Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मिरवणी

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » आमटी / डाळ » मिरवणी « Previous Next »

Mrinmayee
Friday, September 22, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिरवणीत सगळेच घटक उष्ण पडणारे असल्यामुळे ही आमटी खूप थंडित किंवा पावसाळ्यात खातात.
अर्धा डोल सुकं खोबरं
८-१५ मिरे (किती तिखट चालेल यावर अवलंबून)
५ लसूण पाकळ्या
एक मध्यम आकाराचा कांदा (न घेतल्यास चालतो)
मीठ
१ आमसुल
तुप किंवा तेल १छोटा चमचा
जीरं पाव चमचा
कृती:
* खोबरं गॅसवर भाजून घ्यावं वरून किंचित काळं होईपर्यंत. घरात स्मोक डीटेक्टर असणार्‍यांनी विकतचा खोबर्‍याचा चुरा तव्यावर खरपूस परतून घ्यावा.
* कांदा घेणार असाल तर तो देखील सोलून त्याला " + " अश्या खाचा देऊन भाजून घ्यावा.
* मिरं, खोबरं (भाजून तुकडे करून), कांदा (परत एकदा, नसला तरी चालतो) लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून अगदी बारिक वाटून घ्यावं. वाटताना पाणी शक्य तितकं कमी घालून.
* तेल जीर्‍याची फोडणी करून त्यावर अगदी अर्धा मिनिट वाटण परतावं.
* यावर दोन कप उकळीचं पाणी घालून अमसूल घालून ४-५ मिनिटं उकळू द्यावं
चवदार मिरवणी तयार.
भाताशी खायला उत्तम! यात हवं असल्यास शिजलेल्या तुरीच्या किंवा मुगाच्या डाळीचा गोळा घालावा. (त्याबरोबर जरासा गुळ पण). तसंच अंड खाणार्‍यांना यात उकडलेलं अंड घालता येईल. मिरवणीला उकळी येताना त्यात अंड फोडून पण टाकतात.
** खोबरं, कांदा भाजताना फार जाळल्या जाऊ नये. नाहीतर कडवटपणा येतो.


Savani
Friday, September 22, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ कित्ती छान ग तू. लगेच रेसिपी टाकलीस.
आज करते सन्ध्याकाळी आणि सांगते कसं झालं.


Megha16
Friday, September 22, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ.
मस्त झट्पट रेसीपी दिलिस ग.
मला अशी आमटी भाता सोबत खुप आवड्ते.


Chinnu
Friday, September 22, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण, तु कित्ती छान छान रेसेपी देतेस ग!

Arch
Friday, September 22, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर तर मिरवणी सुक्या बोंबलाची असते. बाळंतिणीना जरूर देतात आमच्याकडे. तूप भात आणि मिरवणी एकदम मस्त लागत.

Savani
Tuesday, September 26, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, काल मिरवणी केली होती. झटपट आणि चवदार प्रकार.

Mrinmayee
Tuesday, September 26, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, किती गं उरक तुला! लागलीच करून बघीतलीस! मी तर रेसीपीज वाचून करायचं फक्त 'ठरवते'! :-)
आर्च, मिरवणी तर नुसता 'आमटी' प्रकार! मग त्यात बोंबील घाला, अंडी, बटाटे, दगड, धोंडे.. काय वाट्टेल ते! . राजस्थानात याच आमटीतले इन्ग्रेडियंट्स घेऊन 'दलीया' करतात! रेसीपी दिली आहे इथे:
/hitguj/messages/103383/105173.html?1155852150

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators