|
Pinaz
| |
| Tuesday, June 06, 2006 - 12:24 pm: |
| 
|
मुलाने काळजी घेतली नाही तर त्याला सुद्धा शिक्षा मिळू शकते >>>> वा ग वा राधा. तु कशाला करतेस BB close? मुलांना शिक्षा होत नाही आणि मुलांच्या स्वैर वागण्याची शिक्षा मुलींना मिळते अशीच तर चर्चा चालू आहे ना? बलात्कार केलेल्या किती नालायकांना शिक्षा मिळते सांग बरे?
|
Storvi
| |
| Tuesday, June 06, 2006 - 4:08 pm: |
| 
|
बस क्या इधरीच तो विषय सुरु हुव्या ना, फ़िर इधरीच आके क्लोज क्या? 
|
Malavika
| |
| Tuesday, June 06, 2006 - 5:55 pm: |
| 
|
मुलीन्नि कमी कपडे घातले म्हणजे तिच्यावर कशाही कमेन्ट्स करायला मुलान्ना मोकळीक! मुलीन्च्य शरीराबद्दल असा विचार क केला जातो? मुलान्च्या शरीराबद्दल नाही? तोकडे कपदे घालणे म्हनजे स्वातन्त्र्य नव्हेच पण कोणाला घालायचे असतील तर अशा प्रव्रुत्तीन्ना घाब्रून का रहावे लागते हा खरा प्रश्न आहे.
|
Meggi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 8:35 am: |
| 
|
मालविका, योग्य शब्द वापरलास ' प्रवृत्ती ' . पण या प्रवृत्ति च्या बळि फ़क्त मुलिच असतात क? अशिअ प्रवृती फ़क्त पुरुषांमध्येच असते का? माझ्या मित्राचा एक अनुभव. churchgate station वरुन रात्री ११.३० १२ वाजता परत येत होत ऑफिस मधुन. एक बाई समोरुन आली आणि सलगी करायला लागली. पैसे मागु लागली, आणि पैसे न दिल्यास पोलिसाला बोलवेन अशी धमकि दिली. माझ्या मित्राने धूम ठोकलि तिथुन.. कसाबसा सुटला तो.. या घटना अपवादने नाही, सर्रास घडतात. इथे वाईट प्रवृत्ति कोणाचि दिसुन येते? आणि त्याला बळि कोण पडतयं? निरपराध लोकांना त्रास देणे, त्यांच्य व्यक्ती स्वतंत्र्यावर घाला घालणे, त्यांच्या परिस्थितिचा फ़ायदा घेणे हि एक प्रवृत्ति आहे, आणि या प्रवृत्ति चे बळी स्त्री प्रमाणे पुरुष देखिल असतात. hostel मध्ये होणार घृणास्पद reagging , खुन, दरोडे, लुटमार यातुन पुरुष देखिल तितकाच असुरक्षित आहे असच दिसुन येतं. नेहमि स्त्री-पुरुष समानतेवर बोलणार्या आपण मुली, जेव्हा सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा फ़क्त स्त्री किती सुरक्षित आहे यापेक्षा समाज किती सुरक्षित आहे याच विचार का नाही करत? समाजात फ़क्त तोकडे कपडे घातलेलि स्त्री नाही, तर सर्वच स्त्रिया आणि पुरुष असुरक्षित आहेत. त्यामुळे समाजात होणार्या गुन्ह्यां साठी सरसकट पुरुषानां जबाबदार धरणं मला पटत नाही.
|
Deemdu
| |
| Wednesday, June 07, 2006 - 9:00 am: |
| 
|
तर सर्वच स्त्रिया आणि पुरुष असुरक्षित आहेत >>>> ह्याचा ratio द्या हो जरा
|
Meggi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 10:26 am: |
| 
|
उद्या आपले भाऊ, वडील, नवरा यांच्य बाबतित पण काही झाल तर ratio मागायचा का? '१० मुलिंचे rape होतात, तर माझ्या भावाचे हात-पाय तोडले गुंडांनी तर काय फ़रक पडतो.. १०:१ चा ratio तर आहे.. ' असा विचार मी तरी नाही करणार. बस मध्ये बॉम्ब फ़ुटतो, तो प्रवास्यांच ratio बघुन नाही.. दिवसा-ढवळ्या खुन पाडुन घरफोडि करणारे लोक स्त्रि-पुरुष बघुन लुटमार करत नाहीत... जो पर्यंत समाज असुरक्षित आहे, तो पर्यंत स्त्रिया पण असुरक्षित असणार. UAE मध्ये गुन्ह्याचं प्रमाण जवळ जवळ शून्य आहे. कारण इथे लोक कायद्याला घाबरतात. पोलिसाला लाच द्यायचि कोणाचि हिम्मत होत नाही. इथे सर्व समाज सुरक्षित आहे. त्यामुळे साहजिकच स्त्रिया पण सुरक्षित आहेत. जिथे वाईट प्रवृत्ती या कायद्यापेक्षा जास्त प्रबळ आहे, तिथे स्त्रि-पुरुष दोघेहि असुरक्षित आहेत. आणि जिथे कायदा प्रबळ आहे तिथे सर्व समाज सुरक्षित आहे, येवढच मला म्हणायचं आहे.
|
Moodi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 10:41 am: |
| 
|
मेग्गी नुसताच कायदाच नव्हे तर जिथे कायद्याला मानणारे अन तो पाळणारे लोक असतात तिथे गुन्हेगार दबुन राहतीलच. पण आश्चर्य हेच वाटते की पाश्च्यात्य देशात सुद्धा लोक काटेकोरपणे कायदा पाळतात तरी तिथे असे गुन्हे घडतात. युकेमध्ये मुलींना पळवुन नेणाचे किस्से तर सर्रास घडतात. इथे रस्त्यांवर( अमेरीकतही आहेतच हे) अन बहुतेक ठिकाणी गुप्त कॅमेरा लावलेला असतो, पण एका नको तिथे डोके वापरणार्या गुन्हेगाराने एका मुलीला तो cctv ज्या २ ठिकाणी होता त्यातल्या मधल्या अंतरात पकडुन पळवले, मग कॅमेर्यात त्याचा फोटो कसा येणार? गुन्हेगार प्रत्येक ठिकाणी फार लक्ष ठेवुन असतात. अगदी निष्णात वकील सुद्धा फिका पडेल अशा नवीन क्लुप्त्या दरवेळेस गुन्हेगारांकडुन वापरल्या जातात. शेवटी जपुन रहाणे, अनोळखी लोकांपासुन सावध रहाण्याचे प्रशिक्षण आपल्या मुला मुलींना देणे हाच पर्याय उरतो.
|
Chingutai
| |
| Wednesday, June 07, 2006 - 11:31 am: |
| 
|
मेगी, ............गुन्ह्याचं प्रमाण शुन्य टक्के आहे.......... असं नाही, इथल्या प्रसिद्धी माध्यमांवर बंधने आहेत. शिवाय भारतातल्या लोकशाहीशी इथल्या राजेशाहीची तुलनाच होवु शकत नाही. -चिंगी
|
माझा मुख्य रोख आहे तो ह्यावर की अन्न्याय अत्याचार कुणावरही होवो, दोष फक्त स्त्रीलाच दिला जातो. मेग्गीने जो तिच्या मित्राचा अनुभव दिला आहे, त्यात असे कुणीही म्हणणार नाही की एवढ्या रात्रीपर्यंत त्याने ऑफिस मधे कशाला था.म्बावे? पण तिथे एखादी मुलगी असती आणि तिला अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागले असते तर बाकी प्रत्येकाने आधी भिंग लावून तिच्या चुका शोधल्या असत्या.
|
Storvi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 7:49 pm: |
| 
|
हे बाकी खरं चंद्रकोर
|
chandya >> Until we achieve that, the freedom of expression through fashion would have to be limited. All of a sudden why do you guys start caring about practicality when it comes to such topics?
|
Mekhala
| |
| Thursday, June 08, 2006 - 3:46 pm: |
| 
|
अगदी बरोबर चंद्रकोर. एकदम पटलं.
|
Pinaz
| |
| Friday, June 09, 2006 - 9:01 am: |
| 
|
चंद्रकोर खरे आहे तुझे.. आणि कोण मॅगी की मेग्गी.. खुन दरोडे आणि स्त्रीविषयीचे लैंगिक गुन्हे एकाच मापात मोजता येतील का? इतर गुन्हेगारांनाही सोडू नका. पण विषय वेगळा आहे ना? फाटे का फोडता? आणि राधाबाई कुठे आहेत? BB बंद करुन पळाल्या वाटते कृष्णाची मुरली ऐकायला? divaa ghyaa ho baaeesaaheb. 
|
Simeent
| |
| Friday, June 09, 2006 - 11:26 am: |
| 
|
तुम्हा बायकांचे सर्व खरे आहे पण मग ह्या कवितेबद्दल काय? हेही खरेच आहे की. If he is late for class,he’s told, “Time and Tidewait for none”. If I’m late,then the bus was late. If a girl is dressed as a boy,she is modern,says the world. But if a boy is dressed as a girl,”Has he escaped from the Zoo?” If a boy talks with a girl,”I think he is trying for her” But if a girl talks with a boy,then she is trying to be friendly. When a girl cries,the world is convinced of her But when a boy cries,”Come on man:Don’t be a girl”. If a girl meets with an accident,then it’s the mistake of others. And if a boy meets with an accident,”I think you should learn to drive”. If a boy sits in front of a city bus,he is mannerless and cultureless brute. But if a girl sits in the back seat,”Try to respect ladies,man!”. If a boy gets a big rank in an entrance exam,”You’ve to work hard”. But if a girl gets a big rank,we’ve still got 33! Reservation. If there are girls in a class,the professor gives an interesting lecture, And if there are no girls,he says,there is no class today. If a girl does not answer,during a viva,then atleast ‘smile’ says the examiner. But when a boy does not answer,”better luck next time”.
|
Storvi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 5:46 pm: |
| 
|
I think this is relevant .. 
|
Mavla
| |
| Sunday, June 18, 2006 - 8:12 pm: |
| 
|
समाजातील स्त्री स्वतंत्र्य.. नेहमीचा आणि वादाचा मुद्दा. आम्ही यात थोड सहभागी होवु या विचारने एथे लिखाण.. खरतर ईकडे हे लिखान ताकायला उशिरच झला पन तरिही लिहिल्या वचुन रहवेना म्हनुन... लिहाणाच्या चुका, चु. भु. द्या.घ्या. विषयाची सुरुवात एका छान लेखाने झाली आहे. मुळात स्त्रि-स्वतंत्र्य, याचा अर्थ स्त्रिया कशा घेतात, यातच मोठा वादंग आहे. या लेखात खुप छान छान मते मांडली गेली आहेत. पण यातला गर्भित अर्थ खरच आपल्या मना पर्यन्त पोहोचला का? हा प्रश्न आहे. किति वेळा खरच स्त्रिया, या जगन्या साठी गरजेच्या हक्का विशयी भांडतात, आणि किती वेळा फ़क्त पुरुषी बरोबरी साठी भंडतात? मान्य आहे, स्त्रि वर अन्याय होतो, तिच्या हक्कांबाबत हेळ्सांड होते, पन ती स्वताहा किति सजग आहे या विशयी? दिलेले किती हक्क आपण स्वतहा वापरात आणले आहेत हे ति स्वतहा कधी बघते का? राष्ट्रघटणेनेच स्त्रियान्ना "मतदानाचा" हक्क पुरुषाच्या बरोबरिने दिलाय, या पेक्षा वेगळ उत्तम उदाहरण काय असु शकेल?? पण किती वेळा त्या स्वत: या बाबत जागरुक असतात? खरच स्त्रियांना स्वतंत्र्य म्हने नक्कि काय हवय? हे त्यान्नातरी किती वेळा निट कळतय? मुलांशी बरोबरी, म्हणजे स्वतंत्र्य का? की सिगरेट, दारु पिणे म्हन्जे स्वतंत्र्य? खरं सांगायच तर, मुलां पेक्षा नक्किच मुलिंन्ना खुप बंधनात वाढवल, जातं, या माताशी सहमत आहे, आणि मुलिन्ना मुळातच घारतुन खुप कमी स्वतंत्र्य दिलं जातं या विचाराला मी अगदी तथ्य माणतो. वयात येतानाच, कपद्यांची नियमावली, संस्कारांची नियमावली, जबाबदरींची नियामवली वेगवेगळी आहे. मुलांन्नी बेकदरपणे, रत्रिचे हिंडणे "खपवुन घेतले जाते", पन मुलीने मात्र "७ च्या आत घरात". कारण एकच भिती, तिच "चारित्र्य" ..... मुळातच, मुलिन्न टौंट मारले जाणे, तिच्या कपद्या वीशयी कमेंट पास करणे, तिच्या कडे फ़क्त मादी य नजरेने बघने, कामाच्य, सार्वजनिक ठिकानी, शारिरिक लगट, द्विअर्थि शब्द, निअर्निराळ्या प्रकारे, तीची नेहमिच पिळवनुक होते आणि हे सत्य आहे. समाजतले ४ पुरुश सभ्य असले म्हनेजे समाज सभ्य आहे असा अर्थ नाहि होत. जो पर्यन्त ती कुठल्याही भिति आणि अन्याया विना जो पर्यन्त ती समाजात वावरु शकत नाही तो पर्यन्त ती नक्किच बंधनात आहे. पण मला सांगा, याला फ़क्त पुरुषच जबाबदार आहे का? मुलिला नियम लादन्यात फ़क्त वडिल, भाउ च कारणीभुत आहेत का? त्या वेळी तिचि आई म्हणनारी "स्त्रि" नाहि का लादत हि सर्व बंधने, तिच्यावर? तिला नसते का जाणिव आपल्या मुलिच्या हक्कची? पण बिचारी ती तरी काय करणार? रोजच्या ताज्या बातम्या पाहुन तीच तिला नियमांना बंधुन देते. आणि हेच तथ्य आहे, कि सामजिक जानिवेच्या नजरेतुन, आम्हि अजुनहि स्त्रि ला ही बंधने घातली आहेत. गरम चहाचे झुरके घेत आम्हि मारे लाख गप्पा मारो, कि स्त्रि मुक्त झाली , स्वतन्त्र दिल गेलं, पन तिच स्त्रित्व लुटण्याची व्रुत्ती अजुन आम्हि अजुन मनातुन घालवु शकलो नाहि, अजुन ही ति एक मादी याच नजरेने ती समाजत पाहिली जातेय. नाहि म्हनायल हरकत नाहि, समाजाने तिला हक्क दिलेत, पन ते वापरायला, तीला शिकवला नाहि, आनि ति ही अजुन ते शिकली नाहि. शारिरिक मर्यादांपुढे, आनि नैसर्गिक विशमते मुळे त्ती अजुन ही मागेच आहे. खर सांगायच तर आंही अजुनही आमच्य मुलाना, स्त्रि कडे निकोप, निर्मळ द्रुष्टिकोणाने पहायला शिकवु शकलो नाहि. समाज समाज म्हन्जे कोन? तुम्हि आम्हिच ना? तोच तुमचा आमचा समाज अजुनही मागसलेला आहे. युगे लोटली, पन आम्हि अजुन तिथेच आहोत, जीथे, या समाजाच्या नायकाला, यथोचित परमेश्वर "रामाने" ही चारित्याच्या संशयावरुन "सितेची" "अग्नी परिक्षा" घेतली. या पेक्षा दुर्दैवि आनि सम्र्पक उदाहरण काय असेल, आनि हेच आम्हि आम्ह्च्य मुलान्न संस्कार म्हनुन शिकवतोय.. की रामने सितेची अग्नि परिक्षा घेतली कारण, सिता रावणाकडे काही दिवस राहीली होती..... आजही तारुण्यात प्रवेश करनार्या किती पुरुशांच्या नजरा, या सभोवतालच्या स्त्रियांकडे स्त्रि, काकू, मावशी, आत्या, यांसारख्या निकोप नजरांतुन पहाते... नाहि ओ नाही, अजुन आम्ही तेवढे निर्मळ झालोच नाही. शरिराकर्शनाची नैसर्गिक भावना आपन समजु शकतॊ, पन वखवखलेली वासनेची नजरा किती फ़िरताहेत? आमच्या कडे आम्हि एकच शिकलो, मुलाने बाहेरख्याली केली तर ती खपवली जाते, अगदी सामन्य घटणा म्हनुन पाहिली जाते, त्यात नविन काय? असा प्रती सवाल होतो, त्याची हि जग जाहिरी, म्हन्जे त्याचा पुरुश असल्याचा रुबाब समजुन मान्य होतो, आनी जरा कुठे आमच्या मुलिंचे पाय घसरलेकी, "शेण खाल्ल?, घरच्यांच तोन्ड काळ केल?" ..... मला सांगा हा कुठला न्याय? तिच्या शरिरिक सुखाच्या गरजांचि जेंव्हा ती वाच्यता करते तेन्व्हा ती "वेश्या"? काय करणार, आम्ही वर्शानुवर्श असेच घडलो. पुरुश प्रधान संस्क्रुती म्हने? स्त्रिच स्वतन्त्र म्हनजे, शरिरिक नव्हे, तर मानसिक, आनि सामजिक सुरक्शितेतिल सन्मान, स्वातन्त्र, स्वावलंबन, सुचिता, वैचारिक शुध्धी, निर्मळ द्रुष्टिकोन... य सर्वांचा तो मिलाप आहे. तो हवाय. पण तो कधि मिळनार? क्रांती कधी होनार? या सामाजच्या नक्किच काहि काळ्या बाजु असतिल, पन हेच सत्य नव्हे . . . समाजतिल असे अनेक हात आहेत जे स्त्रियन्न घडवताहेत ,स्त्रि स्वतत्र्य, शिक्शन, स्ववलंबन,.. तिचे हक्क तिला दिले गेलेत.... पन अजुन तिल ते नीट्स उमगलेला नाहि, त्यांचा वापर तिला पुर्न पणे जमला नाहि. तो मात्र तिने शिकायल हव.. दारु पिन्यास मुभा, सिगरेट ओढन्यास होकार, कमी कपद्याची परवाणगी, म्हन्जे स्वतन्त्र्य नक्किच नव्हे, तो त्याचा एक भाग म्हनु हवा तर. खरतर आम्हला स्वतहाला आतुन निर्मळ होन्याची गरज आहे. पुरुषाने केली तर "लीला", आनी स्त्रिच्या हातुन घडल तरी पाप? हा नियम प्रथमता बदलायला हवा... म्हने मुलिन्नी कमि कपडे घातले तर मुलान्ना "पेटवल्याची" भावना होते... अहो तशि तर कुत्र्या, मांजरान्ना पन होते, त्या त्या प्रणि जातितल्या माद्या पहिल्या की?.... मग आम्ही स्वतहाला माणुस कस म्हणाव? का म्हणाव? तुमच्या माझ्या पैकी किति जन,बलात्कारीत स्त्री बरोबर लग्न करायला एका पायावर तायार होतील? मी तर नाहि बाबा.. , तुम्ही???? हीच अडचन आहे... आम्हि अजुन नाही स्त्रि ला निकोप पणे पाहु शकत. आम्हाला मुली हव्या असतात फ़िरवायला, नाचयला आनी कशा कशाला... पन आमची बायको, ति मात्र सती सावित्रिच हवी? वारा येवुन तिच पदर जरी नकळत चार चौघात उढला, तरी आम्हि शंकेनेच तिच्या कडे पहातो..... हे जेंव्हा बदलेल, तेंव्हा स्त्रि ला खर स्वतंत्र्य भेटलं अस म्हनायला हरकत नाही. त्या सठी आंतर्मन शुद्ध हव.. जाणिवा सम्रुद्ध आनी परिपक्व हव्यात, सामजिक जबाबदरीचे भान हवे, आत्मसंयमन हवे..., प्रगल्भ वैचारीकता हवी... नशीबाने, आशावाद हाच आहे, की आम्हि खरच चांगले होतोय, स्त्रि ला तिचे हक्क, आनि स्वतन्त्य भेटतय, नहि तर फ़ुले, जन्माला आले नसते.... (पन फ़ुल्यानी केल हे कार्य म्हन्जे संपल का? त्यात आम्हि आमच कोनतच योगदान देनार नाहि क?) समाज सुधारतोय, स्त्रि कडे पाहन्याचा द्रुस्तीकोन पन बदलतोय, पन त्याला स्त्रि आनि पुरुष या दोघांचिही साथ हवी.... जेंव्हा मी माझ्या मुलान्ना ते शिकवेन, तेंव्हा येनारी नवी पिढी सम्रुद्ध होयील.... पन प्रश्न आहे की जिथे या जमान्यात, प्रत्तेक, टी.व्ही. च्यानल वर, व्रुत्तपत्रात, जेंव्हा फ़क्त उघद्या नागड्या देहाचाच मारा होतोय, तीथे तुमच्या मुलान्ना हा द्रुस्तिकोन देनार बाळकडु तुम्ही पाजु शकाल का? आणि तो ते त्याच्या रक्तात भिनवु शकेल काय? अवघड आहे... पण आशा करु.... एका थोर मानसाची गोष्ट आहे... हा थोर मानुस, जेंव्हा, त्याच्या कर्तुत्वा बद्दल आख्या विश्वात नावाजला जातो, तेंव्हा तो या महनत्वाच गुपित आई ला विचारतो, की आई, मी जो हा आहे, तो पहिले कुठे होतो गं? व्रुद्ध, आई सांगते, की बेटा तु या आधी शाळा कोलेजात होतास..., नाही नाही, त्याही आगोदर कुठे होतो? बेटा तु तेंव्ह छोटा होतास, लहान मुल होतास, आजोळी होतास.. नाही नाही, त्याही आगोदर कुठे होतो? बेटा तु खुप लहान तानं बाळ होतास..... नाही नाही, त्याही आगोदर कुठे होतो? तेंव्हा तु माझ्या गर्भात होतास... ९ महिने.... पुन्हा तेवढ्याच निरागस पणे, आई ला ती व्यक्ती प्रश्न विचारते... आई मी त्या ही आगोदर कुठे होतो? "त्या ही आगोदर???????? होय आई, त्याही आगोदर मी कुठे होतो??????????????? "त्याहीआगोदर..... तु माझ्या विचारात होतास................." आम्हाला घडवनार असा मातेचा विचार कधि होनार? असा विचार करनारी माता कधी होणार? राजे म्हणवनारे एक, ते "पुरुष" हौउन गेले, जे शत्रु कडुन जिंकुन आणलेल्य नखशिकांत सुंदर ललनेला पहुन क्षनर्धात निकोप पणे वदुन गेले, की, "तुमच्या सारख्या आमच्या आउ ही सुन्दर असत्या........... तर आम्ही ही असेच सुंदर निपजलो असतो..." स्त्रि कडे असही बघनारा तो पुरुश कधि जन्माला येनार, आणि अशा पुरुशाला जन्म घालनारी आउ कधी जन्माला येनार?.... मावळा.
|
मावळा खरच सुंदर लिहिले आहे तुम्ही. प्लीज शुद्धलेखनाच्या चुका टाळाल का? लिखाण आणखी परिणामकारक वाटेल तुमचे.
|
Pinaz
| |
| Monday, June 19, 2006 - 8:57 am: |
| 
|
काही अंशी खरंय मव्ला तुमचे. तुम्हाला कसे वाढवले जाते यावरही अवलंबून असते बरेच कहि.
|
Soultrip
| |
| Monday, June 19, 2006 - 12:31 pm: |
| 
|
सुंदर ललनेला पहुन क्षनर्धात निकोप पणे वदुन गेले, की, "तुमच्या सारख्या आमच्या आउ ही सुन्दर असत्या........... तर आम्ही ही असेच सुंदर निपजलो असतो..." >>>>> Hearing this Jeejaau might have angrily (rather,स्त्री-सुलभ मत्सराने! ) said, "Raaje!.. & what made you think I'm less beautiful?" Take it lightly folks!
|
Avinashi
| |
| Monday, June 19, 2006 - 3:40 pm: |
| 
|
Take it lightly folks!))))))))) this is absolutely nonsence thing... are u mahashtrian making such silly jokes...???
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|