Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 06, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » अनुदिनी अनुतापे तापलो रामराया- जपानमधील आत्महत्येचे प्रमाण » Archive through July 06, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Wednesday, July 05, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उमेद सम्पली, सातत्यपुर्ण येणारी अपयशे पचवायची ताकद सम्पली की माणसे आत्महत्या करीत असावीत!
दुसर्‍या प्रकारात, जगण्याचे उद्दिष्टच नष्ट झाले किन्वा दिसेनासे झाले तरीही माणसे आत्महत्या करीत असावित
तिसर्‍या प्रकारात आत्यन्तीक अहंमन्यतेला ठेच लागल्यास येणार्‍या निराशेपोटी माणसे आत्य्महत्या करीत असावित!
चौथ्या प्रकारात, जन्म माझ्या हातात नाही, कसे जगावे हेही माझ्या हातात नाही मात्र मृत्यु तरी माझा मीच घडवुन आणिन या टोकाच्या स्वत्व जपायच्या हुकुमी विचारसरणीतुन माणसे आत्महत्या करीत असावीत! :-)
(या व्यतिरिक्तही आत्महत्येची तत्कालीक व्यतिगत अन सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळी कारणे असु शकतील, सगळ्याच कारणान्चे इमॅजिनेशन मी करु लागलो तर.... बापरे, कल्पनाच करवत नाही!)
(कृपया वरील विवेचनात कोणाला काही गहन वगैरे आशय सापडलाच, तर तो दुर्लक्षित करावा! काहीतरी गहन आशययुक्त क्लिष्ट असे सान्गण्याचा माझा उद्देश नाही!)


Bee
Wednesday, July 05, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

“स्वेच्छामरणाला” सुद्धा माझा खरंतर तात्विक विरोध नाही,

रैना, का विरोध नाही तुझा ह्याला.. मरणारा मरतो पण मागे सावरायचे खूप काही सोडून जातो. देवाज्ञा झाली की माणसाला मरण येतेच पण असे हे जीव देऊन वर जाणे म्हणजे समाजाला, घराला, संपूर्ण घराण्याला त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात. तेंव्हा माझा तरी आत्महत्येला प्रचंड विरोध आहे. माझ्यामते आत्महत्या करणारी व्यक्ती एकतर दुबळी असते किंवा तिची सहनशक्ती संपलेली असते. पण तरीही मरणे हा त्यावर ईलाज नाही. दुसरीकडे कुठे तरी पळ काढावा पण नको ते जीव देणे.. आता भारतात शेतकरी जीव देत आहेत पण त्यांच्या कुटुम्बाचे हाल कोण बघेल हा प्रश्न किती भेडसावणारा आहे..

Giriraj
Wednesday, July 05, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,स्वेच्छामरणाला तुझा विरोध नही की रैना चा?मला ते वक्य सपडत नाहिये.. पण ते वक्य रैनचे आहे असे वाटते... तुझ्या लिखाणावरून तरी

स्वेच्छामरणाबद्दल तुझा कहितरि गैरसमज होतोय.. स्वेच्छामरण म्हणजे आत्महत्या नव्हे.


Bee
Wednesday, July 05, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते वाक्य तुला तिच्या पहिल्याच पोष्ट्समध्ये, मध्ये कुठेतरी आढळेल. स्व ईच्छेने घेतलेले मरण म्हणजे आत्महत्याच नाही का? ढोबळ मानाने त्याला आत्महत्याच मानावी लागेल. मी समाधी म्हणत नाही, समाधी घेणारी व्यक्ती वेगळी आहे पण विष प्राषण करुन, फ़ाशी घेउन, विहिरीत जीव देऊन, डाव्या हाताची नस कापून हे सर्व प्रकार जरी कुणी स्व ईच्छेने करीत असेल तरी त्याला आत्महत्याच म्हणता येईल.

Giriraj
Wednesday, July 05, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वेच्छामरण मला तरी वेगळे वाटाते...
एक उदाहरण आहे मधु दंडवते यांचं. ते काही देवस life support वर होते.सुधार्ण्याची शक्यता नव्हतीच. ते शुद्धीवर होते. तेव्हा त्यांनी स्वेच्छीने सगळ्या support system काढून घ्यायला सांगितले. असाच प्रकार जैनांमध्येही करतात म्हणे. अतिवृद्धत्वाला पोचलेले स्वेच्छेने अन्नत्याग आणि नंतर पाण्याचा त्याग करून मरण स्विकारतात. याला समाधी म्हणता येत नाही.
'दयामरण' हा प्रकार terminally ill असणार्‍या रुग्णांबाबत केला जातो. भारतात त्याला मान्यता नाही.दयामरणात रुग्णाच्या नातेवाईकांनी हा निर्णय घेतलेला असतो. जगण्याची शाश्वति नसते,आणि उपचार सोसवत नसतात शरीराला अश्या वेळी 'दयामरणा'चा उपाय असू शकतो.


Bee
Wednesday, July 05, 2006 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पटले... माझ्या बहिणीचे जेठ नुकतेच कोमामधुन गेलेत. तेंव्हा त्यांच्यावर अजुन पैसे खर्च करणे घरच्यांना परवडत नव्हते. Dr म्हणालेत काहीच उपयोग होणार नाही तेंव्हा घरी घेऊन जा आणि आरामात जाऊ द्या त्यांना आपल्या घरात. शेवटी तसेच केले. मला हा प्रसंग फोनवर ऐकूण सुन्न झाल्यासारखे वाटले.

Raina
Wednesday, July 05, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,स्वेच्छामरणावर- विद्या बाळांचे एक व्याख्यान सुमारे ९-१० वर्षांपूर्वी ऐकले होते. त्यानंतर मागच्या वर्षीचे ते Terry Schiavo प्रकरण- ह्या सगळयातून मला तरी Death with Dignity हे तत्व ब्-यापैकी पटतं.

दिनेश लेखन होतही असेल तरी भाषेच्या अडचणीमुळे फार सखोल वाचन नाही- इंग्रजी वृत्तपत्रांवर सगळी भिस्त-
कधी कधी असे वाटते की ही सगळी संस्कृती आपल्या अंगावरून नुसती वाहून चालली आहे.. Because of the language problem, you feel like a lot of culture is just passing you by.
नक्कीच सामाजिक प्रश्न समजला जातो. मधे एक आत्महत्येविरुद्ध कायद्याच्या बिलावर चर्चा सुरु होती parliament मध्ये....

संतू- म्हणजे आपले ८०-९० रुपये- पण आपल्या इथेही आता ते barista/ coffee day मध्ये काय भयंकर महाग coffee असते हो....

लिंबू- तुमचे म्हणणे एकदम पटले..




Raina
Wednesday, July 05, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीराज,
अगदी ! ह्या अन्नपाणी त्यागाच्या उपासाला बहुतेक "प्रायोपवेषण" म्हणतात..


Bhramar_vihar
Wednesday, July 05, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनोबांनी किवा शिवाजीराव पटवर्धनाणी प्रायोपवेशन करुनच देहत्याग केला होता

Bee
Wednesday, July 05, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यंतरी मी असे ऐकले की काही शास्त्रज्ञ संत ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थलाचे उत्खनन करुन त्यात शोध घेणार होते पण त्यांना कुणीच परवाणगी दिली नाही. मात्र किती कुतुहल वाटण्यासारखा आहे ना हा विषय.. मी जेंव्हा आळंदीला गेलो त्यावेळी तिथे फ़क्त एक काळा पाषाण ठेवला होता. तिथे जवळ एक मोठा रथ ठेवलेला आहे. तो खूप जुना रथ होता त्याची माहिती कुणाला आहे का?

Giriraj
Wednesday, July 05, 2006 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषय भरकटू देऊ नका....
चर्चा 'आत्महत्या' या प्रकाराबद्द्लच सिमित असू द्या.. नहि तर पुन्हा मॉडला काम पडायचे!


Bee
Wednesday, July 05, 2006 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो पण वर ह्या विषय भरकटण्याबद्दलही एक दोन वाक्ये आली आहेत. प्रत्येक पोष्ट्समध्ये आत्महत्या असली की झालं का. उगाच सदांकदा मॉड्सची धमकी :-(

Limbutimbu
Wednesday, July 05, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> प्रत्येक पोष्ट्समध्ये आत्महत्या असली की झालं का.

Psg
Wednesday, July 05, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं, आपण जपानी माणसं आत्महत्या का करतात इकडे येऊया पुन्हा..कशाचं दडपण येत इतक त्यांना की त्या विरुद्ध कायदा करायला लागावा?

Maudee
Wednesday, July 05, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायदा करायला लागावा - असा कायदा फ़क्त जपानमध्येच नाहीये.
माझ्या माहितीप्रमाणे आत्महत्या ही आपल्याकडे ही गुन्हा आहे.


Dineshvs
Wednesday, July 05, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती अनेकजणांची आत्महत्येबद्दल मते वाचुन मला प्राणी आत्महत्या करतात त्याची आठवण आली.
देवमासे, माकडे, पक्षी अश्या आत्महत्या करत असतात. कधी अन्नाचा तुटवडा म्हणुन तर कधी जिवितकार्य संपले म्हणुन. तर कधी अनाकलनीय कारणासाठी.
मानवात हे ईंस्टिक्ट तिथुन तर आले नसेल ?


Kandapohe
Thursday, July 06, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं, आपण जपानी माणसं आत्महत्या का करतात >>>
आज शेजारी बसलेला माणुस उद्या उठुन अत्महत्या करतो इतकी गंभीर परिस्थीती नाहीये. त्यामुळे त्यावर चर्चाच का करत आहात हे मला कळलेले नाही. जागतीक आकड्यात जपान १० व्या क्रमांकावर आहे.

इथे माणसाच्या जीवाची प्रचंड काळजी घेतली जाते. आपल्या कडे होणारे ऍक्सीडेंटचे, खूनाचे, कुपोषण, दुष्काळ आणी निष्काळजी पणे मरणाचे प्रमाण इतके आहेत की लोकांना वेगळे अत्महत्या करावीच लागत नाही.
:-)

Saconchat
Thursday, July 06, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना,
ऊत्तम लेख लिहीलाय
ज़ैनाच्या अन्न-पानी त्यागाला सन्थारा व्रत असे म्हणतात.

http://www.bbc.co.uk/religion/religions/jainism/customs/index.shtml
bee, 1 japaanee yen = app. 40 paise

जपानी मानसे आत्महत्या का करतात ह्याची बाकी कारणे बरोबर वाटतात पण "अठरा विश्वे दारिद्र्य" हे कारण पटत नाही. जपानी माणसाच सरासरी पगार २००००० ते ३००००० येन असतो (७०-८०००० रुपये). त्यात दोघेही कमवत असतात त्यामुले एवढे कमालीचे दरिद्र्य असन्याची (आत्महत्या करन्याइतपत) शक्यता नसेल असे वाटते. दुसरे म्हणजे येथील सरकार बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देते (जो त्यान्चा चरीतार्थ चालवन्या इतपत पुरेसा असतो).
जर महागाइ म्हणत असाल तर मला वाटते तेथे भारता पेक्शा स्वस्ताई आहे (अपवाद जागेचा).
जर खालील उदाहरण बघीतले तर कदाचीत आपल्याला हे पटेल
तुम्ही सांगीतल्या प्रमाणे जपान मधे
Coffee चा दर २५० येन आहे (१०० रुपये). भारतात ह्या दर्जाची Coffee कमीतकमी २० रुपयात मीलते. म्हन्जे साधरन जपान मधे त्याची कींमत ५ पट अहे असे समजूयात. पन त्याबरोबर जर त्यांच सरासरी पगार बघित्ल तर तो भारता पेक्शा १० पट जादा आहे (ज़पान सरासरी पगार ७०-८०,००० रुपये, भारत सरासरी पगार ७,००० ८,००० रुपये, ह सरासरी पगार आहे बरे का ईट पगार नाही :-) ). हे जवलपास सगल्याच बाबतीत लागू पडते (जागेचा भाव सोडून) दुसरे असे कि येथे भारता पेक्शा टक्स देखिल कमी आहे (१०-१२%).
ह्याउलट येथील सम्रुद्ध सम्पन्नत जीवन पदोपदी जानवते. कोनतेही रेल्वे स्थानक बघा कींवा साधा रस्ता बघा. अतिशय सुन्दर सजवलेला असतो.
मला तरी येथिल गरीबी कुत्रिम वाटते. म्हणजे स्वत ओढून घेतलेली. गरज, ऐपत नसेल एवढे कर्ज घेयचे, ते परत देता येत नाही असे लक्शात आल्यावर दोरीला टानगुन देयचे. भारतात पन हे गरज, ऐपत नसताना लोन घेयच लोण खुप वाढत आहे. दुसरे आत्मह्त्येचे कारन कमालीचे एकाकी पन हेच वाटते. येथे "प्रेम विवाह" आता बर्यापैकी रुढ झाले आहे. त्यामूले जवलपास सगल्यांना स्वताच जोडीदार शोधावा लागतो. अशावेलेस जर योग्य जोडिदार सापडला नाही तर कमालीचे नैराश्य, दडपन येत असावे. एखाधा सापडलाच तरी जर त्याने/ तिने सोडून दिले तर परत एकाकीपन... आपन इतरान्च्या योग्यतेचे नाही अहोत हा कमलिचा
inferioty complex...
म्हतारपनात सुधा एकटे राहील्यामुले येनारे एकाकीपन हे सुद्धा मुख्य कारन असू शकते

P.S. पहील्यान्दाच काही लिहीत अहे. चूकानबद्धल माफ़ि






Rahul16
Thursday, July 06, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

some info on japan...

wel asalyas wacha...

http://www.thejapanfaq.com/FAQ-Primer.html

Limbutimbu
Thursday, July 06, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सकोनचॅट, तुझ्या आयडीचा उच्चार कसा करायचा? :-)मला जसा जमला तसा केला उच्चार, चूक असेल तर बरोबर काय ते सान्ग!
चान्गल लिहिल हेस :-)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators