Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आमरस घालून शिरा ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » शिरा » आमरस घालून शिरा « Previous Next »

Prajaktad
Saturday, June 03, 2006 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

$$$$$$$$$$ आब्यांचा रस घालुन शिरा(रव्याचा)करताना आमरस नेमका कधि आणी किती घालायचा. $$$$$
plz माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या


Maitreyee
Saturday, June 03, 2006 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, मी आंब्याचा शिरा करताना २ वाट्या रवा असेल तर साधारण दीड दोन वाटी आमरस घालते.जास्त पण चालतो, चव,स्वाद हवा तसा झाला म्हणजे झाले. मी रवा भाजून झाल्यावर जेव्हा पाणी / दूध घालतो त्यावेळेस घालते आमरस.. मी टीनमधल किन्वा फ़्रेश रस direct च वापरते, हापूस चा रस दाट च असतो त्यामुळे पाणचट नाही होत. पाणी अथवा दुधाचे प्रमाण मात्र रसामुळे जरा बदलते.(जरा कमी लागते)
स्वाद आणि दिसायला पण फ़ार सुन्दर होतो हा शिरा.


Prajaktad
Sunday, June 04, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रियी धन्यवाद!
मूडी , मैत्रियी हा शिरा छानच लागतो. माझी मावशी खुप छान करते...
मैत्रियी मला अजुन एक प्रश्न आहे नेहमिच्या शिर्‍याला कस आपण उकळिचे दुध टाकतो, त्याने रवा मस्त फ़ुलुन येतो.
मग दुधाएवजी जर रस टाकला तर रवा फ़ुलुन येणार नाही.


Dineshvs
Sunday, June 04, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तयार आमरसात भरपुर साखर असते त्यामुळे तो एक वाटी रव्याला एक ते दीड वाटी घालायचा आणि तो रवा शिजल्यानंतर. ( म्हणजे साध्या शिर्‍याला आपण साखर घालतो त्यावेळी ) रसातल्या साखरेमुळे रवा नीट शिजणार नाही. ताजा रस वापरायचा असेल तर, आंब्याच्या गोडीप्रमाणे प्रमाण कमीजास्त होईल.
झक्की, लहान मुलाचे पाणी ऊकळताना त्यात सोने टाकुन ऊकळले तर स्मरणशक्ती उत्तम रहाते, असे म्हणतात. नाहीतर बाळाला गळ्यातले लॉकेट चोखायला शिकवावे.



Miseeka
Thursday, July 13, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi Amras cha Shira kartana jevha aapan sugar add karato tyaveli Amras ghalte .sugar jara kamich ghalte nahi tar jast god hoil mhnun.

Maku
Monday, February 26, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dineshvs please तुम्हाला माहीत असेल तर मला रेसेपी देता का. मी कधिच असा शिरा खाल्ला नाहीये.


Dineshvs
Monday, February 26, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वाटी रवा, तुपावर बदामी परतुन घ्यावा.
रव्याच्या जाड बारिकपणावर अवलंबुन पाऊण ते सव्वा वाटी पाणी घालावे व रवा शिजु द्यावा. शिजल्यावर मोकळा होत आला कि एक वाटी आमरस व चवीप्रमाणे साखर घालावी.
मिश्रण परत पातळ होईल, मग ते मंद आचेवर परतुन घ्यावे.
रत्नागिरीला आंब्याचा मावा मिळतो, तो घालुनहि असा शिरा करता यील. त्यावेळी अजिबातच साखर घालायची नाही. पण थोडेसे पाणी शिंपावे.
शिजल्यावरहि ज्या फळाचा स्वाद टिकुन राहतो, अश्या फळांचा म्हणजे केळी, अननस ( टिनमधला ) गर आपरता येईल. अश्यावेळी शक्यतो वेगळा स्वाद म्हणजे वेलची वैगरे फार घालु नये.
उरलेले जाम, मार्मलेड घालुनहि असा प्रकार करता येईल. ( हि आयडिया आताच सुचली. )
साखरेच्या जागी काकवी वा मध वापरता येईल.


Maku
Tuesday, February 27, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks दिनेश मी नक्की करुन बघेल हा शिरा.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators