Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
फ्लॉवर

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » कोबी, फ्लॉवर, नवलकोल » फ्लॉवर « Previous Next »

Dineshvs
Wednesday, November 19, 2003 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्लॉवर बहार

अर्धा किलो फ़्लॉवरचे तुरे मीठ घातलेल्या पाण्यात उकडुन घ्यावेत.
थोड्या लोण्यावर मैदा किंवा कणीक परतुन घ्यावी. त्यात दुध आणि फ़्लॉवर उकडलेले पाणी घालावे. त्यात थोडे जायफळ व मिरी पाव्डर घालावी व फ़्लॉवरचे तुरे घालावे. मीठ घालावे.शिजुन घट्टसर झाले की एका प्लेटमधे काधुन घ्यावे. वरुन थोडे चीज किसुन घालावे, व १० मिनीटे बेक करावे. फ़्लॉवरबरोबर गाजरे, हिरवे वाटाणे फ़रसबी वैगेरे वापरता येईल. या भाज्या नुसत्या लोण्यावर परतुन सजावट करता येईल. ब्रोकोलिचे तुरे पण छान दिसतात.
बरोबर गार्लिक टोस्ट घ्याव्या.


Tanya
Monday, August 08, 2005 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही फ़्लोवर,सिमला मिर्चि आणि मटरचि सुकी भाजी आहे.
pan मधे तेलावर कान्दा(३ते४) चिरुन टाका.कान्दा परतल्यावर गरम मासाला,तिखट घालुन परतवुन मटार(१ cup ),चिरलेला फ़्लोवेर (१ cup ), मिठ,घालुन वाफ़ेवर भाजी शिजवा. नन्तर त्यात टोमटो(२), सिमला मिर्चि(१) बारिक फोडि करुन add करा.२ते३ minute परतुन भाजी सुकी करा. वरुन chat मसाला, कोथिम्बिर पेरा.


Sunidhee
Thursday, February 22, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक छान भाजी. जरा खटाटोप आहे.

पाउण किलो फ़्लावर, थोडा लिंबाचा रस, १ छोटा चमचा हळद, मीठ, तळायला तेल, २ मोठे चमचे आले-लसुण पेस्ट, १ छोटा च. लाल तिखट, अर्धा च. जिरेपुड, थोडे डाळीचे पीठ.

ग्रेव्हीसाठी - अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, १ छोटा च. आले-लसुण पेस्ट, १ मोठा च. वाटलेल्या बदामाची पेस्ट, पाव वाटी टोमॅटो प्युरी, १ वाटी दही, पाउण वाटी खवा (मिळत नसेल तर मी घालत नाही), १ छोटा च. धणेपुड, २ छोटे च. बडिशेपेची पुड, १ छोटा च. लाल तिखट, अर्धा लहान च. हळद, अर्धा लहान च. गरम मसाला, मीठ, पाव लहान च. केशर (पाव वाटी दुधात भिजवुन ठेवावे), अर्धी वाटी तुप.

कृती - फ़्लावर चे तुरे तोडुन घ्यावे व निट धुवून घ्यावेत. थोड्या पाण्यात हळद, मीठ, लिंबाचा रस घालुन त्यात तुरे घालुन ५ मि. उकळावे व लगेच निथळुन घ्यावे. त्याना आले-लसुण पेस्ट, तिखट, जिरेपुड, थोडे मीठ लावून डाळिच्या पिठात घोळवावे व तळुन घ्यावे.

दुसया एका पसरट भांड्यात तूप तापवून कांदा गुलाबी परतावा. त्यावर आले-लसुण पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला, धणेपुड, बडीशेपेची पुड घालुन बदामाची पेस्ट परतावी. त्यावर दही, टोमॅटो प्युरी, चवीनुसार मीठ घालुन मांद गसवर उकळावे. खवा व केशरी दूध एकत्र करुन ते घालावे. दाटसर ग्रेव्ही तयार करुन त्यात तळलेले फ़्लावर चे तुरे सोडावे. घट्ट झाकण ठेउन एक वाफ आणावी.


Dineshvs
Thursday, February 22, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनीधी एक बारिक सुचना. फ़्लॉवरचे तुरे उकडायची गरज नाही. ते कच्चेच मुरवायचे. डाळीचे पिठ कमी घेऊन अर्धवट तळायचे. जरा थंड झाले कि हाताच्या तळव्यात जरा दाबुन घेऊन परत तळायचे.
असे केले कि मसाला छान जिरतो आत. आणि तुकडेहि खमंग तळले जातात.
मग ग्रेव्हीत टाकुन उकळायचे नाहीत. आयत्यावेळी मिसळायचे ग्रेव्हीत.


Cutepraju
Tuesday, November 13, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक पद्धत फ़्लाॅवरच्या भाजीची

फ्लाॅवरचे छोटे छोटे तुरे करुन घ्यावेत. त्याचप्रमने २-३ मध्यम आकाराचे कान्दे घेवुन ते पण बारीक चिरावे. तसेच २ बटाटे काचर्या करायला चिरतो तसे पण छोटे तुकडे करावेत. आलं आणि हिरवी मिरची पण बारीक चिरुन घ्यायच.
नन्तर एका कढईमधे तेलाची मोहोरी हिन्ग घालुन फोडणी करावी. त्याच्यात प्रथम कान्दा परतावा. मग तो थोडा पारदर्शक झाला कि फ़्लाॅवरचे तुरे आणि बटाटा घालावा. मग अजिबात पाणी न घालता झाकण ठेवुन शिजवाव. फ्लाॅवर एकदम न शिजता थोडा करकरीत राहिल ईतपत भाजी शिजवावी. मग त्याच्यात चवीनुसार मीठ आणी बारीक चिरलेल आलं आणि मिरची घालुन व्यवस्थित परताव. वरुन थोडी बारीक चिरलेली कोथिम्बीर घालावी.

फ्लाॅवरचे एकदम छोटे तुकडे करावेत म्हणजे ते व्यवस्थित शिजत.

मस्त लागते अशी भाजी खायला...


Dineshvs
Tuesday, November 13, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Cutepraju मस्कतच्या पंजाबी घसिटाराम मधे मी खुपदा अशी भाजी खाल्ली आहे. मग घरी पण करु लागलो. लोखंडाच्या कढईत केली तर खुप छान लागते.
फ़्लॉवरचे मोठे तुकडेही शिजतात व्यवस्थित. जरा वेळ लागतो इतकेच.


Nayana
Wednesday, December 26, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नेहमीच फ़्लावरला वास येतो तो जाण्यासठी काय करावे? मी तो उकडुन घेते..तरिही वास जात नाही.

Dineshvs
Thursday, December 27, 2007 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्लॉवर बंद भांड्यात उकडला तर जास्तच वास येतो. वरच्या भाजीतले किंवा बाकिचे मसाले भाजीत वापरले तर वास जातो. खास करुन दालचिनी आणि मिरी वापरली तर वास जातो. शिजल्यावरहि भाजी थोडावेळ झाकण न ठेवता, राहु द्यावी.

Anjut
Thursday, December 27, 2007 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नयना फ़्लॉवर उकडून घेताना त्याच्यात लिम्बाची साल घातली तर वास जातो तसेच फ़्लॉवर पांढरा पण राहातो.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators