Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पाकिस्तानी कलाकारांचे भारतात होणारे ल...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » पाकिस्तानी कलाकारांचे भारतात होणारे लाड « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 01, 200720 11-01-07  11:47 pm
Archive through November 03, 200720 11-03-07  9:06 am

Ajjuka
Saturday, November 03, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या,
मुळात मी तुम्हाला उद्देशून वा तुमचं नाव घेऊन कुणाला काय कळतं याचे हिशोब मांडलेले नाहीत. तेव्हा ते तुम्हीही करू नये ही विनंती. मला किती कळतं किंवा नाही हा इथे मुद्दा नाही. तुमचं पोस्ट वाचून तुम्हाला माझं म्हणणंही कळलंय असं वाटत नाहीये. spectrum या शब्दाचा मला अभिप्रेत असलेला वा सामान्यतः ग्राह्य धरला जाणारा अर्थ व संदर्भ आपण लावता आहात तसा तरी मुळीच नाहीये.
निदान मी काय म्हणते आहे ह्याचा नीट अर्थ तरी समजून घ्यावा.
तोपर्यंत आपल्या पोस्टला उत्तर द्यायची गरज मला तरी वाटत नाही.
कारण वरती कुणीतरी pseudo patriots असा जो अतिशय चपखल शब्दप्रयोग केला तो थोडासा बदलून pseudo धर्मप्रेमी असा केला तर त्या मथळ्याखाली जे येईल तेवढेच तुमच्या बोलण्यातून जाणवतेय.


Chyayla
Saturday, November 03, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तुमच म्हणण की कलेला धर्म, जात, देश नसावा हे पटल. माझी ईच्छा की तुमच्या सारखी विचारसरणी सगळ्यांचीच असावी. पण हुसेन सारख्या विकृत कलाकराकडुनही आपण अशीच अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे? मला हे अजिबात नाही कळाले की त्याच्या चित्रकलेबद्दल काहिही माहिती नसताना उगीच उगीच उदो उदो करायची काय गरज आहे... तुम्हीही विचार करावा. हुसेनच्या बाबतित चिन्या व सतिष यांची मते पटण्यासारखी आहेत.

http://www.sanatan.org/hussaincampaign/#about
तुम्हाला हुसेनबद्दल माहिती नसावी तेव्हा माझी विनंती आहे की हुसेनच्या चित्रकलेबद्दल ह्या साईटवरची माहिती वाचा व ज्याना पटले त्यांनी निषेध नोंदवण्यासाठी पिटिशन वर सह्या कराव्या.

धर्मप्रेमी असणे, स्वता:च्या धर्माचा अभिमान असणे यात काय चुकिचे आहे? धर्मप्रेमी म्हणुन कोणी हिंदु कलाकर काही अल्लाची किंवा इतर धर्मियांची बदनामी तर करत नाही. पण म्हणुन काय आपल्या धर्माचा अनादर, द्वेश, अपमानही कलेच्या नावाखाली सहन करुन घेणे हे कितपत योग्य आहे.? वर चिन्याने त्यांच्या धर्माला नावे ठेवली नाही तर केवळ त्याच्याकडुनही रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे, हेही लक्षात घ्यावे.. वर Pseudo , Patriot असे शब्द आल्या बरोबर आनंदानी कोल्हेकुई सुरु झालेली दिसतेय.. आपण कदाचित त्यांच्या रांगेत अनवधानाने जात तर नाही ना.


Nandini2911
Saturday, November 03, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक समजत नाहीये, पाकिस्तानी कलाकाराच्या लाडात हुसेन कसा काय घुसला? तो तर पंढरपूरच आहे ना?
हुसेनने भावन दुखावतील अशी चित्रे काढली आहेत त्यात वादच नाही. पण त्याने दुसरीपण चांगली चित्रे काढली आहेत ना.... वरती मीनक्षीचा उल्लेख आला आहे. गजगामिनीमधे पण त्याने अफ़लातून visuals वापरली होती. त्यामधली symbology तर त्याहून ग्रेट होती.

हुसेनची हल्लीची काही चित्रे पाहता हाच काय तो कलाकार हा प्रश्न पडतो.
ते जाऊ दे
शेरलॉकला जे अभिप्रेत होते ते झालेलेच आहे. शब्दाचे गुंते वाढवायचे आणि दर वेळेला विषय एकाच गोष्टीकडे आणून ठेवायचा.
पाकिस्तान मुसलमान हिंदु धर्म हे v&C वरती परवलीचे शब्द झाले आहेत. कुणीही उठतो कसलाही बीबी चालू करतो चर्चा फ़क्त इथेच येऊन थांबते. नेहमीचे यशस्वी कलाकार नेहमीच यशस्वी संवाद बोलतात आणि मग नेहमीच गुर्हाळ चालू राह्ते.

दुसरे काही विषय नाहीच आहेत का चर्चा करायला?



Ajjuka
Saturday, November 03, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,
|मला हे अजिबात नाही कळाले की त्याच्या चित्रकलेबद्दल काहिही माहिती नसताना उगीच उगीच उदो उदो करायची काय गरज आहे... |
मला त्याच्या चित्रकलेबद्दल काहीहे माहिती नसताना मी उगीच उदो उदो करतेय हे विधान कुठल्या बळावर? FYI मी त्या माणसाने केलेल्या अश्या अनेक कलाकृती पाह्यल्या आहेत जे बघून वेड लागतं. ज्यात कुठल्याही देवदेवता, वास्तू इत्यादींचा काहीही संबंध नाहीये. केवळ एक अनुभव, एका असोशीने व्यक्त होणं आहे त्यात. ते मी कसं काय नाकारू? का नाकारू?
मी स्वतः Theatre Designer (costume) आहे आणि तेच शिकवतेही. designer म्हणून शिकत असताना जगभरातली चित्रकला वा इतर दृश्य कला, त्यातले प्रवाह, त्याचे सामाजिक, राजकीय संदर्भ, वेगवेगळ्या काळातील व संस्कृतीतील visual sensibilities या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला मिळालाय मला. प्रत्येक दृश्य (a frame or a moment on stage) हे एक painting असलं पाहिजे हे शिकवलं गेलंय मला आणि त्या दृष्टीने बघताना हुसेनने केलेल्या 'मिनाक्षी' या चित्रपटाची दृश्ये मला exampler आणि म्हणून खूप काही शिकण्यासारखी वाटतात. हे मी का नाकारू?
मी कुठेही त्याने केलेल्या वादग्रस्त चित्रांचं उदात्तीकरण करत नाहीये वा त्या माणसाचं. कुठल्याच माणसाला मखरात बसवणं मला पटत नाही. आणि माणूस म्हणून त्याने कुठल्याच चुका केल्या नसतील असं काही माअझं म्हणणं नाहीये. माझा मतलब त्या माणसाच्या कलेशी आहे त्याच्याशी नाही. त्याची कला त्या वादग्रस्त चित्रांच्या पलिकडे जाऊन बरीच मोठी आहे हे मी अनुभवलंय ते कोणीही खोटं कसं काय म्हणू शकतं?
मुद्दा एवढाच आहे की त्या माणसावर सरळसोट टिका करण्यापूर्वी आपण संपूर्ण गोष्ट काय आहे बघायला नको का?


Santu
Saturday, November 03, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह हरामखोर हुसेन पंढरपुरात जन्मला
हे एक दुर्दैवच
याला खरेतर जाहिर फ़ाशी द्यायला पाहिजे


Chyayla
Saturday, November 03, 2007 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणुन काय आपल्या धर्माचा अनादर, द्वेश, अपमानही कलेच्या नावाखाली सहन करुन घेणे हे कितपत योग्य आहे
अज्जुका, ठीक आहे तुमच म्हणण एकवेळ विचारात घेउ या, मी तुमच्या या मताचा आदर करतो पण तरी तुम्हाला वरचे विधान पटते काय?

मी इथे चिन्याच आंधळे समर्थन करत नाहीये तर त्याच्या योग्य मुद्याला समर्थन करतोय, चिन्याने हिटलरही एक चांगला कलाकार होता असे मार्मिक उदाहरण दिले. तेही पटण्यासारखे आहे. मला वाटत माझा मुद्दा लक्षात आला असावा.

एक मोठा कलाकार हिंदु असो वा मुसल्मान त्याच्या कलाकृतीचा सामाजिक परिणाम होतोच तेव्हा त्यानेही या जबाबदारीचे भान ठेवणे अपेक्षित असते. करोडो लोकांच्या जाणुन बुजुन भावना दुखावल्यावर तुम्ही लोकांकडुन त्याच्या चांगल्या कामाला पावती द्यावी ही अपेक्षा कशी करु शकता. आज व भविश्यातही MF Husain म्हटला की तो गजगामिनी साठी कधीच लक्षात राहणार नाही लक्षात राहील तो त्याच्या विकृतीसाठी.

नंदिनी, ईथे हुसेन मुस्लिम आहे म्हणुन त्याचा निशेध होत नाहीये तर कलेच्या नावाखाली करोडो लोकांचा भावनेचा अनादर केला म्हणुन निशेध होतोय. तुमच्याकडुनही त्या निशेधाची रास्त अपेक्षा होती बस, म्हणजे पुढे वाद नसता वाढला.

कोणी जर चांगली बाजु दाखवतो म्हटल तरी दुसरा कोणी त्याची प्रकर्शानी जाणावणारी जी टाळता येउच शकत नाही ती बाजु दाखवणारच, तुम्ही ही अपेक्षा का करता की करोडो लोकांच्या भावना दुखावल्यावरही ते त्याचे निर्लज्ज समर्थन करतील.


Chinya1985
Saturday, November 03, 2007 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जूका,माझा उल्लेख केला नाही,माझ चित्रकलेतल ज्ञान काढल नाही अस तुझ म्हणन आहे पण आता तुझ्या मागच्या पोस्टमधील ही वाक्य वाच्-
पण 'तो माणूस चुकीचा, कला बिला सब झूठ' असं मानणार्‍यांनी त्याची वादग्रस्त चित्रे सोडून काहीतरी पाह्यलंय का? एकुणातच चित्रकला याचा 'हुबेहूब कढणे' यापलिकडे काही अर्थ लावलाय का?

आता हे मलाच उद्देशुन लिहिल नाही का??कारण मीच ''तो माणूस चुकीचा, कला बिला सब झूठ' ' अस लिहिल आहे. आणि वरिल वाक्यांवरुन मला चित्रकला म्हणजे हुबेहुब काढणे एव्हढच कळते हे स्पष्ट होत नाही का??फ़क्त तु ते स्पष्ट लिहिल नाही आणि मी स्पष्ट लिहिलय. तुला चित्रकलेतल सगळ कळत अस मनात धरुनच मी मागील पोस्ट लिहिल होत. pseudo धर्मप्रेमी म्हटल की सगळ संपत का??मी मांडलेल्या मुद्द्यांना तुमच्याकडे उत्तर आहे का??तो महान चित्रकार असुनही त्याच्याबद्दल आदर का नाही हे मी हिटलर आणि डॉक्टरच्या उदाहरणावरुन सांगितलय त्याबद्दल तुमच्याकडे उत्तर आहे??
spectrum या शब्दाबद्दल अस म्हणायच आहे की तुम्हाला जी चित्र महान वाटतात ती जगातल्या ९९%लोकांना महान वाटत नाहित(त्यांना चित्रामागचा अर्थ कळत नाही). माझ्यामते तु माझ 'ते' पोस्ट परत एकदा वाच आणि मग याबद्दल लिही. मला वाटत आहे की तुला काय म्हणायच आहे हे मला कळलय,त्याची वादग्रस्त चित्रे सोडुन इतर चित्रे चांगली आहेत अस तुझ म्हणन आहे पण तरीही ते चुकिचे का आहे हेही मी लिहिले आहे. त्याच्याबद्दल मला एव्हढच म्हणायच आहे की हा महान चित्रकार असेलही पण हा त्या कलेचा साधन म्हणुन वापर करतो आमच्या धर्माचा अपमान करण्यासाठी. hackers पण जिनियस असतात पण त्यांच्या बुध्दिचा ते दुरुपयोग करतात आणि म्हणुन पकडले गेल्यास त्यांना शिक्षा केली जाते. मी pseudo धर्मप्रेमी आहे का नाही हे माहित नाही पण ज्याप्रमाणे हुसेनचा मी विरोध करतो त्याचप्रमाणे अल्लाची कार्टुन्स काढणार्‍या डॅनिश कार्टुनिस्टचाही मी विरोध करतो. काहीही कारण नसताना इतक्या सार्‍या लोकांच्या भावना दुखवण पटत का??
मी माझे मुद्दे स्पष्ट भाषेत मांडले आहेत त्यामुळे तुझे मन दुखावले गेले असल्यास क्षमस्व.

नन्दिनी हुसेनचा विषय अज्जुकानी सुरु केला होता 'नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी ' नाही.


Tatyavinchu
Saturday, November 03, 2007 - 10:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर पण त्या बिबी चे नावच पाक ला धरुन असल्यामुळे नेह्मीचे यशस्वी कलाकार येनार नाहीत का? ईथे हिंदु मुस्लीम भानगड बीबी च्या नावामुळे होनारच नंदिनी मग त्यात काय चुकले. हां बीबीचे नाव कलावंत अन त्याचा उदो उदो असला असता तर आपले पोस्ट बरोबर ठरले असते.

Tatyavinchu
Saturday, November 03, 2007 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर पन हुस्सैन ला सोडा रे त्या पाकींना धरा. हुसेन आपलाच आहे.

Santu
Sunday, November 04, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुसेन नी हि चित्रे काढलि यात
विशेष काहिच नाहि कारण मुस्लिमांची मानसिकता तशिच असते
म्हणुन तर खिलजिने सोमनाथा ची मुर्ति मशिदीच्या पायरीला बसवली.

व मुसल्मान सुल्तानानी रामदेवराय चे डोके मुतारिच्या नळाला असे बसवले की त्याची घाण त्याच्या तोंडातुन बाहेर पडेल.
म्हणुन यात विशेष काहिच नाहि खरे तर

या हुसेन ची चामडि सोलुन जिवन्त जाळले पाहिजे.तरच
या मुसल्मानाना चांगलि अद्दल घडेल


Santu
Sunday, November 04, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चीन्या
तुझे काहिच चुकले नाहि.
अरे नेहमिचे यशस्वि जसे इकडे आहेत तसे
तिकडे पण आहेत
तेव्हा तु लढ


Sherloc
Monday, November 05, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेरलॉक तुमचा नक्की राग कशावर आहे? कारण मधेच तुम्ही क्रिकेटमधली उदाहरणे देत आहात.

मी बी.बी. सुरु केला तेव्हा मला फक्त संगित, चित्रकला या दोनच विषयातले "कलाकार" अपेक्षित नव्हते. उत्तम खेळ ही देखील मी एक कलाच समजतो. म्हणुन वर उल्लेखलेल्या मान्यताप्राप्त कालांव्यतिरिक्त उदाहरणे मी दिलीत. ज्या ज्या ठिकाणी चिकाटी, मेहनत आणि एकाग्रता या गुणांची आवश्यकता आहे त्या सर्वच अगदी राजकारण सुद्धा "कला" या प्रकारातच मोडतं. मधु दंडवते, अटलबिहारी वाजपेयी ही काही या प्रांतातल्या कलाकारांची नावे.

कुठल्याही कलाकाराचा गौरव होण्याला माझा विरोध नाही हे मी आधीही सांगितले व आत्ताही सांगतोय. विरोध आहे तो फक्त देशाच्या, धर्माच्या वेगळेपणाचे आकर्षण असलेल्या तथाकथित "कलाप्रेमी"ना. गुलाम अलीचे नाव मी एक ताजा संदर्भ म्हणुन घेतले इतकेच. आणि मी जवळपास चार महिन्यांनी या बी.बी. च्या निमित्ताने काही लिहिले, त्यामुळे "यशस्वी कलाकारांमध्ये" मी असुच शकत नाही.


Deepanjali
Wednesday, November 14, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकिस्तानी किंवा कुठल्याही चांगल्या कलाकारांचा आदर - कौतुक करणे माझ्या दृष्टीने चूक नाही . :-)
To be very specific, फ़क्त पाकिस्तानी कलाकारां बद्दल बोलायचे झाले तर मी स्वत : काही पाकिस्तानी कलाकारांची fan आहे .
एखाद्याच्या character वर केवळ मुस्लिम किंवा पाकिस्तानी म्हणून संशय घेणे मला तरी पटत नाही आणि त्याच बरोबर संजय दत्त किंवा सलमान खान सारख्या गुन्हेगारांना डोक्यावर घेणे मात्र झेपत नाही .





Santu
Saturday, November 17, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पाकिस्तानी कलाकारांची फ़ॉन आहे ))))) तु पकिस्तानचीच तर फ़्यान आहे.

Ladtushar
Friday, April 25, 2008 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकिस्तानी तारका मराठीच्या प्रेमात

मुंबई, ता. २४ - "त्यांच्या' नावांची घोषणा स्टेजवरून होताच अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्या काय बोलतील, कोणत्या भाषेत संवाद साधतील, कोणती घोषणा करतील, असे एक ना असंख्य प्रश्‍न उपस्थितांना पडले होते. तेवढ्यात "त्या' स्टेजवर आल्या आणि माईक हातात घेऊन त्यांनी जय म..हा..रा..ष्ट्र अशी तुटक अक्षरे म्हटली आणि सर्व जण अवाक्‌ झाले. ........
मोडक्‍यातोडक्‍या मराठीत बोलण्याचा त्यांचा प्रयत्न थक्क करून सोडणारा होता. अर्थात त्या दोघी म्हणजे पाकिस्तानी कलाकार सलमा आगा आणि मीरा.

"मी मराठी' वाहिनीचा पहिला वर्धापनदिन काल प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात झाला. त्यावेळी "सन्मान संध्या-२००८' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला अर्थमंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, महापौर डॉ. शुभा राऊळ आदी मंडळी उपस्थित होती. या वेळी दीपा अवचट, मधु मंगेश कर्णिक, रमेश व सीमा देव तसेच पाकिस्तानी गायिका सलमा आगा आणि अभिनेत्री मीरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना सुरुवातीलाच त्या दोघींनीही जय महा...राष्ट्र..., जय महा...राष्ट्र...असे म्हणताच उपस्थित सर्व जण भारावून गेले. कारण तो अख्खा माहौल मराठीचा होता. अभिनेते जितेंद्र यांनीदेखील सुरुवातीला मराठीतून भाषण केले होते आणि त्यातच या दोन पाकिस्तानी गायिका आणि नायिकांनी चक्क मराठीतून संवाद साधल्यामुळे सर्व जण अवाक्‌ झाले. सलमा आगा म्हणाली, ""मराठी संस्कृती ग्रेट आहे. मराठी भाषेत गोडवा आहे. ती शिकावी असे वाटते. हे सगळे वातावरण पाहून आपण भारावून गेलो आहोत.''

महेश भट यांच्या "नजर' या चित्रपटात काम करणाऱ्या मीरानेदेखील मराठी भाषा जगात पोचली पाहिजे, असा आशावाद व्यक्त केला. ती पुढे म्हणाली, ""भारत हा सुंदर देश आहे. महाराष्ट्र आणि मुंबई मला आवडते. मराठी भाषेला वेगळे सौंदर्य आहे. ती भाषा मला आवडते.'' या वेळी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मकरंद अनासपुरे, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, रेशम टिपणीस, गिरीश परदेशी, अनिकेत विश्‍वासराव, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग आदी कलाकारांनी भाग घेतला. पुष्कर श्रोत्री, मेघना एरंडे, कविता लाड, मकरंद अनासपुरे यांनी सूत्रसंचालन केले.


Ladtushar
Friday, April 25, 2008 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मझ्या मते कलाकरांना सिमा नसतात... एखाद्या श्रोत्याला जर का परदेशी संगीत आवडत असेल तर तो त्याला मनापासुन दाद देइल.. पण या बरोबर स्वत: च्या लोककला आणि राष्ट्रीय कलाकारांचा पण अभिमान बाळगला पाहिजे आणि त्याना सुद्धा संधी दिली गेली पाहीजे...

Zakki
Friday, April 25, 2008 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे? त्यांना इंग्रजी येत नव्हते की काय? एव्हढ्या मोठ्या सभेत मराठी? शी:: कित्ती ब्याकवर्ड? अशिक्षित!

आमच्या मुंबई, पुण्यात पहा. अगदी मराठीतून प्रश्न विचारले तरी इंग्रजीतून उत्तरे देतात आमची लहान लहान मुले!



सगळा प्रश्न संतुलन साधण्याचा आहे.

परकीय भाषा, परकीय कला ही केवळ परकीय आहे म्हणून तिला नावे ठेवावीत की ती केवळ कला आहे म्हणून बाकीचे सगळे मान्य करायचे?

नि परकीय कलेला दाद दिली तर आपण एकदम स्वाभिमानशून्य कसे काय बनतो? त्यांचा काय संबंध आहे?

जर परकीय व स्वकीय यांच्यात कलेबद्दल स्पर्धा असेल, तर कला ज्याची चांगली त्यालाच चांगले म्हणावे ना?

जेंव्हा परकीय कलाकाराने कलेच्या नावाखाली काही आक्षेपार्ह केले तर त्याचा राग यावा की नाही? म्हणजे पाकिस्तान्याने भारताला शिव्या घालणारी गाणी कितीहि गोऽड आवाजात गायली तर तुम्ही ऐकत बसाल का?



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators