Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 17, 2008

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through March 17, 2008 « Previous Next »

Naatyaa
Tuesday, February 19, 2008 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

he bagha.. team wins a match in mere 4 balls

http://content-usa.cricinfo.com/women/content/story/337746.html

Zakki
Tuesday, February 19, 2008 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ द्या हो. म्हणून तर गुजरातीत म्हणतात, 'जेनू काम तेनू धाय'!

Satishmadhekar
Tuesday, March 04, 2008 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी जिंकलो ! ! ! :-)

सचिनने शेवटच्या ३ सामन्यात अनुक्रमे ६३ (पाठलाग करताना), नाबाद ११७ (पाठलाग करताना) आणि ९१ धावा केल्या.

संजय मांजरेकर व धोनीला इतक्या लवकर स्वतःचे शब्द गिळायची वेळ येईल असे वाटले नसावे.

सचिनचा दुस्वास करणारे कायमच तोंडावर आपटले आहेत. पॉन्टिंगचे नाक कापले गेले आणि ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण झाले हे चांगले झाले. :-(

पुढच्या विश्वचषकापर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ खूपच दुबळा झाला असेल. मॅग्रा, शेन वॉर्न आणि लॅंगर पाठोपाठ आता गिलख्रिस्ट, ब्रॅड हॉग आणि गिलेस्पी सुद्धा निवृत्त झाले. हेडन वर्षभरातच निवृत्त होईल. ऑस्ट्रेलियाचे नवीन खेळाडू फारसे चांगले नाहीत.


Shravan
Tuesday, March 04, 2008 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, मुख्य म्हणजे पॉंटिग आधी म्हणाला होता तिन सामने खेळावेच लागणार नाहीत. दात घशात गेलेत.
सायमंड यावेळी पण हरभजनची शिकार ठरला.


Vinaydesai
Tuesday, March 04, 2008 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॉन्टिंग खरंच बोलला की.. तीन सामने कुठे खेळावे लागले त्याचे दात घशात घालायला? :-)

खरं तर भारतीय प्रेक्षक्कांनी एकजुट करून सायमंड्स आणि मंडळींना IPL मधून बाहेर काढले पाहीजे. सायमंड्स, क्लार्क, पॉंटिन्ग, हेडन ज्या टीम साठी खेळतील त्या सामन्याना न जाणे किंवा त्यांच्या अखिलाडूपणाचा निधेध करणे सहज शक्य आहे. शेवटी आर्थिक फटका सगळांनाच सुधरवू शकतो नाही का?

अगदी पूर्णपणे वचपा काढल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन...


Raviupadhye
Tuesday, March 04, 2008 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय संघाचा आजचा आणि या आधीचा नि:सन्दिग्ध विजय एकच गोष्ट सिद्ध करतो-जगात एकच बाब स्थिर आहे ती म्हणजे बदल.
सचिनचे आणि धोनी व अख्ख्या चमूचे तरुणाई चे अभिनन्दन


Kedarjoshi
Tuesday, March 04, 2008 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्लार्क ने ती एक धाव वाचवताना सचिन ला अक्षरक्ष्: ढकलले. वर सॉरी ही नाही म्हणाला. रुड नं ३.
प्रवीन कुमार लै भारी.



Nakul
Tuesday, March 04, 2008 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हारले तरी हे असे कसे रडे? w.r.t Ponting
http://content-usa.cricinfo.com/ci/content/image/341026.html

Farend
Tuesday, March 04, 2008 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर सॉरी ही नाही म्हणाला

हो फालतू रूडगिरी! किंवा त्यांच्या भाषेत ' gamesmanship '! त्यावेळेस कॉमेंटेटर्स म्हणाले की तोच एक (सचिन ला पकडून ठेवण्याचा) मार्ग होता क्लार्ककडे त्याला धाव न काढू देण्यासाठी :-)

बाकी भज्जीने काय जिगरबाज बोलिंग केली, सगळे (ऑसी) प्रेक्षक त्याची टर उडवत होते, पण हेडन ला रन आऊट आणि सायमण्ड्स ला पुन्हा घेतला.

सचिन त्याची बॅटिंग चालू असताना पन्नास नंतर स्लो वाटला पण बहुधा पिच सुद्धा स्लो झाले नंतर.

पण एकूण एक जबरदस्त थ्रिलर मॅच आणि जबरी विजय! कांगारूंना फायनल मधे भारताने हरवण्याला आता १० वर्षे होते आली! त्या वेळी सचिन १३४ आणि यावेळेस ही ९१!
भारताने ही बहुधा (२०-२० सोडून) साडेपाच वर्षांनी फायनल जिंकली ना? ( Natwest 2002 ), आणि ऑस्ट्रेलियाला सलग दोनदा ही '९८ नंतर पहिल्यांन्दा हरवले. '९८ मधे कोची आणि कानपूर ला हरवले होते, दोन्ही मॅच मधे सचिनच मॅन ऑफ द मॅच होता, एकदा ५ विकेट्स आणि एकदा १००


Mukund
Wednesday, March 05, 2008 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल.. शारजाहच्या त्या मॅचेस पाहिल्या होत्यास का? तेंडुलकरने कॅस्परवीच व टॉम मुडीला पुढे येउन मारलेले षटकार ते दोघे कधीच विसरणार नाहीत..:-)

तेंडुलकर फ़ायनल्सच्या दोन्ही मॅचमधे मस्तच खेळला. खासकरुन पहिल्या मॅचमधे स्लिप व यष्टीरक्षकाच्या डोक्यावरुन मारलेले चौकार सहीच..

ऑस्ट्रेलियाच्या टिमबद्दल आत्ताच त्यांची ओबिच्युअरी लिहिणे बरोबर नाही पण वॉर्न,मक्ग्राथ,लॅंगर व डेमिअन मार्टीन सारखे खेळाडु एकाच वेळेला निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या संघाच्या रजईला लागलेली ठिगळ आताशा दिसु लागली आहेत. गेली वर्षभर त्यांनी दिखावा तर.... अजुन त्यांना काही फरक पडला नाही..... असाच आणला होता पण भारतिय टिमने या ऑस्ट्रेलिअन उन्हाळ्यात कसोटी व एकदिवसिय सामन्यात त्यांना बरेच धक्के देउन त्यांची ठिगळ लागलेली टिम उसवण्यात बराच मोठा हातभार लावला आहे. आता गिलख्रिस्ट निवृत्त झाला आहे. त्यानंतर त्यांची इतके दिवस मऊ व उबदार असलेली रजई पुर्णपणे उसवते का हे येत्या एका वर्षात दिसुन येइलच....

१९ वर्षाखालील आपल्या मुलांनी मिळवलेला यंदाचा विश्वकरंडक व धोनी आणी त्याच्या तरुण खेळाडुंनी मिळवलेला हा विजय... या दोन्ही गोष्टी आपल्या २०११ च्या विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने खुपच आशादायक आहेत. हुरळुन न जाता.. व्यवस्थीत जर प्लानींग केल तर या टिमकडुन मोठ्या अपेक्षा ठेवता येतील. फक्त ते
IPL च्या पैशाचे भुत या खेळाडुंच्या मानगुटीवर बसुन यांची कामगीरी ढेपाळायला नको एवढीच माफ़क अपेक्षा.... या नविन लिगला प्रोफ़ेशनल असे नाव दिले आहे पण आपले खेळाडु त्यातुन तावुन सुलाखुन प्रोफ़ेशनल्स सारखे खेळतील अशी अपेक्षा ठेउयात... कारण प्रोफ़ेशनल लिग ही दुधारी तलवार आहे... त्यांना मिळालेल्या पैशाला अनुसरुन त्यांनी खेळ करावा अशीच या लिगच्या मालकांकडुन अपेक्षा असते. आतापर्यंत भारतिय खेळाडु हौशी म्हणुन गणले जात होते(जरी त्यांना कोट्यावधी रुपये जाहीरातदार व सेंट्रल कॉंट्रक्ट मुळे मिळत असले तरी) पण आता ते खरे प्रोफ़ेशनल म्हणुन गणले जातील. जेव्हा हौशी म्हणुन खेळत होते तेव्हा हरले तर ते हौशी म्हणुन त्यांना माफ़ करणे सोपे होते पण आता प्रोफ़ेशनल व एवढे पैसे घेउन खेळतात म्हटल्यावर हरल्यानंतर लोकांना त्यांना माफ़ करणे कठीण जाइल.

या नवीन लिगमधे खेळाडुंना जरी अमाप पैसा मिळणार असला तरी खरा फायदा ललित मोदी व
BCCI म्हणजे शरद पवार आदींचा आहे हे चाणाक्षांच्या लक्षात आलेच असेल. फक्त ७ आठवड्यांच्या या लिगमधे केवळ २ तासांच्या १० ते १२ सामन्यासाठी एवढे पैसे दिले जात आहेत हे बघुन भारतातल्या क्रिकेट व्यतिरीक्त बाकीच्या खेळातल्या खेळाडुंबद्दल खुप वाइट वाटले...

Raviupadhye
Wednesday, March 05, 2008 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tonDaalaa kaaLe

Mahaguru
Wednesday, March 05, 2008 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेंडुलकर ने मारलेला रिव्हर्स स्वीप आवडला. बाकी ऑस्ट्रोलियन टिमचे क्षेत्ररक्षण जबरी होते.

आमच्या ऑफिस मधल्या हैद्राबादी ने खुश होउन सगळ्यांना (जवळपास १६ जणांना) कॉफि पाजली. शेवटी म्हणालाच, लक्ष्मण को लेना चाहिये था, सब वेंगसरकर और शरद पवार का पॉलिटिक्स है.


Zakki
Wednesday, March 05, 2008 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कॉफी पाजल्यावर एव्हढेहि म्हणू नये बिचार्‍याने?!

बरे तर बरे, तुम्ही कुणि कुठे सचिन, नि कुठे लक्ष्मण, असे म्हणाला नाहीत. नाहीतर पुन: एकदा श्री छत्रपति शिवाजी महाराजांना अवतार घेऊन, बिहार यू पी, कर्नाटक, तेलंगण नि अंतस्थ शत्रू इतक्या सगळ्यांशी युद्ध करावे लागले असते!


Tonaga
Wednesday, March 05, 2008 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कॉफी पाजल्यावर एव्हढेहि म्हणू नये बिचार्‍याने?!
>>>>>>
झक्कीसाहेब ह्या तुमच्या वाक्यावर एकटाच किती वेळ हसतच होतो... छान वाक्य.

Panna
Wednesday, March 05, 2008 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिलख़्रिस्ट असा अचानक कसा निवृत्त झाला?? केवळ एक कॅच सुटला म्हणुन निवृत्ती? कोणाला नक्की कारण माहितीये?

Zakki
Wednesday, March 05, 2008 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला काही फरक पडतो का? की त्यामागे काही सनसनाटी कारण सापडले, एखादे लफडे वगैरे, तर पेपरात बातमी देऊन खप वाढवता येईल म्हणून?


Kedarjoshi
Wednesday, March 05, 2008 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पन्ना,
त्याने अचानक ऐडलेड मध्ये ही घोषना केली. त्यापाठी मागे त्याचे सिडनीत सुटलेले एक दोन कचेस आहेस पण त्याला स्वताला वाटले की तो आता यष्टी पाठीमागे तेवढा चपळ राहीला नाहीये. त्याचा अनाउन्समेंट मध्ये त्याने हे सांगीतले.




Arc
Thursday, March 06, 2008 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निवड समितीने हाकलुन द्यायच्या आधी स्वत्:च मानाने बाहेर पडलेले बरे असाही विचार केला असेल त्याने.

Jaymaharashtra
Monday, March 17, 2008 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजचा दिवस भारतीय क्रिकेट्च्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस.
२५ वर्षापुर्वी याच १७ मार्च १९८३ ला आपल्या भारतीय संघाने विश्वचषक जिंकुन इतिहास घडवला होता.
पण काय दुर्भाग्य त्या इतिहास घडवणार्‍या संघाचे! की कुणाच्याच ते स्मरणात राहीले नाही खास करुन स्वतःला भारतीय क्रिकेटचे तारणहार आणि सर्वेसर्वा व तत्सम समजणार्‍या BCCI ला तर या दिवसाला काही मह्त्व आहे असे वाटलेच नाही.
तसे देखिल चांगल्या खेळाडुंना अपमानस्पद वागणुक फ़क्त भारतातच मिळते.इतर देशात त्या खेळाडुंच्या नावे स्मारके पुतळे उभारले जातात.


Zakki
Monday, March 17, 2008 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहो, या वर्षी ऑक्टोबर नंतर कुठला संघ भारतात येणार आहे का? त्यांचा एखादा कसोटी किंवा एकदिवसीय सामना बंगलोरला होईल का?

माझा भाऊ बंगलोरलाच रहातो, नि राहुल द्रवीड व त्याची बायको यांना तो व ते त्याला चांगले ओळखतात, तेंव्हा पैसे देऊन तरी चांगली खेळाडूंच्या बसण्याच्या जागी बसून सामना बघायची नि इतर खेळाडू, विशेषत: तेंडूलकर (असल्यास) ला भेटता येईल, त्यांची सही, त्यांच्याबरोबर फोटो घेऊन धन्य होईन मी!

धन्यवाद.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators