Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 06, 2006

Hitguj » Views and Comments » General » Why are we (Indians) like this? » Archive through October 06, 2006 « Previous Next »

Zakki
Friday, September 22, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1full2half, म्हणजे तुमचे म्हणणे, 'आहे ते ठीक आहे, तुम्ही उगाच नावे न ठेवता गप बसा.' असे आहे का?

माझा उद्देश होता असा होता की, इथे आल्यावर कळले की भारतात जे चालते ते बरोबर नाही, तसेच असले पाहिजे असे नाही, तर ते सुधारावे अशी अपेक्षा. पण अर्थात् त्यासाठी लोकांनी स्वत: त्यात भाग घ्यायला पाहिजे, स्वत:च काही करायला पाहिजे. त्यात काही 'कसे करायचे' ते सांगायला नको. म्हणजे सार्वजनिक ठिकाणि कचरा करू नये म्हंटल्यावर योग्य जागी कचरा टाकावा, सार्वजनिक ठिकाणि थुंकू नये म्हंटल्यावर जिथे थुंकायला हवे तिथेच थुंकावे हे कळायला किंवा अंमलात आणायला दुसर्‍या माणसाची मदत लागते का? ज्याने त्याने समजून उमजून स्वत:च ते करायला नको का? फक्त इतरांनी बोलू नये म्हणून काम होणार आहे का?

याबद्दल माझ्या बडोद्यातल्या मित्राचा अनुभव:
तो सेवानिवृत्त होऊन एका श्रीमंत, सुशिक्षित लोकांच्या सोसायटीत रहायला गेला. तिथे त्याच्यासारख्या लोकांना फिरण्यासाठी चांगला स्वच्छ रस्ता केला होता. पण तिथले शिकलेले, श्रीमंत, वयाने वृद्ध झालेले लोकहि सिगारेटची थोटके, इतर कचरा टाकणे, थुंकणे, कुत्र्याला तिथेच घाण करायला देणे असे करत होते. माझा मित्राने ठरवले यांना प्रत्येकाला नम्र शब्दात सांगावे की असे करू नका. त्याला असे आढळले की एकदा सांगून दहापैकी फक्त एक माणूस दोन तीन दिवसासाठी तरी सुधारतो. तीनदा, चारदा सांगून, दहापैकी ३, ऐकतात, पुन: दोन तीन दिवसांसाठी. पुन: ये रे माझ्या मागल्या! म्हणजे शिकलेल्या वयाने मोठ्या, श्रीमंत लोकांत सुद्धा दहापैकी सहा जण घाणेरडे! मग अशिक्षित, गरीब, वयाने लहान लोकांचे काय विचारता?

मग सतत टोचणि लावली तर थोडा फरक पडेल ही अपेक्षा.

पण तुम्हाला लोकांनी बोललेले लागते, पण घाणीचे काही वाटत नाही असे असेल तर आम्ही बोलत नाही!

म्हणजे अक्कल गेली खड्ड्यात, आम्ही कुणितरी श्रेष्ठ, उच्च लोक, काय वाट्टेल ते करू, आम्हाला आमचा अभिमान आहे, तुम्ही कोण सांगणारे? असेच ना? चांगले नाही ते!


Milindaa
Friday, September 22, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1full2half, तुम्हाला मूळ मुद्दाच कळला नाहीये. येथे कोणीही भारताला वाईट म्हणत नाहीये. आम्ही त्याच system मध्ये वाढलो आहोत, आणि कदाचित त्यावेळी आम्हांला तीच system बरोबर वाटली असेल, पण म्हणून आता आम्हांला कळतंय की ते चूक आहे, तर ते चूक आहे हे सांगायला काय हरकत आहे? नको तेथे कसलं देशप्रेम आलं तुम्हांला? हे सर्व सुधारावं असंच आम्हांला पण वाटतं म्हणून जे खटकलं ते लिहीणं चाललंय..

1full2half
Friday, September 22, 2006 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की..
तुम्ही कशावरून काय निष्कर्श काढलात...
मी कुठेही म्हणलेले नाही.. कि अस्वच्छता किंवा नियम उल्लंघन हे सगळे बरोबर आहे...
माझी पोस्ट नीट वाचा.. मी म्हणतोय परिस्थिती फ़ारसा फ़रक पडलेला नाही.. अपवादानेच.. देशापुढील प्रश्न बदलले / संपले आहेत

आणि मी ही तेच म्हणतोय.. स्वत:नेच समजून उमजून करायला नको का.. दुसर्‍याला उपदेश करून काही होणार आहे का..

अहो नुसत्या टोचण्या लावल्या तर काम होईल असे तुम्हांला वाटते.. आणि हे इतके सोप्पे आहे... ??? तर मग आनंदच आहे

तुमचे बोललेले नाही लागणार हो, जो पर्यंत तुम्ही " आपण भारतीय " आहात...
" तुम्ही भारतीय " असे म्हणून टोचलेत ना तर काही सांगत येत नाही बुवा :-)

आणि तुमचे ऐकू कि हो नक्की.. पण उंटावरून शेळ्या हाकण्याचे कार्यक्रम नकोत.. उतरा मैदानात.. बरोबरीने घेऊ कि हो शिंगावर :-)

आणि इतक्या लगेच पराकोटीचे निष्कर्श काढू नकात ही विनंती


Asmaani
Friday, September 22, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1full2half, तुम्ही लिहीलंय,"भारताबाहेर गेल्यावर भारतातील गोष्टींचा इतका त्रास होतो?"
भारतात असतांना भारतातल्या गोष्टी आपण जन्मापासून बघत असतो. असं बघा... चांगलं वाईट ह्या सापेक्ष कल्पना आहेत. एखादी वस्तू एकच असतांना आपण आहे तशी स्वीकारतो. जेव्हा दुसरे काहीतरी उपलब्ध होते तेव्हा दोन वस्तूंची तुलना होउन आपण चांगले वाईट ठरवतो.
त्याचप्रमाणे भारताबाहेर गेल्यावर परदेशातल्या सुव्यवस्था पाहिल्या की भारतातल्या दुर्व्यवस्थेची जास्त जाणीव होते.
भारतातल्या परिस्थितीची कारणे माझ्या मते अशी आहेत.
१)बर्याच भारतीयांना अजूनही स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार आणि लोकशाही म्हणजे कसेही वागण्याची मोकळीक असे वाटते.
२)देशावर प्रेम नसणे. आपलेपणाची जाणीव नसणे.(ह्या वाक्यांवर अनेकजण रागावण्याची शक्यता आहे. पण तुम्हीच विचार करा. जी गोष्ट आपल्याला मनापासून आपली वाटते ती स्वच्छ ठेवण्याकडे, जपण्याकडे आपला कल असतो. आपल्या रहत्या घरात कुणी अगदी अशिक्षित माणसे सुद्धा, पानाच्या पिचकार्या टाकत असतील असे मला वाटत नाही.)
३)कुणाच्याही, अगदी स्वत्:च्या जिवाचीही पर्वा नसणे. (आठवा- bikes वरून भरधाव जाणारी तरुण मुले.)
४)माणूस म्हणून दुसर्या व्यक्तीबद्दल अजिबात आदर नसणे. आपल्याअ एखाद्या कृती मुळे दुसर्याला काही त्रास होत असेल तरी"मला काय त्याचे अशी वृत्ती.
any way कारणे बरीच आहेत. next post मधे उपायांची चर्चा करु


1full2half
Friday, September 22, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा..
१ स्पष्ट करू इच्छितो इथे कुठेही देशप्रेम वगैरे मुद्दे नाहियेत..
बहुदा तुम्हांलाच माझ मुद्दा कळलेला नाहिये... एकतर देशप्रेमाचा उल्लेख तुम्ही का केलात मला पटलेले नाही..

तुमचे बरोबर आहे.. जे तुम्हांला त्रयस्थ नजरेने चूक वाटले ते इथे आपण सगळे मांडतोय..
मला इतकच म्हणायचय... ज्या system मधे तुम्ही वाढला असे म्हणताय.. तेव्हा तुम्ही / आम्ही तश्याच चुका केल्या इलाजाने / नाईलाजाने

तुमच्या सूचना अगदी मान्य.. पण त्यात बाहेर बसून सोडलेल्या आज्ञेचा सूर वाटले तर दु:क्ख होईल इतकच म्हणायच


Chyayla
Friday, September 22, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत प्रयत्न दोन्ही बाजुन्कडुन व्हायला हवा, वैयक्तिक आणी सरकारी पातळीवर सुद्धा

१) ज्याने नियम मोडला त्याला लक्षात राहील असा दन्ड लावावा, जेणेकरुन पुढच्या वेळेस तो दहादा विचार करेल, कुठेच कायद्याचा धाक नसल्यामुळे लोक नियम तोडायला मागे पुढे पहात नाही कारण स्पष्ट आहे, त्याला शासन होणार नाही ही खात्री.

२) इतर लोक नियम पाळत नाही मग मी पाळुन मुर्ख का ठरु, अशी एक भावना ज्याच्या मनात नियम पाळण्याची ईछा आहे त्याच्यातही निर्माण होते, मग जगरहाटीबरोबर आपणही चालावे असे त्याला वाटते.

३) शिक्षणाद्वारे नवीन पिढीला शिस्त व नियम पाळण्याचे महत्व सान्गावे, जेणेकरुन पुढची पिढी तरी सुधारेल.

दोन्ही गोष्टिन्वर भर यासाठी द्यावा कि इतक्या वर्षाच्या म्हणा पिढ्यान पिढ्या बेशिस्तीची जी सवय लागली आहे, ती इतक्या लवकर काढणे शक्य नाही.

सुर्वातीला धाक हवाच, आणी कडक अम्मलबजावणी व्हावी, मी नागपुरात असताना रस्त्यावर नवीनच ट्राफ़िक सिग्नल लावले होते पण कोणी रहदारीचे नियम पाळतच नव्हते, कारण कधी सवयच नाही, जेन्व्हा वाहतुक पोलिसाकडुन कडक अम्मलबजावणी व्हायला लागली तेन्व्हा परिस्थिती सुधारु लागली, आज त्यामानानी पुष्कळ नियम पाळले जातात. तरीही नियम मोडने आणी लाच घेउन सुटणे हे प्रकार तुरळक आहेच.

काही ठिकाणी ग्राम स्वछता अभियान चालतात, पण त्याचा फ़ायदा फ़ारच मर्यादित काही दिवसान्नी परत येरे माझ्या मागल्या, अशा प्रकारे तुम्ही लोकाना सान्गुनही काही फ़रक पडत नाही, शिवाय तुम्ही जर सान्गायला गेलात तर, "रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, शानपन शिकवतो" असल काही एकुन अपमान करवुन घ्या, तो आपल्या बापाचा नसतो पण घाण करायला मात्र याचा बापाचा नक्किच असतो.

गरज आहे राजकिय ईछाशक्तिची आणी चान्गल्या सामाजिक नेत्रुत्वाची



Lokhitwadi
Saturday, September 23, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीन्ना राग येईल पण वस्तुस्थिती अशी आहे की भारतीयान्ना (मी धरुन) कुठ्लीही योग्य गोष्ट करायला लावण्यासाठी हण्टर लागतो. बोलुन समजणारी ही माणसे नव्हेत. नियमाचा बडगा असल्याशिवाय पर्याय नाही.

अहो, ही सार्वजनिक स्वच्छता सोडा, अजुन्ही खूप भयन्कर प्रष्ण आहेत. थोडेसे विशयान्तर होतेय, पण कोर्ट केसेसचा निकाल लागायला १०-१५ वर्षे लागतात. निकालानन्तर अम्मलबजावणि होत नाही. आमच्या तीर्थरुपान्च्या केसचा असाच १५ वर्षान्नी निकाल लागून, निकालाप्रमाणे प्रतिवादी अम्मलबजावणी करत नाही. आता contemp of court ची दुसरी केस. आयुष्यभर काम करुन अजून pension नाही, कारण court case चालू आहे. चला. शेवटी Churchil is proven correct असेच म्हणावे लागेल.


Chyayla
Sunday, September 24, 2006 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहितवादि... Churchil is proven correct म्हणजे काय? माफ़ करा पण मला याबद्दल माहिती नाही म्हणुन कुतुहलापोटी विचारत आहे.

हन्टर म्हणाल तर एका परीने बरोबर आहे, कारण भारतावर कित्येक शतके राजेशाहे होती, त्यामुळे राजाज्ञेप्रमाणे जो हुकुम सोडला जाइल तो निमुट्पणे मानायचा हिच सवय पिढ्यन पिढ्या चालत आली आहे, अजुनही आपल्या देशात घराणेशाहिची मानसिक गुलामगिरी सुरु आहेच, तो वेगळा विषय आहे. पण काही म्हणा लोकशाही अजुन काही रुजली नाही, लोकशाही म्हणजे मनात येइल तसे वागायचा सगाळ्यान्ना अधिकार असलि फ़ाजिल समजुत केलेलि असते, सोबत व्होट ब्यान्केचे राजकारण त्यामुळे नेते पण कायदा सोडुन गुन्हेगारान्ना मदत करतात. पण लोकशाहीत स्वातन्त्र्यासोबत काहे जबाबदारी व बन्धने असतात हे सोयिस्कर विसरुन जातात, ही एक लोकशाहीची घोर विटम्बनाच आहे म्हणा.




Moodi
Sunday, September 24, 2006 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी मी जरा अर्धवट ऐकलेय. चर्चिल असे म्हणाला होता की भारतीयांना स्वातंत्र्य देऊ नका, ते त्या लायकीचे नाहीत, ते देश विकुन खातील.( तो आपला शत्रुच होता, पण आता आपले मित्रच( देशातील राजकारणी, भ्रष्टाचारी, आपल्याच मातीत पोसलेले पण नंतर बनलेले अतीरेकी) ते सिद्ध करतायत याहुन मोठे दुर्दैव कोणते?)

Swa_26
Friday, September 29, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चिलचे ते वाक्य मला वाटते व.पु. काळे यांच्या कोणत्यातरी पुस्तकात आहे. घरी जाऊन बघावे लागेल. मिळाले तर उद्या टाकते.

पण माझा पूर्वीचा मुद्दा यासाठीच असा होता कि जर आपणा भारतीय लोकांना कायद्याचा बडगा दाखवला तरच थोडाफार फरक पडतो. प्लास्टीकच्या पिशव्यांवरील बंदी हे त्याचे ताजे उदाहरण!!


Zakki
Friday, September 29, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात स्वातंत्र्यापूर्वी व नंतर सुद्धा अनेक ब्रिटिशप्रेमी लोक होते. त्यातले कित्येक मला माहित होते, आमच्या घरी येत असत, नि इंग्रजांसारखे बोबडे बोबडे, शब्दात शब्द मिसळून, बोलत असत. त्यांच्या तोंडून मी तसे ('भारतीय लोक स्वतंत्र होण्याच्या लायकीचे नाहीत')अनेकदा ऐकले आहे. पण आमच्या घरी त्या लोकांची टिंगल केली जात असे. शिवाय माझ्यावरहि लहानपणापासून स्वातंत्र्य कसे चांगले हे ठसवले होते.

फक्त अमेरिकेत आल्यावर नि राहिल्यावर साक्षात्कार झाला की स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक बाबतीत सरकारवर अवलंबून न रहाता अगदी छोट्या छोट्या ठिकाणि सुद्धा लोक स्वत:च पुढाकार घेऊन कामे करतात. वर्गण्या जमवतात, नि चांगली कामे करून टाकतात. रस्ते स्वच्छ ठेवणे, कामात दिरंगाई न करणे, लाच न घेणे हे नियम ते आप आपसात पाळतात, नि कुणि जर तसे नाही वागले की त्याला मग कोर्टात खेचतात. निकाल लागो न लागो, पण त्या माणसाचा धंदा बसतो. म्हणून तसे करायला कुणि धजत नाही!


Dinesh77
Friday, September 29, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्किजी,
अगदी बरोबर आहे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.


Chyayla
Monday, October 02, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा साक्षात्कार एकदम उलटा आहे, इथे सगळ काही सरकार वर अवलम्बुन आहे, सोशल सेक्युरिटी वर प्रचन्ड पैसा खर्च होतो, अहो बेकारी भत्ता सुद्धा किती तर २००० डॉ. प्रत्येकी, सरकार कडुन कायद्याची कडक अम्मलबजावणी होते. ईकडची जनता सरकारही तसेच निवडुन देते ना.

भारतात अजुनही सरकार एक भ्रष्टाचार आहे, मुम्बईला पुर आला तेन्व्हा लोकान्नीच एक दुसर्याची मदत केली, आणी इकडे ओर्लियन्स मधे कटरीना चक्रीवादळ मधे लोक सरकारच्या मदतीची वाट पहात राहीले आणी मग सगळे सभ्यतेचे बुरखे फ़ाडुन लुटालुट, बलात्कार झालेत, सरकारची मदत फ़ार उशीरा आली.


Zakki
Monday, October 02, 2006 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो च्यायला, ते सोशल सेक्युरिटी नि बेकारी भत्ता यासाठी नोकरी करणारे लोक प्रचंड कर भरतात. उलट त्याच पैशातून कर्ज काढून इथले कॉंग्रेसमन, सिनेटर चक्क भारतीयांना लाजवेल इतक्या निर्लज्जपणे 'खातात'. म्हणून आता बरेच जण म्हणतात, सोशल सेक्युरिटि सगळी सरकारला देण्या ऐवजी स्वत: च गुंतवा!

मदत म्हणाल, तर जास्त प्रमाणावर, लोकच नेहेमी एकमेकांना मदत करतात. सरकारने दिलेल्या मदतीपैकी एक बिलियनहून अधिक डॉलर्सची अफरातफर झाली. म्हणून काही सिनेमा नट नि इतर प्रसिद्ध व्यक्ति, पैसे घेऊन स्वत:च 'नोर्लिन्स' ला डेरेदाखल झाले नि त्यांनी स्वत: पैसे नि वस्तूंचे वाटप केले. तर सरकार पेक्षा खाजगी कारभार जास्त.

त्यातूनहि इराक युद्ध, इस्राएल ला मदत, यांच्या मानाने ते पैसे अगदीच कमी. त्यातून बेकार भत्ता मिळवणारे फारतर सहा टक्के नि त्यांनाहि तो फक्त जास्तीत जास्त सहा महिने मिळतो. शिवाय आमच्या देशाला ९ ट्रिलियन डॉ. चे कर्ज आहे!! ते आणखीन वाढवायला तयार आहोत. कुणि आम्हाला त्या बाबतीत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक देश १०० वेळा नष्ट करण्या इतके अणुबॉंब आहेत आमच्याकडे. फुकट नाही अमेरिकेची वट! आता कुणि म्हणेल काय हे असंस्कृत लोक, गर्विष्ठ, बळाच्या जोरावर जगतात! पण लक्षात कोण घेतो नि कशाला?


तेव्हढे बलवान व्हा नि मग तुलना करा अमेरिकेशी!


Maneesh
Friday, October 06, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत या विषयावर भारताच्या राष्ट्रपतिंचे हे भाषन चांगला प्रकाश टाकु शकेल.


The President's Speech in Hyderabad .

Why is the media here so negative?
Why are we in India so embarrassed to recognize our own strengths, our achievements? We are such a great nation. We have so many amazing success stories but we refuse to acknowledge them. Why?
We are the first in milk production.
We are number one in Remote sensing satellites.
We are the second largest producer of wheat.
We are the second largest producer of rice.
Look at Dr. Sudarshan, he has transferred the tribal village into a self-sustaining, self-driving unit. There are millions of such achievements but our media is only obsessed in the bad news and failures and disasters. I was in Tel Aviv once and I was reading the Israeli newspaper. It was the day after a lot of attacks and bombardments and deaths had taken place. The Hamas had struck. But the front page of the newspaper had the picture of a Jewish gentleman who in five years had transformed his desert into an orchid and a granary. It was this inspiring picture that everyone woke up to. The gory details of killings, bombardments, deaths, were inside in the newspaper, buried among other news.

In India we only read about death, sickness, terrorism, crime. Why are we so NEGATIVE? Another question: Why are we, as a nation so obsessed with foreign things? We want foreign T. Vs, we want foreign shirts. We want foreign technology.

Why this obsession with everything imported. Do we not realize that self-respect comes with self-reliance? I was in Hyderabad giving this lecture, when a 14 year old girl asked me for my autograph. I asked her what her goal in life is. She replied: I want to live in a developed India.
For her, you and I will have to build this developed India . You must proclaim. India is not an under-developed nation; it is a highly developed nation. Do you have 10 minutes? Allow me to come back with a vengeance.

Got 10 minutes for your country? If yes, then read; otherwise, choice is yours.
YOU say that our government is inefficient.
YOU say that our laws are too old.
YOU say that the municipality does not pick up the garbage.
YOU say that the phones don't work, the railways are a joke,
The airline is the worst in the world, mails never reach their destination.
YOU say that our country has been fed to the dogs and is the absolute pits.

YOU say, say and say. What do YOU do about it?
Take a person on his way to Singapore . Give him a name - YOURS. Give him a face - YOURS. YOU walk out of the airport and you are at your International best. In Singapore you don't throw cigarette butts on the roads or eat in the stores. YOU are as proud of their Underground links as they are. You pay $5 (approx. Rs. 60) to drive through Orchard Road (equivalent of Mahim Causeway or Pedder Road) between 5 PM and 8 PM. YOU come back to the parking lot to punch your parking ticket if you have over stayed in a restaurant or a shopping mall irrespective of your status identity... In Singapore you don't say anything, DO YOU? YOU wouldn't dare to eat in public during Ramadan, in Dubai. YOU would not dare to go out without your head covered in Jeddah. YOU would not dare to buy an employee of the telephone exchange in London at 10 pounds ( Rs.650) a month to, 'see to it that my STD and ISD calls are billed to someone else.'YOU would not dare to speed beyond 55 mph (88 km/h) in Washington and then tell the traffic cop, 'Jaanta hai main kaun hoon (Do you know who I am?). I am so and so's son. Take your two bucks and get lost.' YOU wouldn't chuck an empty coconut shell anywhere other than the garbage pail on the beaches in Australia and New Zealand .
Why don't YOU spit Paan on the streets of Tokyo ? Why don't YOU use examination jockeys or buy fake certificates in Boston??? We are still talking of the same YOU. YOU who can respect and conform to a foreign system in other countries but cannot in your own. You who will throw papers and cigarettes on the road the moment you touch Indian ground. If you can be an involved and appreciative citizen in an alien country, why cannot you be the same here in India ?

Once in an interview, the famous Ex-municipal commissioner of Bombay , Mr. Tinaikar, had a point to make. 'Rich people's dogs are walked on the streets to leave their affluent droppings all over the place,' he said. 'And then the same people turn around to criticize and blame the
authorities for inefficiency and dirty pavements. What do they expect the officers to do? Go down with a broom every time their dog feels the
pressure in his bowels? In America every dog owner has to clean up after his pet has done the job. Same in Japan . Will the Indian citizen do that here?' He's right. We go to the polls to choose a government and after that forfeit all responsibility. We sit back wanting to be pampered and expect the government to do everything for us whilst our contribution is totally negative. We expect the government to clean up but we are not going to stop chucking garbage all over the place nor are we going to stop to pick a up a stray piece of paper and throw it in the bin. We expect the railways to provide clean bathrooms but we are not going to learn the proper use of bathrooms.

We want Indian Airlines and Air India to provide the best of food and toiletries but we are not going to stop pilfering at the least opportunity.
This applies even to the staff who is known not to pass on the service to the public. When it comes to burning social issues like those related to women, dowry, girl child! and others, we make loud drawing room protestations and continue to do the reverse at home. Our excuse? 'It's the whole system which has to change, how will it matter if I alone forego my sons' rights to a dowry.' So who's going to change the system?
What does a system consist of ? Very conveniently for us it consists of our neighbours, other households, other cities, other communities and the government. But definitely not me and YOU. When it comes to us actually making a positive contribution to the system we lock ourselves along with our families into a safe cocoon and look into the distance at countries far away and wait for a Mr.Clean to come along & work miracles for us with a majestic sweep of his hand or we leave the country and run away.
Like lazy cowards hounded by our fears we run to America to bask in their glory and praise their system. When New York becomes insecure we run to England . When England experiences unemployment, we take the next flight out to the Gulf. When the Gulf is war struck, we demand to be rescued and brought home by the Indian government. Everybody is out to abuse and rape the country. Nobody thinks of feeding the system. Our conscience is mortgaged to money.

Dear Indians, The article is highly thought inductive, calls for a great deal of introspection and pricks one's conscience too.... I am echoing J. F. Kennedy's words to his fellow Americans to relate to Indians.....

'ASK WHAT WE CAN DO FOR INDIA AND DO WHAT HAS TO BE DONE TO MAKE INDIA
WHAT AMERICA AND OTHER WESTERN COUNTRIES ARE TODAY'

Lets do what India needs from us.

Thank you,

Dr. Abdul Kalaam
PRESIDENT OF INDIA


Rahul16
Friday, October 06, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

speech is ggod ,,,...pan APJ chya navakhali kahi lok aaple wichar pasarawatat....he speech pan tyatlech 1 aahe...( I am not saying maneesh)

pan anyway sppech is worth giving thought

Satishmadhekar
Friday, October 06, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फाशीची शिक्षा झालेल्या अफ़जलचा अनेकांना अचानक कळवळा आला आहे, जो देश गेली अनेक वर्षे अतिरेकी कारवाया करत आहे त्यालाच अचानक आपल्या माननीय पंतप्रधानांनी अतिरेक्यांचा बळी’ ठरल्याचे प्रशस्तिपत्रक देऊन टाकले आहे, अतिरेक्यांचे हल्ले चालूच आहेत

येण्या-या प्रत्येक दिवशी आपला देश एक नवीन खालची पातळी गाठत आहे. काय होणार या देशाचे कोणास ठाऊक?


Dinesh77
Friday, October 06, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याचे कारण गांधीगिरीचा अतिरेक, आणखी काय!

Zakki
Friday, October 06, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग ते अतिशय बुद्धिमान, जादूसारखे लोक यातून काही मार्ग का नाही काढत? का त्यांची अक्कल नुसती .net वापरून VB नि java program यांच्यात procedure sharing करण्यातच खर्च होते, प्रत्यक्ष process कशी करता येईल याचे ज्ञान नाही?

Dinesh77
Friday, October 06, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसर्‍यांकडे बोटे दाखवण्यात काय अर्थ आहे?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators