Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 10, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Reservation in Private Sector » Archive through July 10, 2006 « Previous Next »

Kedarjoshi
Saturday, July 08, 2006 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग वैचारिक मागासलेपण कशा मुळे जाते?
मान्य आहे की शिक्षणाने माणुस संस्कृत बनतो सुसंस्कृत नाही पण काहीच नसेल तर शिक्षण त्याला सुसंस्कृत बनवायला व सदसदविवेकबुध्दी जागवायास मदत करेल असे वाटते.

imbalance
शिक्षणाने नोकरी मिळते, नोकरी असेल की पैसा मिळतो. दरिद्रीपण संपते.

योग्य.
पण शिक्षण घ्यायला तर public तयार पाहीजे. मागे मी एक लेख वाचत होतो त्यात असे लिहीले होते की १० वि पर्यंत ३० टक्के विद्यार्थी गळतात. आता मला सांगा ते का गळतात? की सरसगट सर्वांना १० वि पास करायचे.
मुद्दा शिक्षणाचा आहे. आरक्षण देन्यासाठी आरक्षित लोक तर पाहीजेत. तेच जेथे नाहीत तेथे भले तुम्ही ७० टक्के आरक्षण द्याल ते फायदयाचे नाही.
मागे लिहील्या प्रमाने १० १२वि पर्यंत मोफत ( economic condition वर) शिक्षन उपलब्ध करुन दिले आहे ( EBC form ) त्याचाही वापर केला जात नाही वर नुसते आमच्यावर अन्याय झाला अशी ओरड केली जाते ते चुकीचे आहे.

कित्येक योजना आहेत त्यांचा फायदा का केला जात नाही? कारण त्या आहेत हे त्या समाजा पर्यंत व्यवस्थित पोचविले जात नाही. त्यांचा ह्या परिस्तिथीचे राजकारण केले जाते.

आरक्षण मुद्यावर वैचारीक दिशाभुल म्हनुन होत आहे.

जे विरोध करत आहेत त्यांना हे लक्षात येत नाहीये की जरी खुप जागा reserve केल्या तरी त्या परत रिकाम्या राहानार आहेत. व ११ महीन्यासाठी परत एकदा open लोक तेथे येतील. व ते ओपन मध्ले आहेत म्हनुन त्यांचावर अन्याय झाला तरी राजकारनी काही करनार नाहीत. कारण राजकारणी कोनासाठीच काही करत नाहीत. मताचे राजकारण चालु ठेवले तरच ते निवडुन येऊ शकतात.

anyway मी माझेच मुद्दे परत रिपिट करत आहे.


Shravan
Saturday, July 08, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मी एक लिन्क देत आहे. सगळ्यानी जरुर वाचा.
हा लेख डॉ.गोविन्द स्वरुप यान्चा आहे. सायन्स ऑफ टिचिंग.
सरकारी शैक्षणीक संस्था मध्ये आरक्षणावरुन बरेच वादळ उठले असताना त्यानी त्यावर सुचविलेला उपाय अत्यंत उत्तम व योग्य आहे.
अर्थात हा शैक्षणीक संस्थाच्या आरक्षणाबाबत आहे. थोडे विषयांतर होइल पण या सुवर्णमध्यातील उपायामुळे कदाचित इथल्या विषयालाही दिशा मिळू शकेल.
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1661074.cms

Peshawa
Saturday, July 08, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाइ आग्रह दाखवल्या बाबत आभार माझी मते दुषित आहेत हे conclude केल्या बद्दल सत्कार! माझ्या कुठल्याहि post मधे मी reservation ह्या मुद्द्यव्यतिरिक्त काहि बोललेलो नाही. भाशे बाबत म्हणाल तर ग्रेस म्हणतात तसे तिच्या नाकात तिरकसतेची वेसरबिंदी जन्मापसून आहे दुर्लक्श करा मुद्द्याला उत्तरे देता अले तर बघा...

आणि सुचना नव्हे विनन्ति करत चला ह्या पुढे सुसंस्कृत व्हायला विचारावर ठाम विश्वास नाही तर विश्वास बसलेल्या विचारांना second guess करण्याची कुवत लागते...

पुन्हा एकदा चर्चे कडे... जे मुद्दे मी वरती लिहिले ते माझे प्रष्ण नाहीत... तर आरक्षण संबंधित तुमच्या वेगवेगळ्या post मधुन आलेली समर्थने( ध्वनित होणारि समर्थने) आहेत... मी पुन्हा list केलि इतकेच अर्थात त्यावर्चि तुमची उत्तरे वाचुन जरा confusion आहे

जरा जमले तर एक यादिच द्या कि समर्थनाचि.. मी अधि हे लिहिले आहे असे न सांगता लिष्ट द्या




Lokhitwadi
Sunday, July 09, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पेशवे, नेमका हाच प्रयत्न मी करुन पहिला. अपेक्षा एवढीच होती, की लालभाई एकदा तरी अपले सर्व मुद्दे बिनचूकपणे व्यवस्थित क्रमवारीने मान्डतील, जेणेकरुन सर्व मुद्यान्चा खल करुन काय बरोबर काय चूक ठरवता येईल. पण, या सर्व चर्चेतून एकदाही लालभाईन्नी आपले मुद्दे बिनचुक मान्डले नाहीत. कायम मागे लिहिले आहे म्हणतात आणि मागे पहावे तर इतर दुसर्‍याच मुद्याची चर्चा करताना त्यान्नी लिहीलेले असम्बद्ध आणि असन्दर्भ लिखाण सापडते. मी त्यान्ना सान्गून पाहीले की, कृपया तुमचे उत्तर परत paste करा. पण त्यान्ना ते पटत नाही. त्यामेळे त्यान्च्या विचारान्वर चर्चा सम्भवत नाही. म्हणून आपण प्रश्न विचारावे तर तसेच ते कधीच मुद्देसूत उत्तरे देत नाहीत, उलट प्रश्न तुम्हाला आहेत तुम्ही उत्तरे शोधा अशी उत्तरे देउन पळवात काढतात. त्यान्च्यातल्या या कमतरतेमुळे (की जाणूनबुजून) त्यान्च्याशी वाद घालता येत नाही आणि चर्चा करता येत नाही. परीणामत्: शेवटी नुसतीच व्यक्तीगत चिखलफेक होते, जो की आपला मुळ उद्देशही नसतो.

वैयक्तीक विचाराल तर प्रथम मला वाटले की लालभाई त्यान्चे विचार मान्डतील आणि आपलेही थोडे प्रबोधनही होउ शकेल. पण लालभाई त्यावरही विश्वास ठेवयला तयार नाहीत. अशा माणसाशी वाद्चर्चा ती काय करणार?


Waatasaru
Sunday, July 09, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>अशा माणसाशी वाद्चर्चा ती काय करणार?
मला असे वाटते की वादचर्चा अश्याच माणसबरोबर करणे अधिक बरोबर ठरेल,
राजकारणी लोकांप्रमाणे



Laalbhai
Sunday, July 09, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग वैचारिक मागासलेपण कशा मुळे जाते?

हा फारच कळीचा मुद्दा आहे केदार. तो शिक्षणाने जात नाही इतके खरे.


Shravan,

Thanks for sharing nice article. I know this gentleman peronally very well. Very sharp and soft-spoken.

Ways he has suggested are very innovative. The Central Government should immediately implement a prototype of his suggestions.

I would not say this as an alternative, but additional way to bring up number of educated people in the country. This way, if implemented and executed properly, can be very effective and efficient.



Chingutai
Sunday, July 09, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Well Said..... विश्वास बसलेल्या विचारांना सेकंड गेस करण्याची कुवत लागते
......व्वा क्या बात है पेशवा!!!

-चिन्गी


Aashu29
Sunday, July 09, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय झाले लालभाइ? पेशवा यांच्या परखड प्रश्णाला बगल दिलि वाटते तुम्हि?कि सुचत नाहिये आता काहिच?
आमच्या सोसायटितहि असेच काहि लोक आहेत कि ज्याना वाटते कि सुन्दर भाशेत बोलण्याच्या आपल्या कसबाने लोक मुळ मुद्दा विसरुन जातिल!!

Aschig
Sunday, July 09, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lalbhai, rather than granting fixed reservations across the board, do you have any inkling as to which sectors they may be most beneficial in? I think most people object to the fact that they are being granted everywhere. I am sure it could be done in a staggered way or in a differential way, but do not have a feel for it. What is your opinion?

Laalbhai
Sunday, July 09, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aschig,

Good point. But I am unable to tell you what is being discussed at higher level.

But as far as my guess and opinion goes, manufacturing sector should be first target. In such industries jobs, not only as workers, but supervisors, foreman etc should have been some percentage of reservations.
Other than that, in administration fields, accountancy fields (mostly clerical jobs) can be brought under such schemes.
Again, jobs with differet skills are required like IT etc can be considered. But that may need separate planning. Experts can comment on that.

These are totally my peronal opinions and as far today, I am not sure what is been discussed and how these reservations will be implemented. We need to wait and watch what approach the experts' committee is taking.


Kedarjoshi
Sunday, July 09, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग वैचारिक मागासलेपण कशा मुळे जाते? >>>
हा फारच कळीचा मुद्दा आहे केदार. तो शिक्षणाने जात नाही इतके खरे. >>>


लालभाई,
ह्या मुद्यावर प्रकाश पाडा. फक्त येवढे उत्तर अपेक्षित नाही. कारन हे उत्तर नाही. मला व येथे वाचनार्‍यांना देखीले ते कळेल.


Laalbhai
Sunday, July 09, 2006 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
या मुद्द्याची चर्चा इथे करण्याचे कारण कळले नाही? कसा संबंध आहे या चर्चेचा?

पण वैचारिक मागासलेपणा "जातो" किंवा "घालवता येतो" असे मला वाटत नाही. मुळातच तो असतो किंवा नसतो. प्रयत्नाने तो घालवता येत असता तर समाजसुधारकांची जी चळत आपल्या इतिहासात मांडून ठेवली आहे, तिचा थोडातरी उपयोग झाला असता, नाही का? :-)


Kedarjoshi
Sunday, July 09, 2006 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,

आपणच तसे पेशव्याच्या एका पोस्ट च्या उत्तरात तसे लिहिले म्हनुन मी हा प्रतीप्रश्न केला.( पेशव्याने जे मुद्दे तुम्ही आत्तापर्यंत मांडले ते एका पोस्ट मधे लिहीले आहेत. तुमचेच मुद्दे व त्यावर तुमचेच उत्तर मी फक्त त्यातील एक मुद्दा उचलला.
असो थोडे विषयांतर झाले असे वाटत असेल तर OK आपण पुढे जाउयात.

मागे मी तो मुसलमानांचा मुद्दा या साठी मांडला की

१. रिझरवेशन वाले पुर्ण भारतीय जनतेचा विचार करत नाहीत. त्यांना तो करायचा नाही असे वाटते कारण मुसलमान, शिख, सवर्नांतील गरिब जनता ( तुम्हाला पटो वा ना पटो, सवर्नात देखील गरिब असतात) ह्यांना वार्यावर जरी सोडले तरी फारसे काही बिघडत नाही हा समज झालेला दिसतोय.

२. ९५% टक्के फक्त आर्थीक दृष्ट्या संपन्न सर्वणच कमवु शकतात अशी जी सार्वत्रीक घारना आहे ती चुकीची आहे. ( माझ्या १० वि च्या बैच च्या वेळेस मंगेश म्ह्सकर हा महाराष्ट्रातुन पहीला आला होता तो मागासवर्गीय आहे. अगदी बाबासाहेंबा प्रमाने दिव्याच्या उजेडात अभ्यास करुन तो पहीला आला. ही अपेक्षा सर्वांकडुन नाही पण निदान पास तर सर्व जण होउ शकतात, शिक्षन घेने सुरुवात तर करु शकतात.

३. सर्व भारतीय जनतेचा विचार केला तर आरक्षण देने किती चुक आहे ते पहा.
दलीत ओबीसी येसीयेस्टी समाज साधारन ५० टक्के (पुर्ण लोकसंखेच्या)
सवर्ण साधारण २० २२ टक्के (मराठा, ब्राम्हण, यादव, ठाकुर, गुज्जु, मारवाडी ई)
मुसलमान १७ ते १८ टक्के
ईतर धर्मीय १० टक्के
आता दलींता पैकी किती जण शिक्षीत आहेत, साधारण १० ते १५ टक्के टक्के ( म्हनजे लोकसंखेच्या ६ ते ७ टक्के) म्हन्जे तुम्ही ५० टक्के जागा ७ ते १० टक्क्यांसाठी ठेवताय. हा सवर्ण व अन्य घर्मीयांवर अन्याय नाही का?
ता.क ही टक्केवारी अगदी करेक्ट नाही पण रिप्रसेंटीव्ह आहे.

लक्षात घ्या आरक्षण द्यायला येथील लोकांचा विरोध नाही ते किती व कसे द्यायचे याला काही निकष असावेत.

आपल्याला समर्थ भारत करायचा आहे लुळा पागंळा नाही. जातीय आरक्षणाच्या कुबड्या घेतल्या तर तो लुळा होईल, पण आर्थीक आरक्षण दिले तर सर्व जाती धर्मांना ते वापरता येईल.





Kedarjoshi
Sunday, July 09, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आरक्षणवादी नेत्यांना एवढेही कळत नाही की दुसर्‍यांचे विचार ऐकावेत, लगेच परीसंवाद देखील उधळुन लावन्यासाठी गर्दी केली.
शेवटी धर्मासारखी आरक्षण ही पण एक अफुची गोळी आहे.

http://loksatta.com/daily/20060709/mp10.htm

Limbutimbu
Monday, July 10, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्गुताईला हार्दीक अनुमोदन! :-) (पेशवा? तुलापण गहन आशय वगैरे सान्गत असलेली वाक्य टाकता येतात की!)
केदार, वैचारीक मागासलेपणा शिक्षणाने जात नाही हे लालभाईने मान्य केले... मला आश्चर्य वाटले!
मला काय वाटले ते बाजुला राहुदे!, खरा कळीचा मुद्दा हाच हे की वैचारीक मागसलेपण घालवायला कोणतेही शालेय शिक्षण उपयुक्त नाही हे तर चान्गल्याची "अनुकरण शीलता" हवी! अन नेमकी तीच अन्य जातीत भरीवपणे मला आढळुन येत नाही! (दोन मुद्दे हेत, अनुकरण शीलता हवी दुररे म्हणजे कशाचे अनुकरण करावे की नाही याची जन्मजात आक्कल किन्वा आइबापानी शिकवलेला नीरक्षीरविवेक हव) मी कुठेतरी अनुकरण शीलतेवर काहीबाही लिहिले होते, जमल्यास शोध अन मलाही सान्ग!
बर तर बर ज्यान्च अनुकरण कराव त्या सवर्णान्नाच खास करुन बामणान्ना शिव्या घालण्याच बाळकडू जे पिलेत ते काय अनुकरण करणार अन वैचारीक मागासलेपणा घालवणार? अन जोवर अनुकरण न करण्याचा उद्दामपणा किन्वा मुर्खपणा शिल्लक असतो तोवर कोणताच माणुसच काय, प्राणी देखिल स्वतःची प्रगती करवुन घेवु शकत नाही!
या ठिकाणी मला अकबर की कोणत्या बादशहाच्या काळातील गोष्ट आठवते! शास्त्रीय प्रयोग म्हणुन त्याने काधी तान्ही मुले मुली एकत्र पण मनुष्याच्या सम्पर्कात येणार नाहीत अशी ठेवली व ती वयात येइस्तोवरचे बदल बघितले! त्याचे निष्कर्ष भयानक हेत! माणसाचा किन्वा कशाचा सम्पर्क न आल्याने ती मुलेमुली जनावरान्पेक्षा भयानक घाणेरडे जीवन जगत होती! या गोष्टीचा सन्दर्भ इतकाच की इन्ग्रजान्च्या फुशीने हुरळुन जावुन किन्वा त्यान्ना सामिल होऊन ब्राह्मण द्वेष्टेपणाच्या राजकारणात सामिल झालेल्यान्नी समस्त सवर्णेतर समाजाला "अनुकरणापासुन" दूर रहाण्याची जी शिकवण दिली त्याचे परिणामस्वरुप म्हणुन नव्हे तर जाता जाता चुकुन दिलेली कबुली म्हणजे वरील वाक्य होय की "शिक्षणाने वैचारीक मागासलेपणा जात नाही"
(मी खात्रीने सान्गतो, वैचारीक मागासलेपाणाचा प्रतिवाद करताना ही लोक बामणी सन्स्कृत विधी आणि पुटपुटणे यावर उतरणार, उतरतात, त्या पलीकडे त्यान्नी बामण पाहिलेला नसतो, पाहिला तर समजायची कुवत नसते, कुवत असली तर चान्गल्याच ते अनुकरण करण्याची वैचारीक मागासलेपणामुळ कुवत म्हणा वा अक्कल म्हणा, नसती)
एनीवे, थोड विषयान्तर झाल्यासारख वाटतय.... मूळ मुद्दा रिझर्वेशन....
तुमच चालुद्या..!


Laalbhai
Monday, July 10, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. रिझरवेशन वाले पुर्ण भारतीय जनतेचा विचार करत नाहीत. त्यांना तो करायचा नाही असे वाटते कारण मुसलमान, शिख, सवर्नांतील गरिब जनता ( तुम्हाला पटो वा ना पटो, सवर्नात देखील गरिब असतात) ह्यांना वार्यावर जरी सोडले तरी फारसे काही बिघडत नाही हा समज झालेला दिसतोय.

केदार, जसे मी आधीच सांगितले की काही समाजांच्या गरजा यातून address होत नाहीत. त्यामुळे तुमचा एक मुद्दा काही अंशी खरा आहे. पण आपण मागेच चर्चा केली तशी EBC ची सोय असूनही त्याचा फायदा घेतला जात नाही किंवा गैरफायदा घेतला जातो. EBC चा फायदा कोणत्याही जातीधर्मातला मनुष्य घेऊ शकतो.

२. ९५% टक्के फक्त आर्थीक दृष्ट्या संपन्न सर्वणच कमवु शकतात अशी जी सार्वत्रीक घारना आहे ती चुकीची आहे. ( माझ्या १० वि च्या बैच च्या वेळेस मंगेश म्ह्सकर हा महाराष्ट्रातुन पहीला आला होता तो मागासवर्गीय आहे. अगदी बाबासाहेंबा प्रमाने दिव्याच्या उजेडात अभ्यास करुन तो पहीला आला. ही अपेक्षा सर्वांकडुन नाही पण निदान पास तर सर्व जण होउ शकतात, शिक्षन घेने सुरुवात तर करु शकतात.

माझ्यामते हाही मुद्दा आपण चर्चिला आहे. आणि अशा निष्कर्शास आलो की नुसती आरक्षणे देऊन भागणार नाही, तर आरक्षणांचा फायदा घेण्यासाठी जागृती आवश्यक आहे.

तुम्ही काम केलेले आहे. त्यामुळे "ही लोकं शिक्षण घ्यायला नाही म्हणतात" या आरोपात किती तथ्य आहे, आणि शब्दशः हा आरोप खरा असला तरी त्यामागे किती कारणे असतात, याची तुम्हाला कल्पना असेलच. या प्रश्नाचा तुम्ही वेगवेगळ्या बाजूंनी विचार केलेला असेल, त्यामुळे "शिक्षण घेणे सुरवात तर करू शकतात" या वाक्याचा फोलपणा तुम्हालाही कळून येईलच. :-)


तिसर्‍या मुद्द्यात तुम्ही ५० % आरक्षणाची बात केली आहेत. ती कोणती आरक्षणे? मला तर अशी ५० % आरक्षणे माहिती नाहीत. कृपया स्पष्ट कराल का?

लक्षात घ्या आरक्षण द्यायला येथील लोकांचा विरोध नाही ते किती व कसे द्यायचे याला काही निकष असावेत.

आपल्याला समर्थ भारत करायचा आहे लुळा पागंळा नाही. जातीय आरक्षणाच्या कुबड्या घेतल्या तर तो लुळा होईल, पण आर्थीक आरक्षण दिले तर सर्व जाती धर्मांना ते वापरता येईल.

जातीय आरक्षणांनी देश लुळा होईल हाच मुळात अपसमज आहे. एक लक्षात घ्या, मागे मी म्हटले तसे देशातून जात आणि धर्म यांचा tag जाणे सर्वस्वी अशक्य आहे. याला कारण जसे नेते आहेत, तसाच सामान्य लोकांच्या मनामनात भरलेला स्वजातीविषयीचा, स्वधर्माबद्दलचा वृथा अभिमान याला कारणीभूत आहे.(बाकी जाऊ द्या, मायबोलीवरच्याच असंख्य पोस्टांमधून हा वृथा अभिमान दिसून येतो. ते कसे नाकारणार?) त्यामुळे ही वस्तुस्थिती आपल्याला गृहित धरुनचे पुढे गेले पाहिजे. जातीभेद नष्ट करा, धर्मभेद नष्ट करा, याही मते मिळवण्याच्या या केवळ मते मिळवण्याच्या गोष्टी आहेत.

जातीवर आधारित आरक्षणांनी देश दुबळा होतो, ही अजुन एक आवई आरक्षणविरोधी लोकांनी उठवलेली आहे.

आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या असे तुम्ही म्हणता तेंव्हाच EBC चा फायदा घेतला जात नाही, अशीही तक्रार करता. :-)

यावर आपली चर्चा झालीच की आरक्षणांच्या जोडीला जागृतीही हवी. शिक्षणाचे फायदे काय आहेत, हे समजले पाहिजे.


Laalbhai
Monday, July 10, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
भारतात प्रत्येक गोष्टीचेच राजकारण होते. तसे आरक्षण मुद्द्याचेही होते आहे. म्हणून तो मुद्दा चूक नाही.

आणि शालिनीताई किंवा पासवान ही लोकं काय करतात आणि काय बोलतात, यावर आपण काही ठरवावे अशी परिस्थिती आहे का? मला तर वाटते की खर्‍या परिस्थितीचे भान त्या लोकांपेक्षा तुम्हालाही जास्त असेल, कारण तुम्ही काम केले आहे. :-) so let's leave those guys apart.

धर्म अफूची गोळी असूनही तुम्ही तो सोडून द्यायला तयार नाही, मग आम्ही आरक्षणे का सोडावीत?:-)
~D

Santu
Monday, July 10, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु
इन्र्गजांच्या फ़ुशि मुळेच आंबेडकर पण त्यांच्या नादाला
लागले होते.व ब्रिटिश धार्जिणे बनले होते.
व स्वातंत्र्या लढ्यास पण आडकाठि करत होते.

केदार
परिसंवाद उधळुन लावणे त्यांना या जन्मात
जमणार नाहि. कारण गावागावात जो शालिनीताई च्या सभांना
जबरदस्त पाठिंबा मिळतोय.
हि एकटि बाई सगळ्या आरक्षण समर्थकांना पुरुन उरलिय. हे समर्थन पाहुन साहेबाची पण पुंगी टाइट झालीय


Avinashi
Monday, July 10, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धर्म अफूची गोळी असूनही तुम्ही तो सोडून द्यायला तयार नाही, मग आम्ही आरक्षणे का सोडावीत? ~D>>>>>

हा धर्म.. सगळीकडे दिसुन येतो.. निदान माय्बोल्वरच्या post मध्ये दिसनार नाही... याची अपेक्षा बाळगायला हरकत नव्हती.
लाल्भाइ तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत पण आधी सगळ्या पोस्त वाचतो मग लिहितो...(बरेच दिवस बाहेर होतो)
मागे मी ललित वर तेच ते असे काहिसे लेखन वाचले.. त्यातल्या लिहिणार्‍या बाई ने ज्योतिबा फ़ुलेंच्या भाशेवर.. जोक केलाय.. म्हणजे ज्या ज्योतिबा फ़ुलेंनी सर्व स्री जातीसाठी स्वताचे आयुश्य वाहुन घेतले.. त्या माणसावर या बाईने टीका केली करण मला तरी हेच दिसत.. ती नक्कि सवर्न समाजातिल असावी.. तीला अनुमोदन अजुन दुसर्‍या स्रीनेच दिले.. आहे. त्याला विरोधात एकाही मानसाने उत्तर दिले नाहि.म्हनजे ज्योतिबा फ़ुले झाले ना आयुश्या वाहुन त्यान्च्याच जातीचे... आनि ह्या तिमकी वाजवनार्‍या वर्च्या जातीच्या म्हनुन यांना कोनाबद्दलही काहीही लिहिण्याचा अधिकार आहे का?
असो. हे असेच चालत आलेय असेच चालत राहनार.


Gs1
Monday, July 10, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


केदार, छोटी दुरुस्ती : मंगेश म्हसकर हे अत्यंत गरिब परिस्थितीतून वर आलेल्या सवर्णाचे उदाहरण आहे.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators