|
Milya
| |
| Sunday, May 07, 2006 - 11:57 am: |
| 
|
म्हणजे काय रे मिल्या? स्वैराचाराचा संबन्ध कुठे दिसला तुला इथल्या पोस्ट मधे?? >>> स्वैराचाराला विरोधही दिसला नाही ना पन directly (आता डीजे च्या नंतरच्या post मध्ये तो आहे) मैत्रेयी तू माणुस च्या post ला उत्तर दिले आहेस की अश्या पुरुषांची संख्या जास्त आहे स्त्रियांपेक्षा पण हे कबुल नाही केलेस की अश्या स्त्रीयाम्ची संख्या निदान शहरात गेल्या दशकात वाढली आहे आणि वाढते आहे... स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करा पण एकांगी नको.... नाहीतर स्वातंत्र्याचा परीणाम स्वैराचारात ह्वायला वेळ लागणार नाही. हक्क आणि कर्तव्ये ह्या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत... तसेच आहे हे.. हे सुद्धा कोण कुठे म्हणाले रे इथे!! >>> मी तरी कुठे म्हनले की असे इथे कुणी म्हणलेय? अगदि प्रत्येक वाक्य कुणी म्हणले म्हणुन त्यावरच असायला पाहिजे का? तो माझा माझा स्वतंत्र विचार आहे तूही माझे post नीट वाच गं ~D
|
Milya
| |
| Sunday, May 07, 2006 - 12:11 pm: |
| 
|
Objection आहे अशा situation मधे पुरुष पेक्षा स्त्रीला दोष दिला जातो त्याचा , Double standrads ला ! >>> डीजे १००% सहमत... पण हे इथे ९०% लोक मान्य करतील पण ह्यावर उपाय काय आहे हे पण सुचव ना!!! समाजाची ही मनोवृत्ती कशी बदलेल? BTW तुझे १.२० चे post आणि माझे post clash झाले... त्यामुळे मी त्यावर कुठेही मत व्यक्त केले नाहीये गं
|
Dj perfect milyaa, प्रत्येक वाक्य कुणी म्हणले म्हणुन त्यावरच असायला पाहिजे का? तो माझा माझा स्वतंत्र विचार आहे>>> बरं मग ठीक आहे
|
मंडळी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझी सगळ्यांना विनंती आहे की मूडीने जी लिंक दिली आहे ती सगळ्यंनी आधी वाचा. मला नक्की काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात ये ईल. इथे हा विषय काढण्याचा उद्देश मन मोकळे करणे हा तर आहेच. पण ह्या समस्येवर काही करता येइल का हे देखील बघायचे आहे. समाज बदलणे कधीच सोपे नव्हते नाही का? पण असे जर फुले आम्बेडकर कर्वे म्हणाले असते तर? आपण त्यांच्याइतके काही करु शकत नाही हे बरोबर. पण खारी चा ही वाटा असतोच ना?
|
माणसा कुठल्या काळातला रे बाबा तु?? एथे बहुतेक चोथा रवंथ केला जातोय काही बाबतीत लोकांच्या modern च्या कल्पना वाचुन मती सुन्न होते in sarcastic sense दारु पिणे म्हणजे modern cigarett पिणे म्हणजे modern modern कपडे घालणे म्हणजे modern मुलींने हे केले म्हणजे ती वाईट, ते केले तर चांगली वगैरे वगैरे... make-up केला म्हणजे मुलगी वाईट, आणी freeodm आहे म्हणुनच लोक(मुले आणि मुली) करतात असा विचार म्हणजे निव्व्वळ दिशाभूल आहे. मी जवळुन अगदी आतील गावातून आलेल्या मुले / मुली ज्यांना बाकी काही माहीती नसेल पण cigareet ते बीडी पासुन मावा(?) का काय ते माहीती होते. पण मुलगी करते म्हणुन उगाच बाऊ. पण मुद्दा हा की स्वात्र्यंत्र आहे म्हणुन असे झाले किंवा चालले आहे असे नसते. गमतीचा भाग की hypocrisy खुप असते जेव्हा मुले vs मुली असे होते. एक किस्सा सांगायचा म्हणजे जी मुले स्वःता सिगरेट ओढ्तात त्यांना बायकोनी ओढलेली चालत नाही.. असो विषयांतर असेल तर माफ़ी असावी. बाकी ज्याने त्याने स्वःताची काळजी घ्यावी हा मुलभूत हक्क आहे. मुलगे असो वा मुलगा - हे माझे मत आहे अजुन काही गोष्टी बदलायला काळ आहे, त्यामुळे मुलीने जमेल तेवढी independant,strong असावे. बाकी मुलगा Vs ंउलगी स्वात्रंत्र्य हा चोठा विषय आहे.
|
Storvi
| |
| Tuesday, May 09, 2006 - 10:51 pm: |
| 
|
मी तो लेख वाचला पण फ़ारसा काही पटला नाही. त्यातली एकच गोष्ट पटली म्हणजे मुलांना ( आपल्या संस्क्रुतित ) वडील शारिरीक वाडई बद्दल माहिती देत नाहीत आणि ती त्यांना बाहेरून मिळते. ह्या पलिकडे फ़ारसे तथ्य मला नाही वाटत त्यात आहे. निदान महराष्ट्रात तरी मुलं मुली दोघांवर जबाबदारी असते शील जपण्याची. मला अशी अनेक कुटुम्बे माहित आहेत, की ज्यांच्याकडे अगदी college ला जाणार्या मुलांनीदेखिल मुलींशी बोललेलं देखील आवडत नाही. बरीच मुलं college मध्ये असतांना मुलींशी बोलायला चाचरतात. ह्यात personality चा भाग आलाच पण upbringing चा ही आलाच. सांगायचा मुद्दा हा की अशी बंधनं दोन्ही कडे असतात, अणि ह्या बाबतीत मुक्त विचारही दोन्ही कडे असतात. आनि कोण म्हणतं मुलांना जाब विचारणारे कोणी नाही म्हणुन? बाहेर काहीही केलं तर तुमच्या आमच्यासार्स्ख्यांचे आई - वडील ऐकुन घेतिल की काय? माझे तरी नाही बाबा घेणार ऐकुन. फ़रक इथे आहे की अगदी समजा बाहेर काही केले तर नंतर त्या मुलाची तितकी हानी socially होत नाही जितकी मुलीची होते. त्यमुळे विशय हाताळायचाच असेल तर मुलींबद्दल social acceptance चा हाताळा. Don't get me wrong. I am the most liberal, leftist, feminist person you will perhaps ever meet पण तरीही मुलांना जबाबदारीशिवाय वाढवतात हे काही पटलं नाही बुवा. आणि बदलायला हवे आहे ह्यात वाद नाही. जोवर स्त्री ही ' मुक्त ' करायची वस्तु आहे असे वाटते तोवर, तिला स्वातंत्र्य ' दिले ' अशी वाक्यरचना होते तोवर तरी स्त्री खर्या अर्थाने मुक्त होणार नाही. आणि हा प्रयत्न तिनेच करायला हवा. आपल्या drawing room मध्ये बसुन इतर चार सुशिक्षीत, सुजाण लोकांना पटवुन देताही येइल पण practically विचार केला तर पूर्ण समाजात अशी क्रांती होणे ह्याला फ़ार काळ जावा लागेल अजुन आणि मिल्या अरे जर खुप वर्षे लागणार असली तर काय रे बिघडलं? लागेनात? थेंबे थेंबे तळे साचे! वेळ लागेल म्हणुन सुरुवातच नाही करायची? हेही काही पटले नाही.
|
Aschig
| |
| Wednesday, May 10, 2006 - 4:52 am: |
| 
|
shilpa, mt, dj well said. The situation won't change until females are proud that they are females. s-e-x determination is banned in india, yet inall western and northern states (including maharashtra) the female/male ratio has been alarmingly deteriorating. To me this is an indication of lack of self-respect amongst (a large fraction of) women. Men will continue to oppress women so long as women will allow them to. They have to get their freedom by force. And that should really start in every home. People who agree (both sexes) should use their drawing rooms to talk to their parents and siblings about this. Revolutions begin at home.
|
पेशवा शी काही अंशी मी सहमत आहे. आपण ईथे कोणत्या स्वातंत्र्याबद्दल बोलतो आहोत? अमूक प्रकारचे कपडे घालण्याचे? अमूक वस्तू खाणे किंवा पिणे याचे? स्वातंत्र्य हवे विचारांचे, स्वत्:ला घडविण्याचे...जर तुम्ही सक्षम असाल तर त्यामधे तुमचे स्री वा पुरुष असणे आड येणार नाही. गार्गी, मैत्रयी पासून आनंदी गोपाळ ते किरण बेदी, मेधा पाटकर, अरुंधती रॉय, कल्पना चावला आणि अशा हजारो स्रियांनी ते सिद्ध केलयं स्वबळावर! अगदी याच विषयावर काही वर्षापूर्वी 'नोट ओन्ली मिसेस राउत' हा सिनेमा आला होता, अतिशय साधा आणि समर्पक! -चिंगी
|
Bee
| |
| Wednesday, May 10, 2006 - 5:36 am: |
| 
|
माझ्यामते मुलांवर देखील आईवडील बंधने ठेवतात पण मुले ती फ़ेटाळून लावू शकतात जर त्यांना त्या बंधनांचा त्रास होत असेल तर. अशी नावडलेली बंधने जर मुलांनी फ़ेटाळून जरी लावली तरी आईवडील खूप काही प्रयत्न करून मुलाला धारेवर आणत नाही. पण मुलींच्या बाबतीत दोन गोष्टी बघितल्या त्या ह्या की मुली एक तर बंधनमुक्त फ़ार लवकर होत नाहीत. केलेच जर प्रयत्न बंधनातून बाहेर येण्यासाठी तर आईवडील, बहिण भाऊ, शेजारी, समाज सगळेच जण तिच्याविषयी बोलायला लागतात. मुलींचे वागणे नजरेस लवकर पडते पण मुलांचे पडत नाही. पण मला एक वाटते, हा कपड्यांच्या मुद्दा, दिसण्याचा मुद्दा खरच इतका गंभीरपणे का घ्यावा. काय पडले आहे त्या दिसण्यात आणि नटण्यात. त्यापेक्षा करीअर साठी पुढे आलेली मुले मुली ह्यांचे विचार केंव्हाही मला पटतात. माझ्या बहिणीच्या मुलीला एक स्थळ आहे, ती १२ वीला आहे. तिचे लग्न चांगल्या मुलाशी जुळते आहे मात्र तिला निदान पदवी तरी आपण घ्यावी असे वाटते आहे. घरचे मला तिला विरोध करत आहेत. पण मला वाटते, पदवी घेतल्याननंतर तिचे आणखी भले होईल. अशावेळी बंधनातून मुक्त होणे केंव्हाही बरे असे मला वाटते.
|
Maitreyee
| |
| Wednesday, May 10, 2006 - 11:56 am: |
| 
|
स्वातंत्र्य हवे विचारांचे, स्वत्:ला घडविण्याचे...जर तुम्ही सक्षम असाल तर त्यामधे तुमचे स्री वा पुरुष असणे आड येणार नाही. >>>> त्याच स्वातन्त्र्याब्द्दल बोलत आहोत पण काही लोक उगीच त्यात as usual पिणे, तोकडे कपडे हे मुद्दे आणत आहेत हाच प्रॉब्लेम आहे! आणि तो Not only Mrs Raut चित्रपट मात्र का लोक डोक्यावर घेत होते ते कळले नाही मला! मला तरी फ़ारसा पटला नव्हता त्या बाईला स्वतच्य मुलीची जबाबदारी पेलता आली नाही असेच माझे मत झाले ते पाहून.. असो. हा वेगळा विषय आहे. स्तोरवी, आशिष good posts .. माझेही असे मत आहे की आपल्या पिढीने तरी असे आदर्श आपल्या मुलांना शिकवले तर निदान पुढच्या पिढीवर तरी 'ही क्रान्ती अशक्य आहे' असे म्हणायची वेळ येणार नाही. क्रान्तीसाठी काळ जावा लागेल हे खरे पण कुठेतरी सुरुवात केल्याशिवाय नुस्ता काळ गेला म्हणून आपोआप क्रान्ती होणार नाहिये हे ही खरे!
|
Bee
| |
| Thursday, May 11, 2006 - 2:52 am: |
| 
|
गार्गी, मैत्रेयीचे मी फ़क्त नाव ऐकले आहे. त्यांची महती मला माहिती नाही. मिसेस राऊत बद्दल माझेही मत मैत्रेयी प्रमाणेच आहे. खूप वर्षांपूर्वी उंबरठा चित्रपट आला होता. तो चित्रपट बर्यापैकी प्रेरक होता. चिंगे, स्वातंत्र्याची तू केलेली व्याख्या खूप आवडली आणि पटली देखील.
|
Ajjuka
| |
| Thursday, May 11, 2006 - 6:02 am: |
| 
|
DJ, Maitreyee, sto... patale. pan discussion madhe navin kahich ghadat nahiyet. streela swatantrya kiti asave he tharavane, tine kaay kele asata/nasata swatantryacha sadupayog athava durupayog mhanane ya goshtich mulat chukichya aahet. kuthalyahi vyaktila jovar aapan pratham maanus ani mag stree kinwa purush ase baghayala jovar shikat nahi tovar stree swatantra aahe, ata tila kititari swaatantrya aahe he mhananyaat kahihi arth nahi. he baghu shakat nahi mhanunach swatache smoking, drinking, ratriberatri bhatakane khatakat nahi pan muline tech kele tar khatakate.. kharatar konihi kele tari khatakayala have.. he hot nahi mhanunach ata navaryanna swaiapakatali kame karavi lagatil asa dukkhi soor aiku yeto. he hot nahi mhanunach ekhadya careerist mulicha navara kasa bichara aahe ani sansaar kasa khadatar chalu aahe he chitra rangavun rangavun dakhavale jate. Tine kelela swaipak ha prachand vinodacha vishay hoto aani tyapudhe tiche kartutv kami manale jate... ase ajun anek mudde aahet je mi swataha roj face karate.. sarv mudde streeyanchyach bajuche aahet asehi nahi.. pan sadhya evadhech.. atta palayala have
|
स्वातंत्र्याचा एक अर्थ माझ्यामते असा आहे की आपल्याला निर्भयपणे जगता यायला हवे. संध्याकाळी ७ नंतर घराबाहेर पडण्याची ज्या देशातल्या निम्म्या लोकसंख्येला भीती वाटते, तो देश खरेच स्वतंत्र आहे का? गरज स्त्रीमुक्तीइतकीच पुरुषमुक्तीची सुद्धा आहे. पुरुषांना सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स पासून मुक्त केले पाहीजे. आणि स्त्रीयांना इनफ़िरिऑरिटि कॉम्प्लेक्स पासून.
|
चन्द्रकोर.. you are right !!! हाच मुद्दा घेउन मी... नविन thread सुरु केला होता... मैत्रेयी चे म्हणने पण पटले मला...
|
Soultrip
| |
| Friday, May 26, 2006 - 8:49 am: |
| 
|
I sincerely believe that women should follow some self-determined decorum about dressing up (or, rather in dressing down). BY NO MEANS this supports burkha-clad women! The argument that boys/men should control their feelings (when girls have dressed up scantily) is very lame. If I consider ‘clothing’ as an upward step in the civilization, I see every scantily dress as a step backwards. (Now I know, scantily dress is a very vague term. But just as an example, all sane men & women will agree that a nice skirt is ok, but a micro-skirt is Not. Or, a bare-chested Salman is not.) I also see this scantily dressing (by women as well as men) as a retro-step towards animaldom. (ok, there is no such word. But you understood what I mean). So if the female of the species is hell-bent on dressing down (& determined to flaunt) , it is but logical that the act will certainly arouse the animal-instincts of male of the species. Not direct, but still relevant example of this is the public frenzy over Rakhi Sawant’s act & dressing style at a Kolhapur program. If she is gyrating like an animal with deliberate wardrobe malfunction, the public is bound to respond in the same manner, the befitting animal way! If you want to cat walk flaunting your lowly tattoo in a low-waist jeans, don’t complain if you get cat calls, whistles or lewd remarks. In other words, it is in line with Newton’s third law: For every action, there is an equal & opposite reaction. So, caveat emptor! Need one say more???
|
वा! म्हणजे एखाद्या मुलीने उकडते म्हणून कमी कपडे घातले तर तमाम पुरुषांनी तिला ग्रुहित धरलेच पाहीजे. नाही का?
|
मला सगळ्यान्च्याच सगळ्याच पोस्ट मधल थोड थोड पटत! मागे सौन्दर्य स्पर्धान्च्या निमित्ताने की कुठेतरी वस्त्रान्बद्दल चर्चा झाली होती, मला वाटते की श्रीनी बरोबर विषय रन्गला होता, मला त्याची लिन्क सापडत नाही हे! आणि तो बीबी वाचल्याखेरीज इथे मत टाकणे अवघड जात हे! प्लीज कुणी देऊ शकेल का ती लिन्क? तो बीबी वाचला तर वरच्या पोस्ट्स्च्या एकत्रीत वाचनामुळे माझा जो वैचारीक गोन्धळ उडालाय तो थोडा कमी व्हायला मदत होइल आणि मग काही लिहिता येइल! 
|
Soultrip
| |
| Wednesday, May 31, 2006 - 6:35 am: |
| 
|
उकडते म्हणुन सुद्धा बरेच सुसंस्कृत तरुण ( your truly included ) शर्टचं वरचं बटन ही काढत नाहीत्; मग उकाड्याची सबब पुढे करुन तोकडे कपडे घालण्याचा मुलींचा हट्ट का??? आणि परत कोण्या टपोरीने सवंग comments pass करु नये हा दुहेरी हट्ट बरोबर आहे का?? When in Rome, live like Romans. जैसा देश वैसा वेष असं ही म्हटलयच ना???
|
Deemdu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 9:28 am: |
| 
|
OK जर एखाद्या अश्या कमी कपडे घातलेल्या मुलीकडे बघुन जर एखाद्या मुलाने किंवा त्याच्या group ने वाईट comment पास केली तर ती मुलगी वाईट आहे कारण तिने कपडे चांगले घातले नाहीत, पण हेच जर उलट झाल आणि अश्या कमी कपड्यावाल्या एखाद्या मुलाची छेड जर मुलीने काढली तर मात्र ती मुलगी वाईट अस का? त्या वेळीही त्या मुलालाच दोष द्यायला हवा ना की मुलीला !!!!!!! कृपया याचा अर्थ मी मुलींनी घातलेल्या कमी कपड्याच समर्थन करतीये असा अजिबात घेऊ नये मी फक्त एकाच प्रसंगाचा दोन्ही बाजुंनी होणारा परिणाम समोर आणायचा प्रयत्न केला आहे
|
Soultrip
| |
| Wednesday, May 31, 2006 - 9:45 am: |
| 
|
"अश्या कमी कपड्यावाल्या एखाद्या मुलाची छेड जर मुलीने काढली तर मात्र ती मुलगी वाईट अस का?" ...त्याना कोणीही वाईट बिल्कुल म्हणणार नाहीत, म्हणत नाहीत. (फार तर 'आगाऊ' म्हणतील I remember how some of my friends were scared of SNDT girls!)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|