Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 21, 2006

Hitguj » Views and Comments » General » Why are we (Indians) like this? » Archive through September 21, 2006 « Previous Next »

Satishmadhekar
Wednesday, September 20, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Are we proud of our nation, culture and compatriots?

Why do we try to forget our own mother tongue and adopt an alien language?

Why do we spit everywhere and create dirt to others? Why do we not feel guilty when throwing garbage on streets? Why do we take our pets out to make dirt at someone else’s house?

Why do we violate traffic signals and deny right of way to others? Why do we drive on the wrong side of the road creating trouble to others? Why do we use high beam lights on the vehicle during the night making others blind?

Why do we not stop blocking the roads by bringing marriage procession on the roads? Why do we play band and burst firecrackers creating nuisance to the society?

How long will our public servants and police continue taking bribes for the work they are paid regularly every month?

How many more children will we produce in our jam-packed country? Why do we keep producing more and more children until we give birth to a baby boy though we do not have money enough to nourish even one child? Why do we become sad on giving birth to a baby girl? Why are we so much passionate about having a baby boy?

Why do we elect the same corrupt and inefficient leaders repeatedly though they have made our life miserable?

Why do we cheat customers even for a very small amount?

Why do we not follow discipline in a queue or in the traffic and stop chaos? Why do we not respect rights of other citizens?

How do we believe that the almighty God will be delighted by butchering a living animal in front of him?

Don’t we feel that it is hypocrisy to protest against USA for attacking an alien country and, at the same time, welcome Pakistan president Musharraf despite its involvement in killing our own citizens?

Since our childhood, we seriously learn a lot about the history and geography of many countries in the world. This knowledge is not necessary for most of the students. Our children know more about countries like UK, USA etc. than the citizens of those countries do. At the same time, most of us know a very little about many regions in our country (e.g. North East states). Why do we waste our children’s precious time by forcing them learning history and geography of the world without learning much about our own country? Is it not symbol of mental slavery?

Why do our national airlines strive to provide excellent service to foreigners and ignore our own citizens?

Why do we have separate laws for citizens of different religions?

Why do we elect a foreign-born citizen when none of the other countries in the world allows a foreign-born national to lead their country?

Why do we adulate foreigners with white skin and hate our own compatriots? How long we will keep alive the mental slavery of the white skin?

Why do we continue electing senile and physically unfit leaders fully knowing that they are unable to care of even themselves? Why is absolutely no qualification required for becoming a politician? How can one become a minister of a portfolio without any specific knowledge on it? Why is there no age bar in politics while in all other fields people have to take retirement after reaching certain age?

Why do our police officers torture innocent citizens and shield criminal politicians?

Why do we get pathetic roads and poor public services despite paying taxes? Why only a few citizens have to pay income tax while many other affluent citizens are absolved from it?

Are we not aware that fire crackers create humongous air and sound pollution? Why do we play music on loud speakers denying peace to others?

It is often said that the people deserve the government they get. Do we really deserve the governments we got so far?

Why are we considered most hypocritical in the world? Will we ever change?

Jai Hind! Vande Mataram! Bharatmata Ki Jai!



Lopamudraa
Wednesday, September 20, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Why do we try to forget our own mother tongue and adopt an alien language? >>>>
मला हे कळले नाही?...दिवे घे...!!!

Soultrip
Wednesday, September 20, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, मायबोलीवर स्वागत!
What she means is you should write in devnaagari script.
दिवे घे is kind of translation of 'take it lightly' :-)

देवनागरीत लिहिणं फार सोपे आहे. It is easy, intuitive. You can learn in couple of days.

Satishmadhekar
Wednesday, September 20, 2006 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठीत कसं लिहायचं ते माहित नव्हतं. पुढच्या वेळी लिहीन.

Swa_26
Wednesday, September 20, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच लोपामुद्रा, मलाही सगळ्यात आधी हाच प्रश्न पडला....

पण वरील सर्व तितकेच खरे आहे हे मान्य करायला हवे. आणि मला वाटते की या सर्वाचे कारण म्हणजे आपण भारतीय लोकांची स्वकेंद्रित व्रुत्ती आहे. इथे कोणीही स्वत:च्या पलीकडे पाहूच शकत नाही. कोणत्याही बाबतीत "मला काय त्याचे?" हिच व्रुत्ती असते. स्वत्:cया पलीकडेही आपला देश, समाज, असे काही असते याची जाणीव नसणे हेही यामागचे एक कारण असू शकते. (आपत्तींच्या वेळी केली जाणारी मदत हा एक अपवाद होऊ शकेल कारण त्या वेळची सामजिक जाणीव ही तेवढ्यापुरतीच असते.)


Lopamudraa
Wednesday, September 20, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि दुसर्‍या देशात गेल्यावर जेव्हा लोकांचे वागणे दिसते ना तेव्हा वाटत त्याना लोकशाही जास्त कळलिये..!!!

Moodi
Wednesday, September 20, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अबबब! मोठी लिस्ट बनवलीय, नंतर वाचावी लागेल. btw आजकाल भारतीय आणि भारत यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बीबी का उघडले जातायत?

Satishmadhekar
Wednesday, September 20, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यामधील काही चुका कळत-नकळत माझ्या हातून सुद्धा घडलेल्या आहेत. चूक केली तरी काही शिक्षा होणार नाही या खात्रीने असं झालं असेल. परंतु एकंदरीत भारत सुधारणं फारच अवघड आहे असं वाटतं.

Aschig
Wednesday, September 20, 2006 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi, I think the reason is that people are getting conscious of how important it is for not only others to look up to us, but also for ourselves to have self-respect. It is a welcome sign and indicates that people are actually spending some time thinking.

Moodi
Wednesday, September 20, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिष तुमचे बरोबर आहे, पण काही वेळेस असे वाटते की अशी जाग यायला आपल्याला दुसर्‍या देशातच का जावे लागते? आपलेच लोक सुरुवात का नाही करत? एक उदाहरण सांगते, खरे आहे, माझ्याच नवर्‍याच्या समोर घडलेले.

माझ्या नवर्‍याच्या ऑफिसमधले ३ तेलगु सहकारी भारतात महिन्याच्या सुट्टीवर गेले. त्या आधी ब्रिटन पाहुन प्रभावीत झालेले हे लोक भारतातल्या अकार्यक्षमतेवर, बेशिस्तीवर आणि बर्‍याच गोष्टींवर नेहेमी चर्चा करायचे. जातांना हे तिघे भरपूर भेटवस्तु वगैरे घेऊन गेले. महागड्या इलेक्ट्रॉनीक गोष्टी वगैरे. नंतर जेव्हा आले तेव्हा फुशारकी मारायला लागले की कष्टमला थोडे पैसे किंवा काही गोष्टी(पर्फ्युमस वगैरे) चारुन कसे त्या कचाट्यातुन सुटले आणि भारतीय म्हणजे भारतीय कष्टम ऑफिसर्स कसे लाचखोर आहेत वगैरे. मग माझ्या नवर्‍याने एकच प्रश्न विचारला की तुम्ही जर तुमच्या वस्तू सोडवण्याकरता टॅक्स वगैरे भरण्या ऐवजी म्हणजे कायद्यानुसार वागण्या ऐवजी त्यांना लाच दिलीत मग तुम्ही तितकेच दोषी नाही का? त्यांचे चेहेरे एकदम पहाण्या लायक झाले, तोंडुन आवाज नाही. आता ते प्रोजेक्ट संपल्याने ते लोक गेले भारतात. पण बघा असे कित्येक किस्से सापडतात, अन मग भारत किती भ्रष्ट आहे, कशी लाचखोरी आहे असे आपल्याला ऐकायला मिळते.

माझ्या घरचे म्हणतात जर दुप्पट टॅक्स भरणे आपल्याला शक्य नाही तर वस्तू भारतातच घ्याव्यात, पैसे साठवले म्हणजे झाले.


Yogibear
Wednesday, September 20, 2006 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> पण काही वेळेस असे वाटते की अशी जाग यायला आपल्याला दुसर्‍या देशातच का जावे लागते? आपलेच लोक सुरुवात का नाही करत?


जाग केव्हा येते? ह्या गोष्टींवर विचार केव्हा केला जातो? आणि खर तर ह्या गोष्टींकडे विचार करण्यासाठी तुमच्या कडे देशात वेळ असतो का?

देशात बहुतौशी मंडळींचा दिवस घर आणि ऑफ़ीस ह्यातच संपतो. जर वेळ उरलाच तर ह्याची बिलं भरा, त्या लाइन मधे उभे रहा, इथे admission घ्या, तिथे जाउन complaint करा ह्यातच जातो. त्यात परत भाजी मर्केट, TV बघणे, जमलेच तर देवळात जाणे, २-४ लोक भेटलिच रस्त्यात तर त्यांना कटवणे ह्यात जातो. रत्री गादी वर निजताना पुन्हा दुसया दिवशीच्या व्यापाची आठवण होउन माणुस झोपी जातो.... असच तुम्ही परेदेशात असताना घडत का? जेव्हा सुखसोयी उपलब्ध होतात, जेव्हा मुळ गरजा भगतात, जेव्हा पोट भरलेले असते आणि जेव्हा तारेवरची कसरत करावी लागत नाही तेव्हा मग आपण ह्या वर विचार करु शकतो...

मला असे मुळीच सुचवायचे नाहिये की कोणि काही करु नये, केवळ एक प्रयत्न की देशात असे का घडत नाही ह्याचा शोध घेण्याचा...


Moodi
Wednesday, September 20, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं! शक्यता आहे योगी. परदेशात सगळी कामे आपल्यालाच( म्हणजे जो कुणी परदेशात जाईल त्याला) करावी लागतात. हाताशी अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध असतात, ९ ते ६ हा कामाचा वेळ आणि जर ऑफिस लांब असेल तर ड्रायव्हिंगचा वेळ सोडला तर तसा आरामच असतो. मी नोकरी करुन घर सांभाळणार्‍या स्त्रीयांबद्दल बोलत नाहीये नाहीतर त्यांचे गैरसमज व्हायचे.

भारतात अजूनही कुटुंब व्यवस्था, शेजारी, सण समारंभ अशा बर्‍याच गोष्टीत हजेरी तर परदेशात आपण एकटे, कुणाकडे फोन केल्याशिवाय जाणार नाही. अशा कारणांमुळे परदेशात आल्यावर हे विचार करायला वेळ मिळत असेल. विचार आहे चांगला पण अंमलबजावणी( भारतात गेल्यावर) किती होतेय ते बघायचे.

पण असेही लोक बघीतलेत की जे घर आरश्यासारखे लख्ख ठेऊन कचरा मात्र शेजार्‍याच्या दारात फेकतात, वस्तुस्थिती आहे ही. जोपर्यंत हे लोक मी आणि माझे घर असाच विचार करतील तोपर्यंत मला नाही वाटत भारतातही परदेशासारखी स्वच्छता येईल. भारतात काही ठिकाणी पाहीले तर अगदी छोटी छोटी गावे स्वच्छता अभियान राबवुन गाव नेटके ठेवतात आणि मुंबई पुण्यासारखी शहरे बघीतली तर वाईट वाटते.

काही जण असे म्हणतील की परदेशात राहुन मग भारतातल्या अस्वच्छतेला नाक का मुरडता? हे नाक मुरडणे नाहीये तर उलट असे वाटते की याच घाणी आणि कचर्‍यामुळे आपल्या लोकांचाच जीव धोक्यात येतो. मग नदीनाले आणि समुद्र त्यांची मर्यादा सोडतात, कारण आपणच ते दुषीत करतो. काय होईल माहीत नाही, अजूनही मुंबई पुण्यात तेच आहे.


Lopamudraa
Wednesday, September 20, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी.. छान मांडल...!!!... .. ... ...

Deshi
Wednesday, September 20, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत आपण ती सिस्टीम स्विकारतो म्हणुन काहीच वाटत नाही.
पण वाक्य चुक आहे की बाहेरच्या देशात आल्यावरच जाग येते. भारतात अनेक लोक आहेत की जे प्रसिध्दीच्या झोतात न येता सामजीक कार्य करतात.

आपण फक्त चर्चाच करतो, फार कमी लोक खरे काम करतात हिच खरी मेख आहे. मुडी ने उदा दिले ते योग्य आहे.

आशीश तुम्ही जे लिहिले ते पटले, देशावर चर्र्चा करणे जरुरी आहे.

हे स्र्व बदलन्यासाठी आपण त्या सर्वांचा भाग झाले पाहीजे. माझे आइ वडील, काका भारतात असतात.माझे काका मजदुर संघाचे कार्य करतात आता तरि मी माझ्या काकांच्या पाठीमागे पडलो आहे की येत्या ईलेक्श्न मधे नगरसेवक म्हणुन उघे रहा. कदाचित ते हो म्हणतील. मला असे सांगायचे आहे की we have to be active part of the system to change it .
ही सुरुवात असेल. अशी अनेकांई केले तर जे खरच avg भारतीय आहेत तेच भारताला बदलु शकतील असे वाटत आहे.


Shaileshkm
Thursday, September 21, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशि, तुम्च्या काकाना जरुर प्रोत्साहित करा. राज्कार्णात चान्ग्ली माण्स शिर्ल्याशिवाय परिस्थिति सुधार्ण कठिण आहे. एकाचे यश बघुन दुसर्याला स्फुरण चढेल.

Swa_26
Thursday, September 21, 2006 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशी, खरंच मला तुमच्या काकांचे म्हणणे पटले.
आपल्याकडे स्वातंत्र्यचळवळीनंतर देशासाठी काही करावे ही भावनाच कुठेतरी लोपत चालली आहे. तो मक्ता केवळ सैन्यातील जवानांनीच घ्यावा अशी स्वत्:च्या सोयीची समजूत सगळ्यांनी करुन घेतली आहे. त्यातून तरुणांनी तर राजकारण या शब्दापासून पाठच फिरवलेली दिसतेय. याबाबतीत मला अलीकडच्याच 'युवा' या चित्रपटाचे उदाहरण द्यावेसे वाटतेय. त्यात असे दाखवले आहे कि आपल्याला जर आपल्या देशासाठी काही करावेसे वाटत असेल तर आपण प्रथम लोकांचा विश्वास संपादन करुन मग निवडणूक लढवावी.
मला माहीत आहे कि हे तितकेसे सोपे नाही, पण अशक्यही नाही आहे. स्वातंत्र्यचळवळीचेच उदाहरण घेतले तर समजणे जास्त सोपे जाईल. त्यवेली जशी तरुणांनी राजकरणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली म्हणूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले.
आपल्या युवाशक्तीला आज गरज आहे ती एका खंबीर आणि द्रष्ट्या नेत्रुत्वाची


Ruma
Thursday, September 21, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांनी खूप छान लिहिले आहे.. पण मला नेहमी प्रश्ण पडतो की राजकारणात आपण सहभागी झालो तरच आपल्याला परीस्थीती बदलणे शक्य आहे अस आहे का? हां त्याचा फायदा नक्की होउ शकतो.. पण त्या शिवाय पण आपण काही करू शकतो का..

साध उदाहरण द्यायच झाल तर नेहमीचाच येणारा प्रश्ण आहे.. सिग्नल असताना किती जण तो सुटे पर्यांत उभे राहातात.. आनि ठीक आहे उभे राहात पण असतील पण आपल्या शेजारून कोणी तो तोडाय्चा प्रयत्ना करत असेल तर कोणी त्याला किंवा तिला सांगायचा प्रयत्न करत का कि सिग्नल सुटेल तेव्हा जा.. अर्थात आईकणे न आईकणे ज्याच्या त्याच्या हातात आहे.. पण आपला प्रयत्ना म्हणून कोणी हे करत का.. माला वाटत अस सांगीतल तर निदान चारातला एक तरी थांबेल..

तूम्हाला काय वाटत...


Satishmadhekar
Thursday, September 21, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पूर्वी काही वेळा लाल सिग्नलला थांबायचा प्रयत्न केला होता. परंतु मागचे लोकं लालवरच जायला सांगतात आणि तुम्ही नाही गेलात तर घाण घाण शिव्या देतात. म्हणून मी शक्य असेल तरच थांबतो, नाही तर जावेच लागते. तुम्ही प्रयत्न करून बघा आणि अनुभव घ्या.

Aschig
Thursday, September 21, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीश, अशाचवेळी teflon चा वापर करायचा असतो. शिव्या काही चिकटत नाहीत अंगाला. दिवा लाल असेपर्यंत त्याकडे बोट दाखवायचे आणी थांबायचे.

Lopamudraa
Thursday, September 21, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश मी घेतलाय हा अनुभव.... पण मी काही सोडत नाही थांबणे...!!!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators