Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गाजराचा केक

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » गाजराचा केक « Previous Next »

Dineshvs
Friday, December 30, 2005 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॅशन केक

यात गाजर वापरलेले आहे. याला आठ ईंच व्यासाचा केक टिन लागेल.

गरम पाण्यात दुसरे भांडे ठेवुन त्यात १५० ग्रॅम बटर वितळवुन घ्यावे. त्यात २०० ग्रॅम सॉफ़्ट ब्राऊन शुगर मिसळावी. त्यातच २२५ ग्रॅम गाजराचा बारिक किस घालावा.. मग ते भांडे खाली ऊतरुन त्यात २ अंडी, २०० ग्रॅम मैदा, ३ टिस्पुन बेकिंग पावडर, अर्धा चमचा दालचिनी पुड, अर्धा चमचा जायफ़ळ, आणि चिमुटभर मीठ मिसळावे. त्यातच ११५ ग्रॅम किसमिस, ५० ग्रॅम आक्रोडाचा चुरा आणि तीन चमचे दुध मिसळावे.
टिनला बटर पेपर लावुन घ्यावा व हे मिश्रण त्यात ओतावे.
१८० सी तपमानाला साधारण तासभर हे बेक करावे. खुपसलेली सुई स्वच्छ बाहेर यायला हवी.
५ मिनिटे टिनमधे ठेवुन तो वायर रॅकवर थंड करावा. मग त्याचे आडवे दोन तुकडे करावेत.

२२५ ग्रॅम क्रीम चीज, चार चमचे लिंबाचा रस, ४० ग्रॅम आयसींग शुगर हे सगळे एकत्र करुन त्यात थोडासा व्हेनिला ईसेन्स घालावा. मग या दोन थरात हे मिश्रण अर्धे भरावे. वरुनहि अर्धे पसरावे. वरुन आक्रोडाचा चुरा लावावा.



हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators