Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 29, 2006

Hitguj » Views and Comments » General » माझे आवडते पदार्थ मला असे आवडतात » Archive through September 29, 2006 « Previous Next »

Santu
Tuesday, May 16, 2006 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुराक म्हण्जे फ़ेणी च्या अधिची stage

Lopamudraa
Tuesday, May 16, 2006 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुण्मयी... great असच वाटते!!! .. .. .. .. . .. . ..

Meemarathi
Wednesday, May 17, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला शाकाहारी जेवनापेक्षा मासाहारी जेवण जास्त आवड्ते.

ही घ्या मला आवडणार्‍या पदार्थांची यादी:

१) चिकन मसाला आणि गरम गरम वडे.सोबत
लिम्बू आणी कान्दा मीठ लावून.

२) ओल्या बोबलाचं हिरवे कालवण आणी तळलेले
कुरकुरीत बोबील, बरोबर गरम गरम पोळ्या.

३) तिसर्‍याचे शेन्गा आणि बटाटा घालून केलेले सुखे
कालवण आणि भात.

४) काद्याची हूल घलून केलेला सुखा जवळा. वा
आहाहा काय मस्त लागते म्हणुन सागु आणि सोबत
नाचणी ची भाकरी.

ह्यापेक्षा जास्त लिहिवत नाही भूख लागली.


Maudee
Wednesday, May 17, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वालाच बिर्ड आणि भात.....
घरी गेल्यावर लगेच वाल भिजत टाकायला हवेत


Gondhali
Friday, May 19, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय तुम्ही मराठी ँमडळी, आपल्या मिसळ ह्या ऊच्च प्रकाराल विसरलात.. पुण्याची जोशी मिसळ (तुळशिबाग), नासिक ला साहेबा ची मिसळ, अम्बीका अनि तुषारची मिसळ म्हणजे फारच तोँडाला पानी सुटते :-)

Sharmila_72
Thursday, May 25, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. वालाच बिरडं-भात आणि तूप, नंतर परत बिरडं भात आणि दही, बरोबर ताजं ताजं कैरीचं लोणचं
२. वरण भात तूप आणि बरोबर तळलेले सोडे किंवा सुकट,भरपूर तेल व कांदा घातलेली
३.भरली वांगी सोडे घालून व दही भात
४. कुरकुरीत भेंडीची भाजी,पोळी, वरण भात





Shonoo
Wednesday, May 31, 2006 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरली वांगी सोडे घालून? कृती लिहिणार का? नेहेमी आपली गोडा मसाला आणि कांदा भरून नाहीतर भगोरा बैंगन करून कन्टाळा आलाय

Bee
Thursday, June 01, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोडे म्हणजे काय पण..

Tanya
Thursday, June 01, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला..भरलि वांगी सोडे घालुन मस्तच!
बी... सोडे म्हणजे छान वाळवलेली आणि साफ केलेली कोलंबी. इथे मिळते. dired section मध्ये.


Arch
Thursday, June 01, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला, भरल्या वांग्याच्या भाजीच्या पातेल्याला पुसून घेतलेला भात, तसच तळली कोलंबीच्या (भरपूर लसूण,कांदा घालून परतलेली कोलंबी) किंवा तळले सोड्याच्या (कोलंबी सारखेच) पातेल्याला पुसून घेतलेला भात खूप आवडतो.

Chioo
Friday, June 02, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sharmila aani arch.. aata patkan ya kruti dya bar. bharalya vangyachi ani talali kolambichipan. nusata vachunch bhook lagate aahe. :-)

Nayana
Friday, June 02, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला watermelon वर चाट मसाला खुप आवडतो.

Nayana
Friday, June 02, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tanya पण इकड्च्या सोड्याला खूप घाण वास येतो.

Priyab
Thursday, September 14, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सोडे काय प्रकार आहे?

Vinaydesai
Friday, September 15, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोडे सोलून वाळवलेली कोलंबी... गोव्याकडे आणि सीकेपी (चांगलं खाणारे पिणारे) लोकांमध्ये खूप आवडीने खाल्ले जातात...
:-)

Sayuri
Friday, September 22, 2006 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरम गरम मऊभाताचा एक थर थाळीत पसरायचा. त्यावर एक कच्चा पापड ठेवायचा. आता पापड दिसेनासा होईपर्यंत वरुन परत मऊभाताचा थर द्यायचा. वरुन साजूक तूप. सोबत मेथांबा आणि घट्ट दही.

श्रीखंडावर topping म्हणून थोडासा आमरस घालायचा, मस्त लागतं हे combination !

Aditih
Wednesday, September 27, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज प्रथमच ह्या बीबी वर आले... काय झकास वर्णनं आहेत पदार्थांची..भारताबाहेर असल्याने हे सर्व वाचुन जाम खुष न होता उदास झाले... कुठे आलो आपला देश सोडुन असं वाटतंय.. किती गोष्टींना मुकतो आहोत.. असो..आलिया भोगासी...
सर्वांनी खरंच खुप छान लिहीलं आहे.

Aditih
Wednesday, September 27, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे .. माझ्या आवडीचा पदार्थ लिहायचा राहुनच गेला..
मला सर्वात जास्त काय आवडतं तर..माझ्या आईच्या किंवा आजीच्या हातचं डाळ्वांगं आणि भात .. त्यावर छान साजुक तूप...कधी मिळेल पुन्हा खायला ....


Varadakanitkar
Friday, September 29, 2006 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं आदिती इथे लिहिणार्‍यांपैकी कुणीच भारतात नाहीये. इथे आपणच बनवायचं आपल्याला आवडंतं ते. बाकी माझ्या आवडीचं जेवण.. वरण भात, बटाट्याची उकडून केलेली झणझणीत भाजी, पुरी किवा पोळी, आम्रखंड आणि पोह्याचा पापड.कैरीचं लोणचं असेल तर अजून छान!

Mrinmayee
Friday, September 29, 2006 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरदा, याला म्हणतात योगायोग!! आज रात्रीचा हाच स्वयंपाक आहे! साधं वरण तुप भात(भात पिवळा, जीरं हळदीची फोडणी घातलेला), पुर्‍या आणि बटाट्याची भाजी. फक्त आम्रखंडा ऐवजी श्रीखंड केलय. आणि पोह्याच्या पापडाऐवजी कुरडया आणि सांडगे तळलेत. मुगाचं बिरडं पण आहे आवडत असेल तर. येणार जेवायला? :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators