क्रीम लावा. मग परत रोल करा. ऊघडी बाजु खाली येईल असे डिशमधे ठेवा आणि फ़्रीजमधे ठेवा. मग आवडत्या फ़ळांचे तुकडे साखर लावुन गरम करा आणि त्याला सुटलेल्या पाकासकट फ़्रीजमधे ठेवुन थंड करा. डिशमधे रोलचा स्लाईस घ्या. सभोवती फ़ळांचे तुकडे घाला. वरुन क्रीम घाला.



हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators