Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
घडीच्या पोळ्या? ...

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पोळ्या » घडीच्या पोळ्या? « Previous Next »

Bee
Monday, June 26, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला घडीच्या पोळ्या शिकायच्या आहेत.

माझी पद्धत अशी आहे. जर ह्यात काही चुकत असेल तर सांगा.

मी कणकेचा गोळा आधी हातावरच गोल करुन घेतो. मग त्याला चापट करतो आणि दोन बोटानी तेल पसरवितो. नंतर पहिली घडी घालतो. परत एकदा तेल लावतो आणि तो अर्धा भाग चापट करतो. नंतर दुसरी घडी घालतो. तर आता तिचा आकार चतकोर झाला. मग कडा बंद करतो आणि पिठ लावून पोळी लाटतो. ती काही केल्या गोल होत नाही. त्रिकोणी होते. पोळी लाटून झाली की मग परत एकदा तेल लावतो आणि तेल लावलेला भाग ताव्यावर टाकतो. दुसरा वरचा भाग कोरडा होत आला की वरची बाजू खाली करतो व काठाने तेल पसरवितो. खालची दुसरी बाजू होत आली की पहिली बाजू परत एकदा ताव्यावर शेकतो. ती झाली की पोळी काढून ठेवतो. मी कापडाने पोळीच्या कडा दाबत नाही. एकून ३ वेळा मी पोळी तव्यावर भाजतो. पहिली बाजू, २ री बाजू, परत एकदा १ली बाजू. same like फ़ुलके पण सगळे काही ताव्यावर.

माझी पोळी कडक येते शिवाय कडा फ़ुटतात. पदर नीट सुटत नाहीत. तेल नक्की कधी आणि किती लावायचे हे काही कळत नाही. पोळी गोल होण्याकरिता काही उपाय सांगू शकेल का कुणी?

पोळ्यांसाठी काही खास तावा लागतो का? मी Teflon चा non stick तावा वापरतो.


Limbutimbu
Monday, June 26, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रे बिच्चारा बी! :-)
हे बघ, हाताने न करता, सरळ सरळ कणकेचा गोल गोळा घेवुन थोडा चपटा करावा! मग तो निम्म्या पोळी एवढा लातुन घ्यावा! ही नीम्म्या आकाराची पोळीला मध्यात तेल लावुन एक घडी घालावी पुन्हा तेल लावुन दुसरी घडी करुन चतकोर तयार करावा!
आता हा चतकोर उचलुन दोन्हीबाजुला पिठीत बुडवुन काढावा! काही स्त्रिया बिनपिढीच्या तेल लावुन लाटतात तर काही पिठीने माखुन काढतात! कणिक जशी घट्ट, पातळ, तेवलेली अशी भिजली असेल त्याप्रमाणे अनुभवाने पिठीचे प्रमाण कमीजास्त करावे लागते!
आता त्रिकोणी चतकोराची गोल पोळी कशा करावी? तर त्या चतकोराचे निरिक्षण कर! परिक्षण कर अन तुझ्या अस लक्षात येइल की तीन कोणाच्या बाजुपैकी एक बाजु जास्त फुगीर असते! तर पहिल्यान्दा त्या कोनीकल फुगिर बाजुवर लाटणे ठेवुन कोनाच्या दोन बाजुन्कडे लाटत तो कोन हलकेच फोडुन अथवा पसरवुन घ्यावा, या प्रमाणेच बाकी कोनही बाजुन्कडे पसरवुन घ्यावेत आणि मग हलके हलदे कडे कडेने लाटणे फिरवित रेटत लाटावे लाटणे पुढे ढकलताना फिरवत रेटावे तर मागे आणताना थोडे ओढावे म्हणजे पोळी पोळपाटावर मागे फिरली जावुन पुढील जागा लाटण्याखाली येते. सराईत स्त्रिया जेव्हा अशी पोळी लाटतात तेव्हा शब्दश पोळी पोळपाटावर गरागरा फिरत असते! त्यान्ना पोळीला हातही लावावा लागत नाही फिरवण्यासाठी, याप्रकारात पिठी जास्त वापरली जाते!
नन्तर ही पोळि अलगद उचलुन तव्यावर टाकावी, घडी करताना लावलेल्या तेला मुळे चार पदर सुटुन पोळी टम्म पुरीसारखी फुगते असा माझा अनुभव हे! :-) मधेच ही आतली वाफ लाटण्याच्या टोकाने चेपुन काढुन टाकावी
दोन्ही बाजु दोनदोनदा मन्द आचेवर भाजल्यागेल्यावर त्यास तेल अथवा तुप लावावे! कोणत्याही परस्थितीत तव्यावर तेल किन्वा तुप टाकु नये तसेच तव्यावरच्या पोळीला तेल तुप लावु नये कारण तव्याला तुपाचा स्पर्ष होताच त्या धगीला ते करपते आणि त्याचा वास मग पोळीला येत रहातो!
पोळी फार वेळ भाजत बसु नये नाहीतर त्यातला पाण्याचा अन्श पुर्णपणे निघुन जावुन ती कडक बनते!
एवढे होऊनही चतकोराची गोल पोळी न झाल्यास जो काही नकाशा होइल तो करावा आणि त्या पेक्षा लहान आकाराची धारदार कड असलेली थाळी किन्वा डोसा प्लेट घेवुन ती त्या नकाशावर चेपावी, बाजुचा वेडावाकडा नकाशा काढुन पुन्हा कणकेत मिसळावा, थाळी उचलावी, खाली पोळपाटावर अक्युरेट गोल पोळी तुला मिळेल नवशिक्या, नुकत्याच लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीन्करता गोल पोळीचा हा हमखास यशस्वी उपाय पिढ्यान्पिढ्या चालत आलेला हे!
तर आजच प्रयोग करुन बघ, देव तुझ्या पोळीच भल पोळिला गोल करो!


Lalitas
Monday, June 26, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुटिंबू, क्या बात है! इतकी साग्रसंगीत रेसिपी सांगितल्यावर पोळीची काय बिशाद आहे बिघडायची!


Chandrika
Monday, June 26, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee,
trikoni polya ka nahi chalat? Mala vaTath tu gol gol karayachya nadath polya khup jor devun laTath ahes tyamule polya vathaD hotath. Anakhi ek sopa upay mhaNaje eka mothya undyache teen chote goLe kar aNi teen purya lat mag ekavar ek thevun halakya hatane poli lat. Gol hoeel anI padar paN sutel. Tuza prayatna kharokharach vakhaNaNyajoga ahe.. All the best...

Dineshvs
Monday, June 26, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मागे लिहिली होती कृति. असो लिंबुने लिहिलीय, तेहि योग्यच अहए.
घडीला आतुन तेल लावल्यावर त्यावर पिठी भुरभुरावी लागते.
गोलच हवी असे नाही त्रिकोणी पण चांगली दिसते, व लागतेहि.
लाटताना फार दाब द्यायचा नसतो, नाहितर पदर सुटे होत नाहीत. तव्यावर टाकताना हातावर ऊभी घेऊन दुसर्‍या हातावर घ्यावी म्हणजे जास्तीचे पिठ खाली पडते व तव्यात जळत नाही.
तसेच आच मध्यम असावी. मी तव्यात असतानाच वरुन तेल लावतो. मध्यम आचेमुळे ते जळत वैगरे नाही, खाली ऊतल्यावर ती एका अर्धे पाणी भरलेल्या ग्लासावर काहि वेळ ठेवायची, म्हणजे वाफ धरत नाही.


Bee
Tuesday, June 27, 2006 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही त्रिकोणी गोल ह्याबद्दल मला काही वाटत नाही. पण ही पोळी लुसलुशीत येत नाही माझ्याकडून. लगेच वातड का होते कळत नाही. मी जरा भार देऊनच पोळी लाटतो. मला हे एक कारण अद्याप माहिती नव्हते. आता हळूवारपणे पोळी लाटण्याचा सराव करावा लागणार. एकदा सवय झाली की ती बदलने जरा अवघडच. शिवाय इतका वेळ नसतो की एकेका पोळीला पाच पाच मिनिटे देता येतील.

मागे मला तान्याने एक पर्याय सांगितला होता की ती पोळीचा गोळा लांबूळका लाटून त्याचा आकार आठाचा करते आणि नंतर ८चे ते दोन गोल एकमेकांवर दाबते. म्हणजे ही पोळी दोन पदरी होत असावी.

पोळी फ़ुगली की त्यातील वाफ़ / हवा काढून टाकायची असते का?


Post edited by moderator to remove unrelated contents

A_sayalee
Tuesday, June 27, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, पोळीची कणीक फ़ार घट्ट भिजवली जात असेल तरी पोळी मऊ नाही होत. अजून एक tip म्हणजे पोळी किन्चित जाड ठेवली तर खुसखुशीत होते!

Bee
Tuesday, June 27, 2006 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायली, नाही घट्ट नाही चांगली निबर भिजवितो मी कणिक... सैल झाली मग साध्या चपात्या देखील नीट होत नाहीत. त्यापेक्षा निबर भिजवली की पाण्याचा हात लावून consistency आणता येते मात्र घट्ट झाली की पिठ जरी घातले तरी ते इतके काही चांगले एकजीव होत नाही.

रैना, तू घडीची पोळी करत नाहीस वाटतं :-)


Post edited by moderator to remove unrelated contents


Raina
Tuesday, June 27, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,

पण ती दिनेशांची पाण्याच्या पेल्याची trick मला माहीत नव्हती- आता रात्रीच्या पोळया करताना वापरुन बघेन.


Post edited by moderator to remove unrelated contents


Dineshvs
Tuesday, June 27, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घडीची चपाती तव्यावर असताना, एकिकडुन फुगायला लागते तेंव्हा तिथे जरा दाब देऊन ती वाफ आतल्या आत पसरवायची असते. म्हणजे सगळीकडुन पदर सुटतो. एकाच ठिकाणी फुगली तर तेवढाच भाग तव्याला टेकतो व बाकिची चपाती वर ऊचलली जाते, त्यामुळी ती भाजली जात नाही.

Post edited by moderator to remove unrelated contents

Shonoo
Wednesday, June 28, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कॉलेजच्या दुसया-तिसया वर्षात असताना, आमच्या कडे बाहेरगावचे काही नातेवाईक वैद्यकीय उपचारांकरता येवून राहिले होते. त्यांना जसलोक, टाटा मेमोरिअल, भाटिया हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी नेण्या आणण्या मधे आईची फार धान्दल होत असे. तेंव्हा एके दिवशी वडिलांनी मला पोळ्या शिकवायचे ठरवले. तोपर्यंत क्वचित पुर्‍या करताना गोळे करून देणे किंवा पुरणाचे गोळे करणे येवढाच काय तो लाटण प्रकाराशी सम्बन्ध होता. कणीक मळताना तेल घालावे लागते हे न त्यांना माहीत न मला.

स्वैपाकघराच्या दारातून एका हातात सिगरेट आणि एका हाताने हनुवटी खाजवत, आठवण करून मला दोन वाट्या कणीक, एक मोठा चमचा मीठ, तेवढीच साखर ( आईच्या पुणेरी मैत्रिणीची आठवण काढून कारण वर्‍हाडात असताना आई साखर घालत नसे )घालायला सान्गितली.

मग एका भांड्यात पाणी घेऊन ते चमच्याने थोडे थोडे कणकेत घाल म्हणाले. असे ३-४ चमचे पाणी पुरेल म्हणून मला आता कणीन मळायला लावली. मला काही ते जमेना. मग वैतागले आणि सिगरेट खाली ठेवून अगदी जोर काढून घट्ट कणिक मळून दिली आणि म्हणाले आत मोठे मोठेच गोळे करुया म्हणजे पोळ्या लवकर होतील.

परत सिगरेट हातात आणि वडील स्वैपाकघराच्या दारात. मग घडीची पोळी कशी करावी लाटावी याचं मार्गदर्शन. पोळी थोडीशी लाटे पर्यन्त चांगली गोल होती. पण तेल लावून घड्या घातल्यावर ती पोळी काही माझं ऐकेना. as if it had a mind oif its own पोळी पसरेच ना.

मग ती साधारण अर्धा से मी जाड पोळी तव्यावर टाकली अन मग गॅस चालू केला. ती भाजे पर्यंत दुसरी लाटायची असते हे कोणाला माहीत? आणि नुसते माहीत असून काय फायदा. लाटणे आणि भाजणे हे मल्टिटास्किन्ग मलाच काय माझ्या वडिलांना सुद्धा जमले नसते.

असे एक एक आधी लाटून मग भाजून, मधे मधे गॅस बंद करून ६ पोळ्या केल्या. त्या फुगल्या तर नाहीतच, पण दाबून दाबून भाज ह्या सल्ल्यापायी छान कडक झाल्या. बहीण म्हणाली मी शेजारच्या मैत्रिणीकडे जेवले. भावाने ब्रेड खाल्ला. मी आणि वडिलांनी कशीबशी एक एक पोळी खाल्ली. आइअ आणि पाहुणे परत यायच्या अगोदर शेजारच्या रेस्टॉरंट मधून नान मागवून ठेवले.

तेंव्हा पासून मी ओव्हर ऑल स्वैपाकाचा आणि त्यातल्या त्यात पोळ्यांचा धसका घेतला तो आजतागायत. मुलं खातात म्हणून चाळिशीच्या उम्बरठ्यावर फुलके करायला शिकले. पण पोळ्यांच्या वाटेला जायचा अजूनही धीर नाही होत.


Bee
Thursday, June 29, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, तुझे वरील पोष्ट्स वाचून मला खूप बरे वाटले.. ते का हे सांगायची गरज नाही. दे टाळी :-)

काल ऐन वेळेवर माझा गॅस संपला. ऐवढ्या उशिरा गॅस कसा मिळणार म्हणून मी विचारात पडलो. कणिक मळवून ठेवली होती, भाजी चिरून ठेवली होती. फ़ोडणी घातली आणि गॅस गेला. भाजी मग microwave वर केली. पोळ्यांचा प्रश्न. घरात फ़्रोजून ठेवलेले काहीच नव्हते. मग मी कणेकेचा गोळे केले. त्याला घडीच्या पोळ्या करतात तशी दुमड पाडली आणि ते छोटे छोटे गोळे तेल लावून पाच मिनिटे microwave मधे ठेवले. इतके छान कचोरीसारखे फ़ुगून आलेत. मग माझे जेवन लवकर, विनाकष्टाचे आणि वेगळ्या चवीचे झाले. घडीच्या पोळ्यांवर हा एक उपाय चांगला आहे शोनू अमलात आण...


Moodi
Monday, July 10, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी एक सांगते, रागवणार नाहीस अशी अपेक्षा आहे. तू लिहीलेल्या मायक्रोव्हेव मध्ये होणार्‍या पोळ्यांची कृती वाचुन नमुना म्हणून मी एक करुन बघितली, ती थोडी फुलली पण कच्चीच राहिली, तू इथे लिहीलेस त्याच पद्धतीने मी साधारण टेंपरेचरवर ठेऊनच अंदाज घेऊन ३० सेकंद ठेवली, पण फुलली तरी कच्चीच राहिली, अशा कच्च्या पोळ्या पोटाला अजीबात चांगल्या नाहीत रे. अगदीच वेळ आली तर लाटुन घडी न करता तेल लावुन फक्त पुरी ठेव, पोळी करु नकोस. पाहिजे तर बट्ट्या करुन त्या ओव्हनमध्ये भाज. नाहीतर नुसता भात अन बाकी कालवण / आमटी / भाजी जिंदाबाद.

Bee
Tuesday, July 11, 2006 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडीताई, कसला राग तुझ्यावर जेंव्हा तू माझ्याबद्दल काळजीच व्यक्त करते आहे तेंव्हा :-)

हे असे गॅस संपने आणि वेळेवर cylinder न मिळणे क्वचित प्रसंगी घडते. माझे गोळे चांगले झाले होते. माझी कणिक थोडी पातळ असते म्हणून असावे. मी चार गोळे जास्त वेळ ठेवले तर ते दगडासारखे टणक झाले होते. मग कमी वेळेवर ठेवणे भाग पडले.


Rutu_hirwaa
Thursday, May 15, 2008 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे नुकतेच लग्न झालेय आणि मी आत्ता पोळ्या बनवण्याची सवय करते आहे
मी रोज सकाळी ७ वाजता पोळ्या करते दुपारी १ ला लन्च ब्रेक असतो.
माझ्या पोळ्यान्च्या कडा कच्च्या राहतात
+ त्या कडक होतात

मला वाटतं की माझे पीठ लावणे जास्त होते की काय कोण जाणे..
शिवाय पोळ्या भिजवण्याची योग्य पध्द्तही हवी आहे..
कुणी मदत करेल का माझ्या च पोळ्या ओफ़ीसमध्ये खाववत नाहीत्त मला :-(


Bee
Thursday, May 15, 2008 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा अभिनंदन ऋतु हिरवा. पण आम्ही तुझ्या कविता मिस करतो आहे तेंव्हा लक्ष असू देत इथेही...

माझ्याकडून काहि टिपा --

१) आच तव्याला चहूबाजूने संपूर्ण पोळीपर्यंत पोचते आहे ना हे खात्री करून घे.

२) पोळी मधे न लाटता कडेनी लाट. जर कडा जास्त जाड असतील तर मधला भाग पटकन शेकला जातो आणि कडा त्या तुलनेने कच्च्या राहतात.

३) पिठ कोमट पाण्यानी भिजवले आणि छान तेल लावून तिंबून काढले तर कनीक छान होते.

४) पोळ्या करून झाल्यात की त्यांना तेलाच एक हलकासा हात लावला की पोळ्या छान नरम राहतात.

५) पोळ्या हवेशीर ठेवू नकोस. लगेच दुरडीत कपड्यात झाकून ठेव.


Shraddhak
Thursday, May 15, 2008 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋतु हिरवा

तुझ्या प्रश्नांची उत्तरं.

१. पोळ्या नंतर कडक होतात याचं सगळ्यांत महत्त्वाचं कारण म्हणजे तव्याचं तापमान कमीजास्त होणे. तू वारंवार गॅस मोठा कमी असं करतेयस का? पहिल्यांदा पोळ्या करताना असं होतं. आपल्या आई आज्जीच्या काळात एक पोळी तव्यावरून उतरेपर्यंत दुसरी लाटून तयार असायची त्यामुळे तव्याचं तापमान तेच राखलं जायचं. तो सगळा सरावाचा भाग झाला.
शक्यतो तव्याचं तापमान तसंच राखलं जातंय ना हे बघ.
मी केलेला उपाय: एक पोळी शेकून झाली आणि दुसरी लाटून तयार नसेल तर गॅस मंद करून ठेवायचा आणि पोळी टाकण्यापूर्वी एक मिनिट पुन्हा आधी होता त्या सेटिंगला करायचा. हळूहळू तुला अंदाज येत जईल.

सध्या लाटण्याचा सराव नसला तर पीठ भरपूर लावलं तरी चालेल. ( नंतर जास्तीचं पीठ झटकून घ्यायचं.) लाटण्यावर जास्त दाब द्यायचा नाही. अलगद फ़िरवायचं आणि कडेने. पोळी गोल झाली पाहिजे आपोआप. वाटलं तर आधी उंडा छोटा घेऊन लाटून बघ. आठाचा आकडा करून तेल लावून दुपदरी पोळी करणे सगळ्यांत सोपे.

कणीक भिजवायला:
सगळ्यांत बेस्ट म्हणजे आदल्या दिवशीच्या दुधाचं पातेलं वापर ( अर्थात दूध संपलं असेल तरच!). कणीक दुधाच्या पातेल्यातला सगळा ओशटपणा शोषून घेते आणि पोळ्या मऊ होतात. ( भांडंही स्वच्छ होतं हा दुहेरी फायदा.)
त्यात चवीप्रमाणे, मीठ टाकून थोडे थोडे पाणी घालून भिजव. फार घट्ट भिजली तरी कडक होते पोळी नंतर, त्यामुळे तो अंदाज बघ.
शेवटी हातावर थोडे तेल घेउन कणीक मळून घे. आणि ही मळलेली कणीक किमान १५ मिनिटं तरी बाजूला ठेवून दे झाकून.
पोळ्या करायला सुरुवात करताना आधी गोळे करून ठेव लागतील त्या आकाराचे.

आणि हो, अजून काही लागलं तर विचार.
:-)Bee
Thursday, May 15, 2008 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋतु हिरवा, इथे तुला आणखि जास्त माहिती मिळेल. हा बीबी बघ

/hitguj/messages/103383/4519.html?1209168240

Rutu_hirwaa
Friday, May 16, 2008 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र
धन्स!!
अग तू म्हणतेस ना तसंच अगदी करते मी म्हणजे ते तव्याच्या तापमानाचं
पण छोटा उन्डा घेऊन लाटून बघते गुड आयडिया :-)

अग कणिक सा.बाई च भिजवतात..सोSS ... मला वाटतं पोळ्या सुरु करण्यापूर्वी पुनश्च ती कणिक जरा तेलाचा हात लावून मळून घेईन आता..त्याने काही फ़रक पडतो का बघुयात..

आधी आता हे सगळे करून पहाते मग विचारेनच अडले तर..

बी
तुला ही धन्स
टीपा विचार करणीय आहेत हो :-)

हो अरे नविन कविता टाकेन एक थोड्या दिवसान्मध्ये


Nyati
Tuesday, November 04, 2008 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

polya karayala ithe kontya brand che pith changle ahe? golden temple ? laxmi ki ajun konte?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators